Tumgik
#हिरवा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘मातोश्रीचा ‘सोंगाड्या’ सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात.. तरीही या बाईला…’
‘मातोश्रीचा ‘सोंगाड्या’ सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात.. तरीही या बाईला…’
‘मातोश्रीचा ‘सोंगाड्या’ सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात.. तरीही या बाईला…’ मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत  यांच्यावर मनसे नेत्याने जिव्हारी लागणारी टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शिवसेनेप्रति निष्ठेवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. यावर आता मनसे नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे.  मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत टीका केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध-पंतप्रधानांचं प्रतिपादन 
आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती
दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम लढत
सविस्तर बातम्या
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, पंतप्रधानांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे.
****
देशभरात आजपासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मराठवाड्याचा मुख्य ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोर्कापणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते,नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनतर्फे उद्या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचं औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचं, विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्यासांठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.  
****
आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे.
हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासननिर्णयही काल जारी झाले.
****
दृष्टीहीन आणि कर्णबधीर प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.
****
 दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेनं शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली असून, निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.
नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्ह्यात आज अडीच हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी नांदेड शहरातील ९ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.
****
जालना इथं घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रीम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली इथं मोदकाचा गणपती अर्थात विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे एक लाख ५१ हजार मोदकांचं वाटप केलं जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात काल चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर आज अनंत चतुर्दशीला सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं परवा १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं उद्या १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
****
परभणी इथं दरवर्षी प्रमाणे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काल सामुहिक विवाह सोहळा पार पडला, यंदा या सोहळ्यात ४० जोडपी विवाहबद्ध झाली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आज आपण थायलंडमधल्या गणेशोत्सवाविषयी अर्पिता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ या...
महाराष्‍ट्रीयन पद्‌धतीनं गणपतीची पूजा आणि स्थापना होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. पुजेचं साहित्य इथं सहज उपलब्ध असतं. पण उकडीचे मोदक देखील आता गेले काही वर्ष आम्ही म��ाराष्ट्रीयन गृहणींकडून बनवून घेतो. इथल्या काही सभासदांचं ��ायी मित्र सुद्धा गणपतीच्या दर्शनाला अगदी आवर्जून येतात. भारताची कमी वाटणार नाही असं ढोल, ताशा, मोदक, आरत्या, अथर्वशीर्ष हे सगळं करत तो एक अर्धा दिवस का होईना पण खूप आनंदात घालवतो.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. काल उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
****
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ची ई पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता मोबाइल ॲपवरून करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. या हंगामाची ई पीक पहाणी करण्यासाठी शासनाने २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात आज ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत धाराशिव जिल्ह्यात कालपर्यंत तीन लाख ९२ हजार ४२४ महिलांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार ८५१ महिलांनी अर्ज केले आहेत.
****
बीड इथं काल बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या काही नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ पूर्णांक ३४ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
0 notes
dyanmevaarutm · 17 days
Text
Tumblr media
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
shrikrishna-jug · 4 months
Text
निसर्ग सृष्टीचं सादरीकरण.
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले.लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा – मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे.जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत…
View On WordPress
0 notes
kvksagroli · 6 months
Text
Tumblr media
शेती दिन : कांदा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर... संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने भोसी ता. बिलोली शेतकऱ्यांच्या शेतात कांद्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (०.३%) वापर या बद्दल शेती दिन घेण्यात आला. सदरील प्रात्यक्षिक 13 शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले होते. त्या सर्वांनी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या दोन फवारण्या कांदा पिकामध्ये घेतल्या. या फाव्र्नीच सर्व शेतकर्यांना चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे कांद्याची वाढ आणि आकार वाढला, तसेच पानांचा गडद हिरवा रंगही वाढला, अशी प्रतिक्रिया शेतकर्यांनी दिली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ.संतोष चव्हाण यांनी कांद्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. #कांदा #पिक #सूक्ष्म #अन्नद्रव्य #onion #vegetables #KrishiVigyanKendra #crop #Agricultural
0 notes
imranjalna · 6 months
Text
श्री नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी / राष्ट्राला समर्पित आणि देशभरातील 10 वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना माननीय पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला The Hon’ble Prime Minister also Flags off Secunderabad – Visakhapatnam Vande Bharat Express
श्री नरेंद्र मोदी जी, माननीय पंतप्रधान यांनी 12.3.2024 रोजी देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी / समर्पित केली तसेच दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सची पायाभरणी केली आणि 10 वंदे भारत ट्रेन व 4 वंदे भारत ट्रेनच्या विस्तारासह इतर रेल्वे सेवा हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये पायाभरणी /…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahavoicenews · 7 months
Text
प्रमुख मराठी लोगो: सांस्कृतिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक
प्रमुख मराठी लोगो हे एक प्रतिष्ठित चिन्ह आहे जे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मराठी भाषिक समुदायाची भाषिक ओळख दर्शवते. क्लिष्ट तपशील आणि दोलायमान रंगांसह डिझाइन केलेला, हा लोगो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता, इतिहास आणि परंपरा यांचे सार दर्शवतो.
प्रमुख मराठी लोगोमध्ये मराठी संस्कृतीत महत्त्व असणारे अनेक घटक आहेत. तिच्या केंद्रस्थानी देवनागरी लिपी आहे, जी मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. मराठी साहित्य आणि कवितेची अभिजातता आणि सुसंस्कृतपणा प्रतिबिंबित करणारी स्क्रिप्ट सुंदर शैलीत आहे.
देवनागरी लिपीभोवती पारंपारिक मराठी आकृतिबंध आणि चिन्हे आहेत, जसे की कमळाचे फूल, आंब्याची पाने आणि मोराची पिसे. ही चिन्हे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत आणि समृद्धी, शुभ आणि सौंदर्य यासह विविध अर्थ धारण करतात.
प्रमुख मराठी लोगोचे रंग पॅलेट अभिमान, उत्कटता आणि एकतेच्या भावना जागृत करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहे. भगवा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या दोलायमान छटा अनुक्रमे धैर्य, वाढ आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जातात, तसेच भारतीय राष्ट्रध्वजाला आदरांजली वाहतात.
प्रमुख मराठी लोगो केवळ दृश्य प्रतिनिधित्वापेक्षा अधिक काम करतो; हे सांस्कृतिक अस्मितेचे आणि मराठी भाषिक समुदायासाठी अभिमानाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे मराठी लोकांच्या लवचिकता, सर्जनशीलता आणि लवचिकतेला मूर्त रूप देते, ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिदृश्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
लोगो सरकारी कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध संदर्भांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केला जातो. तिची उपस्थिती मराठी भाषा, साहित्य, कला आणि परंपरांना साजरी आणि प्रोत्साहन देते, जगभरातील मराठी भाषिकांमध्ये आपुलकी आणि एकतेची भावना वाढवते.
शिवाय, प्रमुख मराठी लोगो वेगाने बदलणाऱ्या जगात भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे व्यक्तींना त्यांच्या मुळांचा अभिमान बाळगण्यासाठी, त्यांचा वारसा स्वीकारण्यासाठी आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रोत्साहित करते.
शेवटी, प्रमुख मराठी लोगो हे केवळ प्रतीकापेक्षा बरेच काही आहे; हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्रीचा आणि तेथील लोकांच्या चिरस्थायी भावनेचा पुरावा आहे. हा प्रतिष्ठित लोगो स्वीकारून आणि त्याचा उत्सव साजरा करून, मराठी भाषिक समुदाय पुढील पिढ्यांसाठी आपली खास ओळख आणि वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
अधिक माहितीसाठी:-
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
anuragyam · 2 years
Text
43 महिलाओं और बच्चियों को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर सम्मानित किया - अनुराग्यम्
अनुराग्यम् नई दिल्ली ने 8 मार्च 2023, अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर 43 महिलाओं और बच्चियों को सुपर टैलेंट गर्ल अवार्ड एवं इंफ्लेन्सेर वोमेन अवार्ड से समानित किया । भारत के अलग अलग राज्यों से अलग अलग वर्ग (सोशल एक्टिविटीज, एजुकेशन, आर्ट एवं संस्कृति, नृत्य, खेल, म्यूजिक एवं म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स) में सर्वश्रेष्ठ कार्य करने पर सम्मानित किया । यह वो बच्चियां है, महिलाएं है जिन्होंने समाज में अपनी एक पहचान बनाई और समाज के कल्याण में अपने अपने वर्ग में सर्वोत्तम स्थान प्राप्त किया ।
सुपर टैलेंटेड गर्ल अवार्ड 2023 से सम्मानित बच्चियों के नाम : अनुराधा चौधरी, आरोही पाटिल, सजनी वाराधाराजन, दीक्षा त्यागी, कविति पावनी, दिव्या वसंत अहीर, गौरी बहरे, पूर्वी रजक, कंदरेगुला साईश्रीनिधि, अफशीन बानू शेख, ओशिन आनंद, कनिष्का मोरे, एम जी श्रुति, हिरवा बधेका, देबोलीन बग, अक्षरा पटेरिया ।
इंफ्लेन्सेर वोमेन अवार्ड 2023 से सम्मानित महिलाओं के नाम : कविता जैन, स्निग्धा छाया अध्यापक, निधि सहगल, डॉक्टर आकांक्षा चौधरी, पलक शर्मा, तान्या, अनुपमा श्रीवास्तव, रूपश्री एस मोहन्ती, दीपंका शर्मा, पुनीत मदान, डॉ पूजा वी आनंद, शीतल शर्मा, प्रीति अरोड़ा, अंजू दागा, श्रेया सूरज, मोनोसरी रॉय, डॉक्टर लोपामुद्रा बहरा, मोनिका कपूर, डॉक्टर छाया कुमारी, निधि कीर्तिभाई कुंवरानी, डॉ मंजू बसंत अहीर, विनीता पुंडीर, डॉ तरुणा माथुर, निधि बंसल, प्रज्ञा मिश्रा, मीनू बाला, अंकिता बहती, ममता रजक।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
श्री सचिन चतुर्वेदी, संस्थापक, अनुराग्यम् इन बच्चियों और महिलाओं के प्रगति के प्रति अपनी भावनाओं को इन अवार्ड्स के ज़रिए इन सब में उत्साह भर कर नव जीवन के कल्याण की शुभकामनाएं देते हैं और भारत की सभी नारियों के समाज के प्रति अपनी प्रतिभा को और आगे ले जाने की मनोकामना करते हैं । अनुराग्यम् परिवार हर पल सभी महिलाओं एवं बच्चियों के हुनर को अपने पटल पर साल भर भारत एवं अंतर्राष्ट्रीय स्तर पर ले जाने की कोशिशें करता है ताकि भारत की बच्चियां और महिलाएं अंतरराष्ट्रीय स्तर पर में अपनी पहचान बना सकें ।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील
महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील
महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील Fire and Health Department Vacancy:राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध - पंतप्रधानांचं प्रतिपादन
देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला उद्यापासून प्रारंभ-गांधी जयंतीला समारोप
मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप
उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-दहा दिवसीय गणेशोत्सवाचीही उद्या सांगता
आणि
आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर मात करत भारत अंतिम फेरीत दाखल
****
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्या आधारावर देशाचं भविष्य घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं. पीएम सूर्यघर योजनेच्या यशाबद्दल कौतुक करत, योजनेमुळे भविष्यात देशातलं प्रत्येक घर ऊर्जा निर्मिती केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ व्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर क्रांतीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमात सहभागी झाले. कोल्हापूर स्थानकावर यावेळी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. कोल्हापूर-पुणे वन्दे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभाच्या या गाडीतून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिरज स्थानकापर्यंत मोफत प्रवास, अल्पोपहार आणि टोप्या रेल्वेकडून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आठव्या ‘भारत जल सप्ताहा’ला उद्यापासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नवी दिल्लीत भारत मंडपम इथे या सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.
****
देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालयं, अभयारण्��ं आणि सार्वजनिक स्वच्छतागृहं यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
मराठवाड्यातही बहुतांश ग्रामपंचायतींमध्‍ये हे अभियान राबवण्‍यात येणार असून, उद्या सगळ्या गावांमधून शुभारंभ करुन स्‍वच्‍छता प्रतिज्ञा घेतली जाणार आहे, नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी ही माहिती दिली.
****
मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं एक वर्षापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज ��त्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या वर्षी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत, न्यायमूर्ती खन्ना यांनी व्यक्त केलं. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना विधी पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांचं तर सुवर्णपदक विजेत्यांना सुवर्णपदकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांनाही चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये आता अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. या निमित्त मराठवाड्यातला मुख्य ध्वजारोहण समारंभ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणीही करणार आहेत.
परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. या सगळ्या ठिकाणी आरोग्य पथकांसह महापलिकेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मूर्ती दानाचा उपक्रम महापालिका राबवणार असून, यासाठी शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.
कचरा प्रक्रिया केंद्रावर निर्माल्य दान करणाऱ्यां नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.
नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.
जालना इथंही महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनानं आवश्यक नियोजन केलं आहे. घरगुती गणेश मूर्तींचं पर्यावरण पूरक विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात आज चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर उद्या अनंत चतुर्दशीला सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं परवा १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. या विजयासोबतच भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. उद्या भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उद्या ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. झाड लावल्यानंतर त्या झाडासोबतचं आपलं छायाचित्र merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
Text
आली होळी आली
आली आली होळी आलीगालावर दिसे रंगाची लाली ।बघून चेहरा ओळख पटेनावाटे जणू आहे तो मवाली । पळस हिरवा झाला लाल ।कसे रंगात रंग  मिळालेभासे बहुरंगी ती शाल । राधा झाली वेडी शोधीआहे कुठे तो कान्हा ।रंग उधळून गेला कसाहवा त्यास ऐक बहाना ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
विवेक विचार
लोककल्याणासाठी आपले तन मन धन कामी लावा. आपल्यातील साऱ्या कल्याणकारक व शुभ शक्ती एकत्र आणा. कोणत्या झेंड्याखाली तुम्ही कार्य करीत आहात याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या झेंड्याचा रंग लाल आहे की हिरवा की निळा की पिवळा, हे बघू नका. हे सर्व रंग एकत्र मिसळून त्यापासून प्रेमाचा उज्वल असा शुभ्र रंग निर्माण करा. कर्म करीत राहणे हेच आपले कर्तव्य, फलाची चिंता करु नका. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kadegaonfpc · 2 years
Photo
Tumblr media
हेवी ड्युटी चारा कुट्टी द्वारे जनावरांना उपयुक्त चारा कुट्टी करून दिला जाईल. घरच्या घरी मुरघास बनवण्यासाठी व मोठ्या बॅगमध्ये हिरवा चारा भरून ठेवण्यासाठी हिरव्या किंवा ओल्या चाऱ्याची बारीक कुट्टी करणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या चारा कुट्टीने मोठ्या साईजची कुट्टी होते. मोठ्या साईजची कुट्टी जनावरे खात नाहीत. तसेच घरगुती चारा कुट्टी ता��ी 100 ते 200 किलो चारा कुट्टी करू शकते. त्यामुळे सदर प्रक्रियेला खूप वेळ जातो. कमी वेळेत व कमी कष्टात जास्त काम करून पाहिजे असेल तर चांगली यंत्रे वापरणे आवश्यक आहे. आम्ही आपणास चांगल्या व अत्याधुनिक कृषी औजारांद्वारे शेती मशागत सुविधा देतो. तसेच ट्रॅक्टर तुमचा, औजार आमचे या तत्वावर कृषी औ��ारे भाड्याने देतो. आपल्या जनावरांसाठी हिरव्या-ओल्या चाऱ्याची कुट्टी करणेसाठी व मुरघास बनवण्यासाठी उपयुक्त हेवी ड्युटी चारा कुट्टीने आम्ही आपणास चारा कुट्टी करून देतो. शिवशक्ती कृषी औजारे बँकेतील अत्याधुनिक हेवी ड्युटी चारा कुट्टीची वैशिष्ठे ◆ एका तासात 2 टन हिरवा चारा कुट्टी करता येते. ◆ थ्री फेज लाईट मोटरद्वारे किंवा ट्रॅक्टर PTO शाफ्ट द्वारे अश्या दोन्ही साधनांवर चालवता येते. ◆ ��र्धा ते जास्तीत जास्त एक इंच एवढी बारीक कुट्टी करते. ज्यामुळे कुट्टी जनावरांना खायला व पचायला सोपी असते. ◆ पाचट कुट्टी द्वारे कुट्टा केलेला चारा डायरेक्त ट्रॉली मध्ये भरता येतो किंवा मळणी मशीन सारखा पोत्यामध्ये व मुरघास बॅग मध्ये सुद्धा भरता येतो. 📞 *7030251288 / 7030251277* https://www.instagram.com/p/CooZDhqoMZQ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा मुंबई, दि. १० : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केले. प्रधानमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahavoicenews · 8 months
Text
रंगीत आशीर्वाद: गणपती बाप्पाच्या आवडत्या रंगांचे अनावरण
गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवात पूज्य हत्तीचे डोके असलेला गणपती बाप्पा लाखो लोकांच्या हृदयात पाऊल ठेवतो. भक्त त्यांच्या घरी दैवी उपस्थितीचे स्वागत करण्यासाठी तयारी करत असताना, रंगांची निवड हा उत्साही उत्सवाचा एक महत्त्वाचा पैलू बनतो. रंगछटांच्या कॅलिडोस्कोपमध्ये, गणपती बाप्पाच्या आवडीचे दोन रंग वेगळे आहेत - जिवंत लाल आणि शुभ हिरवा.
श्रीमंत,उत्कट लाल रंगात गणेशाची गतिशील ऊर्जा आणि उपस्थिती दिसून येते. भक्त त्यांच्या जीवनात देवतेचे स्वागत करतात त्या उत्साहाचे आणि उत्साहाचे ते प्रतीक आहे. दोलायमान लाल रंग उत्सवाचे वातावरण तयार करतात, वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरतात कारण समुदाय प्रिय परमेश्वराची उपासना करण्यासाठी एकत्र येतात.
याउलट, निसर्गाची विपुलता आणि वाढ दर्शवणारा प्रसन्न हिरवा हा गणपती बाप्पाच्या पॅलेटमधील आणखी एक आवडता रंग आहे. हे नवीन सुरुवात, प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक आहे, भगवान गणेशाच्या दैवी गुणधर्मांशी पूर्णपणे संरेखित होते. हिरवीगार सजावट सभोवतालची शांतता आणि शुभतेची भावना आणते, आध्यात्मिक अनुभव वाढवते.
गणेश चतुर्थीच्या वेळी लाल आणि हिरव्या रंगाचे मिश्रण केवळ सौंदर्याच्या पलीकडे जाते; त्याचे गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की या अनुकूल रंगांमध्ये देवतेला वेषभूषा केल्याने त्यांच्या जीवनात दैवी आशीर्वाद, ऊर्जाआणि सौभाग्य आमंत्रित होते. दोलायमान स्पेक्ट्रम दैवी उपस्थितीचे दृश्यमान बनते, जे भगवान गणेशाशी संबंधित बहुआयामी सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंबित करते.
जसजशीगणेश चतुर्थी जवळ येते तसतसे, भक्त सजावट, कपडे आणि उपकरणे यासाठी लाल आणि हिरवा रंग काळजीपूर्वक निवडतात, ज्यामुळे उत्सवाच्या भावनेला अनुसरून रंगांचे सुसंवादी मिश्रण तयार होते. चैतन्यमय वातावरण जीवन आणि अध्यात्माच्या आनंददायी उत्सवाच�� प्रतिबिंब आहे, उपासकांमधील एकता वाढवते.
"रंगीबेरंगी आशीर्वाद: गणपती बाप्पाच्या आवडत्या रंगांचे अनावरण" हे शीर्षक या आनंदोत्सवाचे सार समाविष्‍ट करते. निवडलेले रंग केवळ मूर्तींना शोभत नाहीत तर भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा कॅनव्हासही रंगवतात. दैवीहत्तीच्या डोक्याचा भगवान त्याच्या उपस्थितीने घरांवर कृपा करतो म्हणून, दोलायमान लाल आणि शुभ हिरवे केवळ रंगांपेक्षा अधिक बनतात - ते आशीर्वादाचे पात्र बनतात आणि जगभरातील भक्तांच्या हृदयात गणपती बाप्पाचा आत्मा वाहून नेतात.
अधिक माहितीसाठी:-
गणपती बाप्पाचा आवडता रंग
अभ्युदय बँक बातम्या मराठीत
1 note · View note