Tumgik
nirannjan17 · 4 months
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर वि��य असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार ��हे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
nirannjan17 · 1 year
Text
कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा,आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे..पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे..!
"सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
N_D_PATIL_22
0 notes
nirannjan17 · 2 years
Text
श्वेतपत्रिका..महाराष्ट्राची.✍
महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरले जातेय. आज ईकडे शाखेतील कार्यकर्ते मुख्यमंत्री हा जनतेची कामं करतोय म्हणून सगळ्या मंडळात गेले १० दिवस ढाल तलवार मिरवतोय तिकडं त्याच्याच इंजिनियर भाऊ जाॅब शोधतोय कारण..... त्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले जातेय. तिकडे भाजपायी मंडळी नवीन नवीन मुद्दे जनतेसमोर आणतेत कोणी कूठल्या कुठं गाळे घेऊन ठेवले हे माहीत आहे, कोणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि मीडीयाही टीरपी साठी तिखट मीठ लावून तेच बोंबलतेय पण ह्याना महाराष्ट्रातील जनतेशी काही घेणंदेणं नाही फक्त एअरबस चा पण प्रकल्प गुजरातने लुबाडला ही बातमी तुमच्यापर्यंत नीट पोहचली नाही पाहिजे कारण....... जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. उद्योग मंत्री कोण आहे हेच जनतेला माहित नाही कारण सध्याचे उद्योग मंत्री कोणी काय केलं आणि कोणी काय नाही केलं ह्याच उद्योगात जास्त मग्न आहेत त्यांना तुमच्या रोजगारीशी काडीमात्र संबंध नाही .......कारण जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. मूळशी पॅटर्न मधला डायलॉग पोलिसभरती वर एकदम जुळून येतय "पळा पळा नूस्त पळा "अन स्थगिती आली की गपगुमान रहा ..कारण तूम्हाला फक्त गृहीत धरले जातेय. आज न राहवून मराठी माणसाच्या मनाला नक्की वाटतय की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर मान खाली घालून बसला आहे कारण... जनतेला फक्त गृहीत धरले जातेय. जोपर्यंत अशा ४० लबाडखोर आमदार सारखे विचार महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही तोपर्यंत सर्व जनता गृहीतच धरली जाणार आणि ज्यादिवशी हे असे दळभद्री विचार महाराष्ट्रातून संपतील तीच खरी श्वेतपत्रिका असेल महाराष्ट्राची.
N_D_PATIL_23
0 notes
nirannjan17 · 2 years
Text
मशाल...
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा...
तिजोऱ्यांत केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळमाती
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतंही न वाली, अरे पुन्हा...
उभा देश झाला आता एक बंदिशाळा
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली, अरे पुन्हा...
धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, अरे पुन्हा...
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
N_D_PATIL_21
0 notes
nirannjan17 · 2 years
Text
भारताची ७५ वर्षे: आझादी का अमृत महोत्सव
भारतीय स्वातंत्र्याची गौरवशाली ७५ वर्षे आपण साजरी करत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या पूर्वसूरींनी तनमन अर्पून लढा दिला. लाठ्या-काठ्या, तुरुंगवास आणि प्रसंगी गोळ्याही झेलल्या. हुतात्म्यांच्या या समर्पणातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आणि मग गेल्या पाउणशे वर्षांत देशाने अनेक क्षेत्रांत प्रगतीची दालनं खुली केली. इथे धरणं उभी राहिली, गावागावात वीज पोहोचली, हरितक्रांतीने इथल्या शेती, बागांमध्ये हसू फुललं. आपल्या देशात कामगारांच्या घामातून उद्योग उभे राहिले. शहरं रोजगाराची केंद्र झाली. ग्राहक राजा झाला.जागतिकीकरणाचा पाळणा हलू लागला. सांस्कृतिक वैभव विकसित झालं आणि इथल्या क्रीडाक्षेत्राला नवे धुमारे फुटले. लाल मातीतल्या पैलवानांनी ऑलिम्पिकची सुवर्णस्वप्न दाखवली, प्रगतीचे मिल्खा,उषा सुसाट धाव घेत निघाले. हॉकीतले ध्यानचंद आणि क्रिकेटमधले कपिल,धोणी चषक उंचावू लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रगीतासह जेव्हा जेव्हा तिरंगा लहरू लागला तेव्हा तेव्हा देशाचा उर अभिमानाने भरून येऊ लागला. अनेक धर्मीयांच्या, अनेक संस्कृतींच्या, अनेक भाषिकांच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून आज आपला तिरंगा राष्ट्रध्वज दिमाखाने लहरत आहे. त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला आता या तिरंग्याचा मळवट मिरवायचाय. सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल पिक्चर म्हणून भारताचा राष्ट्रध्वज ठेवावा.
#आज़ादी_का_अमृत_महोत्सव
११/८/२०२२
N_D_PATIL_20
0 notes
nirannjan17 · 2 years
Text
महाराष्ट्राच राजकारण:भूत, वर्तमान आणि भविष्य काळ.
आता पर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या लोकांनी बंड केले आहेत ते एकतर संपवले आहेत अथवा शमवले आहेत. बंडखोरी करून कोणच टिकला नाही. सेना फोडणारे एकदा तरी पडतात शिंदेंना सेनेत इथून पुढे किंमत नसणार,त्यामुळे ते पक्ष सोडतीलच हे तितकेच खरे आहे. शिवसेनेला दोन नंबरचा नेता सांभाळता येत नाही.एवढे मातब्बर नेते पक्ष सोडून जाणारा सेना एकमेव स्थानिक पक्ष ह्या महाराष्ट्रात आहे कारण शिवसेना हा निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा शिवसैनिकांवर जास्त अवलंबून आहे. सरकारमध्ये असण्याची सर्वाधिक गरज राष्ट्रवादीलाय,जर सरकार टिकले तर त्यांच्यामुळे टिकेल. सरतेशेवटी आमदार तयार करायचं रसायन हे पवार साहेबांकडे आहे.
मराठा क्रांती मोर्चा नंतर भाजप ने महाराष्ट्रातील मराठा नेते अस्थिर केले हे एका अर्थाने चांगले असले तरी महाराष्ट्रातील एकूण राजकारणही अस्थिर बनवले. एक ब्राह्मण इतक्या मराठ्यांना नुसता पळवतोय हेही ऐतिहासिक तेवढेच मजेदार विषेश म्हणजे छत्रपती च्या गादीला पण झटके दिले आहेत. पूर्वी सत्ता प्रबळ शेतकरी जातींच्या ताब्यात होती त्यामुळे अठरा पगड जातीला धरून चालणारे मराठा प्रस्थ सत्तेत राहीला. आता कुठल्याही जात समूहाकडे नव्हे तर व्यापारी वर्ग व मध्यम वर्गाकडे संपुर्ण देशाच्या राजकारणाची सूत्रे आहेत. बाकी सगळे तोंडी लावण्यापुरते. राहीला प्रश्न राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तर त्यांना एकमेकांची जिरवण्यात जास्त आवड आणि सवड आहे. जोपर्यंत संपूर्ण देशातील काँग्रेसी लोक एकत्र येत नाही तोपर्यंत काँग्रेस निवडून येत नाही हे सर्वश्रूत आहे.
राहीला प्रश्न आता एकनाथ शिंदे चा तर तो असाय
काय म्हणावे या माणसाला ..
सूगी असताना पळवून नेलंय कणसाला..
N_D_PATIL_19
0 notes
nirannjan17 · 3 years
Text
मराठा आरक्षण आणि आंदोलन
सद्य परिस्थिती बघता मराठा आरक्षण आणि त्यांच्या मागण्या हाच मुद्दा सकल मराठा समाजाने ऊचलून धरला पाहिजे. महाराष्ट्र राज्यात जवळपास ३३%(अंदाजे) मराठा समाज आहे त्यामध्ये ७०% मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास आहे. हाच ७०% म्हणजे जवळपास २.५ कोटी लोक हे आधुनिक काळातील दलित आहेत. हे जोपर्यंत भारतीय न्यायव्यवस्थेला पटणार नाही तोपर्यंत हा प्रश्न अधांतरी राहील. मग केंद्र सरकार मधे कोणाचाही सत्ता असो.
छत्रपती संभाजी राजे हे जरी मराठा समाजाच प्रतिनिधित्व करत असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत हे मराठा समाजाने विसरू नये आणि ते पण अशा पक्षाचे खासदार आहेत ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे. जरी त्यांचे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी स्वतंत्र विचार असले तरी ते अशा पक्षाचे नेते आहेत की जो पक्ष मराठा आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सर्व मराठा समाजाने पाठिंबा दिला पाहिजे असेकाही नाही. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणारी 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' संस्था भाजपचीच! संसदेत बोलण्यासाठी आर्जवे करताना साथ मविआने दिली पण परवानगी नाकारणारी भाजपच! आता मराठ्यांसाठी खोटा कळवळा भाजपचाच! सदावर्ते पण भाजपा ची एक टीम आहे हे विसरून चालणार नाही.
राहीला प्रश्न सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्या, मराठा आंदोलकांवरील गुन्हे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कोपर्डी प्रकरणातील आरोपिंना फाशीची शिक्षा, आंदोलनात आत्महत्या केलेल्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी. ह्या सर्व मागण्या राज्य सरकारच्या अधिकारात येतात. या राज्यस्तरीय मागण्यांचा तर त्या लवकरात लवकर कशा सुटतील हे त्या त्या निर्धारीत खात्याकडे वर्ग करून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी सर्व मराठा समाजाने त्याच्या स्थानिक आमदाराकडे मागणी केली पाहिजे. विधानसभेत मत मांडली पाहिजेत. त्यासाठी भाजपा हाच पर्याय नाही. यासाठी फक्त छत्रपती संभाजी राजेंनी आंदोलन करून ऊपयोग नाही सर्व सकल मराठा समाजाने उग्र आंदोलन करायला पाहिजे.
N_D_PATIL_18
0 notes
nirannjan17 · 3 years
Text
पावणखिंड
पन्हाळगढी जाहला शिवाजी सिद्धीच्या वेढ्यात कैद
तोचि बनला दूसरा शिवाजी असे नाव शिवा काशिद सैद
मनी धरीले राजाने विशाळगडी पोहचणे गरजेची
त्यावर नजर असे ती शत्रूसम आदिलशाहीची
वाट आडवून थांबला तो सिद्धी मसूद जबरा
तेथ उभे बाजी, फूलाजी, संभाजी व बांदल लावूनी नजरा
अशी पकडली मोक्याची जागा घोडखिंडीची
तेथून जात असे फक्त एक अश्व टाचेची
सरसावूनी आले तेथ हे शेले ऊपसूनीया तलवार
त्या रात्री तीनशे वीर जाहले जिवावर उदार
अकाशी घनघोर सरींच्या ज्वाला बरसती
खाली तलवारीच्या जिभा रक्त चाटती
येताच सिद्धी खिंडीत मरहट्टयांनी त्याची आरंभिली कत्तल
तिकडे शिवाजी निसटला विशाळगडी लावूनी शक्कल
ध्यानी बसले वीर लावूनी तोफांची आस
तेथ राजांचा विशाळगडी जल्दी जाण्याचा प्रयास
महाराज पोहचता गढी गजर तोफांचा जाहला
ऐकताच गजर बाजीप्रभूंनी सूटकेची श्वास सोडला
असे शिवाजी तयांचा राजा
युगत मांडून बजवेल शत्रूंचा बाजा
जाहली उदंड असी ती घोडखिंड
नाव दिले राजांनी तयासी पावणखिंड
-----निरंजन
N. D. PATIL _17
2 notes · View notes
nirannjan17 · 3 years
Text
महाराष्ट्र आणि मद्यराष्ट्र..
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
हिंदू धर्मात तर सुरा (दारू) प्राशन करणारे ते सुर (देव) असा एक समज आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन मिळाली म्हणून महाराष्ट्रचा मद्यराष्ट्र व्हावा हे हास्यास्पद मत आहे.
तुमच्या गावात पोलीस चौकी आहे म्हणून तुम्ही कायदे, वाहतुकीचे सिग्नल मोडायचे सोडले का? एवढे सोज्वळ आहात का तुम्ही? आणि भेंडी जर तुम्ही एवढे सोज्वळ आहात तर तुमच्यासमोर वाइन ठेवली म्हणून तुम्ही दारुडे बनणे शक्य आहे?
प्रॉब्लेम दारुमध्ये नाहीये... प्रॉब्लेम इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत, जातीयवादी आणि कट्टर धर्माभिमानी संस्कारात आहे. हुंड्यासाठी सुनेला पेटविणाऱ्या सासू दारू पीत नसतात आणि गावात एखाद्या दलित स्त्रीची नग्न धिंड काढताना खानदानी घरातले पुरुष आणि स्त्रिया दारू न पिता त्या कृतीला प्रेक्षक बनून मूकसंमती देतात. दारूला बदनाम करण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूत भरलेला पुरुषी अहंकार, जातीय माज आणि धार्मिक विद्वेष बाजूला काढून फेका.
दारू पिणाऱ्या जिनाने विरोधक म्हणून गांधींना गोळी मारली नाही, दारू न पिणाऱ्या नथुरामने मारली.
आमचे भीमसेन जोशी दारू पिऊन संतांची भजने स्वर्गीय आवाजात आणि भावात म्हणायचे. एवढं कळलं तरी पुरेसे आहे.
(COPIED THREADS FROM TWITTER)
N_D_PATIL_16
0 notes
nirannjan17 · 3 years
Text
एसटी संप आणि राजकीय घडामोडी.
एसटी महामंडळाचे शासनात विलिणीकरण हा प्रश्न सुटणार नाही हे सर्वश्रूत आहे तो एका दिवसाचा एव्हाना कमीत कमी वर्षभर तरी न सुटणारा प्रश्न आहे.
मध्य मुंबईत गिरणी कामगारांचा संप आणि सध्या एसटी कर्मचारी संप यात काही फरक नाही. त्यावेळी संप जसजसा चिघळत गेला, तसा उग्र व हिंसक रुप धारण करता झाला. पैशांच्या तंगीअभावी ज्या गिरणी कामगारांना कामावर हजर रहावं वाटत होतं, त्यांना मिलच्या गेटवर तुफान मारहाण करुन पिटाळून लावलं जायचं. अंतिमतः त्या संपाचं काय झालं ते सर्वश्रूत आहे. आज त्या मिलच्या जमिनींवर टोलेजंग इमारती, शाॅपिंग माॅल्स उभे राहिलेत. ज्या लालबाग, परळ, लोअरपरळ, वरळी पट्टयाला गिरणगाव म्हटलं जायचं, तो सर्व भाग आता "शांघाय" बनण्याच्या मार्गावर आहे. किंबहुना हळूहळू तिकडे मार्गक्रमणा करीत आहे. १९८० च्या दशकातील गिरणी संपाचं सद्यस्थितीतील एसटी संप हे दृश्यरुप आहे. यातही राजकीय रस्सीखेचीत निम्नवर्गातील एसटी कर्मचारी भरडला जातोय. याचं भान ना राजकारण्यांना ना स्वतः कर्मचार्यांना आहे. सगळा अहंकार व स्वार्थाचा खेळ चाललाय. पडळकर, खोत, दरेकरांनी एसटी संपाचा बॅटन आता सदावर्तेंकडे सरकवलाय आणि ते देखील राणा भीमदेव थाटात गर्जना करत आहेत. त्यातून निष्पन्न काहीच होताना दिसत नाहीए. विरोधी पक्षनेते आपापल्या राजकीय पोळ्यां भाजण्यासाठी तासून बसलाय हे बस कर्मचारी आणि महामंडळाला समजत नाही हे नवलच आहे. मधल्यामध्ये राजकीय पोळ्या मात्र खरपूस भाजल्या जात आहेत. बरं यातून एसटी कर्मचार्यांचंही काही भलं होईलसं दिसत नाहीए. बहुसंख्य एसटी संपकरी व नेते बहुजन समाजातील आहेत आणि या संपाला धग देणारे आपापल्या गढीत बसून संभाव्य राजकारणात काही उलथापालथ होतेय किंवा नाही, याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. इतिहासावरून कोणीच काही शिकले नाही , ना राजकारणी ना सतत होरपळणारी जनता. भांडवलदार सतत श्रीमंत होणार आणि जनता या मूर्ख राजकारण्यांच्या मागे लागून पुन्हा अजून जुना इतिहास रेखाटणार.. इगो बाजूला ठेवा कामावर रुजू व्हा आणि संघर्ष करा. जी चूक मिल कामगारांनी केली ती करू नका रे. एसटी संपामागून वेगळाच डाव रंगतोय, याची सुतराम शंका कर्मचार्यांना येऊ नये म्हणजे नवल आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने सुध्दा एसटी कर्मचार्यांच्या हिताचे निर्णय घेऊन संप लवकरात लवकर कसा मिटवता येईल ते पहावं. या संपामुळे सर्वसामान्यांची आर्��िक ओढाताण होतेय.
सरतेशेवटी काय तर संप मिटल्यास लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागेल आणि लोकांची गैरसोय पण संपेल.
N_D_PATIL_15
0 notes
nirannjan17 · 4 years
Text
मुश्किल होते है रास्ते अक्सर उन पर होते हादसे
उन हादसो को टाल दें मुश्किलों को मात दे
जो भी आज हमारे दुश्मन थे वोह भी कभी खास थे
ये कलयुग है मेरे भाई यहाँ हर कोई कमाल है ईन्सानियत से रहलो यही अपनी ढाल है कर्मा ही सबका जवाब है ।
यहाँ पे सब भी बेहाल है किसी की टेडी सी चाल है पर उनका भी बहुत बुरा हाल है ये भी एक कमाल है इसलिए बोलता है कर्मा बहुत लाजवाब हैं । तू आया जिस जगह से नाम उसका भूतकाल है ।
जो मुश्किल होते हैं रास्ते उनको करना आसान है
भाई सुन तूम्हारे जज़्बौ की कश्ती को करना समुंदर पार है
जो थक कर सो गये है वो तो खुद ही जाग जायेंगे अभी जागे हुए लोगों को बस बेदार करना बाकी है ।
कोई फ़रियाद तेरे दिल में दबी हो जैसे
तूने आँखों से कोई बात कही हो जैसे
जागते-जागते इक उम्र कटी हो जैसे
जान बाकी है मगर साँस रुकी हो जैसे
हर मुलाकात पे महसूस यही होता है
मुझसे कुछ तेरी नज़र पूछ रही हो जैसे
राह चलते हुए अक्सर ये गुमां होता है
वो नज़र छुप के मुझे देख रही हो जैसे
एक लम्हें में सिमट आया सदियों का सफ़र
ज़िन्दगी तेज़ बहुत तेज़ चली हो जैसे
इस तरह पहरों तुझे सोचता रहता हूँ मैं
मेरी हर साँस तेरे नाम लिखी हो जैसे
कोई फरियाद...
कोई फरियाद by nirannjan ft. nusrat mehedi & faiz anwar
N_D_PATIL_14
1 note · View note
nirannjan17 · 4 years
Text
मेरे हम-नफ़स मेरे हम-नवा मुझे दोस्त बन के दग़ा न दे
मैं हूँ दर्द-ए-इश्क़ से जाँ-ब-लब मुझे ज़िंदगी की दुआ न दे
मेरे दाग़-ए-दिल से है रौशनी इसी रौशनी से है ज़िंदगी
मुझे डर है ऐ मिरे चारा-गर ये चराग़ तू ही बुझा न दे
मुझे छोड़ दे मिरे हाल पर तिरा क्या भरोसा है चारा-गर
ये तिरी नवाज़िश-ए-मुख़्तसर मिरा दर्द और बढ़ा न दे
शकील बदायूनी
N_D_Patil_13
0 notes
nirannjan17 · 4 years
Text
India in the shadow of "AUSTERITY Measures "
India in the shadow of AUSTERITY Measures
The grece is the biggest example of riots over AUSTERITY measures implanted by their government which occurred due to their data furging and increase in debts. Nowadays constantly evolving Covid-19 pandemic has cast a long shadow on the global economy, which was already jolted by the US-China trade war . With fears of a global recession on the horizon, Covid-19 appears to have dealt the global economy a triple-whammy: massive supply-chain related disruptions across a range of industries from containment efforts in China and other economies; amplification of demand-side shocks due to uncertainties as well as lockdowns and other containment measures domestically; and propagation of financial shocks and the US dollar credit crunch.
Now India is under the shadow of AUSTERITY measures. Recently Indian ministry of finance Issuing fresh directions to curtail expenditure, the Finance Ministry on Thursday asked the government departments to cut some non-plan expenditure by 10%. "In the context of the current fiscal situation, there is a need to continue to rationalise expenditure and optimize available resources," the Finance Ministry said.
The austerity measures include instructions for officials to avoid holding meetings in five-star hotels; discourages departments from holding seminars abroad; bars government officials from first class air travel.
"There will be a ban on holding of meetings and conferences at five star hotels except in case of bilateral/multilateral official engagements to be held at the level of Minister-in-Charge or Administrative Secretary, with foreign Governments or international bodies of which India is a Member," the statement said.
"While officers are entitled to various classes of air travel depending on seniority, utmost economy would need to be observed while exercising the choice keeping the limitations of budget in mind. However, there would be no bookings in First Class," the statement adds. Interest and debt payments, the defence budget, salaries and pensions will not be affected, the statement said.
The government should stop furging data of GDP, fiscal deficit, unemployment to avoid the economic crisis. As thereof now India have it's own currency but in the global market it's no rupee can survive to go down. To make the social security and suceptibility government should focus on least AUSTERITY measures to the people in the middle and below level of class.
N. D. PATIL _12
0 notes
nirannjan17 · 5 years
Text
पाळींव पोपटास
हे डाळिंबाचे दाणे वेड्या ! घात तुझा करिती ll ध्रुo ll
कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यां​वरती ll १ ll
मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll
चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
फळ दिसेल ते फोडावें
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll
चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll
कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll
पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll
येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll
हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll
हा अध:पात तव झाला
डा​​ळिंबची कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll
— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)
आवडलेल्या कविता....
N. D. PATIL _11
0 notes
nirannjan17 · 5 years
Text
जैविक अस्त्रे (Bioweapons) : तिसरे महायुद्ध आणि COVID 19
जैविक युद्धामध्ये जिवंत जीवजंतू आणि त्यांच्यापासून उत्पादित पदार्थांचा वापर केला जातो. परंपरागत जैविक युद्धात सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्मातिसूक्ष्म रोगजंतू, परजीवी सूक्ष्मजंतू, बुरशी आदी जीवासंघ आणि विषाणू ह्यांचा मानव, पशू व वनस्पती यांना मारण्यासाठी अथवा हानी पोहोचविण्यासाठी वापर केला जातो. विषे/विषाणू हे जैविक तसेच रासायनिक असल्याने त्यांवर १९७२च्या जैविक युद्धाच्या आणि १९९३च्या रासायनिक युद्धाच्या करारांतर्गत बंदी घालण्यात आली. जिओ पॉलिटिक्स अँड एम्पायरला दिलेल्या एका खास मुलाखतीत डॉ. बॉयल यांनी चीनच्या वुहानमधील बायोसाफ्टी लेव्हल 4 प्रयोगशाळेतील (बीएसएल -4) कोरोनव्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी चर्चा केली ज्यामधून त्यांचा असा विश्वास आहे की संसर्गजन्य रोग सुटला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हा विषाणू संभाव्य प्राणघातक आहे आणि एक आक्षेपार्ह जैविक युद्धाचे शस्त्र किंवा दुहेरी-उपयोग बायोफेअर शस्त्रास्त्र एजंट जनुकीयदृष्ट्या कार्य गुणधर्म मिळवून सुधारित केले आहे, म्हणूनच चिनी सरकारने मुळात या विषाणूचा आच्छादन घेण्याचा प्रयत्न केला आणि आता ते यासाठी कठोर उपाययोजना करीत आहे. वुहान बीएसएल -4 लॅब ही जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) संशोधन लॅब देखील आहे आणि डॉ. बॉयल यांनी म्हटले आहे की डब्ल्यूएचओला काय घडत आहे याची पूर्ण माहिती आहे. एकीकडे COVID 19 च्या उगम स्थानावरून अमेरि��ा व चीन यांच्यात भडका उडालेला आहे.
एका करोना व्हायरसने १५० करोडचा चीन घरातच बंदिस्त झाला. रस्ते विरान झाले चीनचे अध्यक्ष भुमीगत झाले.
एक अत्यंत सूक्ष्म जंतू.१५० कोटींचा चीन चीडीचूप झाला. अगदी अदृश्य अशा एका जंतू ने चीनची दानादान उडवली .
अख्ख जग एका क्षणात" झोपावयाची ताकद निसर्गात आहे आणी मानव मात्र अहंकाराने एकमेकांना संपवन्याची धारणा ठेवतो .करोना ने थोडाही जातीभेद वर्णभेद धर्मभेद किंवा प्रांत भेद केला नाही.सगळ्यावर सारखे प्रेम दाखवत घरातच डांबले.
मानव मात्र हे माझे ते माझे मी अमक्या कुळाचा अमक्या जातीचा अमक्या धर्माचा असा अहंकार मिरवत फिरत असतो. ही शेखी करोना ने एका क्षणात उतरवली. "अलीकडे जरा
जास्तच खुमखुमी व जास्तच ताठा असलेला उत्तर कोरियाचा तानाशहा अक्षरश: पळून गेला.एकीकडं उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमामुळं संपूर्ण जग चिंतेत असताना, दुसरीकडं  उत्तर कोरियाने संहारक जैविक शस्त्र विकसित करण्याच्या कामी लागला असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. अमेरिकेतील थिंकटँक असलेल्या बेल्फर सेंटरनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 
मरणाच्या भीतीने आपल्याच वीस हजार लोकांना ठार मारण्याची भाषा करु लागला. जगातील कोणताही जीव हा निसर्गापुढे अगदीच कस्पट आहे.
जे खळांचे व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो
मैत्र जिवाचे.
Tumblr media
N. D. PATIL _10
1 note · View note
nirannjan17 · 5 years
Text
Tumblr media
अजूनही कदाचित....
N.D.PATIL_09
0 notes