Tumgik
#वास्तू
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ब्रेकफास्ट मध्ये बनवा टेस्टी आणि हेल्दी हरभरा पराठा
ब्रेकफास्ट मध्ये बनवा टेस्टी आणि हेल्दी हरभरा पराठा
ब्रेकफास्ट मध्ये बनवा टेस्टी आणि हेल्दी हरभरा पराठा काळे हरभरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यांच्या मदतीने आपण अनेक टेस्टी आणि हेल्दी पदार्थ तयार करू शकता. असा एक म्हणजे हरभरा पराठा, कसा बनवायचा जाणून घ्या. काळे हरभरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यांच्या मदतीने आपण अनेक टेस्टी आणि हेल्दी पदार्थ तयार करू शकता. असा एक म्हणजे हरभरा पराठा, कसा बनवायचा जाणून घ्या. Go to Source
View On WordPress
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नायलॉन मांजावर बंदीसाठी राज्यभरात शोध मोहीम राबवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश 
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष आज निकाल सुनावणार
ज्येष्ठ शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं दीर्घ आजाराने निधन
यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान
आणि
धाराशिव इथं येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आयोजन
****
नायलॉन मांजावर बंदीसाठी राज्यभरात शोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांनी, दुकान आणि कारखानेच नव्हे, तर नायलॉन मांजा सापडेल ते घरही सील करण्याचे आदेश दिले. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. याप्रकरणी ३४ याचिका होत्या, तसंच सव्वा दोन लाख कागदपत्रांची तपासणी करायची होती. त्यामुळे निकालासाठी एवढा वेळ देणं गरजेचा होतं, असं नार्वेकर यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणीही ३१ जानेवारीपर्यंत निकाल येईल, असं ते म्हणाले.
****
संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गडचिरोली इथं महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी ‘नवरत्न सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
****
दरम्यान, मुंबईत काल पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचं उद्घाटन मुख्यंत्र्यांच्या हस्ते झालं. येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.
****
नाशिक इथं १२ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी काल आढावा घेतला. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भुसे यांनी काल नाशिक इथं शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
****
येत्या २७ ते २९ जानेवारी दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी काल संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यापुढे दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथल्या वास्तू संवर्धनाची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. केंद्राच्या आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाने या वास्तूंच्या जतन-संवर्धनाच्या कामात समन्वय ठेवण्याची सूचना पवार यांनी केली.
****
ज्येष्ठ शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं काल कोलकाता इथं निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते. शास्त्रीय गायकीबरोबरच राशीद खान यांच्या इतर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. ‘जब वी मेट’ चित्रपटातलं ‘आओगे जब तुम ओ साजना’, किंवा ‘माय नेम इज खान’ चित्रपटातलं ‘अल्लाह ही रेहम’, ही त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय आहेत. २०२२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. २००६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचाही पुरस्कार मिळाला होता. राशिद खान यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर उच्च न्यायालयानं, एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने केदार यांच्यासह सहा आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, उच्च न्यायालयाने त्यांना काल जामीन मंजूर केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या घरांवर आयकर विभागाने काल छापे मारले. त्यांच्याशी संबंधित काही व्यावसायिकांची देखील चौकशी करण्यात आली, तसंच इतरही काही कार्यालयांवर छापेमारी करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेला पालकमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सभेचे आयोजक हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात २०२३ वर्षासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले. बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेंकी रेड्डी, आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. क्रिकेटपटू मोहम्मद शमी, पॅरा तिरंदाज शितल देवी, ओजस देवतळे, आदिती स्वामी यांच्यासह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, तर आठ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा एक ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे.
****
येत्या १८ ते २२ जानेवारी दरम्यान धाराशिव इथं श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या महोत्सवामध्ये, एकूण २०० दालनं उभारली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत काल छत्रपती संभाजीनगर इथं मामा चौकात शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या नीलावती शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली...
****
धाराशिव जिल्ह्यात भूम इथं ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि बसस्थानकाचं, काल पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. २४ कोटी ५३ लाख रुपये खर्च करून उभारल्या जात असलेल्या या रुग्णालयामध्ये, सर्व प्रकारच्या आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातील, असं सावंत यांनी सांगितलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतंर्गत बँकेकडे आलेले प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्याचे निर्देश, मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले आहेत. काल परभणी इथं महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विनाकारण विलंब करु नये, प्रस्तावात त्रुटी असतील तर त्याचं तात्काळ निराकरण करुन घ्यावं, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
लातूर जिल्ह्यातल्या नवमतदारांना मतदानाचं महत्त्व कळावं, काव्यलेखन स्पर्धेसह विविध उपक्रम घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्वीप अंतर्गत जिल्हा कृती आराखडा संदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
****
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ च्या विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाच्या नुकसानी पोटी २३२ कोटी रुपये २८ जानेवारी पूर्वी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्वरित जमा होणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या २९ झाली आहे. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी करुन बाधित स्रोतांवर उपाययोजना करण्याचे निर्देश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते काल बोलत होते. जल सुरक्षकांच्या मार्फत पिण्याच्या पाण्याचे नमुने पाच उपविभागीय प्रयोगशाळेत तपासून घेण्याच्या सूचनाही पाठक यांनी दिल्या.
****
जालना तसंच छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल पाऊस झाला. आजही ढगाळ वातावरण राहणार असून, गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
journalist27 · 10 months
Text
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य,व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे,
दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी आपल्या कानावर पडली.आपले मायबाप सरकार ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे,हे आपण सारे आजवर अनुभवत आलो आहोत.ग्रामीण भागातील शांळामध्ये पुरेसे शिक्षक नाहीत,वर्गखोल्या नाहीत,विद्यार्थ्यांना पिण्यासाठी धड पाणी नाही,मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत.इ.समस्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजल्या आहेत.यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात देशाने सर्वांगीण प्रगती केली.विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण जी कामगिरी केली,त्याचे दृष्यपरिणाम आपण काल अनुभवले.आपले चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावले.पुढच्या महिन्यात ते चंद्रावर उतरेल असा अंदाज आहे.आपल्या शास्त्रज्ञानी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.आज आपली अनेक मुलं इस्रो व अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
हे सांगण्यामागचा उद्देश असा कि ही जी सर्वांगीण प्रगती साध्य होण्यामागे केवळ शिक्षण ही एकमेव व्यवस्था आहे.पण ती अधिक सक्षम व्हावी,यादृष्टीने गेल्या ७५ वर्षात सरकारकडून प्रामाणिकपणे प्रयत्नच झाले नाहीत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रत्येक सरकारने लक्ष दिले,ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र कायम उपेक्षित राहिला.२१ व्या शतकात आता ग्रामीण भागही कात टाकू लागला आहे.पण त्यास योग्य ती गती मिळालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसाबसा धडपडतोय,पण सरकारकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात येत नाही.
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला.सुमारे ७५ लाख रु.चे बिल थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.या बिलापोटी सरकार जे अनुदान देते ते २०१९ पासून देण्यात आले नाही,असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.लाखो कोटी रु.चे अंदाजपत्रक असलेले आपले राज्य सरकार ७५ लाख रु.देऊ शकत नाही,ही बाबच मुळात शरमेची आहे.हे केवळ पालघर जिल्ह्यातच अस घडलं नाही तर इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.पुणे-७९२,सातारा-३१३,जळगाव-२४८,कोल्हापूर-१४८ एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विजेची बिले भरली नाहीत,म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.याव्यतीरिक्त अन्य जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले याची कोट्यवधी रु.ची वीजबिले वेळेवर भरणारे सरकार शाळांची वीजबिले भरत नाही,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.उन्हाळ्यात या मुलांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नाही.एकीकडे खोक्याचा वारेमाप वापर सुरू असताना,आमदार,खासदार मंत्र्यांना वीजबिलात भरमसाठ सवलती दिल्या जातात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र घामाघूम होत शिकतोय,हे चित्रच मुळात आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
आजही अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःच्या मालकीच्या वास्तू नाहीत,अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षक एकाच वर्गात दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात.अपुरा शिक्षक वर्ग,वर्गखोल्या नाहीत,वीजपुरवठा खंडित,अशा स्थितीत मुलं शिकणार कशी ? यावर एकाही सरकारने आजवर उपाययोजना करणे टाळले.त्यामुळे ग्रामीण भागात साक्षरतेचा वेग आता मंदावला आहे.विद्यार्थ्यांची गळती,हे फार मोठे संकट असून ते रोखण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिक्षण विभाग संवेदनशील नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.दुसरीकडे खाजगी शाळांचे पीक मात्र जोमात आले आहे.जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे खाजगी शाळा बेडकासारख्या फुगत चालल्या आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था का होतेय ? याचा विचार होण्याची गरज आहे.विजबिलापोटी देण्यात येणारे अनुदान रोखणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.गावागावात शिक्षण समित्या कार्यरत आहेत.या समित्यांच्या सदस्यांनी गावातील सरपंच व ग्रामसेवकाना थकीत वीज बिलसंदर्भात जाब विचारायला हवा होता.वास्तविक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्यांनी या ज्वलंत समस्येचा आजवर पाठपुरावा केला असता तर अशी नामुष्कीची पाळी आली नसती.
एकीकडे आपण चंद्रावर पाय ठेवण्यासाठी अब्जावधी रु.खर्च करतो,तर दुसरीकडे शाळांची विजबिले वर्षानुवर्षे भरत नाही,याची सांगड कशी घालायची ? जी अवस्था जिल्हा परिषद शाळांची तीच अवस्था आश्रमशाळा व अंगणवाड्याची आहे.मग अस वाटत कि चंद्रावर जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च कशासाठी ? आज २१ व्या शतकात ग्रामीण भागातील जनतेला कुपोषणमुक्त जीवन,पाणी,
शिक्षण,आरोग्य व दोन वेळचे जेवण,यासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.हे विदारक चित्र बदलण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत,आणि पुढेही होतील,असे वाटत नाही.पालघर जिल्ह्यात विक्रमगड म्हसेपाडा या आदिवासी पाड्यावरील चिमुकली वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडते,हे कसले लक्षण आहे.या व्यवस्थेला आपण प्रगल्भ लोकशाही व्यवस्था म्हणावे का ? मंत्र्यांच्या दालनावर सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रु.खर्च करत असते,पण ग्रामीण भागातील शाळांची विजबिले भरण्यास टाळाटाळ करते.या व्यवस्थेत सुधारणा होईल," सबका साथ,सबका विकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल,अशी शक्यता नाही.आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत.आपला देश,आत्मनिर्भर व डिजिटल इंडिया होण्याच्या मार्गावर आहे,असा डिंगोरा सतत पिटला जातो,पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव काय आहे ? यावर सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे.आजवरच्या प्रत्येक सरकारचा केवळ शहरी भागावर फोकस राहिला,त्यांना खरा " भारत खेड्यात," आहे,हे महात्मा गांधी यांचे म्हणणे कधीच पटले नाही.त्यामुळे पाच ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आपण जी स्वप्ने पाहत आहोत,ती व्यर्थ आहेत.ग्रामीण भागातील निरक्षरता कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी दमदार पावले उचलत नाही,तोवर ग्रामीण भागातील तरुणाईला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही.
Tumblr media
1 note · View note
astroruchi · 11 months
Text
Vastu Tips for Kids Bedroom 🛏️
Dr.Abhiruchi Jain (Astrologer) Contact on : 9922113222 Join us : www.astroruchi.com https://www.facebook.com/astroruchi.abhiruchi
0 notes
nashikfast · 1 year
Text
'गुरुदक्षिणा’ सभागृह म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीने निर्माण केलेले ‘फ्युचर हेरिटेज’
अश्विनी भालेराव, नाशिक : गुरुदक्षिणा सभागृह म्हणजे एक आयकॉनिक बिल्डिंग आहे, ती केवळ तिच्या स्थापत्यामुळे नव्हे तर ही वास्तू हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांच्या भावनांतून साकारलेली ही इमारत आहे त्यामुळे या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो तसेच ही संस्था केवळ विद्यार्थी घडवित नाही तर चांगला माणूस आणि नागरिक घडवते आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी मा. आनंद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
exposing-now · 1 year
Text
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
13 December, मुंबई, देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला, डॉक्टर भूषणजी जाधव यांच्या समाजकारण , तरुणांना रोजगार व उद्योग जगतातील तसेच महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासातील भरीव योगदााबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . मराठी बांधकाम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
opsteckirti · 2 years
Photo
Tumblr media
शेजारच्या वास्तूचे प्रवेशद्वार आपल्या प्रवेशदारासमोर का नसावे ? शेजाऱ्यांच्या वास्तूचे प्रवेशद्वार आपल्या वास्तूच्या अगदी समोरासमोर कदापि ही नसावे.पूर्वीच्या वास्तू ह्या एकमेकांपासून लांब अंतरावर असायच्या.एक वास्तूचे प्रवेशद्वार दुसऱ्या वास्तूसमोर येणार नाही व वास्तुदोष होणार नाही अशाच प्रकारे पुर्वीच्या गृहरचना होत्या. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. llलाभदायी वास्तु ll आजच संपर्क करा.वास्तुतज्ञ पंडित श्री. व सौ.पलंगे यांना वास्तु शास्त्र निगडीत अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/.../UCZ3P899wc98JnzfkLVVCJQ/videos
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? व्यक्तीने कोणत्या वयात किती तास झोपावे?
रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? व्यक्तीने कोणत्या वयात किती तास झोपावे?
रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? व्यक्तीने कोणत्या वयात किती तास झोपावे? रात्री झोपण्याच्या वेळेबाबत अनेकदा चर्चा होते. पण तुमचे वय आणि तुमची झोप यांचा संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रात्री झोपण्याच्या वेळेबाबत अनेकदा चर्चा होते. पण तुमचे वय आणि तुमची झोप यांचा संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे का? Go to Source
View On WordPress
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 10 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १० ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी त्यांना आमंत्रित केलं आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय ऑलिंपिक संघटना तसंच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
****
जागतिक मानसिक आरोग्य दिन आज पाळला जात आहे. मानसिक आरोग्य एक मानवी हक्क, ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. स्वत:च्या मानसिक आरोग्याच्या मुलभूत अधिकारासह इतरांच्या अधिकारांचंही संरक्षण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण गरजेचं असल्याचं, जागतिक मानसिक आरोग्य संघटनेनं सुचवलं आहे. देश, वेश, प्रांत, भाषा, वर्ण, वर्ग अशा कोणत्याही गोष्टी मानसोपचार मिळवण्यासाठी अडसर ठरु नयेत, आणि आपण सर्वांनी आपापल्या परिने प्रयत्न करायला हवेत, असं मत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर दीपिका पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं खाजगी एफएम वाहिन्यांसाठीच्या सीबीसी जाहिरात दरात सुधारणा केली आहे. नवीन सुधारणांनुसार मार्च २०२३ पर्यंतच्या आधारभूत दरात केलेली ४३ टक्के वाढ समाविष्ट आहे. तसंच एफएम रेडिओवरील जाहिरातीचा सखल आधारभूत दर प्रत्येक दहा सेकंदासाठी ५२ रुपयांवरुन वाढवून ७४ रुपये करण्यात येणार आहे. सध्या देशात कार्यरत असलेल्या चारशेहून अधिक कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या उत्पन्नातही या वाढीव दराचा फायदा होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक कौशल्य अभ्यासक्रम राबवण्याची सूचना, राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. काल मुंबईत कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेताना, ते बोलत होते. पनवेल इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर विद्यापीठाची इमारत तसंच आयटीआयची नवी वास्तू उभारण्याच्या पहिल्या टप्प्याचं काम पुढील वर्षी जून पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी यावेळी सांगितलं.
****
शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल विविध महामंडळांमार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा बैठकित ते बोलत होते. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कालव्यांसाठी करावयाच्या भूसंपादन प्रक्रियेचाही पालकमंत्र्यांनी काल आढावा घेतला.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील नियोजित अती उच्चदाब वाहिनी टॉवरचं काम स्थगित करण्यात आलं आहे. या कामामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतुक वळवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र काम स्थगित केल्यामुळे वाहतुक पूर्ववत सु��ु राहिल, असं राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी सांगितलं.
****
धुळे शहरातल्या अवधान टोल नाका इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासगी चारचाकी वाहनांकडून टोल वसुली करण्यास विरोध करत वाहनं सोडली. टोल नाक्यावर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनही केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथलं सप्तश्रृंगी देवीचं मंदिर शारदीय नवरात्रोत्सव काळात भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 'ज्ञानतीर्थ' हा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव, १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयात होणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. या महोत्सवामध्ये 'मराठवाडा मुक्तिसंग्राम: लढा स्वातंत्र्याचा-गाथा बलिदानाची' या विषयावर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज धरमशाला इथं इंग्लंड आणि बांग्लादेश दरम्यान सामना सुरु आहे. आजचा दुसरा सामना हैदराबाद इथं पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान दुपारी दोन वाजरा सुरु होईल.
****
मलेशियात १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार्या खो - खो स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात राज्यातल्या चार खेळाडुंची निवड झाली आहे. यात धाराशिव जिल्ह्यातले किरण वसावे आणि संपदा मोरे, मुंबईचा निखिल सोडिये आणि सोलापूरची प्रिती काळे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगर इथले विकास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
गुजरात बद्दल जाणून घ्या
गुजरात बद्दल जाणून घ्या
गुजरातचे सोमनाथ मंदिर गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध मंदिर सोमनाथ आहे. बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले मानले जाते. सोमनाथ म्हणजे देवांचा देव, जो भगवान शिवाचा एक भाग मानला जातो. गुजरातमध्ये एकापेक्षा एक प्राचीन आणि भव्य मंदिरे आहेत. येथील प्राचीन मंदिरांची वास्तू देशातील इतर मंदिरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. राज्यातील अनेक मंदिरे देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
धक्कादायक : ' सरल वास्तू ' फेम मानवगुरू चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
धक्कादायक : ‘ सरल वास्तू ‘ फेम मानवगुरू चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, ऑनलाईन डेस्क दि. 05 जुलै :- ‘सरल वास्तू’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. हत्येची थरारक घटना हॉटेलमधील रिसेप्शनजवळील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी गुरुजींवर चार वेळा वार केल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
astroruchi · 11 months
Text
youtube
Tips For Happy Home 🏡 ll सूखी घर के लिये वास्तू टिप्स 🏡 ll
0 notes