Tumgik
#महाराष्ट्रीयन
marmikmaharashtra · 27 days
Link
https://marmikmaharashtra.com/the-movie-sriyut-non-maharashtrian-which-comments-on-corruption-in-recruitment-will-hit-the-audience-on-september-6/
0 notes
jainshilp · 1 month
Text
0 notes
sheetalkitchen · 2 months
Video
youtube
महाराष्ट्रीयन टमाटर प्याज की चटनीtomato onion chutney #food #trending #r...
0 notes
100newsup · 3 months
Text
'Sarfira': अक्षय, राधिका मदान का मजेदार वेडिंग ट्रैक 'चावत' हुआ रिलीज
मुंबई: अक्षय कुमार और राधिका मदान अभिनीत बहुप्रतीक्��ित फिल्म ‘सरफिरा (Sarfira)’ के निर्माताओं ने भावपूर्ण गीत ‘खुदाया’ रिलीज करने के बाद, मजेदार विवाह गीत ‘चावत’ का अनावरण किया है।’चावत’ शीर्षक वाला यह महाराष्ट्रीयन थीम वाला गाना इस सीजन के हर उत्सव का मुख्य आकर्षण बनने का वादा करता है। अपने एक्स को लेते हुए, अक्षय ने प्रशंसकों को एक नए गाने के वीडियो के साथ ट्रीट किया और पोस्ट को कैप्शन दिया,…
0 notes
iloveindia-club · 3 months
Text
Deewan Khana
Deewan KhanaService options: Has all you can eat · Serves vegetarian dishesAddress: 1265, In Premises of Hotel Central Park, Apte Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004जंगली महाराज रस्त्यावरील हाॅटेल दिवान खाना अस्सल महाराष्ट्रीयन व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठीचे ठिकाण
youtube
View On WordPress
0 notes
currenthunt · 7 months
Text
लक्ष्मी मुर्देश्वर पुरी ने मुंबई में "स्वैलोइंग द सन" नामक अपनी पुस्तक लॉन्च की
- संयुक्त राष्ट्र की पूर्व सहायक महासचिव लक्ष्मी मुर्देश्वर पुरी ने मुंबई में अपनी पहली पुस्तक "स्वैलोइंग द सन" लॉन्च की। - यह उपन्यास उनके माता-पिता और महाराष्ट्र में उनकी जड़ों से प्रेरित है। - इस किताब में उन्होंने नायक के माध्यम से महिला सशक्तिकरण पर प्रकाश डाला है। - उन्होंने कहा कि यह पुस्तक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन संतों और कवियों के विभिन्न अभंगों से अत्यधिक प्रेरित है। Read the full article
0 notes
mishtushah · 7 months
Text
ईशा अंबानी को मिला लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवार्ड' रिलायंस परिवार को किया समर्पित
#IshaAmbani #RelianceRetailIndustry #Lokmat #IndianBusinessWomanAward
0 notes
kajoltiwari963 · 7 months
Text
Mumbai में ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ Award से सम्मानित हुईं #IshaAmbani
#ishaambani
0 notes
sneha-bahekar12 · 9 months
Text
Bridal Makeup - Sneha Bahekar Makeup Artist
महाराष्ट्रीयन सादगी🌹 she is giving his excellent Service at the To know more, book an appointment today!!
0 notes
Text
मुंबईत गुजराती लोकांची मुजोरी; महाराष्ट्रीयन लोकांना ‘नो एंट्री’
https://bharatlive.news/?p=151089 मुंबईत गुजराती लोकांची मुजोरी; महाराष्ट्रीयन लोकांना ‘नो ...
0 notes
rangcreation123 · 1 year
Text
A special variety of Kota sarees in color creations you want! Now meet the color of your choice rang in rang creation saree collection at Ulhasnagar.
0 notes
sajagbharat · 1 year
Text
'महाराष्ट्रात दलित अत्याचार'
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
buzz-london · 2 years
Text
😕😏🤨 *💥 एक पाकिस्तानी पत्रकार ट्रेन से सफ़र कर रहा था...* *सामने एक बड़ा बच्चा बैठा था...* *पाकिस्तानीने बच्चे से पूछा, यहाँ सबसे ज्यादा खतरनाक लोग कौन सी जगह के हैं ???* *बच्चा : "महाराष्ट्रीयन, पंजाबी, यूपीवाले, हरियाणवी, और सबसे ज्यादा तो गुजराती !"* *पाकिस्तानी : "ओह ~~~ इनके पास जाना डेंजरस है !"* *[कुछ देर पश्चात]* *पाकिस्तानी : "मैं कैसे जान सकता हूँ कि कौन* *कैसा व्यक्ति कितना खतरनाक है ??"* *बच्चा : "बैठा रह शान्ति से... अभी दस घंटे के सफ़र में सबसे मिलवा दूंगा...!"* *कुछ ही देर बाद हरियाणा का एक चौधरी मूंछों पे ताव देता हुआ बैठ गया।* *बच्चा : "भाई ये हरियाणवी हैं...!"* *पाकिस्तानी : "इससे बात कैसे करूँ ?"* *बच्चा : "चुपचाप बैठा रह और मूंछों पर ताव देता रह... ये खुद बात करेगा तेरे से...!"* *पाकिस्तानी ने अपनी सफाचट मूछों पर ताव दिया...!* *चौधरी उठा और पाकिस्तानी को दो कंटाप जड़े -* *"बिन खेती के ही हल चला रिया है तू...हरामजादे़ ?"* - - *थोड़ी देर बाद एक मराठी आ के बैठ गया...* **बच्चा : "भाई ये मराठी है...!"* *पाकिस्तानी : "इससे बात कैसे करूँ ?"* *बच्चा : "इससे बोल कि बाम्बे बहुत बढ़िया...!"* *पाकिस्तानी ने मराठी से यही बोल दिया...* *मराठी उठा और थप्पड़ लगाया - "साले बाम्बे नहीं मुम्बई... समझा क्या ?"* - - *थोड़ी देर बाद एक यूपी वाला सामने आकर बैठ गया।* *बच्चा : "भाई ये यूपी वाला है...!"* *पाकिस्तानी गाल सहलाते हुए : "इससे कैसे बात करूँ ?"* *बच्चा : "इससे बोल सोनिया गांधी जिंदाबाद...!"* *पाकिस्तानी ने यूपी वाले से यही कह दिया यूपी वाले ने कसकर घूंसा मारा - "जय योगीजी, नरेन्द्रमोदी जिंदाबाद... एक ही विकल्प मोदी !"* - - *थोड़ी देर बाद एक सरदार जी आकर बैठ गए।* *बच्चा : "देख भाई ये पंजाबी है...!"* *पाकिस्तानी ने कराहते हुए पूछा - "इससे कैसे बात करूँ...?"* *बच्चा : "बात न कर बस पूछ ले कि 12 बज गए क्या ?"* *पाकिस्तानी ने ठीक यही किया...!* *पाकिस्तानी : "ओ सरदार जी 12 बज गए क्या ?"* *सरदार जी ने आव देखा न ताव पाकिस्तानीको उठा के नीचे पटक दिया...!* *सरदार : "साले खोत्या नूं... तेरे को मैं मनमोहनसिंण लगता हूँ, जो चुप रहूँगा...!"* - - *पहले से परेशान पाकिस्तानी पत्रकार बिलबिला गया !* .. *खीझ के बच्चे से बोला : "इन सबसे मिलवा दिया अब गुजराती वाले से ���ी मिलवा दो !"* . . *बच्चा बोला - "इतनी देर से तेरे को पिटवा कौन रहा है...???"* 😂🤪
1 note · View note
Text
Misal Pav Recipe | Misal Pav कसे बनवायचे | महाराष्ट्रीयन मिसळ पाव
ही कोल्हापुरी मिसळ पारंपारिक महाराष्ट्रीयन मिसळ रेसिपीची (एक लोकप्रिय मुंबई Street Food Dish) एक स्वादिष्ट मसालेदार आवृत्ती आहे जी मऊ पाव आणि कुरकुरीत फरसाण सोबत दिली जाते.
हे माझ्या अत्यंत आवडत्या Street Foods पैकी एक आहे (मुंबई स्टाईल चाट डिशेसमध्ये दुसरे) आणि माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मी सतत खात असलेली ही एक डिश आहे. Continue: https://rb.gy/tqcp7i
Tumblr media
1 note · View note
prabudhajanata · 2 years
Text
मुंबई : अनिल बेदाग : बहुमुखी प्रतिभा के राजा, रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ने हमारे दिलों पर कब्जा कर लिया है और संपूर्ण सिनेमाई दुनिया में अपने योगदान से पूरे राज्य मे तरफदारी हंसिल की है। कल रात, उन्होंने महाराष्ट्रचा फेवरेट कौन में पुरस्कार जीता, जो राज्य की प्रशंसा का सम्मान है और वह इस उच्च सम्मान के योग्य है उसमे कोई संदेह का स्थान नहीं है। वेड में एक अनुकरणीय मराठी निर्देशक के तौर पे डेब्यू करने के बाद, रितेश निर्विवाद रूप से राज्य के पसंदीदा बन गए हैं। वह कई कला के धनी है। एक प्रशंसित निर्देशक से लेके एक अद्भुत अभिनेता तक, रितेश जो भी कार्य हाथ में लेते हैं उसमें वह सर्वश्रेष्ठ साबित होते हैं। रितेश देशमुख बॉलीवुड फिल्मों में अपनी बहुमुखी प्रतिभा के लिए जाने जाते हैं। उन्होंने अपने प्रोडक्शन हाउस 'मुंबई फिल्म कंपनी' के साथ मराठी सिनेमा में भी एक प्रभावशाली जगह बनाई है, जिसने उन्हें अपने गृहनगर के करीब ला दिया है। जबकि रितेश देशमुख ने बॉलीवुड में अपने प्रदर्शन के लिए कई पुरस्कार जीते हैं। यह कोई छिपा हुआ तथ्य नहीं है कि मराठी फिल्म उद्योग में उनके काफी सारे प्रशंसक हैं। ‘लाई भारी’ और ‘मौली’ और ‘बालक पालक’ जैसी ब्लॉकबस्टर मराठी फ़िल्मों के साथ, रितेश देशमुख सच्चे महाराष्ट्रीयन और मिट्टी के लाल हैं।
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
जी -२० च्या विकास कार्य गटाची आजपासून मुंबईत पहिली बैठक
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अहमदाबादमध्ये भेट
महापुरुषांबद्दल  कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महापुरुषांबद्दल अनावधानाने केलेल्या विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामीनाला १० दिवसांसाठी स्थगिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी
आणि
महाराष्ट्र फाउंडेशनचा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर, भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार
****
जी -२० च्या भारताच्या अध्यक्षतेखालील विकास कार्य गट- डेव्हलमेंट वर्किंग ग्रुपची पहिली बैठक आजपासून मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या सर्व देशी-विदेशी पाहुण्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीनं स्वागत झालं. त्यांच्या स्वागताचे फलक संपूर्ण मुंबईत जागोजागी झळकले आहेत. गेल्या दशकामध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर जी २० मध्ये डेव्हलमेंट वर्किंग ग्रुप स्थापन झाला. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठरवलेली लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने हा समुह कार्यरत आहे.
याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
‘‘मुंबईत सुरू होणाऱ्या तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी आज २ महत्त्वपूर्ण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करताना त्यात जी २० ची भूमिका आणि डेटा यावर एक चर्चासत्र होईल. दुसऱ्या सत्रात जीवनशैलीतील बदलातून हरित विकास साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा होईल.  इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या विषयांवरही आजच्या सत्रात मार्गदर्शन केलं जाईल. या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, हस्तकला आणि नृत्य यांचाही अनुभव घेता येईल. गेट वे ऑफ इंडिया आणि कान्हेरी लेण्यासारख्या ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन या पाहुण्यांना देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याचीही संधी मिळेल.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची काल अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सीमावादावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक विधानं न करण्याची काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
महापुरुषांबद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली भुमिका स्पष्ट केली. महापुरुषांचा अनादर करण्याचा विचार आपल्या स्वप्नातही येणार नाही, मात्र आपल्या भाषणातला काही भाग सोयिस्कररित्या समाजापुढे मांडून त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं, राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांबद्दल अनावधानाने झालेल्या विधानाबद्दल काल पुन्हा एकदा माफी मागितली. याबाबत एक संदेश जारी करून त्यांनी, महापुरुषांविषयी बोलताना आपल्याकडून बोली भाषेतले शब्द अनवधानाने निघाले, यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं. शाई फेक झाल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत आपली कोणाबद्दलही तक्रार नाही, या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असं वाटतं, त्यामुळे आता हा वाद थांबवावा असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी मंत्र्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात काल बीड शहरात बंद पाळण्यात आला. शिवप्रेमींनी शहरातून याविरोधात रॅली काढली. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आलं.
****
निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहनं महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या ताफ्यात दिली गेली, असं भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारने निर्भया निधीतून २२० वाहनं खरेदी केली होती, यातली १२१ वाहनं फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबईतल्या ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली, तर ९९ वाहनं मे २०२२ मध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा ताफ्यातही याच निधीतून खरेदी केलेली वाहनं होती, असंही वाघ यांनी सांगितलं. ही सर्व वाहनं पुन्हा निर्भया पथकात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आठवडाभरात ती पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
****
शिंदे-फडणवीस सरकारनं चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात असूनही कारवाई होत नसल्याचं ते म्हणाले. महापुरुषांच्या अपमानासह राज्यातल्या विविध समस्यांप्रश्नी महाविकास आघाडी येत्या १७ तारखेला मुंबईत महामोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अनेक वर्षांच्या कालखंडानंतर होत आहे. हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं असावं अशी काँग्रेसची मागणी असल्याचं ते म्हणाले.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे, मात्र आपल्या या निर्णयाला न्यायालयानं पुढच्या १० दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून, या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयानं देशमुख यांना काल जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहणार आहे.
****
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी नवीन अभ्यासक्रमांची गरज असल्याचं मत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी काल मुंबईत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीसह जगातल्या विविध देशातले उद्योगसमूह महाराष्ट्रात ग���ंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं पाऊलं उचलावीत, असं केसरकर यांनी सांगितलं.
****
रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचं पत्र नुकतंच जारी केलं. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी काल शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.  पटेल यांचा मुख्यमंत्रिपदाचा हा सलग दुसरा कार्यकाळ आहे.
****
शिवसेना पक्षाबाबत आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेत आयोगानं ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल यासंदर्भात अधिसूचना जारी केली.
****
अरुणाचल प्रदेशात तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त आहे. नऊ डिसेंबरला झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. मात्र चकमकीनंतर दोन्ही कडचं सैन्य माघारी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीने काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्याच्या क्षेत्रात एकूण सहा, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, असे एकूण अकरा पुरस्कार यंदा दिले जाणार आहेत. भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार तर शरद बावस्कर यांच्या भुरा या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी ट्विट संदेशातून मुंडे यांना आदरांजली वाहिली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी नजिक गोपीनाथ गड इथं मुंडे यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या योजना हेतुपुरस्सर अडवल्या जात होत्या, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल हिंगोलीत बोलत होते. राज्यात शिंदे - फडणवीस सरकारचं काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून, पुढील तीन वर्षात शेतकर्यांना दिवसाही वीज मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबादमध्ये होणार्या अकराव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्र��ाश त्रिभूवन यांची निवड करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ११ आणि १२ फेब्रुवारीला शहरातल्या तापडिया नाट्यमंदीरात हे संमेलन होणार आहे.
****
विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं तर पुढं जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यावेळी उपस्थित होते.यावेळी ५० संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखांच्या एकूण १७ हजार ११९ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करत असल्याचं कुलगुरूंनी घोषित केलं.
****
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण १७१ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ४६ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
****
अन्न पदार्थ निर्मिती व्यवसायात कार्यरत असलेले हॉटेल, रेस्टाँरट, आणि इतर उद्योगांकडून पात्रतेचे निकष पूर्ण होत आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय सुरक्षित अन्न आणि पौष्टिक आहार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नागरिकांना पौष्टिक आणि सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याची खबरदारी अन्न औषध प्रशासन विभागानं घ्यावी, भेसळयुक्त अन्नपदार्थ निर्मितीवर कारवाई करुन प्रतिबंध करावा, असं पाण्डेय यांनी सांगितलं. शालेय स्तरावर ‘चला पौष्टिक आहार घेऊया’ या उपक्रमाअंतर्गत समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच शालेय शिक्षण विभागाने एकत्रित उपक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा समन्वय समितीच्या काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. १५ ते २५ डिसेंबर २०२२ हा पहिला टप्पा, तर १५ ते २५ जानेवारी २०२३ असा दुसरा टप्पा असेल. या दरम्यान नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या हुतात्मा सैनिकांच्या वीरमाता, पत्नी, पिता किंवा माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याला जिल्हा महसूल तसंच पोलीस प्रशासनाचं प्राधान्य असेल, अशी ग्वाही, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. सर्वसामान्य नागरिकांना हुतात्म्यांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी हुतात्मा स्मारकासाठी पान्हेरा या गावी जागेची पाहणी केली असून, त्याठिकाणचं काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावी परीक्षेत ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख दहा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र तसंच वीरपत्नीला जमिनीचा सातबारा वाटप गोयल यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते काल शवविच्छेदन गृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार बंब यांच्या निधीतून या शवविच्छेदन गृहासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरात काल तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शहरात थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
****
0 notes