Tumgik
#राजीनाम्याची
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेसासाठीच्या नीट परिक्षेतल्या गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परिक्षेप्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील कामकाज पुकारल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लाऊन धरली. काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.  
****
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारने आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या एन डी व्ही आय प्रणालीद्वारे नुकसानीचं मोजमाप होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी मागणी करतील तेवढा निधी मंजूर केला जाईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
पुणे पोर्शे काल अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांची आणि पुण्यात इतर पब्जवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. अंमली पदार्थांच्या सुळसुळाटामुळे पुण्याचं नाव खराब होत असून, याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणाल्या दोषी पोलिसांना निलंबित केलं असून, पोलिस आयुक्तांनी अतिशय कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला.
****
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं जामिन मंजूर केला आहे. सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयानं गेल्या ३१ जानेवारीला अटक केली होती.
****
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक वर आगमन सेवा सुरु असून, तिथून होणारी उड्डाणे आज दुपारी दोन वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
****
नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिस दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत. इरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर यांच्या माध्यमातूनच गुणवाढी संदर्भात आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती, याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय जाधव याने चौकशीदरम्यान दिली. त्याचबरोबर प्रवेशपत्र सापडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही आता कसून चौकशी केली जात आहे.
****
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा पार पडली. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा उद्या अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
****
नांदेड महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमेअंतर्गत काल दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केलं, तर ६० हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या विशेष पथकाने जुना मोंढा परिसरात ही कारवाई केली.
****
टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बर्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. 
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
Bangladesh: पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी; तणावपूर्ण वातावरणात हिंसाचार
https://bharatlive.news/?p=181235 Bangladesh: पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी; तणावपूर्ण ...
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
कायदा सुव्यवस्था हाताळण्यास राधाकृष्ण विखे अपयशी , मनसेची राजीनाम्याची मागणी
नगर शहरात आणि जिल्हयात अनेक दिवसांपासून दरोडे खून अशा घटना रोज उघडकीस येत आहेत . गेल्या वर्षभरापासून जिल्हयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नगर शहर जिल्हयात अशांत वातावरण निर्माण झालेले आहे .कधी काय घडेल याचा भरोसा राहिलेला नसल्याने लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सर्वच जण भीतीच्या वातावरण जगत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून असे प्रकार घडत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
"आम्ही दोन हजार कोटींची योजना आणली"
Tumblr media
मुंबई | हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न(Maharahstra-Karnataka Border Dispute) चांगलाच लावून धरला आहे. त्याचपाठोपाठ आता अब्दुल सत्तारांच्या(Abdul Sattar) राजीनाम्याची मागणीही विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा गेला आहे. सरकार सीमावासियांच्या पाठीशी आहे. सध्या जे सीमाप्रश्नावर बोलत आहेत, त्यांनीच सीमावासियांच्या योजना बंद केल्या. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, असं म्हणत त्यांनी दोन हजार कोटींची म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना आणल्याचा दावाही केला. अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षनेत्याच्या प्रकरणाचीही माहिती काढू आणि अब्दुल सत्तारांचीही माहिती काढू. दरम्यान, सोमवारी सभागृहात सीमाप���रश्नाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) हा भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. Read the full article
0 notes
darshaknews · 2 years
Text
सौरव गांगुली नवी सुरुवात करणार आहे का? स्वतः हा मोठा खुलासा केला आहे
सौरव गांगुली नवी सुरुवात करणार आहे का? स्वतः हा मोठा खुलासा केला आहे
सौरव गांगुलीच्या राजीनाम्याची बातमी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की, तो आता एक नवीन सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी त्याने चाहत्यांचा पाठिंबाही मागितला आहे. यानंतर गांगुली अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून तो राजकारणात नवी इनिंग सुरू करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र आता गांगुलीनेच याचा इन्कार केला आहे. गांगुली…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
भारतीय जनता युवा मोर्चाने केली उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतीय जनता युवा मोर्चाने केली उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी
तिरोडा, दि.8 : भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे आज तिरोडा तहसीलदारांना निवेदन देवून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. जिल्हा भाजयुमोला याबाबतची सूचना भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली होती. भाजयुमोने दिलेल्या निवेदनानुसार, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी - शालिनी ठाकरे
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी – शालिनी ठाकरे
 सांताक्रूझ- वाकोला येथील पटेलनगरमध्ये माला नागम व संकेत नागम या मायलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर तिथे जनक्षोभ उसळला आणि स्थानिक महिला-पुरुषांनी तिथे भेट द्यायला गेलेल्या महापौर महाडेश्वर यांना दुर्दैवी कुटुंबाच्या घरी जाण्यापासून रोखलं. त्यावेळी एका तरुणीचा हात महापौरांनी मुरगळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबाबत शालिनी ठाकरे यांनी महाडेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केली…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
यूपी अधिकाऱ्याने जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून "मानसिक छळ" केल्याचा दावा केला, तो नाकारतो
यूपी अधिकाऱ्याने जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून “मानसिक छळ” केल्याचा दावा केला, तो नाकारतो
बाराबंकीचे जिल्हा दंडाधिकारी डॉ आदर्श सिंह यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. लखनौ: बाराबंकी येथील एका ब्लॉक विकास अधिकाऱ्याने राजीनामा दिला असून, जिल्हा दंडाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्याने त्यांचा “मानसिक छळ” केल्याचा आरोप केला आहे. बीडीओ अमित त्रिपाठी यांच्या राजीनाम्याची दखल घेत सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून ग्रामविकास आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बाराबंकीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्राचे राजकीय संकट: उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी थांबवले - सूत्र
महाराष्ट्राचे राजकीय संकट: उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी थांबवले – सूत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे तर दोनदा राजीनाम्याची ऑफर दिली होती, पण शरद पवारांनी दोन्ही वेळा राजीनामे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र (महाराष्ट्र लाईव्ह) सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान एक मोठी बातमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
अधिवेशन कुठलंही असू द्या ते गाजवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच
अधिवेशन कुठलंही असू द्या ते गाजवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच
सद्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतंय. नवाब मालिकांवर आरोप झाले, चौकशी झाली, आणि अटकही झाली. सद्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय पण आघाडी सरकार घेणार नसल्याचे सांगत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस खासदारांची मंजुरी
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा पारदर्शकरित्या पूर्ण-परीक्षा परिषदेचा निर्वाळा
ईनाडू समुहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं हैदराबाद इथं निधन
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील. सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे दुसरेच पंतप्रधान आहेत. या समारंभासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख नेते राजधानी दिल्लीत दाखल होत असून, सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल
****
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून खासदार राहुल गांधी यांची निवड केली आहे. काल दिल्लीत पक्षाच्या कार्यकारी मंडळाची बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड यावेळी करण्यात आली. या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असून इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटाची काल मुंबईत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित होते. दरम्यान, आपण उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत, त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती, त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते ��मित शहा यांनी तुर्तास प्रतीक्षेचा सल्ला दिला असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवी होती, संसदेमध्ये बहुजनांचं नेतृत्वच नको होतं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षांना सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचं असतं, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती, असं परखड मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
****
राज्यात दुष्काळग्रस्त भागातील जनतेला तातडीनं मदत पुरवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामागणीचे निवेदन त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सादर केलं. कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला ५० हजार रुपये आणि फळबागांना एकरी १ लाख रुपये मदतीची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट ही संपूर्ण देशभरात पूर्णपणे पारदर्शकरित्या पार पडली असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय परीक्षा परिषद -एनटीएने दिला आहे. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या सहा परीक्षा केंद्रातील एक हजार सहाशे विद्यार्थ्यांचा चुकीच्या प्रश्नपत्रिकेच्या वितरणामुळे वेळ वाया गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचं निवारण करण्यासाठी एनटीएने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
****
ईनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं काल निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रामोजी राव यांनी तेलगु, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम तसंच हिंदी भाषेत सुमारे ६० चित्रपटांची निर्मिती केली होती. प्रतिघात आणि नाचे मयूरी हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. नाचे मयूरी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारनेही गौरवण्यात आलं होतं. २०१६ मधे त्यांना पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रिकरण सुविधांसाठी देशोदेशी नावाजली गेलेली हैदराबाद इथली रामोजी फिल्म सिटी त्यांनी उभारली. ई-टीव्ही हा १३ भाषांमधला दूरचित्रवाहिन्यांचा समूह त्यांनी स्थापन केला. रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत कालपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केलं आहे. या उपोषणासंदर्भात आंतरवाली सराटी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयात काल ठराव घेण्यात आला, त्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने पाच तर विरोधात पाच सदस्यांनी मतदान केलं. त्यानंतर सरपंचांनी आपलं निर्णायक मत मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने दिल्यावर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस प्रशासनाची असल्याचं मत जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि युगांडा या संघात सामना सुरू असून आजच्या दिवसातला तिसरा सामना ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.
दरम्यान, काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा ३६ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा चार गडी राखून पराभव केला. काल सकाळी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ८४ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दिलेलं १५९ धावांचं ��क्ष्य गाठतांना, न्यूझीलंडचा संघ अवघ्या ७५ धावांतच सर्वबाद झाला.
****
नांदेड इथं हिंगोली भागात वजीराबाद पोलिसांनी काल तीन गावठी पिस्तूलं आणि पाच जिवंत काडतूसं जप्त केली. याप्रकरणी गोपाल चव्हाण, मनोज मोरे आणि शुभम सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी जालन्यात घनसांगवी इथल्या रणवीर सिंग याच्याकडून सदर पिस्तुलं विक्रीसाठी आणण्याल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
हिंगोली शहर पोलिसांनी दुचाकींची कर्णकर्कश आवाज करणारी सायलेन्सर्स मोठ्या प्रमाणावर जप्त केली होती, अशी जवळपास शंभरावर सायलन्सर्स काल नष्ट करण्यात आली. दुचाकीधारकांनी आक्षेपार्ह सायलेन्सर काढून टाकण्याचं तसंच आपलं वाहन अल्पवयीन मुलांच्या हाती न देण्याचं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात, शिवसेना शाखेच्या स्थापनेला काल ३९ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं गुलमंडी इथं शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील तोरंगण इथं काल वीज कोसळून यादव नामदेव बोरसे याचा मृत्यू झाला. निफाड, कुंभारी, सावरगाव, रानवड, नांदुर्डी या भागात पावसामुळे बऱ्याच घरांचं नुकसान झालं.
त्र्यंबकेश्वर इथं बिल्वतीर्थ तलावात दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या या दोन्ही तेरा वर्षीय मुलींचा पाय घसरून त्या तलावात पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातल्या देशमाने इथं आराम बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बसचालक जगदीश जाट हा ठार झाला असून, बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. ही बस जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या भाविकांची दोन धाम यात्रा पूर्ण करून परतत असतांना हा अपघात झाला.
****
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन येत्या १५ ऑक्टोबर पर्यत बंद राहणार आहे. मध्य रेल्वेकडून जारी पत्रकात ही माहिती दिली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी मोठा पाऊस पडतो, त्यातून दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन, दरवर्षी पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते.
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात नडगाव गावाजवळ काल संध्याकाळी दरड कोसळली. या घटनेत जिवीत हानी झाली नसली तरी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
नैर्ऋत्य मोसमी पावसानं राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसंच धाराशिव या जिल्ह्यांचा काही भाग व्यापला आहे. पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”, नाना पटोलेंची मागणी
“मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”, नाना पटोलेंची मागणी
“मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”, नाना पटोलेंची मागणी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabaht Lodha) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भाजपाच्या वतीने मलीन केली जात आहे. पण त्याने काहीही फरक पडणार नाही, उलट त्यांचं तेज अजून वाढत आहे. त्यांनी कितीही अवमान केला तरीही शिवरायांचा विचार संपणार नाही. माझं…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार
Tumblr media
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशिरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. Read the full article
0 notes
darshaknews · 2 years
Text
सौरव गांगुलीच्या राजीनाम्याच्या अफवांनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे
सौरव गांगुलीच्या राजीनाम्याच्या अफवांनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे
बीसीसीआय अध्यक्ष: बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की, तो आता एक नवीन सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी त्याने चाहत्यांचा पाठिंबाही मागितला आहे. यानंतर गांगुली अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले. गांगुलीने राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
शिवसेनेचा बाण, कुणाची शान? उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी
शिवसेनेचा बाण, कुणाची शान? उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अत्यंत शिगेला पोहचला आहे, त्याची परिणीती म्हणून उद्धव ठाकरे सरकारवर राजीनाम्याची नामुष्की आली आणि शिंदेशाहीचा उदय झाला पण, त्यानंतरही ही ‘अ’राजकता थांबली नसून आमदारांची अपात्रता आणि शिंदे सरकारला आव्हान देत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल केल्या त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय भवितव्याचा फैसला ठरणार आहे. या आहेत त्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी संसदे’त उत्साह कायम
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी संसदे’त उत्साह कायम
नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी कृषी कायद्यांसह आंदोलक शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या खोट्या आरोपांचा समाचार घेण्यात आला. तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या वेळी करण्यात आली.  संसद मार्गावरील जंतरमंतर येथे शेतकरी संसद गुरुवार (ता. २२)पासून सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes