Tumgik
#कीर्ती
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कीर्ती मी तुला... मालिकेचा निरोप घेताना समृद्धी भावुक; चाहतेही भारावले
कीर्ती मी तुला… मालिकेचा निरोप घेताना समृद्धी भावुक; चाहतेही भारावले
कीर्ती मी तुला… मालिकेचा निरोप घेताना समृद्धी भावुक; चाहतेही भारावले ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यापूर्वी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र ही मालिका आता…
View On WordPress
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
चंद्र सूर्य अस्त पावतील पण माझ्या राजाची कीर्ती कधीच अस्त पावणार नाही असा एकमेव अद्वितीय आराध्यवृक्ष श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक🚩🙏 . ✍️📷🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivray #jayshivray #shivajimaharaj #shivjayanti #balshivaji #kokan_amchi_shaan #raigad #shivjayanti🚩 #maharaj ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and pramotion 🤗 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Raigadh - रायगड) https://www.instagram.com/p/Co1GP7MIQ5M/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे अन्न सुरक्षा आणि मान��� प्राधिकरणाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण.
राज्यातल्या ४३४ आयटीआयमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं परवा उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन.
आणि
संविधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत. ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हील्स- अर्थात फिरती पथकं तैनात करावीत, ज्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळू शकतील, असं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा विभागातर्फे हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या संमारंभाचं उद्घाटन होईल. यानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. भारती पत्रिकेच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन आणि राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरणही यावेळी शाह यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं देशाला संबोधन प्रसारित होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं, प्रादेशिक बातमीपत्रं सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित जयदीप आपटे याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आज मालवण न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातला दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद यंत्रणे��्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं तर आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
२०२५ या वर्षासाठीच्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर.एन चिमंद्रे यांनी ही माहिती दिली. ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांनी awards.gov.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा संसर्गजन्य आजारावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होणार आहेत.
****
थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३१८ वीजग्राहकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी २२४ ग्राहकांनी ८७ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल एकरकमी भरून व्याज आणि विलंब माफीचा फायदा घेतला आहे. तर २० ग्राहकांनी हफ्त्याने रक्कम भरण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी आणि तीसगाव इथं वीजचोरी प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली.
****
0 notes
6nikhilum6 · 17 days
Text
Nigdi : ...तर महापालिका 'त्या' विद्यालयाच्या खोल्या ताब्यात घेणार
एमपीसी न्यूज – निगडीतील लि. सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे (Nigdi)कीर्ती विद्यालय महापालिकेच्या इमारतीत सुरू असून विद्यालय प्रशासनाने पालिकेचे बारा लाख रूपयांचे भाडे थकविले आहे. त्यामुळे पालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाकडून विद्यालय प्रशासनाला थकीत रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. तसेच तीन दिवसात पैसे न भरल्यास विद्यालयाच्या खोल्या ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता…
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
27. स्वधर्माशी समन्वय    
श्रीकृष्ण स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय आणि सुसंवादाबद्दल बोलत आहेत, युद्धाबद्दल नाही.
श्रीकृष्णाला अर्जुनाचे विचार, शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत, स्वतःच्या धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे.
खरं तर, समन्वय हा सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘इलेक्ट्रॉन’, ‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’ पासून ते मोठ्या आकाशगंगा, ग्रह आणि तारे एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. म��नवी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे उदाहरण नाही, ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक कार्यामुळे आपण जसे आहोत तसे बनलो आहोत. समन्वय म्हणजे गोष्टी आणि परिस्थिती जशा आहेत तशा, आपल्या संदर्भ आणि मूल्यव्यवस्यच्या  चौकटीत आपल्याला हवेत तशा नव्हे.
आपल्या लहानपणापासून, आपल्याला शिकविण्यात आले आहे की सत्कर्मांमुळे मृत्युंनंतर आपण स्वर्गात जातो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात. श्रीकृष्ण म्हणतात, स्वर्ग आणि नरक या मृत्यूनंतरच्या गोष्टी नाहीत, तर त्या आता आणि येथेच अस्तित्वात आहे. कुणाच्या क्षमतेला कशी आणि किती संधी मिळते त्यावर हे अवलंबून आहे.
जेव्हा आपण इतरांचा स्वधर्म समजून घेतो तेव्हा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असतो जो स्वर्ग आहे आणि त्याचा अभाव नरक आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतात की नाही यावर आपल्या आनंद किंवा दुःखचा अनुभव अवलंबून असतो. जेव्हा स्वधर्माशी आंतरिक समन्वय साधला जातो तेव्हा तो बाह्य जगाचा विचार न करता स्वर्गासारखा असतो.
0 notes
bhagwant123 · 4 months
Text
#GodMorningFriday
#Satbhagti_Sandesh
सच्ची लगन
जो भक्त किसी प्रकार का राग द्वेष ने करके सच्ची लगन से भक्ति करते हैं उनको पाप कम नहीं लगता उनकी सदा कीर्ती होगी।
Sant Rampal Ji Maharaj
Tumblr media
0 notes
jagdamb · 10 months
Text
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
मिलींदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती ||
#श्रीकालभैरव
जयंती | हार्दिक शुभेच्छा!
Tumblr media
#अष्टक #kalbhairav #jayanti #hindu #god #jagdamb #mahadev #mahakal #shreekalbhairav #bhairavnath #shiva #ujjain
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
0 notes
adabdurraquib · 11 months
Text
Tumblr media
दीपावली के इस महापर्व की आप व आपके पूरे परिवार, प्रियजनों को मेरी एवं मेरे कम्पनी की ओर से हार्दिक शुभकामनाएं l
ये दीपावली आपके जीवन में ढेर सारी खुशियाँ, सुख शांति, धन-धान्य, यश कीर्ती, आरोग्य एवं समृद्धि लाये!
*Adar (Founder & CEO)*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
0 notes
hemendra1969 · 1 year
Text
पारद शिवलिंग पूजनाचे अनेक लाभ
श्रावणमास पारद शिवलिंग पूजन - सकारात्मक कवच, घरात सुख-शांती, पती-पत्नी नात्यात विलक्षण सुधार होतो. अविवाहितांसाठी पर्वणी, शिवलिंगावर काय अर्पण करावे?
पारद शिवलिंग पूजनाचे अनेक लाभ अधिक माहिती ब्रह्म पुराणात असे म्हटले आहे की, जो पारद शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो आणि जीवनाच्या अंताला सर्वोच्च स्थान (मोक्ष) प्राप्त करतो. आयुष्यात त्यांना मान-सन्मान, उच्च पद, नाव आणि कीर्ती आणि शिक्षण मिळते. पारदची उत्पत्ती भगवान शिवाच्या अंशातून झाली आहे. म्हणून पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdishgarg · 1 year
Text
Tumblr media
#कबीर परमेश्वर के_अद्भुत_उपदेश
इन्द्री कर्म ना लगे लगारम, जो भजन करे निर्द्वंद्व रे।
गरीब दास जग कीर्ती होगी, जब लग सूरज चन्द रे।।
0 notes
nashikfast · 1 year
Text
--II ● विवेक विचार ● II--
लोकमत संतुष्ट ठेवायचे आणि महान कार्य करायचे हे एकाच वेळी करणे शक्य होईलच असे नाही. अंतःप्रेरणेनेनुसार कार्य केले पाहिजे. ते जर कार्य योग्य, उत्तम, आवश्यक असेल तर समाज ते डोक्यावर उचलून घेईलच. कदाचित कार्य करण्याला हे यश आपल्या जिवंतपणी पाहायला मिळणार देखील नाही. पण आपण स्वतःला तन-मन-धन पूर्वक कार्यात पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. ज्यांना जगाचे हित करावयाचे आहे त्यांनी आपली सुख-दुःखे, यश, कीर्ती हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरची मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
देशभरातल्या प्रतिभावंत क्रीडापटूंसाठीच्या कीर्ती योजनेची घोषणा
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. लातूर शहराजवळ चिंचोलीराववाडी इथे नवीन एमआयडीसी परिसरातल्या ३५० एकर जागेवर ही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
दक्षिणमध्य रेल्वेनं जालन्याजवळ दिनेगाव इथं उभारलेल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'चंही पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलं. जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसा��ेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सुविधेमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं उद्या सकाळी उद्घाटन केलं जाणार आहे.
****
पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातल्या एकूण ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौर पॅनेल, १८ नवीन रेल्वेमार्ग आणि रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण किंवा गेज रुपांतरण, १२ गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, चार रेल कोच रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.
****
दरम्यान, आज राजस्थानातल्या पोखरण इथे भारत शक्ती या कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी अवलोकन केलं. या कार्यक्रमात देशाच्या तीनही संरक्षण दलांच्या स्वदेशी शस्त्र प्रणालींची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. पोखरण आज पुन्हा एकदा भारताच्या स्वयंपूर्णतेचा साक्षीदार बनलं आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी सेनादलांचा गौरव केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. पी एम सूरज ही एक सामाजिक सशक्तीकरण योजना असून, यातून, देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून याच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए लागू करण्यात आला असून, पात्र व्यक्तींना नागरिकत्वासाठी अर्ज करण्याकरता केंद्रीय गृहमंत्रालयानं इंडियनसिटिझनशिपऑनलाईन डॉट एनआयसी डॉट इन, पोर्टल सुरू केलं आहे. इच्छुक व्यक्तींना ॲपवरूनही अर्ज करता यावा, यासाठी सीएए-२०१९ हे मोबाईल ॲपही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचं गृहमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, या कायद्याला आव्हान देणारी याचिका इंडियन युनियन मुस्लीम लीगनं सर्वोच्च न्यायलयात दाखल केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
****
भाजपचे नायब सिंह सैनी यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहरलाल खट्टर यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांचा जननायक जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली साडेचार वर्षांची युती संपुष्टात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे या पक्षातून बाहेर पडले आहेत. समाज माध्यमावर एक संदेश देत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपआपल्या निवासस्थानी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विधान भवनातही महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉक्टर विलास आठवले यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. प्रतिभावान खेळाडूंच्या निवडीसाठी शास्त्रीय चाचण्या आणि निकष ठरवले जाणार असून, देशात केवळ महिला खेळाडूंना प्रशिक्षण देणारी दोन केंद्रं सुरू करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.
****
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं आहे. यातल्या सुमारे साडेतीन हजार लाभार्थींची बँक खाती आधारशी जोडलेली नसल्यामुळे सुमारे पावणेतीन कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात वर्ग होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी संबंधितांशी संपर्क साधावा आणि आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
मुंबईत पश्चिम बोरिवली इथे एका पंचवीस मजली निर्माणाधीन इमारतीच्या सोळाव्या मजल्यालगतच्या लोखंडी सांगाड्यावरून पडल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला. आज दुपारी एकच्या सुमाराला हा अपघात झाला.
****
0 notes
mukund-singar-blog · 2 years
Photo
Tumblr media
*ज्याच्या हाथात गुरुमूर्ती,* *त्याची जगभरात कीर्ती.!* तमाम शिवसैनिकांना श्री गुरु दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.🌹🙏🌹 *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#दत्त_जयंती_2022* *#shivsainikforever🚩🚩 #udhavthakre_उद्धवठाकरे ji, #adityathakare_आदित्यठाकरे ji, #ShivsenaForMaharashtra 🔥 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cl2w4UOvZd8/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
rightstartup · 2 years
Text
दिवाळीच्या तेजोमय प्रकाशात नकारात्मकतेचा अंधःकार दूर सारून सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश सर्वत्र पसरून आपल्या जीवनात यश, कीर्ती, सुख-समृद्धीची भरभराट होवो ही शुभकामना. सर्वांना दीपावलीच्या व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tumblr media
0 notes
Text
मातेचे गुणगाण
नवरात्री चे आयोजनमाँ दुर्गाचे करू नमन ।अंबा जगदंबा तू कालीमाते कीर्ती तुझी महान ।दुराचाऱ्यांचा करी विनाशअष्टभुजा ग तुझीच शान ।मनोकामना होई पूर्णकरील जोही तुझे ध्यान ।जय आंबे जय जगदंबेभक्तिभावे करतो गुणगान ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
26 मे च्या सिनेमा आणि टीव्हीच्या या मोठ्या बातम्यांनी मथळ्यांमध्ये स्थान निर्माण केले
26 मे च्या सिनेमा आणि टीव्हीच्या या मोठ्या बातम्यांनी मथळ्यांमध्ये स्थान निर्माण केले
26 मे 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 26 मे रोजी मनोरंजन उद्योगातून या मोठ्या बातम्या आल्या आहेत. करणी सेनेच्या विरोधानंतरही अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव बदलले जाणार नाही. ‘KGF’ फ्रँचायझीचे निर्माते ‘KGF 3’ साठी हृतिक रोशनच्या नावावर चर्चा करत आहेत. रवी तेजाच्या आगामी ‘रामाराव ऑन ड्युटी’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 17 जूनला रिलीज…
Tumblr media
View On WordPress
0 notes