Tumgik
#विकासकामांच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं… नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून सुरुवात
पर्यावरण रक्षणासाठी राज्याच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, मुख्यमंत्र्यांचा वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमकडून आज सन्मान
मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
दहा दिवसीय गणेशोत्वाची सांगता, धुळे-नाशिक इथं दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद
सविस्तर बातम्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. एनपीएस वात्सल्य च्या नवी दिल्ली येथील उद्‌घाटन सोहोळ्याअंतर्गत देशभरात जवळपास 75 ठिकाणी एकाच वेळी असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही ठिकाणे सहभागी होतील आणि त्या ठिकाणी नवीन अल्पवयीन सदस्यांची पीआरएएन कार्ड देऊन नोंदणी केली जाईल.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन काल सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण करत असल्याचं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम काल दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमिपूजन केलं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला. निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारणीसाठी पुरेसा निधी दिला जाईल,  सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी  रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.  हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात शेतकरी आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.
****
परभणी, हिंगोली,नांदेड, धाराशिव आणि लातूर इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं..
****
केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवड्याला कालपासून प्रारंभ झाला. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांगणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते या मोहिमेचं काल उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावात स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या पंधरवड्यात या मोहिमेला गती देण्यासाठी गाव स्तरावर स्‍वच्‍छता विषयक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्‍यात आलं आहे.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाची काल सांगता झाली. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नांदेड, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. 
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.
****
धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर खाली आल्यानं तीन बालकांचा मृत्यू झाला. धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावात ही घटना घडली. इतर सहा जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकजवळील पाथर्डी इथंही नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला असून त्याचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या काल दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.
****
हिंगोली ��िल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुक्यात दिव्यांगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत काल हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.
****
अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड इथं काल स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी  गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय  इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामुहिक वृक्षारोपण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामासाठी दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला, अशी माहिती पाटील यांनी  दिली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
विकासकामांच्या समन्वयासाठी सीएम वॉर रूम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकासकामांच्या समन्वयासाठी सीएम वॉर रूम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 20 : राज्यातील विविध विकास कामे गतीने व्हावीत, यासाठी सीएम वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या कामांवरही या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असल्याने विकास कामे करताना विलंब होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. धोकादायक म्हणून जाहीर केलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पुर्नबांधणीसाठी 7 नोव्हेंबर 2022 पासून…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
आमदार नितेश राणेंकडून कणकवली नगरपंचायत ला "दिवाळी बंपर" निधी ची भेट !
आमदार नितेश राणेंकडून कणकवली नगरपंचायत ला “दिवाळी बंपर” निधी ची भेट !
मुख्यमंत्री, पर्यटन मंत्र्यांची भेट घेत कणकवलीच्या विकासाची महत्वपूर्ण चर्चा विविध विकास कामांसाठी निधी, व स्टाफ पॅटर्न मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवली शहराच्या अनेक विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
भंडारा, दि. 3 : जिल्हा नियोजन समितीतर्फे यंत्रणांना निधी वितरण करण्यात आले असून विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार विभागांनी निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सन 2020-21 व सन 2021-22 मधील झालेल्या कामांचा व खर्चाचा आढावा घेतला.…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
मराठवाड्याची झोळी रिकामीच
Tumblr media
  मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील सिद्धार्थ उद्यानात झेंडावंदन करून मराठवाडा मुक्तीसाठी योगदान देणा-या महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या भागासाठी भरीव निधी दिला जाईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जिल्हानिहाय विकासकामांचा फक्त पाडाच वाचला. त्यातील बहुतांश घोषणा या जुन्याच आहेत. एकही ठोस घोषणा न करता ब-याचशा जुन्या विकासकामांचीच यादी वाचली. हाच उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरुवात झाली, असे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच यापुढे विकासकामांचा मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक विकासकामांच्या नुसत्याच घोषणा केल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ परिसराचा विकास, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भूसंदपादन, क्रीडा विद्यापीठाची स्थापना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, शहराच्या जून्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डी येथे जाण्यासाठी १७ कि.मी. पोच मा��्गाची दर्जोन्नती. विश्वास नगर, लेबर कॉलनी येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकूल व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मराठवाडा वाटर ग्रीडमध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील चार धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करणार, अशा घोषणा केल्या. जालना जिल्ह्यासाठी अंबड येथे भुयारी गटार योजना, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर परिसराचा विकास आदी कामे, परभणी जिल्ह्यात शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा अशा ब-याच घोषणा केल्या. हिंगोलीत हळद संशोधन केंद्रासाठी जागा देणार हिंगोली जिल्ह्यात श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदीर परिसराच्या विकास, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदीर संस्थान परिसराचा विकास, कुरुंदा (ता. वसमत) येथे पूर प्रतिबंधक कामे केली जाणार असल्याच्या घोषणा केल्या. नांदेडमध्ये बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प नांदेड जिल्ह्यात क्रीडा संकुलासाठी जागा, नांदेड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, घनकचरा प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प, नांदेड शहरातील भूयारी गटार योजना पूर्ण करण्याची घोषणा केली. लातूर जिल्ह्यासाठीच्या घोषणा लातूर जिल्हा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागा, विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम, मराठवाडा वॉटर ग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी यशवंत सागर जलाशय उजनी येथून ११२ द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध करणे आदी घोषणा केल्या. उस्मानाबादेत वैद्यकीय कॉलेज सुरू करणार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी नदीजोड प्रकल्प,श्री तुळजाभवानी मंदीर व परिसराचा विकास करणार, तसेच बीड जिल्ह्यात जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम करण्याची घोषणा केली. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
तिरोडा शहर अन् समस्यांचा कहर भाग-1 | तिरोडा शहरातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक, विकास रखडला  : समाजसेविका योगिता संजय जांभुळकर
तिरोडा शहर अन् समस्यांचा कहर भाग-1 | तिरोडा शहरातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक, विकास रखडला  : समाजसेविका योगिता संजय जांभुळकर
तिरोडा : नागरिकांच्या अनेक समस्या तिरोडा नगर परिषद क्षेत्रात आवासून उभ्या आहेत. आज ना उद्या या समस्या मार्गी लागतील याच आशेत नागरिक आहेत. अनेक वर्षांपासून विकासकामे रखडलेली आहेत. लोकप्रतिनिधींना शहर व नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कोणत्याही प्रकारचा रस असल्याचे दिसून येत नाही. विकासकामांच्या नावावर केवळ  निधी लाटण्यात ते मस्त असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. शहरातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
AMC : प्रभाग समस्यामुक्त करण्याबरोबर विकासकामांच्या माध्यमांतून शहराचा चेहरा मोहरा बदलणार : महापौर शेंडगे
#AMC : प्रभाग समस्यामुक्त करण्याबरोबर विकासकामांच्या माध्यमांतून शहराचा चेहरा मोहरा बदलणार : महापौर शेंडगे #Ahmednagar
AMC : अहमदनगर (दि ९ मे २०२२) : कल्याण रोडच्या विकासाला आता गती मिळाली असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रलंबित कामांचा शुभारंभ होवून ते पुर्ण होत आहे, याचे मोठे समाधान मिळत आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता आम्ही सर्व करत असून, नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करुन या भागात जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करुन ती पुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या भागाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
विकासकामांच्या निमित्ताने भेट?:पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट; जसे सर्वधर्म समभाव, तसे सर्व पक्ष समभाव- उदयनराजे
विकासकामांच्या निमित्ताने भेट?:पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट; जसे सर्वधर्म समभाव, तसे सर्व पक्ष समभाव- उदयनराजे
विकासकामांच्या निमित्ताने भेट?:पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट; जसे सर्वधर्म समभाव, तसे सर्व पक्ष समभाव- उदयनराजे https://divyamarathi.bhaskar.com/rss-v1–category-5492.xml
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आठव्या भारतीय जल सप्ताहाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते नवी दिल्लीत उद्घाटन
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन सर्वत्र साजरा-मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता-ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकींन�� प्रारंभ
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं आठव्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण आपण आज करतो, असं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आज दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.
मराठवाड्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमीपूजन केलं. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली.
परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यातल्या पेडगांव इथं मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात सत्तार यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला –
राज्याचे शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अनेक अशा माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
****
नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्यशासन अनेक सामाजिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडं वाटचाल करत असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर आता सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला आहे.
पुण्यात मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागचा राजा आणि इतर सर्वच मोठ्या मंडळांच्या गणपती मिरवणुका विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गक्रमण करत आहेत. महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलावही तयार केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं आहे. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप दिला जात आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून अर्धा किलो सेंद्रीय खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे. नांदेड, जालना, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे.
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.
****
आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांची दिल्ली विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून राजीनामा सादर केला.
****
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या आज दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.
****
हिंगोली जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुके अंतर्गत अपंगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत आज हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.
****
अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडं सादर करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड इथं आज स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीति सरकार यांनी गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामूहिक वृक्षारोपण करण्यात आलं.
****
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी उद्यापासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी परवा १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील गिद्दलूर आणि दिगऊमेटा दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
nashikfast · 3 years
Text
दिंडोरी व पेठ तालुक्यातील कामांबाबत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ आक्रमक होतात तेव्हा…
दिंडोरी व पेठ तालुक्यातील कामांबाबत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ आक्रमक होतात तेव्हा…
नाशिक: विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक पवित्रा अंगिकारत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांना चांगलेच धारेवर धरल्याचे समजते. विकासकामांच्या फाईल्स अडवल्या जात असून, यापुढे असा प्रकार घडायला नको म्हणून त्यांनी चांगलीच आक्रमक समज दिल्याचे वृत्त आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील पेठ-दिंडोरी तालुक्यातील कामांबाबत ��डवणूक यापुढे होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
भंडारा, दि. 3 : जिल्हा नियोजन समितीतर्फे यंत्रणांना निधी वितरण करण्यात आले असून विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार विभागांनी निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सन 2020-21 व सन 2021-22 मधील झालेल्या कामांचा व खर्चाचा आढावा घेतला.…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कणकवलीत विकासकामांच्या "वर्कऑर्डर" चा धडाका
कणकवलीत विकासकामांच्या “वर्कऑर्डर” चा धडाका
नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून अनेक नवीन रस्ते अस्तित्वात शहरातील विविध कामांसाठी 4 कोटी 86 लाख 85 हजार चा निधी मंजूर कणकवली: शहरात सत्ताधाऱ्यांकडून दूरदृष्टी ठेवत विविध नवीन रस्ते अस्तित्वात आणत असताना पावसाळ्यापूर्वी शहरात अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामे ही प्रत्यक्षात सुरू देखील झाली आहेत. कणकवली शहरातील एकाच टप्प्यात एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही - उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
पुणे दि.२२: पुणे शहरातील रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, शासनातर्फे आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. हडपसर येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मा���ी राज्यमंत्री…
View On WordPress
0 notes
rwarlekar · 4 years
Photo
Tumblr media
भाजपने मंजूर केलेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाची व उद्धाटनाची संधी विरोधकांनी घ्यावी: मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ; Learn More : http://indiareal.in/?p=49788&lang=mr&feed_id=23146&_unique_id=6038e6945adca
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
पुणे : अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भाषण देत असतानाच शेजारच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्…
पुणे : अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भाषण देत असतानाच शेजारच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्…
पुणे : अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भाषण देत असतानाच शेजारच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्… सोमवारी पुणे महानगरपालिकेची मुदत संपली. दरम्यान यापूर्वी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उद्घटानांची लगबग रविवारपासूनच शहरामध्ये सुरु आहे. रविवारी तर पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ३१ वेगवगेळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. रविवारी नियोजित…
View On WordPress
0 notes