Tumgik
#‘शिवसेनेच्या
airnews-arngbad · 8 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
स्वहिताआधी देशहिताचा विचार करावा-उपराष्ट्रपतींचं आवाहन;राज्यभरातल्या संविधान मंदिरांचं लोकार्पण
देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा काल पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी राज्यसरकार सकारात्मक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
केंद्र तसंच राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची शरद पवार यांची टीका
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्‌घाटन
****
स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं काल मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून दूरदृश्य पद्धतीनं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय राज्यघटना ही फक्त मिरवण्यासाठी नसून, तिचा गाभा समजून घेण्याची गरज धनखड यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी संविधान मंदिरांचं लोकार्पण करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरांमुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती धनखड यांनी काल नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात 'एक पेड मां के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.
****
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झारखंडमध्ये रांची इथं पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही काल करण्यात आलं. सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा असेल, आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून, या निर्णयाबाबत आश्वस्त केलं.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रातलं तसंच राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्यात शिंदखेडा इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका पवार यांनी केली.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं, जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं देखील काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पैठण इथल्या संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.
****
अभियंता दिन काल साजरा झाला. नागपूर इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍कार तसंच उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार देखील यावेळी वितरीत करण्‍यात आले.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच आवश्यक सूचना केल्या.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. मस्कतमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत गणेश घुगे यांनी माहिती दिली..
‘‘दरवर्षी आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करतो. गणपतीसाठी आम्हाला एक ठिकाण आहे रूई म्हणून. तिथे आम्हाला भारतातून गणेशमूर्ती इम्पोर्ट करतात. आणि ते आणून आम्ही इथे सण साजरा करतो. ढोलताशाचा गजर वगैरे इथं काही प्रकार नाही. आणि प्रसाद दोन वेळेला असतो. सकाळ संध्याकाळ प्रसाद करतो. गणपतीची आरती करतो. भजन करतो. आणि आनंदाने हा सण आम्ही इथे साजरा करतो.’’
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद - मिलाद- उन - नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त आज सर्वत्र मिलाद महफिल आणि सीरत संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे. ईद निमित्त ठिकठिकाणी मिलाद जुलूस देखील काढले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातली परिपत्रकं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल जारी केली.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
उद्या १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
दरम्यान, उद्या साजरा होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी माहितीपट पाहावा असं आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावं, असं आवाहन कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या मोहा आणि सिरसाळा इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते.
दरम्यान, अंबाजोगाई इथले ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन काल धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर, आमदार नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होत्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
परभणी इथं काल धनगर समाजाच्या वतीनं मेघालयचे राज्यपाल सी.एच.विजयशंकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.इंद्र मणि उपस्थित होते. आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणावर भर देण्याची गरज विजयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि कांदा निर्यातीला दिलेलं प्रोत्साहनाचं, आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी स्वागत केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी आधारभूत केंद्र पुढच्या काही दिवसात सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रितेश मोरे असा या मुलाचा नाव असून तो गणेशपूर पिंप्री इथलं रहिवासी होता.
****
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
Video
youtube
शिवसेनेच्या रणरागिणी नाशिक पुर्व विधानसभेसाठी सज्ज..
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-both-candidates-of-shiv-sena-have-a-close-fight/
0 notes
imranjalna · 5 months
Text
जालन्यात महायुतीत बिघाडी..जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
शिवसेना भाजपची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण.. भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार.. गोरगरीब कष्टकरी व गायरान जमिनीसाठी लढा देणारे ॲड.मगरे लोकसभेच्या रिंगणात.. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज.. जालन्यात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हाप्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेंच्या अडचणीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 8 months
Text
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
आदेश बांदेकरांच्या जागी सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची नियुक्ती
https://bharatlive.news/?p=188667 आदेश बांदेकरांच्या जागी सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी ...
0 notes
nashikfast · 11 months
Text
आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबई : दसऱ्याच्यानिमित्ताने आज (दि. २४) होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. यंदाच्या भाषणामध्ये उद्धव…
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
वाटचाल नव्या विकासपर्वाकडे...
Tumblr media
तूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा वास्तवदर्शी आणि सत्याची झालर असलेला इतिहास कोणी लिहीला आहे की नाही, ठावे नाही. परंतु अशा इतिहासाची पाने जेव्हा केव्हा लिहीली जातील, त्यावेळी सध्याच्या राज्य सरकारचे नाव नोंदवावे लागणार आहे. या संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेणारे आधुनिक भगीरथ म्हणूनही या सरकारचा उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत, कलेपासून कलेवरापर्यंत आणि संन्यासापासून पदन्यासापर्यंत जीवनातील प्रत्येक क्षेत्र गढूळ होत चालले आहे की काय अशी शंका यावी असे वातावरण भवतालात असताना अशा स्थितीतही जगण्याची गणितं शोधण्यासाठी अंधाराशी चाललेल्या लढाईत सर्वसामान्य माणसांची ताकद वाढेल असा उजेड सध्याच्या भाजप- शिवसेनेच्या युती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आणला आहे. मुळात लातूर जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती ओळख पुसून टाकण्यासाठी हे राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना येत्या २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास पावणेचार लाख कुटुंबांना नळजोडणी मिळणार आहे. यासाठी जवळपास ५४८ कोटी रुपयांच्या ९३५ योजनांना सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्णही झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणीद्वारे पेयजलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. नळ पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या आदिवासी गावे, वाड्या, पाडे येथील कुटुंबांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाड्या यांनाही या योजनेतून नळजोडणी देण्यात येते आहे, हे विशेष. वर उल्लेख केल्याप्रमाणे, जिल्ह्यात या मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ९३५ योजनांपैकी लातूर तालुक्यासाठी १३५ योजना असून या तालुक्यातील ६५,८९२ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. पाणी हा जगण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्याशिवाय जगता येत नाही. जगणेही शक्य नाही. याची जाणीव ठेवून लातूर जिल्ह्याचा रखरख असलेला जलनकाशा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे एक हिरवेगार स्वप्नच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत दिसते. कुठेही चर्चा नाही. कामाचा गवगवा नाही. राज्य शासनाने पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत या जिल्ह्यात वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७५ टक्के – म्हणजेच सुमारे ७५,००० रु. पर्यंत – अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट ३७५ शेततळ्यांचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्रधारण कमाल मर्यादा नाही, याचाही येथे उल्लेख करायला हवा. लातूर जिल्ह्यातील उद्योगधंदे, कृषितंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विजेसारख्या मूलभूत सुविधेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानुसार सामाजिक जाणिवेचे भान ठेवून राज्य सरकारने ��ास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे धोरण अंगीकारलेले असले तरी सौरऊर्जा निर्मितीवरही शासनाने अधिक भर दिलेला आहे. जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी खाजगी जमीन भाडेपट्ट्याने घेतली जाणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतक-यांना प्रति हेक्टरी दरवर्षी ७५,००० रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत ��ंभरेक प्रस्ताव सादर झाले असून त्याद्वारे सुमारे १,४३७.७३ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणा-या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून १६०.११ मेगावॅट विद्युत निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने परंपरागत कृषिविकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत जिल्ह्यातील ३०० हेक्टरवर सेंद्रीय शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १५ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, ३ वर्षांत प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे. या सरकारने परंपरागत कृषिविकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने १० लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून, यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी. जी. एस. प्रमाणीकरण, डीबीटी द्वारे शेतक-यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टरप्रमाणे पहिल्या आणि तिस-या वर्षी प्रत्येकी १६,५००, दुस-या वर्षी १७,००० रु. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही स्वप्ने साकार करण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीनधारण क्षमता, बैलांची कमी झालेली संख्या, शेतीकामासाठी कमी झालेली मजुरांची संख्या व वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये व फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण आखले आहे. या जिल्ह्यातील २१७५ शेतक-यांना या अंतर्गत विविध अवजारे आणि यंत्रांसाठी जवळपास १० कोटी १ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिटस् आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये, तसेच अन्य बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प किंवा अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांना ५० टक्के, तर इतर शेतक-यांना ४० टक्के अनुदान दिले जाते. वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरणात जंगले नष्ट होत असतानाच राज्य सरकारने राज्यात बांबूक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आहेतच. लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर मात करावयाचे असेल तर बांबूक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणा-या वृक्षांमध्ये बांबूचा समावेश आहे. त्यामुळे वृक्षाच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बांबू केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून रोजगारनिर्मितीचे साधनही असल्यामुळे औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबूपासून विविध वस्तू, फर्निचर बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तयार बांबूंची खरेदी करून बचत गटांच्या सुमारे ३०० महिला या बांबूपासून विविध साहित्य, फर्निचरची निर्मिती करतात. त्यामुळे शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना ६ हजार रुपयांची मदत केली आहे. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घातली असून आता शेतक-यांना दरवर्षी प्रति शेतकरी १२ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे, ही या सरकारची मोठी उपलब्धी मानावी लागेल. विविध निराधार योजनांमधूनही शासनाने वयोवृद्ध निराधारांच्या हाती जगण्याचे बळ दिले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प राबविण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील १४ उपप्रकल्पांसाठी जवळपास २२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी युनिट व दाळ मिल आदी उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून लातूर जिल्ह्यातील ७ कोटी ४७ लाखांच्या १०८ प्रकल्पांना या सरकारने मंजुरी देऊन एका नव्या क्रांतीकडे पाऊले टाकली आहेत. या योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या ३४ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. समाजातील महिला घटकांचा विचारही राज्य सरकारने प्राधान्याने केला असून महिला सन्मान योजना त्याकरिता शासनाने आणली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन – आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि अन्य सर्व बसेसमधून प्रवास करणा-या महिलांना या योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. एका नव्या विकासपर्वाकडे लातूर जिल्ह्याची वाटचाल राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सुरू आहे. विकासाकडे बघण्याचा हा मानवीय आणि समग्रतावादी दृष्टिकोन झाला. अख्ख्या जगण्याचे वारूळ होऊन माणसांचे समूहच्या समूह कोसळताना आपण कोरोनाकाळात पाहिले. परंतु आता मनाला आधार देणारे राज्य शासन विविध विकास योजना आणून या जिल्ह्यात विकासाची नवी पाऊले उमटवू पाहत आहे. यही है जिंदगी, कुछ ख्वाब, चन्द उम्मीदें… इन्हीं खिलौनों से तुम भी बदल सको तो चलो... – असे हे शासन पाठीवर थाप टाकून म्हणत आहे. नव्या जागरणाच्या अशा मांदियाळीचे आपण स्वागतच करायला हवे! -जयप्रकाश दगडे, ज्येष्ठ पत्रकार, लातूर Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      गौरी गणपतीनिमित्त राज्यसरकारकडून १ कोटी ७० लाखावर पात्र नागरिकांना आनंदाचा शिधा
·      मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ
·      पंचवीसावा कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा
·      छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
·      महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत श्रीलंका संघात उद्या अंतिम सामना
आणि
·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धांना दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्यानं प्रारंभ
सविस्तर बातम्या
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातल्या १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडं तसंच भाजीपाला लागवडीची योजना राबवण्यासाठी ४० लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील नांदेडसह १४ जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाना या योजनेचा लाभ होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड इथून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिल्लोड इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावं, असे निर्देश दिले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचं काम जिल्ह्यात उत्तमरित्या होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा येत्या मंगळवारचा उदगीर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून ही माहिती कळवण्यात आल्याचं, क्रीडा मंत्री संजय बनसोडे तथा लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं आहे.
****
कारगील विजय दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत कुलाबा इथल्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवदन केलं. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबातल्या ११ वीर नारींना यावेळी सन्मानित करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं. माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंका संघात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं बांग्लादेशचा तर श्रीलंकेनं पाकिस्तानचा पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, भारताला दिलेलं ८१ धावांचं आव्हान, भारताच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दिलेलं १४० धावांचं लक्ष्य श्रीलंकेच्या संघानं एक चेंडू आणि तीन बळी राखून पार करत, अंतिम फेरीत धडक मारली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं काल रात्री दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झालं. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रां यांनी या स्पर्धेच्या प्रारंभाची घोषणा केली. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाच्या बाहेर सीन नदीच्या किनारी भर पावसात पार पडलेल्या संचलन सोहळ्यात सात हजारावर खेळाडू सहभागी झाले. भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू यांनी केलं.
दरम्यान या स्पर्धेत आज हॉकी, बॅडमिंटन, टेनीस, टेबल टेनीस, नेमबाजी, मुष्टियुद्ध आणि नौकानयन आदी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत
****
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. प्राचार्य मगदूम फारुकी यांनी उर्दुत अनुवादित केलेल्या पद्मविभूषण शरद पवार - दि ग्रेट एनिग्मा या पुस्तकाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
दरम्यान ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ४ पुस्तकांचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते आज होणार आहे.
****
ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, ज्ञानराधा पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश कुटे याला बीड कारागृहातून जालना इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
दरम्यान हिंगोली इथल्या अनुराधा पतसंस्थेत ६ कोटी २७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचा अध्यक्ष अशोक कांबळे याला आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. कांबळे हा गेल्या ५ महिन्यांपासून फरार होता.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ४ लाख ५९ हजार ४५ ग्राहकांकडे सुमारे २३३ कोटी ३० लाखांचं वीजबिल थकित आहे
****
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काल लातूर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. पावसाच्या पार्श्वभूमीवर नाले साफसफाईतील हलगर्जीपणा टाळावा, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी सूचना, देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर काल जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
नांदेड महापालिकेनं पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत हिपॅटायटिस पंधरवाडा पाळण्यात येत आहे. या निमित्त काल जिल्हा रुग्णालयात हिपॅटायटिस बी आणि सी ची तपासणी करण्यात आली.
****
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
नगरच्या ' ताबा पॅटर्न ' च्या कार्यपद्धतीचाच अभिषेक कळमकर यांच्याकडून पर्दाफाश
नगर शहरातील गुन्हेगारीचा नवीन प्रकार असलेल्या ‘ ताबा पॅटर्न’ च्या विरोधात महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची काल भेट घेतली त्यावेळी शहरातील रिकाम्या प्लॉटवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून अतिक्रमण करत खंडणी वसूल करण्याची देखील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी नगर शहरातील तब्बल 30 पेक्षा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
शिवसेनेच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेचा हातोडा..
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, शिवसेनेच्या माजी महिला आमदारासह जिल्हा प्रमुख आणि 19 जणांना 5 वर्षाची शिक्षा
नांदेड : नांदेडमध्ये 2008 साली महागाई विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या तत्कालीन आमदारांसह एकूण 19 जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी 19 जणांना प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.आंदोलन कर्त्यांनी 8 एसटी बसेस आणि एका महापालिकेच्या बसची तोडफोड केली होती. या प्रकरणी अतिरिक्त न्यायाधीश एस.ई.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years
Text
शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदावरून राऊत यांना हटवले...
संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. यावर आता संजय राऊत यांनी भाष्य करत निष्ठा राखण्यासाठी पद गमवायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही जर खोके घेत, गुडघे टेकले असते, तर त्या पदावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
गद्दारांना प्रत्यूत्तर म्हणून शिवसेनेच्या ४० शाखा उघडणार : सत्यजित पाटील-सरूडकर
https://bharatlive.news/?p=171750 गद्दारांना प्रत्यूत्तर म्हणून शिवसेनेच्या ४० शाखा उघडणार : सत्यजित ...
0 notes