Tumgik
#केल्यास
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Jio ची जबरदस्त Cashback ऑफर, ३१ डिसेंबर पूर्वी रिचार्ज केल्यास मिळणार 'इतकी' सूट
Jio ची जबरदस्त Cashback ऑफर, ३१ डिसेंबर पूर्वी रिचार्ज केल्यास मिळणार ‘इतकी’ सूट
Jio ची जबरदस्त Cashback ऑफर, ३१ डिसेंबर पूर्वी रिचार्ज केल्यास मिळणार ‘इतकी’ सूट Reliance Jio Best Offers: जर तुम्ही जिओ युजर असाल तर, Jio तुम्हाला २५० रुपयांच्या सवलतीत रिचार्ज करण्याची संधी आहे. ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत वैध आहे. जाणून घ्या सविस्तर. Reliance Jio Best Offers: जर तुम्ही जिओ युजर असाल तर, Jio तुम्हाला २५० रुपयांच्या सवलतीत रिचार्ज करण्याची संधी आहे. ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत वैध आहे.…
View On WordPress
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी त�� थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes · View notes
airnews-arngbad · 17 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे अग्रेसर असल्याचं निरीक्षण, अमेरिकेतल्या गोल्डमन सॅक्स या जागतिक ब्रोकरेज कंपनीनं नोंदवलं आहे. सक्षम सकल घरगुती उत्पादन आणि सकारात्मक गुंतवणूकदार यामुळे भारताचं उत्पन्न स्थिरगती राखून आहे आणि ही गती २०३० पर्यंत कायम राहील, असं या कंपनीनं म्हटलं आहे. मूडीज ॲनलिटिक्स या दुसऱ्या अशाच कंपनीनं, २०२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक एक टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
****
अपघात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालय यासंदर्भात सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे. राज्यांचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगा��ं दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. कोणीही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा वैष्णव यांनी दिला.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आज नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांनी काल नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. सध्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पवना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरलं आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बळीराजाला सुखी, समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवणं गरजेचं असून, प्रगती पथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली
****
0 notes
news-34 · 5 days
Text
0 notes
Text
निर्माल्य कलश: परंपरा व पर्यावरणाचा समतोल
Tumblr media
धार्मिक विधी, पूजा, आणि साधनांमध्ये निर्माल्य म्हणजेच पूजा सामग्रीचे महत्व अतिशय महत्वाचे असते. निर्माल्य म्हणजे पूजा आणि धार्मिक क्रियाकलापांमध्ये वापरलेले फुलं, पानं आणि इतर नैसर्गिक पदार्थ. त्यामुळे, हे पदार्थ पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्यासाठी निर्माल्य कलशाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य योग्य प्रकारे विसर्जित करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे.
आधुनिक काळात सण उत्सवांत प्लास्टिकचा हि मोठ्या प्रमाणात वापर होताना आढळून येते. आणि ते प्लास्टिक निर्माल्य च्या माध्यमातून नदी तलाव व इतर जलाशयांत विसर्जित करण्यात येते त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होताना आपल्यास दिसून येते. पाण्याची नैसर्गिक शुद्धतेची पातळी खालावताना जाणवत आहे.
पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, म्हणूनच निर्माल्य कलश एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. पूजेचे निर्माल्य आपण निर्माल्य कलशात दान करून आपण धार्मिक कर्तव्यांचं पालन करतानाच पर्यावरणाचे संरक्षण देखील करतो.
निर्माल्य म्हणजे काय? Nirmalya हा शब्द संस्कृत भाषेतील ‘निर्मल’ या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ शुद्ध किंव्हा पवित्र असा होतो. पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमानंतर उरलेले फुलं, अक्षता, हळद-कुंकू, अगरबत्ती इत्यादींना निर्माल्य असे म्हणतात. याप्रकारे, हे सर्व पदार्थ निसर्गात विसर्जित करणं ही एक पारंपरिक प्रथा आहे, पण अनियंत्रित पद्धतीने विसर्जन केल्याने पर्यावरणाची हानी होऊ शकते.
निर्माल्य कलशाची गरज! धार्मिक उत्सव आणि पूजांच्या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नैसर्गिक असले तरी, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यास ते पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करणे  खूप महत्त्वाचं आहे.
निर्माल्य कलश ही एक सोपी, परंतु प्रभावी उपाययोजना आहे. या कलशांमध्ये निर्माल्य गोळा करून त्याचं विसर्जन योग्य ठिकाणी करता येते . यामुळे नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होऊन पिण्यायोग्य पाण्याचे आपण संवर्धन करू शकतो. 
निर्माल्य कलशाचे प्रकार “स्विफ्ट टेक्नोप्लास्ट“ सारख्या आधुनिक कंपन्या निर्माल्य कलशाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. स्विफ्ट टेक्नोप्लास्ट च्या माध्यमातून हे कलश दोन प्रकारात उपलब्ध आहेत:
Nirmalya Kalash with Plastic Stand: हा प्रकार हलका आणि टिकाऊ आहे. प्लास्टिकचा वापर करून बनवलेला हा कलश स्टँड उपयोगात सोपा आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे.याचा पर्यावरणास कोणताही अपाय नाही कारण यात वापरले जाणारे प्लास्टिक हे १०० टक्के पुनर्वापर करण्यायोग्य आहे.
Nirmalya Klash with MS Stand: हा प्रकार अधिक मजबूत आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा आहे. माइल्ड स्टीलच�� वापर करून बनवलेला हा कलशस्टँड वजनाने जड असला तरी, त्याची टिकाऊपणा आणि स्थिरता उत्तम आहे.
निर्माल्य कलशाचे फायदे
पर्यावरण पूरक: निर्माल्य कलश वापरल्यामुळे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते.
सौंदर्यदृष्ट्या आकर्षक: हे कलश विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे धार्मिक स्थळांच्या सौंदर्यात भर घालतात.
दीर्घायुषी: निर्माल्य कलश उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.
सुरक्षित: प्लास्टिकने बनवलेल्या या कलशांमुळे निर्माल्याचं संकलन सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने करता येते. 
निर्माल्य कलशाचा वापर कसा करावा?
पूजेच्या शेवटी निर्माल्य संकलित करा: प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटी उरलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशमध्ये  ठेवा आणि त्यात निर्माल्य जमा करा.
योग्य विसर्जन: एकदा कलश भरल्यावर, ते योग्य ठिकाणी जसं की, कंपोस्ट पिट, बागेतील खतं, किंवा महापालिकेच्या ठरवलेल्या ठिकाणी विसर्जित करा.
पुनर्वापर: निर्माल्य कलश स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात, त्यामुळे एकदा घेतलेला कलश दीर्घकाळ चालतो.
कलश हा पर्यावरण पूरक, सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. धार्मिक पूजेसाठी निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. निर्माल्य कलशाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या धार्मिक कर्तव्यात कुठलाही अडथळा येत नाही आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण देखील होते. त्यामुळे, Swift Technoplast सारख्या कंपन्या या अभिनव कल्पनांना प्रत्यक्षात आणून आपल्याला एक उत्कृष्ट पर्याय पुरवत आहेत. त्यामुळे आपल्या धार्मिक विधींमध्ये निर्माल्य कलशाचा वापर करून आपण पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारू शकतो.
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
34. कर्मावर लक्ष्य केंद्रित करा, कर्मफळावर नाही
गीतेच्या सुप्रसिद्ध श्लोक 2.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या परिणामांवर म्हणजेच कर्मफलांवर आपला अधिकार नाही. ते पुढे म्हणतात की कर्माचे फळ हे आपल्या कोणत्याही कृतीची प्रेरणा असू नये आणि कृती न करण्याकडे आपला कल नसावा. हा गीतेचा सर्वात उद्धृत श्लोक आहे कारण तो जीवनाच्या विविध आयामांमध्ये पाहिला जाऊ शकतो.
श्रीकृष्ण सूचित करतात की श्रद्धा चमत्कार करू शकतो (7.21-7.22). हा श्लोक समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीकृष्णावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या तर्कशास्त्रात खोलवर न जाता किंवा त्याच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न न करता ते आपल्या जीवनात लागू करणे. आपण श्रीकृष्णावरील आपली श्रद्धा अधिक दृढ केली पाहिजे आणि त्याचे आचरण सुरू केले पाहिजे. या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आचरणात आणला तरच आपण कर्मयोगाच्या शिखरावर पोहोचू शकतो.
त्यापुढची पायरी हे समजून घेण्याची आहे की कर्मफलावर आपण लक्ष केंद्रित केल्यास आपले कर्मावरील लक्ष ढळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून कर्मफलदेखील हिरावून घेतले जाऊ शकते. चांगला अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेच्या निकालात अपेक्षित असलेले कर्मफल हिरावून घेऊ शकते. परिस्थिती कोणतीही असो आपण आपले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तिसरा भाग असा की, कर्म हे नेहमी वर्तमानकाळ घडते तर कर्मफल हे भविष्यात मिळते आणि त्यातही अनेक शक्यतांचा समावेश असू शकतो. आपण केवळ वर्तमानाला नियंत्रणात ठेवू शकत असल्याने आणि भविष्यावर आपले काहीही नियंत्रण नसल्याने श्रीकृष्ण आपल्याला कायम वर्तमानात जगण्यास सांगतात.
दृष्टीकोन किंवा समज कोणताही असो, या श्लोकात आनंद आणि दुःखाच्या कधीही न संपणाऱ्या लाटा ओलांडण्यास मदत करून आपल्यात समता आणण्याची क्षमता आहे.
0 notes
aissmseducation · 2 months
Text
इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!
Tumblr media
Author– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Hair Fall Tips: केसांचा कोरडेपणा हे केस गळण्याचे आणि तुटण्याचे प्रमुख कारण आहे. केस मऊ आणि रेशमी बनवण्यासाठी हेअर कंडिशनर वापरा, यासाठी तुम्ही घरच्या घरी एलोवेरा जेलने केसांचे कंडिशनर बनवू शकता.
पावसाळ्यात केस गळण्याच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त असतात. ओलाव्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. यासाठी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावा. बाजारात उपलब्ध असलेल्या कंडिशनरमध्ये रसायने जास्त असतात. त्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. एलोवेरा जेलच्या मदतीने केसांची स्थिती घरीच तयार केल्यास चांगले होईल. हे घरगुती कंडिशनर केसांना योग्य पोषण देईल आणि केसांचे नुकसान कमी होईल. चला जाणून घेऊया आपण घरच्या घरी केसांचे कंडिशनर कसे बनवू शकतो?
0 notes
shrikrishna-jug · 5 months
Text
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.
काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला.“अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४
सातारा दि.17: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे.  निवडणुकांची घोषणा केल्यापासून तीन दिवसाच्या आत जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 याच्या कलम 127-क च्या आवश्यकता निदर्शनास आणणारी आणि कोणतेही उल्लंघन केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन
‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन
‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या काळात जून २०२० मधील अधिसूचना आणि एप्रिल २०२१ मधील शासन निर्णयानुसार राज्यातील विना अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांत सेवेत असणाऱ्या शिक्षकांना अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय, तुकडीवर बदली देण्यास मंजुरी देण्यात आली होती. परंतु, या निर्णयास विद्यमान सरकारने १ डिसेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार स्थागिती दिली आहे. या…
View On WordPress
0 notes
kvksagroli · 8 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर ऊस शेतीचे नियोजन करावे; डॉ अंकुश चोरमले ऊस शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते यासाठी सूक्ष्म सिंचनाचा योग्य वापर व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे व ना म कृषी विद्यापीठाचे कृषी कीटक शास्त्रज्ञ तथा ऊस पिक तज्ञ डॉ. अंकुश चोरमले यांनी शुक्रवार (ता.९) रोजी सगरोळी येथील आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांना सांगितले. शेतामध्ये निघणारा केर कचरा हा जमिनीतच टाकल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारतो व जमिनीवर कचऱ्याचे आच्छादन तयार झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत नाही व ओलावा जास्त काळ टिकून राहतो त्यामुळे पाण्याची बचत होते, ऊस पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते. शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठाचा खर्च कमी होऊन ऊसशेती फायदेशीर ठरू शकते. यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे. सेतूफार्म अॅपवर पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती दिली आहे, ह्या अॅपचा वापर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करावी असे आवाहन केले. व ना म कृषी विद्यापीठाच्या मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती याविषयी मार्गदर्शन करताना, जैविक निविष्ठांचा योग्य वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर न करता दशपर्णी, अमृतपाणी, अग्नीअस्त्र यासारख्या स्थानिक जैविक निविष्ठा तयार करून पिकांसाठी वापराव्यात म्हणजे भाजीपाला व इतर पीके जास्त काळ टिकून राहतात व जमिनीचे आरोग्य सुधारते असे सांगितले. गत बारा वर्षांपासून येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. दरवर्षी तंत्रज्ञान महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी कृषी ज्ञान व माहितीची शिदोरी घेऊन जात आहेत, ह्याचा परिणाम दिसत असून शेतकऱ्यांच्या सक्ष��ीकरणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे कार्य असल्याचे गौरवोद्गार बिलोली - देगलूर मतदार संघाचे आमदार जीतेश अंतापूरकर यांनी काढले. सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुनील देशमुख, सरपंच गोदावरी उस्केलवार, संजीव सगरोळीकर, डॉ माधुरीताई रेवणवार आदींची उपस्थिती होती. तीन दिवसीय तंत्रज्ञान महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. #agriculture #Krushived2024 #kvksagroli #sugarcanefarming #SugarcaneFarmers #icar #कृषिवेद२०२४ #climatesmartagricultur
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या‌ राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रमाचं आज पुण्यात आयोजन
महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
घटकपक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास आपला पाठिंबा-महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची ग्वाही
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
आणि
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड वर्ग
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या‌ राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रमाचं आज पुण्यात बालेवाडी क्रीडांगण इथे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची  भेट म्हणून रक्षाबंधनाच्या  अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय समारंभामध्ये  लाभार्थी महिलांना सहभागी होता यावं, यासाठी अनेक ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे समारंभाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. हिंगोली, नांदेड, लातूर इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार असून, योजनेसाठी अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिला��च्या आधार संलग्नित असणाऱ्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास परवापासून प्रारंभ झालेला आहे.
दरम्यान, ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथे बोलत होते.
****
राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी विक्री कक्षांची व्यवस्था करून द्यावी. महानगरांमध्ये असे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सध्य राज्यात उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे एकूण सात लाख ८२ हजार बचत गट कार्यरत आहेत.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
****
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारी समितीत स्थान देण्यात आलं आहे.
****
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.
****
महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आहे.
****
सत्तरावे  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ या चित्रपटानं पटकावला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल या चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. नॉन फीचर विभागात साहिल वैद्य दिग्दर्शित ‘आदिगुंजन’ या मराठी माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळवला. याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हरसाठी पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट कला-संस्कृतीविषयक चित्रपटाचा मान सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ या मराठी चित्रपटानं पटकावला. तर ‘आणखी एक मोहंजोदारो’ हा सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट ठरला.
गुलमोहर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, ‘तिरुचित्रम बलम’ या चित्रपटासाठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटातल्या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, तर ‘ऊँचाई’ या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार पोन्नियन सेल्वन भाग १ या तमिळ चित्रपटासाठी ए. आर. रेहमान आणि ब्रह्मास्त्र- भाग १ शिवा या हिंदी चित्रपटासाठी प्रीतम यांना विभागून जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार ‘केसरिया’ या गाण्यासाठी अरिजीत सिंग यानं पटकावला आहे.
****
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वर्ग करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे या ८ हेक्टर ३० गुंठे जागेचा ताबा सोपवल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या जागेवर महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात आली आहे. त्याकरिता ५१३ कोटी रूपयांचा सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करण्यात आला असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सावे यांच्या हस्ते इतर मागास वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या वसतीगृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या वसतीगृहात ज्यांना प्रवेश मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले आधार योजना आणि स्वयंम योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातील इतिहासाची साक्ष देणारी वारसा स्थळं आणि त्या संबंधित इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी इतिहासप्रेमी नागरिक, इतिहास अभ्यासक आणि लातूर जिल्हा प्रशासनानं 'लातूर हेरिटेज वॉक' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. काल लातूर जिल्हा स्थापना दिनाचं औचित्य साधून या हेरिटेज वॉकला सुरुवात आली. यावेळी गंजगोलाई परिसरात पुरणमल लाहोटी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘शंभरीची झाली गोलाई...’ या गीतावर नृत्य सादर केलं.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं "हर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय देश भक्तीपर समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या पाथरी तालुक्यातल्या वडी इथल्या प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला.
****
बीड इथं महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सादर केलं आहे. ज्येष्ठता यादी, पदोन्नती, यासह विविध प्रश्नांकडे यातून लक्ष वेधण्यात आलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव इथल्या उपपरिसरात आज जलसंवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या पाण्याच्या परिस्थितीवर या कार्यशाळेत चर्चा होणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
****
पॅरिस इथं पॅरालम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना २८ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.  आठ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ८४ खेळाडूंचं भारतीय पथक सहभागी होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या पथकाला शुभेच्छा दिल्या.
****
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
mdhulap · 9 months
Link
जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध ! old flat property tax.
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ       
श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्‍या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.
एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.
आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.
रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.
लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.
0 notes