Tumgik
#सायबर क्राईम
mhlivenews · 1 year
Text
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून तब्बल आठ लाख ७६ हजारांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप;विविध मुद्यांवरून विरोधकांची सरकारवर टीका
कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
आणि
तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
****
देशात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत मांडवीय यांनी आज उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मांडवीय यांनी आरोग्य सुविधा आणि सेवांविषयीचा आढावा घेतला.
****
दरम्यान, ठाण्यात एका १९ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या रुग्णावर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आपल्या सर्व यंत्रणांचा आढावा घेतला असून, आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
मला नागरिकांना सुद्‌धा आवाहन करायचं आहे, की सध्या आपल्याला सर्दी, ताप, खोकला वगैरे हे जर असेल, तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या. आपली टेस्टींग करून घ्या. आणि मॉब मध्ये जास्त जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे. मास्क युज करायला पाहिजे. आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत, त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. गेल्या सरकारच्या कार्यकाळात खालावलेला शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत असून, त्यासाठी महावाचन अभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिक्षक भरती, आदी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असून सायबर क्राईम रोखण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आतापर्यंत २४ हजार जणांविरोधात अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनातला अंतिम आठवडा प्रस्ताव विदर्भाच्या प्रश्नावर करण्याची सदनाची परंपरा आहे, मात्र विरोधी पक्षनेते तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही विदर्भाचे असताना, विरोधकांनी या अधिवेशनात विदर्भाशी संबंधित एकही प्रश्न मांडला नाही, याबद्दल फडणवीस यांनी खेद व्यक्त केला.
****
दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली. राज्यात वाढते गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर जयंत पाटील यांनी ड्रग माफियांचा मुद्दा उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणातून राज्यात फोडाफोडीचं राजकारण करून परिस्थिती अस्थिर केली जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं. जनतेच���या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याबद्दल तसंच संसदेत खासदारांचं निलंबन प्रकरणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.
****
राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन दिली. विधानसभेत आज सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना महाजन बोलत होते.
****
बनावट पदवी प्रमाणपत्रावर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आज विधानसभेत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले देशातील १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने शोधले, यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याअनुषंगाने १५ जानेवारीपूर्वी याबाबत निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असं इतर मागास, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं.
****
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर जालना आणि बीड जिल्ह्यात पुलांची प्रलंबित कामं एका महिन्यात सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले जाणार असल्याचं राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. ते विधानसभेत बबनराव लोणीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भूसंपादनाअभावी या पुलांची कामे थांबली आहेत. तातडीने भूसंपादन केलं जाईल, त्यानंतर काम सुरू न केल्यास कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
साहित्य अकादमीचे वर्ष २०२३ साठीचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 'रिंगाण' या कादंबरीत खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्यांची अनेक वर्षापासून मोजणी झाली नव्हती, ती मोजदाद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, या मोजदादीमध्ये देवीचे अनेक मौल्यवान अलंकार, तसंच सोने-चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांची माहिती दिली. हिंगोलीच्या अनिता डुकरे तसंच अर्चना डुकरे आणि लातूर इथले राजेंद्र गारदी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - अनिता डुकरे, अर्चना डुकरे, जि.हिंगोली आणि राजेंद्र गारदी, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दोन जानेवारीपासून आयजेएफ महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाचे आयोजक बिलाल जलील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, मुशायरा, तसंच फूड फेस्टीवलचं आयोजन करण्यात येणार आहे. मेरा शहर मेरा गुरूर अर्थात माझं शहर माझा अभिमान हे या आयोजनाचं घोषवाक्य आहे. महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. आमखास मैदानावर होणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
****
धाराशिव इथं येत्या २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सब ज्युनियर गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० धनुर्धर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
धाराशिव इथं पोलिस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतून ४ ते १२ जानेवारी दरम्यान छत्तीसगढ़मध्ये रायपूर इथं होणाऱ्या सब ज्यूनियर गटातील राष्ट्रीय धनुर्विधा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्ह��� सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
Tumblr media
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
Tumblr media
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinews महाराष्ट्र पोलीस सायबर क्राईम कडून धार्मिक तेढ निर्माण करणारे स...
0 notes
prabudhajanata · 2 years
Text
दोपहिया वाहन चोरी की घटनाओं को देखते हुये वरिष्ठ पुलिस अधीक्षक महोदय श्री प्रशांत अग्रवाल द्वारा रायपुर जिले के समस्त पुलिस राजपत्रित अधिकारियों एवं थाना प्रभारियों सहित प्रभारी एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट को वाहन चोरी की घटनाओं पर अंकुश लगाने एवं अज्ञात आरोपियों की पतासाजी कर आरोपियों को पकड़ने हेतु आवश्यक दिशा निर्देश दिये गये है। इसके साथ ही एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट की एक विशेष टीम का गठन कर वाहन चोरी के अज्ञात आरोपियों की पतासाजी कर पकड़ने हेतु भी लगाया गया है। जिस पर एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट की विशेष टीम द्वारा ��ाहन चोरी के अज्ञात आरोपियों की पतासाजी के संबंध में मुखबीर लगाकर, पेट्रोलिंग व सूचना संकलन करने के साथ ही अन्य माध्यमों से भी इस संबंध में सूचना एकत्र कर वाहन चोरी के अज्ञात आरोपियों की पतासाजी कर पकड़ने के प्रयास किये जा रहे थे। इसी तारतम्य मंे दिनंाक 13.01.2023 को एण्टी क्राईम एण्ड सायबर यूनिट की विशेष टीम को सूचना प्राप्त हुई कि थाना देवेन्द्र नगर क्षेत्रांतर्गत पंडरी ओव्हरब्रीज के नीचे दो व्यक्ति दोपहिया वाहन बिक्री करने की फिराक में ग्राहक की तलाश कर रहें है। जिस पर अतिरिक्त पुलिस अधीक्षक शहर/अपराध अभिषेक माहेश्वरी, नगर पुलिस अधीक्षक सिविल लाईन वीरेन्द्र चतुर्वेदी एवं उप पुलिस अधीक्षक क्राईम दिनेश सिन्हा द्वारा प्रभारी एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट तथा थाना प्रभारी देवेन्द्र नगर को सूचना की तस्दीक कर आवश्यक कार्यवाही करने निर्देशित किया गया। एण्टी क्राईम एण्ड साईबर यूनिट तथा थाना देवेन्द्र नगर पुलिस की संयुक्त टीम द्वारा उक्त स्थान पर जाकर मुखबीर द्वारा बताये हुलिये के व्यक्ति एवं वाहन को चिन्हांकित कर पकड़ा गया। पूछताछ मंे व्यक्तियों ने अपना नाम जितेन्द्र सागर एवं पूर्णाचंद्र जाल निवासी उड़ीसा का होना बताया। टीम के सदस्यों द्वारा दोनों से वाहन के कागजात के संबंध में पूछताछ करने पर उनके द्वारा गोल मोल जवाब देकर लगातार टीम को गुमराह करने का प्रयास करते हुए वाहन के संबंध में किसी प्रकार का कोई भी कागजात या दस्तावेज प्रस्तुत नहीं किया गया। जिस पर टीम के सदस्यों द्वारा दोनों से कड़ाई से पूछताछ करने पर उनके द्वारा वाहन को चोरी का होना बताया। टीम के सदस्यों द्वारा चोरी की अन्य वाहनों के संबंध में कड़ाई से पूछताछ करने पर उनके द्वारा थाना देवेन्द्र नगर क्षेत्र से 02 नग दोपहिया वाहन तथा थाना राजेन्द्र नगर क्षेत्र से 05 नग दोहपहिया वाहन चोरी करना बताया गया। आरोपियों को गिरफ्तार कर उनकी निशानदेही पर कब्जे से चोरी की कुल 07 नग दोपहिया वाहन जुमला कीमती लगभग 3,00,000/- रूपये जप्त किया गया। आरोपियों से जप्त चोरी की 01 नग दोपहिया वाहन में आरोपियों के विरूद्ध थाना देवेन्द्र नगर में अपराध क्रमांक 04/23 धारा 379 भादवि. का अपराध पंजीबद्ध है तथा चोरी की शेष 06 नग दोपहिया वाहनों में आरोपियों के विरूद्ध पृथक से थाना देवेन्द्र नगर में धारा 41(1+4)जा.फौ./379 भादवि. का अपराध पंजीबद्ध कर आरोपियों के विरूद्ध कार्यवाही किया गया। गिरफ्तार आरोपी जितेन्द्र सागर पिता जेहरू लाल सागर उम्र 23 साल निवासी चिन्तागुड़ा थाना सिंदेकला जिला बलांगिर उड़ीसा हाल पता त्रिमूर्ति नगर थाना देवेन्द्र नगर रायपुर। पूर्णाचंद्र जाल पिता महेश्वर जाल उम्र 29 साल निवासी चिन्तागुड़ा जिला बलांगिर उड़ीसा हाल पता त्रिमूर्ति नगर थाना देवेन्द्र नगर रायपुर। कार्यवाही में उपुअ श्री राहुल शर्मा थाना प्रभारी देवेन्द्र नगर, एण्टी क्राईम एण्ड साईबर यूनिट से सउनि. मोह. जमील, प्रेमराज बारीक, प्र.आर. कुलदीप द्विवेदी, रविकांत पाण्डेय, अनुप मिश्रा, कृपासिंधु पटेल, महेन्द्र राजपूत आर. विजय पटेल, सुरेश देशमुख, रवि तिवारी एवं आशीष राजपूत की महत्वपूर्ण भूमिंका।
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
थोड्याशा निष्काळजीपणामुळे बँक खाते रिकामे होऊ नये, यासाठी ‘अशी’ घ्या काळजी
थोड्याशा निष्काळजीपणामुळे बँक खाते रिकामे होऊ नये, यासाठी ‘अशी’ घ्या काळजी
थोड्याशा निष्काळजीपणामुळे बँक खाते रिकामे होऊ नये, यासाठी ‘अशी’ घ्या काळजी डिजिटल विश्वातील सुविधांसोबतच सायबर क्राईम आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सोशल मीडियावरही फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. इंस्टाग्रामवर फसवणुकीचे एक प्रकरण समोर आले असून, यामध्ये या घोटाळ्यामुळे महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक, महिलेला तिच्या इंस्टाग्राम मित्राने कस्टम्समधून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
4rtheyenews · 2 years
Text
आधा दर्जन 52 पत्ती के दिवानों को पुलिस ने दबोचा,6610 रुपए और ताशपत्ती जब्त
आधा दर्जन 52 पत्ती के दिवानों को पुलिस ने दबोचा,6610 रुपए और ताशपत्ती जब्त
रायपुर/बिलासपुर। जिले के सीएमडी कॉलेज ग्राउंड में जुआ खेल रहे आधा दर्जन जुआरियो को तारबहार पुलिस ने गिरफ्तार किया है। वही कब्जे से नगद 6610 रुपए और ताशपत्ती जब्त की गई है। दरअसल वरिष्ठ पुलिस अधीक्षक द्वारा पुलिस के समस्त पुलिस राजपत्रित अधिकारियों, थाना प्रभारियों सहित प्रभारी एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट को जुआ,सट्टा में संलिप्त लोगों की पतासाजी कर कार्यवाही करने निर्देशित किया गया है।जिस पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
धनलक्ष्मी विद्यालयात सायबर क्राईम दक्षता जनजागृती
धनलक्ष्मी विद्यालयात सायबर क्राईम दक्षता जनजागृती
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम दक्षता जनजागृती मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस निरीक्षक सचिन जाधव तसेच मानधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक श्री. प्रकाश कोल्हे उपस्थित होते गुन्हेगारीचा तांडव भ्रष्टाचाराचा सुळसुळाट कशा पद्धतीने होतो यासाठी नेमकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
व्हॉट्सअॅपवर हे फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यास खाते ब्लॉक होईल, तुरुंगात जाऊ शकता
व्हॉट्सअॅपवर हे फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यास खाते ब्लॉक होईल, तुरुंगात जाऊ शकता
चॅटिंगसह फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. व्हॉट्सअॅप ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे. हे सोशल मेसेजिंग अॅप केवळ चॅटिंगसाठी वापरले जात नाही, तर कॉलिंग आणि फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो, परंतु आपण नकळत काहीतरी शेअर करू शकता जे व्हाट्सएप आहे. WhatsApp च्या धोरणाच्या विरोधात असू शकते. बरेच लोक अॅपचे धोरण न वाचता त्याचा वापर करतात आणि…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत
सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत
सिंधुदूर्ग सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी सिंधुदूर्ग : इंटरनेटमुळे व्यापार आणि व्यवहार ऑनलाईन झाला आहे. काही सेकंदात व्यवहार करणे सोपे झाले असल्याने ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण कित्येक पटीने वाढले. तसे फसवणुकीचे प्रकारही वाढले. सायबर क्राईम वाढले. नेट बॅकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॅलेट्स, युपीआय या माध्यमातून फसवणूक वाढली आहे. सायबर गुन्हेगारांनी जवळपास २९ हजार रूपये परस्पर लंपास केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१५ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
भाजप नेते भजनलाल शर्मा आज राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे इतर नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
लोकसभा सुरक्षेचा भंग प्रकरणी मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेत झालेली चूक ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. आगामी काळात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असं ते म्हणाले.
****
नवी दिल्लीत विज्ञानभवनात काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारत जबाबदारीनं आगेकुच करत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देईल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.
****
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १० लाख ६४ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. प्रत्यक्ष कराची संकलित रक्कम सरकारने अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या अपेक्षित रकमेच्या ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के इतकी असल्याचं याबाबत जारी आकडेवारीत म्हटलं आहे.
****
डीप फेक आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या सायबर गुन्हे तसंच जुगारसाठीच्या ॲप वर कठोर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करत असून, गरज पडल्यास राज्य सरकार ही तसा कायदा करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ऑनलाईन गेमिंग, सायबर क्राईम कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप फेक याचं मोठं आव्हान असून, यासाठी राज्य सरकार एक प्रणाली विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र हे देशात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. गेल्या तीन महिन्यात राज्यात २८ हजार ८६८ कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
beednews · 2 years
Text
सायबर क्राईम... महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग; केज मधील धक्कादायक घटना. https://beed24.in/cyber-%e2%80%8b%e2%80%8bcrime-molestation-of-a-college-girl-shocking-incident-in-the-kaij/
0 notes
prabudhajanata · 2 years
Text
DM SONI KI REPORT : बचेली/ जिला दक्षिण बस्तर दंतेवाड़ा में श्रीमान पुलिस अधीक्षक महोदय श्री सिध्दार्थ तिवारी के दिशा निर्देशन एवं श्रीमान अतिरिक्त पुलिस अधीक्षक श्री रामकुमार बर्मन के मार्गदर्शन में जनता एवं पुलिस के बीच बेहतर संबंध बनाये रखने हेतु लगातार अभियान चलाया जा रहा है इसी क्रम में आज दिनांक 12.01.2023 को बचेली पुलिस द्वारा ग्राम नेरली स्कूलपारा के ग्राम पंचायत कार्यालय में जन चौपाल लगाकर ग्राम नेरली के सरपंच, पंच एवं ग्रामवासियों की बैठक लेकर जन संवाद कर ग्राम की समस्याओं को सुना गया तथा मौके पर उनके समस्याओं का निराकरण भी किया गया। जन चौपाल में उपस्थित लोगो को विभिन्न् अपराधों जैसे महिलाऐ एवं बाल अपराध, युवा पीढ़ी को नशे से बचने एवं सायबर क्राईम संबंधी, ऑनलाईन बैकिंग फ्रॉड, सड़क दुर्घटनाओं से बचने यातायात नियमों की जानकारी, सोशल मीडिया के माध्यम से हो रहे अपराधों एवं रोकथाम हेतु जानकारी दी गई तथा सभी को कानून का पालन करने, क्षेत्र में शांति व्यवस्था बनाये रखने तथा किसी प्रकार की समस्या होने एवं संदिग्ध लोगों व मुसाफिरों के संबंध में जानकारी होने पर पुलिस थाना बचेली के शासकीय मोबाईल नंबर 07857-230337 एवं थाना प्रभारी के शासकीय नंबर 94791-94316 पर संपर्क करने हेतु समझाईश दिया गया है।
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक
सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक
सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक इस्लामविरुद्ध कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर लिहू नये यासाठी अभिनेत्याला संबंधित चालकाने धमकी दिली होती. मुंबई (Mumbai) क्राईम ब्रांचने आरोपीला वांद्रे (Bandra) इथून अटक केली आहे. सायबर क्राइम सेलच्या मदतीने क्राइम इंटेलिजन्स युनिटने मंगळवारी रात्री आरोपी रिझवान खानला वांद्रे इथल्या ट्रान्झिट कॅम्पमधून अटक…
View On WordPress
0 notes
4rtheyenews · 2 years
Text
ऑनलाईन सट्टा चलाने वाले 6 आरोपी गिरफ्तार
ऑनलाईन सट्टा चलाने वाले 6 आरोपी गिरफ्तार
एण्टी क्राईम एवं सायबर यूनिट व थाना सुपेला की संयुक्त कार्यवाही टीम ने संयुक्त कार्यवाही करते हुए ऑनलाईन सट्टा चलाने वाले 6 आरोपियों को गिरफ्तार किया है तथा उनके पास से से 12 नग मोबाईल, 4 नग लेपटॉप, 1 नग मॉनीटर, 1 नग सीपीयू, 3 नग की-बोर्ड, 4 नग माऊस, 1 नग ब्रॉडबैण्ड, 4 नग लेपटॉप चार्जर, 6 नग एटीएम कार्ड, 8 नग चेकबुक, 3 नग पासबुक बरामद किया है। मिली जानकारी के अनुसार दुर्ग जिले में महादेव एप्प,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
नेवाश्यातील ' त्या ' घटनेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की ?
नेवाश्यातील ‘ त्या ‘ घटनेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की ?
नेवासा शहरातील रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला शांततेत सुरु असलेल्या मिरवणुकीला काही समाजकंटकाकडून झेंडा दाखवून देशद्रोही घोषणा दिल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नेवासा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आहे . पत्रकार परिषदेत मनोज पाटील म्हणाले की,या घटनेच्या मागील मुख्य सूत्रधार हे सायबर क्राईम शाखेच्या मदतीने नक्कीच लवकरात उघडकीस येणार आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes