Tumgik
#मारतो
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचित�� लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही ���समाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
एका समुद्रात जहाज बुडत असत…
Bandya – इथून जमीन किती लांब आहे ?
Pradip – एक किलोमीटर…
Bandya लगेच पाण्यात उडी मारतो
Bandya – कुठल्या बाजूला
Pradip – खालच्या…!!!
0 notes
bandya-mama · 8 months
Text
बँक लूटल्यावर…
डाकू : तू मला पिहलंस का?
क्लार्क : होय!
डाकू क्लार्कला गोळी मारतो.
नंतर bandya ला विचारतो,
“तू मला पाहिलस का?”
Bandya : नाही! पण माझ्या बायकोनं पाहिलं आणि म्हणत होती पोलिसांना सांगते.
🥳🥳🥳😱😱😱🤣🤣🤣
0 notes
nashikfast · 2 years
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
ज्ञान, विद्या, धन, शक्ती, सामर्थ्य इत्यादी जे काही गोळा करून प्रकृती मनुष्याजवळ संचित करते, तेह सर्व योग्य वेळ येताच चोहीकडे वाटून देण्याकरताच असते. परंतु हे सत्य आपण विसरतो. आपल्या स्वाधीन केलेल्या प्रत्येक वस्तूवर “केवळ माझ्यासाठी” असा आपण शिक्का मारतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या विनाशाची बीजे पेरतो. *स्वामी विवेकानंद…..* *● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर ३ कार्तिक शक १९४४*★…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका
“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका
“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मुलाने वयस्कर बापाला केली बेदम गरम; झटका घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कॅद, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे घटना घडली
मुलाने वयस्कर बापाला केली बेदम गरम; झटका घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कॅद, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे घटना घडली
राजस्थान जोधपूर एक व्हिडी व्हायरल मूळ या व्हिडीओमध्ये आपल्या प्रौढ बापाओ मारहारण मला व्यक्तीला अटक केली आहे. आपल्या माहितीनुसार एका कारणावर वादाला या व्यक्तीने बेदम टाकली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैदहिट. हाचडीओ व्हायरल स्वयंस्वरूप स्वयंसेवक केली आहे. तुझी मुलाने आपल्या लक्षात ठेवली होती. आजच्या दिवशी अशाच मोठ्या प्रमाणावर चढणे करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद. व्हिडीओच्या आधारे सीआरपीसी १५१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील बीजेबी कॉलेजची विद्यार्थिनी रुचिका मोहंती हिच्या रॅगिंग आणि आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात घरापासून रस्त्यावर खळबळ उडाली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या वसतिगृहांमध्ये झालेल्या रॅगिंगच्या घटनांसाठी राजकीय पक्ष नवीन पटनायक सरकारला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, ऑलिम्पियन दुती चंदने एक खळबळजनक खुलासा केला आहे. तो स्वत:ला रॅगिंगचा बळी म्हणत होता. त्याने 3 जुलै 2022 रोजी सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Expressing Multiple Verbs Taking Place in Marathi
In English, you express multiple verbs with a very straightforward 'and'. For instance, "Alka makes tea and drinks it."
In Marathi, however, there are two ways to express multiple verbs, depending on the context of your sentence.
If the verbs occur in succession, then the chronologically first verb is conjugated by removing -णे [-ṇe] and adding -ऊन [-ūn]. Therefore, to use the above example:
अल्का चहा बनवून पिते. [alkā cahā banavūn pite]
You could also translate this as "Having made tea, Alka drinks it".
Some more examples:
डीन अभ्यास करून वकील बनतो. [ḍīn abhyās karūn vakīl banlā] Dean studies and becomes a lawyer. (Having studied, Dean becomes a lawyer).
ग्रेसी विचार करून बटण दाबते. [gresī vicār karūn baṭaṇ dābte] Gracie thinks and presses the button. (Having thought, Gracie presses the button).
हेमा खाऊन ढेकर देते. [hemā khāūn ḍhekar dete] Hema eats and burps. (Having eaten, Hema burps).
However, this construction is only valid if the verbs are happening in succession.
On the other hand, if you are describing two verbs happening independently, you will use the same construction as in English, i.e. separating the verb with an 'and' word, such as आणि [āṇi] or व [va].
For instance,
मारियो धावतो आणि उडी मारतो. [māriyo dhāvto āṇi uḍī mārto] Mario runs and jumps.
Here, it is implied that Mario runs and jumps, but not necessarily in that sequence. We only learn that sometimes he runs, and sometimes he jumps.
If we were to say,
मारियो धावून उडी मारतो. [māriyo dhāvūn uḍī mārto]
It would imply that Mario runs before he jumps (which is also valid, but it bears a different meaning, that is to say that he makes a running jump).
Therefore, you can use आणि [āṇi] or व [va] to join a collection of verbs that do not occur in a set sequence:
ती अभ्यास करते, जेवते आणि झोपते. [tī abhyās karte, jevte āṇi zhopte] She studies, has meals, and sleeps.
विलियम व्यायाम करतो व खेळतो. [viliyam vyāyām karto va kheḷto] William exercises and plays.
5 notes · View notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
खरे तर कुणी त्यास बाप्पा म्हणतो कुणी गणु, गणेशा, गणपती, मोरया अशी विविध हाक मारतो कधी अगदी एकेरी साद सुध्दा घालतो जणु तो कुणा मित्र कुणा सखा वाटतो. त्याच देवपण हे हे त्याच्या रुपात जितक त्याहीपेक्षा त्याच्या या सर्व गोड नावात जास्त. आईच्या प्रेमळ नात्यासारख गोड नात हे गणपती सोबत त्याच्या भक्तांच असत तर अश्या ह्या गोड देवाची विविध नाव आपणास माहीती आहेतच चला तर मग कमेंट मध्ये तुमच्या आवडीच गणपतीचे नाव लिहून उजळणी करुयात. . Source 📸✍️ @naadkhulaa . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोंकणी चाकरमानी माणसाच हक्काचे पेज✌ कोकणातील निसर्ग🏞️। खाद्य🌾 । संस्कृती🙏🏻 । कला🌠। परंपरा🚩। समुद्र🌊। गडकिल्ले🏰 । सण🎇। राहणीमान🏡 यांचे 📷🎥 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 🚩⚓ konkan, palghar, vasai, viraar, mumbai, navimumbai, raigad, ratnagiri, sindhudurg, goa, karwar 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ganpatimurti #ganesha #modak #ganeshji #ganpatidecorations #decoration #ganpatibappamorya_ #konkangram #coconut #kokanchi_shan #ganpatifestival #bappa #konkanarchitecture #bappa_maza #morya #ganpati #kokancha_nisarga #konkandairies #majhamorya #maharashtra_clickers #beautiful #ganpatibappamorya #picoftheweek #mangalmurtimorya #modakpriya #godbappa #ganpatibappamorya #mazamorya ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. तुम्हा सर्वांनी आपल्या पेजला दिलेल्या भरघोस प्रेमामुळे आपण ईतक्या लवकर हा पल्ला गाठलाय ही तर सुरुवात आहे आता जबाबदारी अजुन वाढलीय तरीही अजुन कोंकण नव्याने बघायची आवड तशीच्या तशीच आहे त्यामुळे रीप्लाय करण्यास उशीर झाल्यास थोडे सांभाळून घ्यावे उशीरा का होईना पण आम्ही सगळ्या DM ना रीप्लाय देतोच 🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ आपला नम्र @mechakarmani 🤗 (at Ganpati Bappa Moria.....mangal Murti Muria.............!!!!!) https://www.instagram.com/p/CTKlNDOMzcu/?utm_medium=tumblr
2 notes · View notes
rahulmarathiblog · 2 years
Text
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान एका तरुण तरुणीचे प्रेमप्रकरण जुळले मात्र काही दिवसात त्यांनी लग्न देखील केले आणि पुढे काही दिवसात पत्नीला पोलीस दलात नोकरी लागली त्यावेळी तिने चक्क आपल्या पतीला ओळखण्यास देखील नकार दिलेला आहे. महिलेचा पती आता न्याय मिळेल या आशेने सरकारदरबारी चकरा मारतो आहे. बिहारच्या सहरसा येथील हे प्रकरण आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणी ही या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान एका तरुण तरुणीचे प्रेमप्रकरण जुळले मात्र काही दिवसात त्यांनी लग्न देखील केले आणि पुढे काही दिवसात पत्नीला पोलीस दलात नोकरी लागली त्यावेळी तिने चक्क आपल्या पतीला ओळखण्यास देखील नका��� दिलेला आहे. महिलेचा पती आता न्याय मिळेल या आशेने सरकारदरबारी चकरा मारतो आहे. बिहारच्या सहरसा येथील हे प्रकरण आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणी ही या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
Pradip: मला तुझी आठवण आली कि,
मी तुझा फोटो बघतो.
मुलगी: अय्या, आणि माझा आवाज
ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?
Pradip: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो.
0 notes
bandya-mama · 1 year
Text
Bandya त्याच्या शेतात गेलेला असतो…
विहिरीच्या काठावर बसलेल्या एका बेडकाशी त्याचं भांडण होतं.
बेडूक : तुला बुद्धी नाहिये!
Bandya : आहे!
बेडूक : नाहिये!
(असं म्हणून बेडूक विहिरीत उडी मारतो.)
Bandya : अरे! नाहिये!, तर नाहिये!
एवढ्यासाठी विहिरीत जीव द्यायची गरज नव्हती.
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
सरकारी नोकरी लागताच शिपायाला बोलावून नवऱ्याला हाकलले , पती म्हणतोय की..
देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान एका तरुण तरुणीचे प्रेमप्रकरण जुळले मात्र काही दिवसात त्यांनी लग्न देखील केले आणि पुढे काही दिवसात पत्नीला पोलीस दलात नोकरी लागली त्यावेळी तिने चक्क आपल्या पतीला ओळखण्यास देखील नकार दिलेला आहे. महिलेचा पती आता न्याय मिळेल या आशेने सरकारदरबारी चकरा मारतो आहे. बिहारच्या सहरसा येथील हे प्रकरण आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणी ही या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक
मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक
मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सीसीटीव्हीमध्ये, गुडगावमध्ये लिफ्टमधून सुटलेला माणूस लिफ्टमन, गार्डला वारंवार चापट मारतो.
सीसीटीव्हीमध्ये, गुडगावमध्ये लिफ्टमधून सुटलेला माणूस लिफ्टमन, गार्डला वारंवार चापट मारतो.
गुडगावचा माणूस सुरक्षा रक्षकाला थप्पड मारताना दिसला गुडगाव: गुडगावमध्ये एका व्यक्तीला त्याच्या अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाला वारंवार थप्पड मारताना दिसल्यानंतर त्याला लिफ्टमधून वाचवल्यानंतर लगेचच दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुडगावच्या सेक्टर 50 मधील क्लोज एन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. वरुण नाथ हा व्यक्ती आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये अडकला. तो बाहेर…
View On WordPress
0 notes