Tumgik
#स्टीव्ह जॉब्स मुलगी
marathinewslive · 2 years
Text
स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने iPhone 14 सीरिजची उडवली खिल्ली; इंस्टाग्रामवर शेअर केले मीम्स| स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने आयफोन 14 मालिकेची खिल्ली उडवली; मीम्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने iPhone 14 सीरिजची उडवली खिल्ली; इंस्टाग्रामवर शेअर केले मीम्स| स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने आयफोन 14 मालिकेची खिल्ली उडवली; मीम्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Apple ने आपल्या फार आउट इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरिज लाँच केली, ज्या अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच केले गेले. या नवीन एअरपॉड्स आणि स्मार्टवॉच या कार्यक्रमात लाँच करण्यात आले आहेत. नवीन प्रोसेसर, ४८ मेगापिक्सेल कॅमरेल आणि डायनॅमिक आयलंड नॉच, आयफोन १४ सीरिजमध्ये बदल केले गेले आहेत. ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब चेबवली लोक्स इव्ह जॉब्स हिने आयफोन 14 सीरीज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
*क्षण आनंदाचे*
सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहज प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"अन्य देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?
यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.
कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतर धावताहेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेट सारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्���ा प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असते, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण तेंव्हा वेळ नसेल. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोहचल्यानंतर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचुन काय उपयोग ? 🌹
0 notes