Tumgik
#शोधणं
airnews-arngbad · 24 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
महिला अत्याचारांबद्दल सामाजिक आत्ममंथन व्हावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं येत्या चार सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातल्या दिघीचा समावेश, २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
मालवण तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी तांत्रिक संयुक्त समितीची स्थापना
हिंगोली जिल्ह्यात तलाठ्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू, एक हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
आणि
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे दाखल
सविस्तर बातम्या
राज्यघटनेने दिलेली स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. काल सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या संदेशात राष्ट्रपतींनी, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, आत्ममंथन करण्याची गरज व्यक्त करत, कोणताही सभ्य समाज असे अत्याचार सहन करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. कोलकात्याची ही एकमेव घटना नसून, अशा अत्याचार श्रृंखलेतली एक कडी असल्याची बाब अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशा घटनांबद्दल समाजात रोष निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, अशा घटनांच्या मूळापर्यंत पोहोचण्यावरही त्यांनी भर दिला. एक समाज म्हणून आपण स्वत:लाच कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर येत आहेत. उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याची माहिती, लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक दर्जाच्या १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली आहे. सुमारे २८ हजार ६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात दहा राज्यांमध्ये सहा मुख्य औद्योगिक मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. नव्यानं तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी या शहराचा समावेश आहे. या प्रकल्पातून सुमारे दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशभरातल्या २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. मातृभाषांमधल्या स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याअंतगर्गत मराठवाड्यात लातूर, उदगीर आणि धाराशिव इथं रेडिओ वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे सहा हजार चारशे छप्पन्न कोटी मूल्याच्या तीन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे देशातली तेराशे गावं आणि अकरा लाख लोकसंख्या रेल्वेनं जोडली जाईल.
****
मालवण तालुक्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या घटनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातले उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.    
****
दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकारण करणं थांबवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हा पुतळा नौदलानं उभारला होता, राज्य सरकारनं नाही, तरीसुद्धा या घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि भव्य पुतळ्याची उभारणी, या तीनही पातळीवर राज्य सरकार काम करत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
नेव्ही यासंदर्भात चौकशी करून उचित कार्यवाही करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती. किंवा त्याच्यामध्ये काय चुका राहिल्या, यासंदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी पी डब्‍ल्यू डी विभागाने एक एफ आय आर केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस विभाग देखील कार्यवाही करेल. आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्याठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत.
या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या परिसराला भेट दिली. त्यावेळी ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला असे दोन जण जखमी झाले. महाविकास आघाडीनं काल मालवण बंदची हाक देत, मोर्चाही काढला होता. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं निदर्शनं करणार आहे.
****
शेतकऱ्यांना पुढील वर्षात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाही वीजपुरवठा केला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान काल हिंगोली वसमत इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, ही जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव-रंजेबुआ इथल्या तलाठ्याचा काल कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष पवार असं या तलाठ्याचं नाव असून, प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत धारधार चाकूने वार केले. पवार यांना उपचारासाठी परभणीला नेत असतांना, त्यांचं निधन झालं. दरम्यान, एका हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
****
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याच्या आरोपाखाली धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार धाराशिव इथल्या आनंदनगर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. प्रतीक्षा गवारे हुंडाबळी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी डॉ. प्रीतम शंकर गवारे याला पोलिसांनी काल अटक केली. डॉ प्रतीक्षा यांनी गेल्या शनिवारी आत्महत्या केली होती, तेव्हापासून सदर आरोपी फरार होता.
****
प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांनी काल फुलंब्री तालुक्यात पाथ्री इथल्या राजश्री शाहू विद्यालयातल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. सगळ्या मुलींनीही आपल्या आई-वडिलांसोबत आणि शाळेतल्या शिक्षकांसोबत संवाद साधावा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांना सांगाव्यात, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची कामं योग्य समन्वय ठेवून केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी व्यक्त केला आहे. काल हदगाव तालुक्यात शिवपुरी इथल्या कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलजीवन मिशन अंतर्गत गावस्तरावर ग्रामसेवकांनी सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले. जितेंद्र पापळकर यांची बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे होता.
****
बांगलादेशात हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ काल धाराशिव शहरात काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदुरौद्र मोर्चा काढण्यात आला. हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत, तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करून, या हिंदूंचं पुनर्वसन करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अंबाजोगाई इथंही काल याच संदर्भात मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या सर्व व्यापारी पेठा आणि दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती.
****
धाराशिव इथं काल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात करटुले, हादगा, चिघळपाथरी, आघाडा, बांबू, कवठ यासह ८० हून रानभाज्या आणि रानफळं विक्रीसाठी उपलब्ध होती. या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यावर पोहोचली आहे. धरणात सध्या ५६ हजार ८९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
0 notes
Text
आजार आणि औषधांबद्दल गुगलवर माहिती शोधणं किती धोकादायक? वाचा
https://bharatlive.news/?p=135787 आजार आणि औषधांबद्दल गुगलवर माहिती शोधणं किती धोकादायक? वाचा
एक ...
0 notes
Text
माझं हरवणं
तुझं ते रुसणंगालात हसणं ।आवडतं मलासोबत असणं ।नकोच वाटतंतुझं ते नसणं ।हवं मज वाटेडोळयात बघणं ।विचारात तुझ्यामाझं हरवणं ।आठवण येतातुलाच शोधणं ।बघून मग तुलामलाच विसरणं ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
शत्रुघ्न सिन्हांचा पंतप्रधानांना टोला;‘या जगात २ व्यक्तींना शोधणं अशक्य…’ http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d/?feed_id=18417&_unique_id=5fa3e50369eef
0 notes
atulbhimen · 4 years
Text
Dhyan प्रक्रिया 2
Tumblr media
Dhyan प्रक्रिया 2: ध्यानधारणेच्या प्रक्रियेत आपण मनाला जखडून ठेवणाऱ्या सवयीपासून मनाला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. सतत विचार करण,एखादी गोष्ट,घटना उलटसुलट तपासून बघणं,आठवणीत रमणं, कोणत्या ना कोणत्या समस्येवर उपाय शोधणं आणि भूतकाळ किंवा भविष्यकाळातील घटनांवर लक्ष केंद्रित करणं या साऱ्यातून मुक्त व्हावं,असं आपण ध्यानधारणेच्या प्रक्रियेतून मनाला सांगत असतो. मनात वा्याच्या वेगानं विचार चालू असतात, भावनांची आवर्तनं जाणवत असतात. विचार व भावनांच्या आवेगाला आवर घालून थोडं संथपणे,संयतपणे मार्गक्रमण करायला आपण मनाला मदत करतो. Dhyan प्रक्रिया 2: त्या विचारांची गर्दी जर दूर केली तर त्या जागी आपल्या आतमध्ये डोकावण्याची शक्ती येते. आपल्या जाणिवा अधिक तरल होऊ शकतात. Dhyan प्रक्रिया 2: ध्यानधारणा करणं म्हणजे समस्यांवर विचार करणं किंवा एखाद्या घटनेची उलटसुलट तपासणी करणं नव्हे. मनाला हवं तसं भरकटू देणं,स्वप्नवत् काल्पनिक गोष्टींत रमणं असा ध्यानधारणेचा अर्थ होत नाही. मनातल्या मनात सतत संवाद करणं,आपणच आपल्याशी वाद घालत बसणं किंवा विचारांची प्रक्रिया तीव्र करणं याही गोष्टी ध्यानधारणेत होत नाहीत,किंवा अपेक्षित नाहीत. शांतपणे कुठलाही आटापिटा न करता एकाग्रचित्त स्थितीत स्वत:चा शोध घेणं आणि जागृतावस्था प्राप्त करणं, हे ध्यानधारणेचं फलस्वरूप असतं. Dhyan प्रक्रिया 2 Dhyan प्रक्रिया 2: ध्यानधारणा करताना आपण मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करता.अनेक गोष्टींकडे मन आकर्षित होत असतं, काही गोष्टी मनात घर करून बसलेल्या असतात तर जागृतावस्थेत आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींत आपण सतत गुंतत राहतो. या सगळ्यांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण ध्यानातून करत असता.अशी Read the full article
0 notes
digimakacademy · 4 years
Text
मुंबईतील धारावीत आणि दिल्लीत सामूहिक संसर्ग, IMAच्या दाव्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा दुजोरा
मुंबईतील धारावीत आणि दिल्लीत सामूहिक संसर्ग, IMAच्या दाव्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा दुजोरा
[ad_1]
नवी दिल्लीः देशात करोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) व्यक्त केली आहे. आपल्याला संसर्ग कुठून झाला हे बाधित व्यक्तीला कळत नाहीए. यामुळे व्हायरस सोर्स शोधणं अवघड झाल्याने चिंता वाढली आहे.
आयएमएच्या दाव्याला आता दिल्लीतील नामांकीत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. करोनाचा सामूहिक संसर्ग काही कालावधीपासून सुरू…
View On WordPress
0 notes
destinetolife · 4 years
Text
स्वतःला शोधा: जग आपणास शोधून काढेल
स्वतःला शोधा: जग आपणास शोधून काढेल
Who am I ?
स्वतःला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत गमावणे, मोहनदास करमचंद गांधी यांचं हे वाक्य आपल्याला स्वतःला शोधण्याचा मार्ग दाखवतात. स्वतःला शोधणं म्हणजे नेमकं काय? आणि का? कारण जन्मापासून ते मरेपर्यंत संघर्ष असतो तो फक्त आपल्या जबाबदाऱ्या, इच्छा, आकांक्षा यांना पूर्ण करण्याचा त्यात नेमका स्वतःचा शोध म्हणजे काय? कारण एवढं सर्व करत असताना जीवन कमी पडते त्यात आणखी नवीन…
View On WordPress
0 notes
vicharbhaskar · 5 years
Text
Youngest Leader In Politics ......# India
               तरुणांनी राजकारणात का यावे ?
               'समर्थांच्या राजकारणाचे मर्म दुसऱ्याला समर्थ बनविण्यात आहे. पण जो दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरून ते नष्ट करण्याचे डावपेच खेळतो, त्याच्या सामर्थ्याला शिवतेज लाभणे शक्य नाही. ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपत होता, त्याच काळात कान्होजी आंग्रे आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारखे तेजस्वी नरवीर ' न भूतो न भविष्यती ' अशी ऐतिहासिक कामगिरी बजावतात , हा योगायोग नसतो. ती सर्वोच्च नेतृत्वाची बुध्दीमान योजना व विचारसरणी असते. पण आज चित्र असे दिसते , की नेत्याला दाखवून द्यायचे की असते की मीच सर्वश्रेष्ठ आहे , त्यामुळं तो पक्षातील आपल्या इतर साथींना मोठा होऊ देत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षात सक्षम नेतृत्व करणारा नेता शोधणं अवघडच. कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे पाय ओढत असतात. यातच राजकारण्यांचा बहुतांशी वेळ खर्च होतो.
                  आज मनी अँण्ड मसल हेच राजकारणाचे सूत्र झालेले आहे. विचारांचे राजकारण शिल्लक आहे का ? तर नाही, चालू आहे ते फक्त प्रचारांचे राजकारण आणि गटबाजी. त्यासाठी सर्व राजकीय मुल्यांची श्रदांजली दिली जाते. लोकांना दिलेली आश्वासने धुळीस मिळवली जातात . देशाला गरज आहे तो उत्तरदायी नेतृत्वाची स्वच्छ  प्रशासनाची जबरदस्त धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्याची , नव्या  कल्पना तत्काळ  अंमलात आणणाऱ्या व्यक्तींची , भ्रष्टाचाराने  आज संपूर्ण देश पोखरलेला आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे नेतृत्वच देशाला वाचू  शकते. म्हणूनच  अशा तरुणांनी  राजकारणात आले पाहिजे. प्रश्न सोडवणाऱ्या नव्या लोकांना जनतेने  निवडून द्यायला हवे. मग तो अपक्ष का असेना. राजकारणात बदल हा नेहमीच चांगला  ठरतो. त्यातूनच व्यक्तीत बदल घडतो. नवी पिढी हि बंडखोर असते व तीच बदल घडवून आणू शकते.
                 आपण पाहतो, बुद्धीवतांनी, विचारवंतांनी, सुशिक्षित मध्यमवर्गीयानी,  सच्चे सामाजिक कार्यकते , सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या अभ्यासकांनी निवडणूक प्रक्रियेपासून स्वत:ला कायम दुर ठेवले आहे. अगदी मतदानाबद्दल त्यांची अनिच्छा  दिसते. त्यामुळेच  भ्रष्ट , मनगटशाहीवाले , घराणेशाहीवाले सतत  निवडून देताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणजे अद्यापही राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शहरांचे , खेड्यांचे प्रश्न सुटलेले नाही. सामान्य माणसाचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे . तेव्हा या सगळ्यातून तरुणांचे नवविचार क्रांती करू शकतात.
                                                                                    -    भास्करराव म्हस्के
0 notes
Text
आनंदी पालकत्वाचा मार्ग
पालकत्व हा प्रत्येक पालकाचा आपल्या मुलांच्या दृष्टीने असणारा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, आपल्या मूलाची वाढ योग्य प्रकारे व्हावी, समाजात त्याची वर्तणूक चांगली हवी, आपलं मूल हुशार व्हावं, डोक्याला कुठलाही ताण न देता, कुठलाही त्रास न होता आपल्या मुलाचं संगोपण व्यवस्थित व्हावं, आपलं मूल आणि आपण स्वतः आनंदी असावं असा विचार करणा-या पालकांपैकी तुम्ही एक आहात? डॉ. किंजल गोयल लिखित “आनंदी बालक आनंदी पालक” हे पुस्तक अशा सर्व पालकांसाठीच आहे.
लेखिका स्वतः मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळे पालक आणि मुले अशा दोघांच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी सर्व समस्यांचे उपाय, प्रश्नांची थेट उत्तर या पुस्तकात अगदी सोप्या व प्रत्येकाला ती पटतील अशा भाषेत मांडली आहेत.
लहानपणापासून ते कुमार��यीन मुलांपर्यंत, पौगंडावस्थेपासून ते मुलं मोठी होईपर्यंत त्यांना योग्य पद्धतीने वाढवणं हा एक जिकरीचा पण तितकाच उत्सुकतेचा विषय आहे. पालकत्वाच्या प्रवासात पालकांना अनेक आव्हानांना, अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. मूल चिडचिडं, रागीट होणं, मुलांनी खोटं बोलणं, मुलांनी चुकीचा मार्ग अवलंबन, वयानुसार मुलांमध्ये होणारे शारिरीक-मानसिक बदल, त्यातून त्यांची होणारी जडणघडण, मुलांनी पालकांचं न ऐकणं, उलट बोलणं यामुळे पालक आणि मुलांमधला दुरावा वाढत जातो. मुलांच्या वर्तनापुढे पालक हतबल, चिंताग्रस्त होतात. मुलांना वाढवताना पालकांनाही अनेकदा कठोर व्हावं लागतं. त्याचा परिणाम ब-याचदा नकारात्मक झाल्याची उदाहरणं आपण पाहतोच. पालकत्वाचा मार्ग अत्यंत सुकर, विनाअडथळा असावा असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. परंतु हे होण्यासाठी ज्या पद्धतीचा संवाद पालक आणि मुलांमध्ये व्हायला हवा तो होत नाही. पालक म्हणून झालेल्या चूकांबद्दल अपराधभावना अनेक पालकांच्या मनात असते. पालकत्वात येणा-या समस्यांवर सकारात्मक उपाय शोधण्याची तंत्रे यात वाचायला मिळतील.
समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवण्यापेक्षा त्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काय पावलं उचलावीत त्याबद्दल यात सांगितलं आहे. परंतु सर्वच समस्या सहज सुटणा-या असतात असं नाही. योग्य प्रकारे सर्व काळजी घेतली आणि पुस्तकाप्रमाणे सर्व गोष्टी केल्या तरी समस्या राहत असतील तर शांत राहा! हे होणारच आहे. प्रत्येक समस्या आधीपासून थोपवता येणं हे कोणत्याही पालकासाठी अशक्य आहे. जे टाळता येण्यासारखं आहे ते टाळायचं आणि त्यातूनही ज्या समस्या सामो-या येतील, त्यातून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढायचा हे खरं कौशल्य आहे. हे कौशल्य शिकण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
आपण मुलांकडून जशा अपेक्षा ठेवतो, त्याचप्रमाणे स्वतः मध्ये बदल करून घेण्यास, स्वतः कडे नसलेल्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. फक्त मुलांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्याला घडविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न करणारे पालक आपल्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात हे या पुस्तकातून शिकायला मिळेल.
मूल वाढवताना अनेकदा असे प्रसंग येतात की घरात ताणतणाव निर्माण होतो, अंगावर पडणा-या नवीन जबाबदा-यांमुळे नवरा-बायकोमधील कलह वाढतो, आपल्या कित्येक गोष्टी सोडून द्याव्या लागतात, नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात, तडजोड करावी लागते, आपला प्राधान्यक्रम बदलावा लागतो. काय योग्य नि काय अयोग्य हे प्रसंगानुरूप आपण शिकत जातो. पालकत्वाची जबाबदारी पार पाडताना आई किंवा बाबांचा कमी-अधिक सहभाग असून चालत नाही तर दोघांचाही समान सहभाग असावा हा विचार लेखिकेने मांडला आहे व तो किती योग्य आहे हे तुम्हाला नक्की पटेल.
जबाबदारीच्या ओझ्याखाली पालक इतके दबून जातात की आपल्या आवडी-निवडी जपणं, स्वतःसाठी वेळ काढणं, जगण्यातला आनंद घेणं विस��ून जातात. मुलांचं हित कशात आहे याला तुम्ही जितकं महत्त्व देता तितकंच महत्त्व तुमची वैयक्तिक प्रगती, सुख कशात आहे यालाही द्यायला हवं. तुम्ही आनंदी असाल तरच आनंदी पालकत्व घडणं शक्य होईल. केवळ आनंदी मूल वाढवणं हा या पुस्तकाचा उद्देश नाही तर पालक आनंदी असणं हा ही एक उद्देश आहे.
किंजल गोयल यांनी स्व अनुभवातून शिकलेल्या गोष्टी तसेच जगभरातल्या पालकांशी केलेली चर्चा, त्यांचे अनुभव, लोकांची मतं, त्यातून मिळत गेलेली उत्तरं यांची भर घालून या पुस्तकाला प्रॅक्टिकल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाचा विषय अशा पद्धतीने हाताळला आहे की कोणताही पान वाचायला घेतलं तरी ते उपयुक्त ठरणारं आहे. पुस्तक क्रमवार वाचण्याची गरज नाही. त्यामुळे मुलांना वाढवताना ज्या समस्येला तुम्ही तोंड देत आहेत त्याचं उत्तर तितक्यात सहज शोधणं तुम्हाला यामुळे शक्य होणार आहे.
जगभरातल्या पालकांच्या समस्या, उपाय आणि पालकत्वाचा दृष्टिकोन यांचं एकत्रीकरण, मुलांना वाढवत असताना पालकांच्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल या पुस्तकात दिलेले आहेत.. केवळ मुलांच्याच नव्हे तर पालकांच्या वाढीविषयीचं हे पुस्तक जरूर वाचा.
Amazon: https://goo.gl/kF4UQc Flipkart: https://goo.gl/k2CL58
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
हरियाणातील नारनौर जिल्ह्यातील कनिना इंथल्या जीएलपी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्यामुळं पाच विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. रमजान ईदनिमित्त शासकीय सुटी असतानाही खाजगी शाळा सुरु ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाताना हा अपघात झाला. दरम्यान, हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा उपायुक्तांकडून अहवाल मागविला आहे.
****
काश्मीर घाटीत पुलवामा जिल्ह्यात स्थानिक पोलीस, लष्करासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव बंदी आणि शोधमोहीम आज सकाळी सुरु केली. संशयित ठिकाणी हे पथक पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, सुरक्षा पथकानं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
****
परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली, सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इंथल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी महाविकास आघडीचे उमेदवार चंद्राकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान, शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर आदींनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्‍घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.  
****
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातल्या माथेरान मध्ये गेल्या २६ डिसेंबर पासून  इ-रिक्षा सेवा पुन्हा सुरू झाली, मात्र या रिक्षांमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्यानं सध्या ७ पैकी केवळ ३ ई-रिक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग तसंच पर्यटकांची गैरसोय होत आहे. सनियंत्रण समितीने रिक्षांची संख्या वाढवावी, त्या ठेकेदारास चालवायला न देता पुर्वी जे लोक हात रिक्षा चालवत होते त्यांनाच चालवायला द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
****
मतदार यादीत नाव शोधणं, किंवा मतदान केंद्र कुठं आहे याबद्दलची माहिती भारत निवडणूक आयोगानं तयार केलेल्या व्होटर ॲपवर उपलब्ध आहे. या ॲपचा वापर करून मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्‍पर्धेत आज मुंबई इंडियन्‍स आणि रॉयल्‍स चॅलेंजर्स बंगलुरू यांच्‍यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
****
जर्मनी इथे सुरु असलेल्या डबल्‍यूटीटी फीडर डसलडर्फ टेबल टेनिस स्पर्धेत भारताची यशस्विनी घोरपडेनं काल स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी युनचेई चा ३-२ असा पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.
सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करणं हे सरकारचं काम - शरद पवार.
महाजनसंपर्क अभियानाचा निवडणुकांशी संबंध नाही-आमदार प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती.
आणि
औरंगाबाद विमानतळावरुन आज १७४ हज यात्रेकरू थेट जेद्दाहला रवाना.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. मूगाचा दर आता प्रतिक्विंटल आठ हजार ५५८ रुपये, भुईमूग सहा हजार ३५७, तर तीळाचा आठ हजार ६३५ रुपये असेल. अन्य तेलबिया तसंच भरड धान्याच्या दरातही क्विंटलमागे सहा ते सात टक्के वाढ करण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. कपाशीलाही आता सहा हजार ६२० ते सात हजार २० रुपये दर मिळेल, अशी माहिती गोयल यांनी दिली. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना बाजरीला उत्पादनखर्चावर ८२ टक्के अधिक लाभ होईल, तूर ५८ टक्के, सोयाबीन ५२ टक्के, तर उडदावर ५१ टक्के लाभ होण्याची शक्यता आहे. इतर धान्यावरही उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के लाभ होईल, असा अंदाज आहे. देशात अन्नधान्याचं उत्पादन ३३ कोटी टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड-बीएसएनएलला फोर-जी आणि फाइव-जी स्पेक्ट्रम वाटपाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी ८९ हजार ४७ कोटी रुपयांचं तिसरं पॅकेजही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जागतिक अन्न सुरक्षा दिन आज पाळण्यात येत आहे. अन्नामुळे उद्भवू शकणारे धोके रोखणं, मानवी आरोग्य, आर्थिक समृद्धी, शेती आणि शाश्वत विकासाचे नवीन मार्ग शोधणं आणि त्यांच्या व्यवस्थापनास मदत व्हावी यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं, दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. अन्न मानके जीवन वाचवतात, अशी यंदाच्या अन्न सुरक्षा दिवसाची संकल्पना आहे.
****
विद्यार्थ्याला अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याची क्षमता नवीन शैक्षणिक धोरणात असल्याचं, राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू. संजीव सोनवणे यांनी राजभवनात राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून ज्ञानगंगा घरोघरी हे आपले ब्रीदवाक्य विद्यारपीठ अधिक प्रभावीपणाने राबवू शकेल असा विश्र्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे.
****
रायगड जिल्ह्यात उलवे इथं साकारण्यात येणारं तिरुपती देवस्थानचं श्री वेंकटेश्वर स्वामी वारी मंदिर हे राज्यातील भाविकांचं नवं तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे झालं, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आंध्र प्रदेश राज्यात असलेल्या तिरुपती बालाजीचं प्रत्यक्ष दर्शन घेणं ज्यांना शक्य होत नाही, त्यांना या ठिकाणी प्रतिरुप तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली
****
कोल्हापूर शहरात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सामाजिक माध्यमांवरुन कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर परिसरात १९ जून पर्यंत जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत, प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
****
सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतुनं कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याविरुध्द कारवाई करणं हे सरकारचं काम आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सत्ताधारी पक्षातले काही घटक अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचं आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
औरंगजेबाचे छायाचित्र झळकावत नाचणाऱ्या आणि औरंगजेबाचे छायाचित्र वॉट्सॲप स्टेटसवर ठेवून त्याचे उदत्तीकरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. औरंगजेबाचे कोणी भक्त असतील, त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेनेची भूमिका आम्ही आजही कायम ठेवली असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. औरंगजेबाचे उद्दातीकरण करणाऱ्यांविरोधात राज्यसरकारने देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान राऊत यांनी दिलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. दहावीची लेखी परीक्षा १८ जुल�� ते एक ऑगस्ट दरम्यान, तर बारावीची सर्वसाधारण आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १८ जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान होईल, असं मंडळानं सांगितलं आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १६ जून पर्यंत महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
****
महाजनसंपर्क अभियानाचा निवडणुकांशी संबंध नसल्याचं, अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. अभियानांतर्गत येत्या १० जून रोजी नांदेड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या कामाचा आज अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी हे अभियान असल्याचं, दरेकर यांनी सांगितलं. दरम्यान गृहमंत्री शाह यांची नियोजित सभा नांदेडकरांसाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आमदार दरेकर यांनी व्यक्त केला.
****
औरंगाबाद विमानतळावरुन आज १७४ हज यात्रेकरू थेट जेद्दाहला रवाना झाले. यंदा एक हजार ७५० यात्रेकरू औरंगाबादहून मक्का मदिनाचं दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती खिदमात ए हुज्जाज समितीचे समन्वयक अर्शद इंजिनिअर यांनी दिली आहे. शहरातल्या जामा मस्जिद इथं हज यात्रेकरुंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचं इंजिनिअर यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या एकदिवसीय शिबीराच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज आढावा घेतला. या उपक्रमाविषयी ग्रामस्तरावर जनजागृती करून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दिव्यांग बांधवांना आधारकार्डसह विविध शासकीय कागदपत्रं, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील हरीजवळगा इथले हुतात्मा सुभेदार प्रमोद सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतीचा एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात बोंढार हवेली इथल्या अक्षय भालेराव खून प्रकरणी हिंगोली जिल्ह्यात शिरड शहापूर इथं आज कडकडीत बंद पाळून औंढा वसमत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मारेकऱ्यांना कठोर शासन करावं, पीडित कुंटूबाला शासकीय मदत मिळावी, जातीयवादातून होणाऱ्या घटनांवर पायबंद घालावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कार्यकारी व्यवस्थापक शरद ठोंबरे यांचे नातेवाईक खाजगी ईसम कल्याण बाबासाहेब ऊर्फ बाळू ठोंबरे याला वीस हजार रुपयांची लाच घेतांना आज रंगेहात अटक करण्यात आली. माजलगाव इथल्या एका सेवा सहकारी सोसायटीच्या वैधानिक लेखापरीक्षण केल्याचा मोबदला म्हणून देण्यात आलेला धनादेश वटवण्यासाठी ठोंबरे यानं ही लाच घेतली होती.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू झाला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या २५ षटकांत तीन गडी बाद ८० धावा झाल्या होत्या.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 07 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०७ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
नवी मुंबई विमानतळाचं काम युद्धपातळीवर सुरु असून, ते लवकरच सुरु करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. २०२४ मध्ये हे विमानतळ सुरु करण्याचा मानस असून, राज्य सरकार या कामासाठी पूर्ण सहकार्य करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कोल्हापूर शहरात वादग्रस्त स्टेटसमुळे निर्माण झालेल्या तणावाबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जात असल्याचं सांगितलं. राज्यात अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षांचं दंगलीसंदर्भात विधान येणं, आणि त्यानंतर हा तणाव निर्माण होणं, हा योगायोग नसल्याचं ते म्हणाले. औरंगजेबाचं उदात्तीकरण सरकार खपवून घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात उलवे इथं साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचं भूमीपूजन आज  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचं प्रत्यक्ष दर्शन घेणं शक्य होत नाही, अशा वेळी या ठिकाणी तिरुपती बालाजीचं दर्शन होईल, हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
***
औरंगजेबाचं छायाचित्र स्टेटसवर ठेवून त्याचं उदत्तीकरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
***
दरम्यान, या प्रकरणावरुन कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन दिवसांपूर्वी तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवलं होतं, ही माहीती हिदुत्ववादी संघटनेला समजताच, संघटनेनं आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी बंद मागे घेण्या��ं आवाहन करुनही आंदोलन सुरु झालं आहे.
***
जागतिक अन्न सुरक्षा दिन आज पाळण्यात येत आहे. अन्नामुळे उद्भवू शकणारे धोके रोखणं, मानवी आरोग्य, आर्थिक समृद्धी, शेती आणि शाश्वत विकासाचे नवीन मार्ग शोधणं, आणि त्यांच्या व्यवस्थापनास मदत व्हावी यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं, दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. अन्न मानके जीवन वाचवतात, अशी यंदाच्या अन्न सुरक्षा दिवसाची संकल्पना आहे.
***
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची लेखी परीक्षा १८ जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान, तर बारावीची सर्वसाधारण आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १८ जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान होईल, असं मंडळानं सांगितलं आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १६ जून पर्यंत महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
***
जेजुरी इथल्या श्री मार्तंड देव संस्थानावर विश्वस्त निवडीचा वाद सुरु असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी जेजुरी बंदचा इशारा दिला आहे. या संस्थानावर बाहेरचे पाच विश्वस्त नियुक्त केल्याप्रकरणी गेल्या सुमारे १२ दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थांचं आंदोलन सुरु आहे.
***
पूर्णा ते चुडावा रेल्वेस्थानकांदरम्यान आज लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशीरा धावणार आहेत. यामध्ये अमृतसर - नांदेड गाडी पूर्णा ते नांदेड दरम्यान सुमारे चाळीस मिनिटं, काचीगुडा नगरसोल नांदेड ते चुडावा दरम्यान एक तास, नगरसोल काचीगुडा गाडी परभणी ते पूर्णा दरम्यान दोन तास, आणि काचीगुडा नरखेड ही गाडी नांदेड ते चुडावा दरम्यान अर्धा तास उशिरा धावेल. तर नरखेड काचीगुडा ही गाडी पूर्णा इथं ५० मिनिटं थांबणार आहे.
***
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून लंडनच्या ओवल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे.
***
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ आज पहाटे अजून तीव्र झालं आहे. हे वादळ गोव्यापासून ८९० किलोमीटर, मुंबईपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असून, पुढच्या २४ तासात ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं.
दरम्यान, नऊ आणि दहा तारखेला मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
//************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक अन्न सुरक्षा दिन आज पाळण्यात येत आहे. अन्नामुळे उद्भवू शकणारे धोके रोखणं, मानवी आरोग्य, आर्थिक समृद्धी, शेती आणि शाश्वत विकासाचे नवीन मार्ग शोधणं, आणि त्यांच्या व्यवस्थापनास मदत व्हावी यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं, दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. अन्न मानके जीवन वाचवतात, अशी यंदाच्या अन्न सुरक्षा दिवसाची संकल्पना आहे.
***
नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटुंशी चर्चा करण्यास सरकार इच्छुक असून, त्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्विट संदेशात सांगितलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटुंचं आंदोलन सुरु आहे.
***
ओडिशा इथं झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या आता २८८ झाली आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर हा आकडा समोर आल्याचं, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदिप कुमार जेना यांनी सांगितलं.
***
रायगड जिल्ह्यात उलवे इथं साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचं प्रत्यक्ष दर्शन घेणं शक्य होत नाही, अशा वेळी या ठिकाणी तिरुपती बालाजीचं दर्शन होईल, हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
***
राज्यातल्या धनगर आणि मेंढपाळांचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन काल अमरावती इथं घेण्यात आलं. मेंढपाळांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना अर्ध बंदिस्त शेळी - मेंढी पालनासाठी शासनानं मदत करावी, तसंच चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांचे ठराव शासनाला पाठवण्यात आले.
***
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ आज पहाटे अजून तीव्र झालं आहे. हे वादळ गोव्यापासून ८९० किलोमीटर, मुंबईपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असून, पुढच्या २४ तासात ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं.
//*************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.****
केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत साडे ९१ रुपयांची कपात केली आहे. दिल्लीत आजपासून १९ किलो एलपीजी व्यावसायिक सिलेंडर दोन हजार २८ रुपयांना, तर मुंबईत एक हजार ९८० रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं भारतीय तेल महामंडळानं सांगितलं.
****
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात आय पी पी बी, या टपाल खाते संचालित बँकेनं, आपल्या ग्राहकांसाठी व्हॉटस्अॅप बँकिंग सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या मोबाईल फोनद्वारे बँकेचे व्यवहार करणं सोपं होणार आहे. घरपोच सेवा, जवळचं टपाल ऑफिस शोधणं आणि इतरही सेवा या सुविधेद्वारे उपलब्ध होणार आहे.
****
केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल राष्ट्रीय पुरवठा संकेतस्थळाच्या सागर सेतू मोबाईल अॅपचं लोकार्पण केलं. हे मोबाइल अॅप सामान्यत: आयातदार, निर्यातदार आणि सीमा शुल्क मध्यस्थ यांच्या आवाक्यात नसलेल्या कार्याची प्रत्यक्ष माहिती प्रदान करेल. यामध्ये जहाजाशी संबंधित माहिती, तसंच जहाजांच्या वाहतुकी संबंधित व्यवहारांचा समावेश आहे. आयात आणि निर्यातीच्या मंजुरी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या देयकांच्या डिजिटल व्यवहारासाठी  देखील हे अॅप उपयोगी आहे. या अॅपमुळे सागरी व्यापाराला चालना मिळेल आणि देशाची अर्थव्यवस्था वाढेल अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या बुधवारी रात्री घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली, आणि माहिती घेतली.
दरम्यान, या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी सुमारे ५०० अज्ञातांविरोधात विविध १८ कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, लाखोंचा जनसमुदाय सभेला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या राज्य शासनानं छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न रेंगाळून ठेवलं आहेत, पाणीपुरवठा योजना, रस्ते या सारख्या योजना रखडल्या असून त्यांना सरकारनं गतिमान करण्याची गरज असल्याचं देसाई म्हणाले.
****
राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, कांदा अनुदान योजना २०२२-२३ चा लाभ घेण्यासाठी, तीन एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अर्ज करावेत असं आवाहन राज्याच्या पणन संचालकांनी केलं आहे. हे अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे करता येणार आहे. 
****
राज्यात दिव्यांगांसाठी महाशरद हा उपक्रम, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येत आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक सहाय्यक उपकर��ांची नोंदणी  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाशरद डॉट इन, या संकेतस्थळावर करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था या एकमेकांशी संपर्क साधू शकतील.
****
मानसिक आरोग्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन लातूर जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी.बी. माने यांनी केलं आहे. लातूर इथं काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत समाजात जनजागृती व्हावी आणि मानसिक रूग्णांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी या कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक असून, आरोग्य मंडळानं त्यादृष्टीनं प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली. सरकारने राज्यात एकूण आठ विभागांत आरोग्य मंडळाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधुनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या मिया ब्लीचफेल्ड्ट हिचा 21-14, 21-17 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदंबी श्रीकांतला पराभव पत्करावा लागला.उपांत्यपूर्व फेरीत त्याला जपानच्या खेळाडूने मात दिली.
****
येत्या सहा एप्रिलपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या या अंदाजात, उद्या छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
//**********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
या फोटोमधील हत्तीला पाय किती? कितीही डोकं लावा अचूक उत्तर शोधणं कठीणच
या फोटोमधील हत्तीला पाय किती? कितीही डोकं लावा अचूक उत्तर शोधणं कठीणच
या फोटोमधील हत्तीला पाय किती? कितीही डोकं लावा अचूक उत्तर शोधणं कठीणच सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये अनेक प्रश्न किंवा कोडी असतात. अशी कोडी तुमची बुद्धिमापम चाचणी घेत असातात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये अनेक प्रश्न किंवा कोडी असतात. अशी कोडी तुमची बुद्धिमापम चाचणी घेत असातात. असाच एक फोटो…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
दुसरा कपिल देव शोधणं बंद करा..! गंभीरचा टीम इंडियाला सल्ला; वाचा काय म्हणाला गौतम?
दुसरा कपिल देव शोधणं बंद करा..! गंभीरचा टीम इंडियाला सल्ला; वाचा काय म्हणाला गौतम?
दुसरा कपिल देव शोधणं बंद करा..! गंभीरचा टीम इंडियाला सल्ला; वाचा काय म्हणाला गौतम? भारतीय क्रिकेट संघ सध्या विविध बदलांमधून जात आहे. विराट कोहली संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळा झाला. त्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कप्तान बनवण्यात आले. संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजापासून पूर्णवेळ ऑलराऊंडर खेळाडूचा शोध अजून संपलेला नाही. दुखापतींमुळे हार्दिक पंड्या बेजार झाला…
View On WordPress
0 notes