Tumgik
#होणाऱ्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
धक्कादायक ! होणाऱ्या नवऱ्याने लग्नास दिला नकार; तरुणीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या
धक्कादायक ! होणाऱ्या नवऱ्याने लग्नास दिला नकार; तरुणीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या
धक्कादायक ! होणाऱ्या नवऱ्याने लग्नास दिला नकार; तरुणीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या चंद्रपूर : चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी साखरपुडा झाला असतानाही होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना  उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने फाशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
airnews-arngbad · 8 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 3 days
Text
कोकणातली माझ्या मावशीच्या घराजवळची नदी
मला जसा समुद्र आवडतो तशी नदी पण आवडते. समुद्रावरच्या चौपाटीवर वाळूत पावलं खूपसून तासनतास बसावं असं वाटतं तसंच नदीच्या किनाऱ्यावर एखाद्या खडपावर बसून नदीच्या वाहत्या पाण्यात पाय बुडवून ठेवून लहान लहान मासे पायावरची धूळ आणि मळ खाण्यासाठी चावे घेतात त्याने होणाऱ्या गुदगुल्या स्पर्शून घ्यायला मला आवडतं. “करली” नदी माझ्या मावशीच्या घरापासून पंधरा मिनिटाच्या चालीवर आहे. कोकणात ज्यावेळेला मी माझ्या…
0 notes
6nikhilum6 · 6 days
Text
Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट निदर्शनास आले आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या 25 ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. औद्योगिक वसाहतींमुळे वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड…
0 notes
arunpangarkar2 · 10 days
Text
आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ ��था गरिबी निर्मूलन चळवळ
0 notes
news-34 · 17 days
Text
0 notes
mhlivenews · 20 days
Text
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. २ : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि…
0 notes
Text
38. क्रिया आणि प्रतिक्रिया 
श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही. याचा अर्थ असा नाही की आपण अकर्माकडे आकर्षिले जातो, ज्याचा अर्थ कोणतीही कृती न करने किंवा परिस्थितीला केवळ प्रतिक्रिया देणे असा आहे.
जरी श्रीकृष्ण अकर्म हा शब्द वापरतात ज्याचा शाब्दिक अर्थ निष्क्रियता असा होतो, परंतु संदर्भ दर्शवितो की ते प्रतिक्रिया दर्शवते. श्लोक 2.47 जागरूकता आणि करुणेबद्दल बोलतो; जागरूकता ही अशी आहे की ज्यामध्ये कृती आणि परिणाम वेगळे असतात आणि इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल करुणाची भावना असते.
श्रीकृष्ण म्हणतात की कर्म केल्याशिवाय आपले जगणे अशक्य आहे कारण भौतिक शरीराच्या देखभालीसाठी खाणे इत्यादी कर्मांची आवश्यकता आहे (3.8). सत्व, तमो आणि रजो हे गुण आपल्याला सतत कृतीकडे घेऊन जातात (3.5). त्यामुळे कारवाई न होण्यास क्वचितच जागा आहे.
बातम्या बघत किंवा वाचत असताना आपण आपल्या वागण्याकडे लक्ष दिले तर असे लक्षात येते की जेव्हा आपण आपली धर्म, जात, राष्ट्रीय���्व, विचारसरणी अशा सामायिक मिथके आणि विश्वासांबद्दल वाचतो, ऐकतो किंवा बघतो तेव्हा ही कर्मे ज्या प्रतिक्रिया निर्माण करतात त्यांची आपल्याला जाणीव होते.
कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी आपल्या परस्परसंवादातही असेच आहे, जिथे बहुतेकदा ती प्रतिक्रिया असते, जी शब्द आणि कृतींच्या संदर्भात निर्णय/विभाजित मनातून येते. परिस्थिती आणि लोकांवरील अशा प्रकारची प्रतिक्रिया, आपल्या जीवनातील आनंद हिरावून घेते कारण आपण जागरूकता आणि करुणेने प्रेरित निस्वार्थ कृतीची संधी गमावतो. जागरूक असलेली बुद्धिमत्ता इतरांचा दृष्टीकोन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असेल आणि नंतर सहानुभूतीने वागू शकेल.  
श्रीकृष्ण सांगतात की इतरांच्या कर्माला प्रतिसाद म्हणून आपल्यात निर्माण होणाऱ्या अकर्माची जाणीव ठेवली पाहिजे. तसेच श्रीकृष्ण आपल्याला अशा कृती न करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे इतरांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होईल. याचा सराव करून आपण परिपक्वता, अखंडता आणि आनंदाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गुजरातमध्ये सामील होणाऱ्या गावकऱ्यांसोबत तातडीची बैठक; शासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांची मध्यस्थी कशासाठी ?
गुजरातमध्ये सामील होणाऱ्या गावकऱ्यांसोबत तातडीची बैठक; शासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांची मध्यस्थी कशासाठी ?
गुजरातमध्ये सामील होणाऱ्या गावकऱ्यांसोबत तातडीची बैठक; शासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांची मध्यस्थी कशासाठी ? नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आणि गुजरात सीमेलगत असलेली सुरगाणा तालुक्यातील काही गावांनी गुजरातमध्ये सामील होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. गावागावांत ग्रामसभा बोलावून ठराव करून गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना गुजरातमध्ये सामील करण्याचे निवेदन दिले आहे. यासाठी विलीनीकरण संघर्ष समिती…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 month
Text
मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी
मुंबई शहर जिल्ह���धिकारी संजय यादव यांचे आवाहन  मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर…
0 notes
sadguruswamisamarth · 2 months
Note
I am 29 year old male., I have been facing issues with my career , financial, there is huge debt on me , I am unable to hold money for long , I don't know who is my Kuldev or kuldevi please help me in this
आपल्या जीवनातील होणाऱ्या प्रगतीवर आपले कुलदैवत, पितृदेव व निवासी वास्तुचा तिहेरी परीणाम होत असतो. आयुष्यात होकारार्थी परिणामांना अनुसरुन कमीतकमी संबंधीत तीन त्रासांचे निवारण होणे आवश्यक असते.
पितृदोष मुक्तीहेतु आपल्या तर्पण विधीद्वारे पितरांची शांती तर होतेच त्याच बरोबर दत्तप्रबोधिनी सहज सोप्या घरगुती वास्तु उपायांनी घरात सुख शांती समृद्धीचे वातावरण तयार होते.
आपल्या कुलदेवतेला अनुसरुन काही महत्वाचे मुद्दे मला अपाँईंटमेंटहेतु अपेक्षित आहेत ते खालीलप्रमाणे यथाशक्ति मला 9324358115 Whatsapp वर कळवावेत.
*कुलदैवत माहीती
१. पुर्ण नाव
यामधे कृपया करुन आडनावात जर भुतकाळात काही बदल झालेला असेल तेही कळवावेत.
२. मुळ गाव
याठिकाणी आपल्याला मुळ गांव जर ठाऊक नसेल तर वडिलांच्या नात्यामधील गावाची माहीती द्यावी ( बंधनकारक नाही )
३. गोत्र
गोत्र माहीत असल्यास कळवावे. अन्यथा कश्यप म्हणुन लिहु नये.
४. सुखवस्तीहेतु स्थलांतरीत झालेले ठिकाण
या मुद्द्यामधे किती वर्षापुर्वी स्थलांतरीत झाले ते कळवणे.
५. माहीत असलेल्या कुलदेवतेला लावलेला कौल
कुलदेवतेच्या लावलेल्या कौल मधे काही गोंधळ होत असल्यास तसे सांगणे.
६. कुलदेवतेचे वार्षिक मानपान
आपल्या कुलदेवतेच्या मानपानात काही त्रुटी राहात असेल ते कळवणे.
यासोबतच दत्ताप्रबैधिनीच्या सर्वच्या सर्व लिंक खालीलप्रमाणे दिलेल्या लिंक वरुन आपण प्राप्त करु शकता.
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
Text
निर्माल्य कलश: परंपरा व पर्यावरणाचा समतोल
Tumblr media
धार्मिक विधी, पूजा, आणि साधनांमध्ये निर्माल्य म्हणजेच पूजा सामग्रीचे महत्व अतिशय महत्वाचे असते. निर्माल्य म्हणजे पूजा आणि धार्मिक क्रियाकलापांमध्ये वापरलेले फुलं, पानं आणि इतर नैसर्गिक पदार्थ. त्यामुळे, हे पदार्थ पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्यासाठी निर्माल्य कलशाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य योग्य प्रकारे विसर्जित करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे.
आधुनिक काळात सण उत्सवांत प्लास्टिकचा हि मोठ्या प्रमाणात वापर होताना आढळून येते. आणि ते प्लास्टिक निर्माल्य च्या माध्यमातून नदी तलाव व इतर जलाशयांत विसर्जित करण्यात येते त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होताना आपल्यास दिसून येते. पाण्याची नैसर्गिक शुद्धतेची पातळी खालावताना जाणवत आहे.
पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, म्हणूनच निर्माल्य कलश एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. पूजेचे निर्माल्य आपण निर्माल्य कलशात दान करून आपण धार्मिक कर्तव्यांचं पालन करतानाच पर्यावरणाचे संरक्षण देखील करतो.
निर्माल्य म्हणजे काय? Nirmalya हा शब्द संस्कृत भाषेतील ‘निर्मल’ या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ शुद्ध किंव्हा पवित्र असा होतो. पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमानंतर उरलेले फुलं, अक्षता, हळद-कुंकू, अगरबत्ती इत्याद���ंना निर्माल्य असे म्हणतात. याप्रकारे, हे सर्व पदार्थ निसर्गात विसर्जित करणं ही एक पारंपरिक प्रथा आहे, पण अनियंत्रित पद्धतीने विसर्जन केल्याने पर्यावरणाची हानी होऊ शकते.
निर्माल्य कलशाची गरज! धार्मिक उत्सव आणि पूजांच्या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नैसर्गिक असले तरी, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यास ते पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे  खूप महत्त्वाचं आहे.
निर्माल्य कलश ही एक सोपी, परंतु प्रभावी उपाययोजना आहे. या कलशांमध्ये निर्माल्य गोळा करून त्याचं विसर्जन योग्य ठिकाणी करता येते . यामुळे नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होऊन पिण्यायोग्य पाण्याचे आपण संवर्धन करू शकतो. 
निर्माल्य कलशाचे प्रकार “स्विफ्ट टेक्नोप्लास्ट“ सारख्या आधुनिक कंपन्या निर्माल्य कलशाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. स्विफ्ट टेक्नोप्लास्ट च्या माध्यमातून हे कलश दोन प्रकारात उपलब्ध आहेत:
Nirmalya Kalash with Plastic Stand: हा प्रकार हलका आणि टिकाऊ आहे. प्लास्टिकचा वापर करून बनवलेला हा कलश स्टँड उपयोगात सोपा आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे.याचा पर्यावरणास कोणताही अपाय नाही कारण यात वापरले जाणारे प्लास्टिक हे १०० टक्के पुनर्वापर करण्यायोग्य आहे.
Nirmalya Klash with MS Stand: हा प्रकार अधिक मजबूत आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे. माइल्ड स्टीलचा वापर करून बनवलेला हा कलशस्टँड वजनाने जड असला तरी, त्याची टिकाऊपणा आणि स्थिरता उत्तम आहे.
निर्माल्य कलशाचे फायदे
पर्यावरण पूरक: निर्माल्य कलश वापरल्यामुळे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते.
सौंदर्यदृष्ट्या आकर्षक: हे कलश विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे धार्मिक स्थळांच्या सौंदर्यात भर घालतात.
दीर्घायुषी: निर्माल्य कलश उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.
सुरक्षित: प्लास्टिकने बनवलेल्या या कलशांमुळे निर्माल्याचं संकलन सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने करता येते. 
निर्माल्य कलशाचा वापर कसा करावा?
पूजेच्या शेवटी निर्माल्य संकलित करा: प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशमध्ये  ठेवा आणि त्यात निर्माल्य जमा करा.
योग्य विसर्जन: एकदा कलश भरल्यावर, ते योग्य ठिकाणी जसं की, कंपोस्ट पिट, बागेतील खतं, किंवा महापालिकेच्या ठरवलेल्या ठिकाणी विसर्जित करा.
पुनर्वापर: निर्माल्य कलश स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात, त्यामुळे एकदा घेतलेला कलश दीर्घकाळ चालतो.
कलश हा पर्यावरण पूरक, सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. धार्मिक पूजेसाठी निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. निर्माल्य कलशाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या धार्मिक कर्तव्यात कुठलाही अडथळा येत नाही आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण देखील होते. त्यामुळे, Swift Technoplast सारख्या कंपन्या या अभिनव कल्पनांना प्रत्यक्षात आणून आपल्याला एक उत्कृष्ट पर्याय पुरवत आहेत. त्यामुळे आपल्या धार्मिक विधींमध्ये निर्माल्य कलशाचा वापर करून आपण पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारू शकतो.
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Pune : चौथ्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’चे आयोजन; देशभरातून सहभागी होणाऱ्या ४० मातकाम कलाकारांची कला पाहण्याची पुणेकरांना संधी
Pune : चौथ्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’चे आयोजन; देशभरातून सहभागी होणाऱ्या ४० मातकाम कलाकारांची कला पाहण्याची पुणेकरांना संधी – MPC…
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media
सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..
कार्यक्रमासाठी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश पाटील, कोल्हापूर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि गाढव पालन या महत्वाकांक्षी योजना आणि त्यांसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, नियम, अटी आणि प्रस्ताव दाखल करताना आणि त्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीना असलेल्या सर्व शंका आणि अडचणी बाबत विस्तृत माहिती दिली. एन. एल. एम. अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायात उतरता यावे आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची आणि शुद्ध जातीची करडे आणि कुक्कुटपिल्ले उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ५० % पर्यंत अनुदान देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प शेतकऱ्याला उभारता येतो. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनाहो योजना राबविताना येणारी दुसरी अडचण म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन. यासाठी कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन तसेच, डॉ. संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि संसाधनामध्ये यशस्वी शेळीपालनाची पंचसूत्री बाबत त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी शेतकऱ्यांकडील शेळीपालनाची उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) सुरु होणाऱ्या “पशुसंवर्धन पंधरवडा २०२४” याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागींच्या कौशल्य आणि ज्ञानात वाढ करून पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि या क्षेत्रात उद्यमशीलता वाढविणे असे होते. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून पशुधन उत्पादकता वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळू शकेल. कार्यक्रमामध्ये इच्छुक शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे विविध पदाधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) इतर महत्त्वाच्या व्यक्ति अश्या एकूण ११० व्यक्तींचा समावेश होता. #agriculture#animals#poltryfarming#Goatfarminginindia#KrishiVigyanKendra#skills
1 note · View note