Tumgik
#टँकर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास रोडवर सोमवारी पहाटे स्वयंपाकाच्या तेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. ट्रँकरमधील तेल रोडवर सांडल्याने वाहतुक सेवेवर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टँकर ३३ टन कच्च्या तेलाने भरलेला होता आणि गुजरातमधील वालियाकडे निघाला होता. प्रथमदर्शनी,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी एक डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला तर अन्य एकोणीस जण जखमी झाले. ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती. अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या भागात पहाटे भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे हादरे बसले, तर परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळून मोठी पडझड झाली.
नांदेड शहरात सकाळी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.
भूकंपाचे हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, असं आवाहन नांदेड तसंच हिंगोली जिल्हा प्रशासनांनी केलं आहे. गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते त्यांनी त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आजही विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत, हिट ॲण्ड रन, महिला सुरक्षा आदी मुद्यांवरून घोषणाबाजी केली.
****
मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. याबाबतच्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित न राहिल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येताच, विरोधकांनी आणि त्याच्या उत्तरात सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटं आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा घेणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते आज विधानसभेत संजय सावकारे यांच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
राज्यात भेसळयुक्त पदार्थ तपासण्यासाठी सध्या असलेल्या प्रयोगशाळा कमी पडत असल्यामुळे खासगी सहभागातून अशा प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाई���, अशी माहिती अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्माराव अत्राम यांनी दिली. यासंदर्भात या खात्याला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल तसंच सरकार याबाबत कडक भूमिका घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं किलेअर्क परिसरातल्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचा मुद्दा विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी तरतूद केलेली असून, हे काम जलद पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं.
आमदार राजेश राठोड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोलार पॅनल न बसवता, देयकं अदा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्रकरणी आठ दिवसांत तपास करून कारवाईचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यासाठी पन्नास हजार युवकांची, योजना दूत, म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
****
अतिवृष्टीमुळे गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्याने मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
gajananjogdand45 · 9 months
Link
https://marmikmaharashtra.com/truck-tanker-drivers-strike-big-crisis-on-udyog-nagri-you-can-feel-the-rush-on-the-road/
0 notes
karmadlive · 1 year
Text
पिंप्री राजा रोडवर गॅसचे टँकर उलटून चालक जखमी
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
'राज्य सरकारची 'हर घर मल' योजना!'
मडगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे “हर घर जल’ देण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता “हर घर मल’ची योजना राबवीत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्यामुळे लोकांनीच आता सतर्क राहण्याचे आवाहन केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 13 : पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले. एल (पश्च‍िम), मुलुंड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
नाशिकमध्ये भीषण दुर्घटना; बस अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू
Tumblr media Tumblr media
नाशिक | नाशिक जवळ नांदूर नाका येथे खासगी बसला आग लागून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खासगी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 10 पुरुषांचा समावेश आहे. तर 29 प्रवाशी जखमी असून त्यापैकी 3 जण गंभीर जखमी आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हालवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च देखील राज्य सरकारकडून केला जाईल असे त्यांनी सांगितलं आहे. Read the full article
0 notes
inshortsmarathi · 5 years
Photo
Tumblr media
टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करावं लागतो, लाज वाटायला हवी- जयंत पाटील दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ?
0 notes
loksutra · 2 years
Text
12 हजार लिटर स्वयंपाकाचे तेल घेऊन जाणारा टँकर महामार्गावर उलटला, बाटल्या आणि भांड्यात तेल घेऊन जाणारे लोक
12 हजार लिटर स्वयंपाकाचे तेल घेऊन जाणारा टँकर महामार्गावर उलटला, बाटल्या आणि भांड्यात तेल घेऊन जाणारे लोक
प्रतीकात्मक चित्र प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो पोलिसांनी सांगितले की, अनेक गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या डब्यांमध्ये आणि इतर भांड्यांमध्ये सांडलेले तेल नेण्यास सुरुवात केली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. महाराष्ट्र (महाराष्ट्र) मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्वयंपाकाचे तेल (स्वयंपाकाचे तेल) तो घेऊन जाणारा टँकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
Nagar News : टँकर-ट्रकच्या धडकेत दोन ठार ; दोन जण गंभीर जखमी
https://bharatlive.news/?p=170858 Nagar News : टँकर-ट्रकच्या धडकेत दोन ठार ; दोन जण गंभीर जखमी
करंजी : पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघात मतदान.
डोंबिवली एमआयडीसीत अमुदान रसायन कंपनीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, २४ जण जखमी.
राज्यात दोन दुर्घटनेत आठ जणांचा बुडून मृत्यू, तर उजनी जलाशयातल्या नौका दुर्घटनेतील सहा मृतदेह सापडले.
आणि
मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात येत्या शनिवारी २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग-राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे.
****
मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेतली. पाणी पातळी वाढवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं, यासाठी सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात सध्या एक हजार २५० गावांमध्ये एक हजार ८३७ टँकर सुरु असून, टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत, तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विभागातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
****
ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत अमुदान या रसायन कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली. आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच महिलांसह २४ कामगार जखमी झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं दिली आहे.
या स्फोटामुळं एक ते दीड किलोमीटर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, कंपनीतील स्फोट झाल्याची घटना दु:खद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.   
****
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बचाव कार्य सुरु असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवान, दोन तरुण, आणि एक स्थानिक नागरीकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत दोन मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरु असताना ही घटना घडली. जवान कर्तव्यावर असताना पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्यानं हा अपघात झाला. यात धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपिंचंद पावरा आणि वैभव सुनिल वाघ यांचा समावेश आहे. मृत जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे धुळे इथं श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
****
उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली होती. दोन दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.
****
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या बोरपाडा धरणात बेडकी इथल्या दोन सोळा वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. उज्वला जयंत्या गावित आणि मिखा सानू गावित अशी दोघींची नावं आहेत. गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी त्या आज सकाळी आंघोळीला गेल्या, त्यावेळी ही घटना घडली.    
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं बिबट्यानं हल्ला केल्यानं एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असं या मृत मुलीचं नाव आहे. मुलगी अंगणात खेळताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला होता.
****
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नवी मुंबईत अनधिकृत फलकाविरोधात महानगरपालिकेकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३६ मोठे अनाधिकृत फलक काढण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही सर्वेक्षणानंतर ३१ अवैध फलक अतिक्रमण विभागाकडून काढण्याचं काम सुरू आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आमदार  पाटील यांच्या पार्थिवावर करवीर तालुक्यातील सडोली खालसा या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांनी २० वर्ष कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं. आमदार पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुखः व्यक्त केलं. पाटील यांच्या निधनानं राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानं सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक जाणतं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तर आमदार पाटील यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
****
वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज ठिकठिकाणी साजरी होत आहे. भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञान प्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करुन साजरा करण्यात येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जागजई इथं बुद्धपोर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातील बांधवांची जत्रा फुलली आहे. बुद्धपोर्णिमे निमित्त 'देव आंघोळ' आणि देवदर्शन करण्यासाठी आदिवासी समाज बांधव इथं एकत्र जमतात. पुर्वापार वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते. याठिकाणी काळाचौरव, पांढराचौरव, राव, माणकोबाई ह्या देवांना भक्तगण आंघोळीसाठी आणतात. वाजतगाजत हजारो आदिवासी समुदाय इथं आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितात.
****
हिंगोली शहरात बुद्ध पोर्णिमेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा इथून आज सकाळी फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरात पौर्णिमानगर इथं वैशाख पौर्णिमेच्या व बुद्ध जयंतीच्या निमित्तानं तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. 
****
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये आज ८९ मचाणावरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख्ख प्रकाशात हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना होणार आहे
****
निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयाच्या नावानं येणारे बनावट दुरध्वनी उचलू नये, असं आवाहन जिल्हा कोषागार विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर, कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचं खोटं सांगितलं जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. पण, कोषागारामार्फत निवृत्ती विषयक, लाभ प्रदान करताना किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नसुन, ऑनलाईन व्यवहाराविषयी देखील सूचित करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही दुरध्वनी, संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसंच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केले आहे.
****
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागासोबतच जिल्ह्यातील कोणत्याही गाव, वाडी-वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवल्यास, तातडीनं उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. 
****
मराठवाडा, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.  
****
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात कमालीची वाढ झाली असून काल अकोला इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक आठ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीशीच्यावर होता. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड इथं ४३ पूर्णांक एक, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार तर नांदेड इथं ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची ' ती ' मागणी मान्य , 29 एप्रिलला सुनावणी
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची ‘ ती ‘ मागणी मान्य , 29 एप्रिलला सुनावणी
नगर जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या टँकर घोटाळा प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू व्यवस्थित मांडली जात नसल्याने सरकारी वकील बदलण्यात यावा अशी मागणी लोक जागृती प्रतिष्ठानने केलेली होती त्यानुसार आता आधीचे वकील बदलण्यात आलेले असून ढगे यांच्याऐवजी दुसऱ्या वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि सुनावणीत जिल्हा न्यायालयात सरकारी वकील बाजू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची ' ती ' मागणी मान्य , 29 एप्रिलला सुनावणी
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची ‘ ती ‘ मागणी मान्य , 29 एप्रिलला सुनावणी
नगर जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या टँकर घोटाळा प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू व्यवस्थित मांडली जात नसल्याने सरकारी वकील बदलण्यात यावा अशी मागणी लोक जागृती प्रतिष्ठानने केलेली होती त्यानुसार आता आधीचे वकील बदलण्यात आलेले असून ढगे यांच्याऐवजी दुसऱ्या वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि सुनावणीत जिल्हा न्यायालयात सरकारी वकील बाजू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
इंदूरमधील भीषण अपघात: सोनूने आईला सांगितले - मी फ्रेंड्स बर्थडे पार्टीला जात आहे, परत आल्यावर तो कफनमध्ये गुंडाळला गेला होता.
इंदूरमधील भीषण अपघात: सोनूने आईला सांगितले – मी फ्रेंड्स बर्थडे पार्टीला जात आहे, परत आल्यावर तो कफनमध्ये गुंडाळला गेला होता.
इंदूरमध्ये कार अपघातात सहा मित्रांचा मृत्यू – फोटो: सोशल मीडिया अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका मध्य प्रदेशातील इंदूर येथे सोमवारी रात्री एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ज्याने ही बातमी ऐकली तो स्तब्ध झाला. या अपघातात मरण पावलेल्या मित्रांची तोडफोड केली गेली. यातील एक मित्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
तांझानियात भीषण टँकर स्फोटात 57 जणांचा मृत्यू
तांझानियात भीषण टँकर स्फोटात 57 जणांचा मृत्यू
तांझानियात शनिवारी झालेल्या भीषण टँकर स्फोटात एकाचवेळी 57 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दार-अस-सलाम शहरात एक भरधाव तेल टँकर नियंत्रण सुटल्याने उलटले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, 50 हून अधिक लोकांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
तर ज्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. सगळे लोक तेल चोरण्याचा प्रयत्न करत होते. पूर्व…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची नवी मागणी, ' त्या ' व्यक्तीला हटवा
टँकर घोटाळा प्रकरणात लोकजागृतीची नवी मागणी, ‘ त्या ‘ व्यक्तीला हटवा
नगर जिल्ह्यात गाजलेल्या आणि पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या टँकर घोटाळा प्रकरणातील सरकारी पक्षाची बाजू मांडणारे वकील ढगे यांना हटवण्याची मागणी मूळ तक्रारदार लोकजागृती सामाजिक संस्थेने केलेली आहे. लोक जागृती सामाजिक संस्थेचे म्हणणे आहे की, ‘ सत्र न्यायालयात भूमिका मांडणारे सध्याचे वकील तक्रारदारांना विश्वासात घेत नाहीत. गुन्ह्याच्या संदर्भात देत असलेल्या माहितीकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes