Tumgik
#गेले
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ?” किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला सवाल
“ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ?” किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला सवाल
“ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ?” किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला सवाल मुंबई – गेल्याअनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमकतेने विविध आरोप करताहेत. “ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ?” असा सवाल आता सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत एक ट्विट देखील केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dyanmevaarutm · 2 days
Text
Tumblr media
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
आभाळंच फाटलं कुठं कुठं शिवणार ? सासू सासरे दिंडीला गेले अन..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नगर तालुक्यातील आठवड गावच्या शिवारात एका महिलेने मुलासोबत शेतात उडी घेत आत्महत्या केलेली आहे. 23 तारखेला शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोमल राजेंद्र नवले ( वय 25 वर्ष ) आणि यश राजेंद्र नवले ( वय आठ दोघेही राहणार आठवड ) अशी त्यांची नावे असून कोमल यांच्या पतीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले...
मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेल्याची आणखी एक वदंता राजकीय वर्तुळात पसरली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
alkabirislamic · 6 months
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मोहम्मदजीं चा मोक्ष नाही झाला!
फरिश्ते जिबराईल मोहम्मदजी ना खेचरा वर बसवून वर घेऊन गेले. जिथे त्यांनी हजरत मुसा, इसा, आणि इब्राहिम जी यांना बघितले. या वरून हे सिद्ध होते की त्यांचा पण मोक्ष नाही झाला आहे, तर मुस्लिम समाजातील लोकांचा मोक्ष कश्याप्रकारे संभव आहे?
Tumblr media
23 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक��रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्ह��� कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, ���ागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
10 notes · View notes
haveyoubeentothiscity · 5 months
Text
लोकसंख्या: ६,२००,००० (6,200,000)
भाषा: मराठी (Marathi)
Credit to @oneparticularharbor for the translation. धन्यवाद!
11 notes · View notes
Text
Tumblr media
परमेश्वर कबीर जी सहशरीर सतलोकात कसे गेले पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes · View notes
bandya-mama · 1 year
Text
Bandya : अरे यार लाइट गेले.
Pradip : लाइट गेले आहेत, तर पंखा चालू कर.
Bandya : बोललास ना मूर्खासारखं,
पंखा चालू केला तर मेणबत्ती विझणार नाही का?
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😩😩😩😎😎😎😉😉😉🤣🤣🤣
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका? मुंबईः ठाकरे (Thackeray) परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे. आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कुटुंबीयांच्या…
View On WordPress
0 notes
boltevha · 1 year
Video
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्त...
2 notes · View notes
drsamratjankar12 · 1 day
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes
kaizengastrocare · 2 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
0 notes
airnews-arngbad · 8 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. यापैकी आठ जागा जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि १६ जागा काश्मीर खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई आहेत.
****
0 notes
Text
Tumblr media
समुद्राने पाच वेळा जगन्नाथपुरी चे मंदिर तोडल्यानंतर कोणाच्या आशीर्वादाने ते मंदिर पुन्हा बांधले गेले पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes · View notes
travelnew · 8 days
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला.
ANANT CHATURDASHI - 17-09-2024, Tuesday - 99.5% Waxing Gibbous Moon (Pournima) - GANPATI VISARJAN.
0 notes