Tumgik
#स्पर्धेत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर मुंबई :  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आतापासून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू असून दुसरीकडे भाजपच्यावतीने मुंबईत ‘जागर मुंबई’चाअंतर्गत सभा घेण्याचे सत्र सुरू आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील  या सभेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 days
Text
Pune : जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत जोग स्पोर्ट्स ला 5 सुवर्ण व 4 रौप्य
Pune : जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत जोग स्पोर्ट्स ला 5 सुवर्ण व 4 रौप्य – MPC…
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
 एक - शून्यनं आघाडी
सविस्तर बातम्या
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
***
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.
****
राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.  या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण प्रकरणी कुणबी नोंदी बाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या  आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.
****
नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख समिक्षक तसंच वक्ते म्हणून  संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी हे होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Video
youtube
जलतरणपटू योगेश्वरी जेजुरकर हिचे राष्ट्रीय स्पर्धेत यश..
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-bhushan-naisha-excels-in-isro-exam/
0 notes
shrikrishna-jug · 7 months
Text
प्रो.पोंक्षे, बुद्धीबळ आणि त्यांची नम्रता
प्रो.पोंक्षे जेव्हडे त्यांच्या विषयात निपुण आहेत तेव्डडेच ते बुद्धीबळ ह्या खेळातही निपुण आहेत हे मला अलीकडे कळलं. कधी बुद्धीबळ ह्या विषयावर त्यांच्याशी चर्चाच झाली नसल्याने त्यांच्याकडून आपणहून विषयावर बोलणं झालं नाही.मला ज्यावेळी कळलं की त्यांचा बुद्धीबळाचा एक संघ आहे आणि ह्या खेळावर ते आणि त्यांचा संघ स्पर्धेत हिरीरीने भाग घेत असतात त्यावेळी मी थोडा खजिल झालो.त्यांच्या अंगातला नम्रता हा गूण…
View On WordPress
0 notes
skmrsblog · 7 months
Text
1000 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2024| GK Questions and Answers in Marathi https://zpshikshak.com/2024/02/gk-questions-and-answers/
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-district-level-elocution-competition-in-excitement/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पिंपरी-चिंचवड – राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण
पिंपरी-चिंचवड – राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण
पिंपरी-चिंचवड – राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पिंपरी, दि. ९  – भोपाळ येथे सुरु असलेल्या ओपन नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राच्या संघाला सुवर्णपदक मिळाले. महाराष्ट्राच्या संघात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस नाईक रश्मी धावडे यांचा समावेश आहे. रश्मी धावडे यांच्यासह तीन महिलांच्या संघाला नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. ओपन महाराष्ट्र शूटिंग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 16 days
Text
Alandi : पालिकेच्यावतीने पर्यावरणपुरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा; स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 12
एमपीसी न्यूज –  आळंदी नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा 5.0 अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत शहरात पर्यावरण संवर्धन जागृती होण्याच्या (Alandi)उद्देशाने शहरातील पर्यावरण पूरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या गणपती सजावटीची 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत नगरपरिषदेच्या 9284454530 या व्हाॅट्सअप नंबर वर ऑनाइन…
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी २ वाजता सुटून सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. 
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्‍यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.  केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा ���ामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत १७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात,  डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी पुढे आहे. 
****
0 notes
Text
नुकतंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या श्री शारदा मंदिर प्राथमिक शाळेमध्ये ६६ व्या बालक सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण करताना तेथील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली. छ. संभाजीनगरमधील सर्वात जुन्या शिक्षण संस्थेने अद्यापही मराठी माध्यम टिकवून ठेवले आहे, हे विशेष. साधी, सोपी शाळा... मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी... इथे रांगोळी स्पर्धेत मुलांनीही बक्षिसे मिळवली. सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुलींनीच केलेलं...! मातृभाषेतून संवाद, लिखाण, बक्षीस वितरण... धमाल अनुभव.. त्या पालकांचंही मनोमन कौतुक वाटलं, ज्यांनी आपल्या पाल्यांना इथे शाळेत घातलंय. मार्कांपेक्षाही मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास त्यांना जास्त गरजेचा वाटला.
मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा टोपे मॅडम, शिक्षकवृंद व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार!
Contact us for more- 8087382763
https://careercounselingonline.in/
Akshar Handwriting Analysis, Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra-431001
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
1 note · View note
mhlivenews · 8 months
Text
राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
political-chat-01 · 8 months
Text
Tumblr media
स्वतंत्र भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारचे कुस्तीगीर पै. खाशाबा जाधव यांची आज जयंती!
देश स्वतंत्र झाल��यानंतर क्रीडा प्रकारातील कुठलीही संसा��ने नसताना, जागतिक पातळीवर ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत पदक जिंकणे, ही अभिमानाची बाब आहे. पै. खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes