Tumgik
gramsangind · 2 years
Text
youtube
आपलंच एकेकाळचं क्रश जेव्हा बऱ्याच वर्षांतून आपल्या समोर येतं तेव्हा.....नक्की ऐका.. मॅरेज मटेरियल ❤️❤️🌹🌹
0 notes
gramsangind · 2 years
Text
youtube
गोदा म्हातारी...
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं....
पण तिला का शिकू वाटलं.. काय घडलं असं.?
ऐका गोदा म्हातारी
Like, comment and subscribe....
0 notes
gramsangind · 2 years
Text
द्वेष आणि विष...
Tumblr media
0 notes
gramsangind · 2 years
Text
0 notes
gramsangind · 2 years
Text
Found an interesting article on web...
https://googalguy.com/explore-forex-trading-strategies-using-mt4-software/
0 notes
gramsangind · 2 years
Text
#मॅरेज_मटेरियल
#marriagematerial
नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते.
आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं जास्तीचंच माहिती!
सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी!
खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही. नाही म्हटलं तर त्यांच्या त्या रायटप आणि असाईनमेंटचा पसरा खूपच व्हायचा; पण चालायचं! इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हटलं की ती बाब दुर्लक्षित केलेली केव्हाही चांगली. नाहीतर मला भीती असायचीच की इतक्या सगळ्या रद्दीत ते मला कधी भरून नेतील आणि विकून येतील हे मलाच काय पण तिकडे आटपाडीला राहणाऱ्या माझ्या घरच्यांना देखील ठाऊक होणार नाही.
एकदा तर त्यांनी कहरच केला. गावकऱ्यांचे दाखले मी माझ्या चटईवर ठेवून आंघोळीला गेलो होतो. गेले ना घेऊन हे लेकाचे आणि असाईनमेंट म्हणून जमाही करून आले. खरा कहर तो नव्हताच मुळी. तो तेव्हा झाला जेव्हा त्यांनी त्यावर शिक्षकाच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते परत देखील आणले! आता गावकऱ्यांना हे असले दाखले देणार होतो का मी?
मी तर त्यांना कधी कधी फिरकी घेताना मोहब्बते पिक्चरातील त्या चार पोरांची उपमा द्यायचो. हा, आता त्यांच्या आयुष्यात तशा नट्या नव्हत्या तेव्हा कोणी! असतीलही; पण कॉलेजच्या त्या शिस्तीपुढे त्या कधी पुढे आल्याही नसतील. पण मी मात्र त्यातला शाहरुख मुळीच नव्हतो बरं. कारण आपल्या डोक्यावरील त्या काळ्याभोर जंगलाला समोरून अगदी डावीकडून नी उजवीकडून समान तोड लागली असल्���ाची चांगलीच कल्पना मला होतीच!
पण वाटायचं कधी कधी. इंजिनिअरिंग करायला हवं होतं; पण जेव्हा त्याच इंजिनिअर पोरांचे बाप आपल्याकडे दाखले मागायला अगदी नामदेव पायरीपर्यंत भेटायला यायचे तेव्हा मात्र मी माझ्या त्या विचाराला अगदी पुढेच म्हणजे चंद्रभागेतच जलसमाधी द्यायचो! कित्येकदा!
कारण, या ना त्या कारणाने सतत इंजिनिअरिंग न केल्याचे शल्य वाटत राहायचं. आपण ढ होतो असाही काही भाग नव्हता. बारावी सायन्सच्या क्लासमधील सुजाता. माझी क्रश म्हणा हवी तर. आम्ही मात्र तिला तेव्हा मॅम म्हणायचो. हुशार होती म्हणून की काय कुणास ठाऊक. बाकीच्यांचे मला माहीत नाही; पण माझ्यासाठी ती मॅरेज मटेरियल अर्थात मॅम होती. आणि म्हणून मी पण मॅम म्हणायचो.
तर तिने नंतर स्वेरीला इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन घेतले होते. तेही एक कारण असावं बहुतेक सारखं सारखं शल्य वाटण्याचे. पण आता एकंदरीत तिथले वातावरण कळाल्यावर मात्र माझ्या त्या शल्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती. म्हणजे फार फार तर मी तिच्या हाती रुमाल थामवण्यापर्यंत मजल मारली असती. मी काही सुपर कंडक्टर नव्हतोच मुळी!
“चला, चला. आटपाडी आटपाडी.” एसटी कंडक्टरच्या जोरदार आरोळीने मी भानावर आलो. एसटीच्या दारातून खाली झुकत तो जोरजोरात ओरडत होता.
आज महिन्याची एकादशी असल्याने गाडीत गर्दीही जोरदार होती. अर्थातच मी मागे बसलो होतो. तसंही मी एसटीत फार तर दहा मिनिटे जागा असतो. धावत्या एसटीसोबत लगेचच माझी झोपही धावून येते आणि. . .
एसटी पंढरपूराबाहेर पडते न पडते तोच मी तिच्या हेलकाव्या सोबत झुलत झोपीही गेलो. कधी महुद आलं कळलं देखील नाही. मी जागा झालो. गर्दी कमी होऊन आता पुढे एखाददुसरे सीट रिकामे दिसत होते. आतील लोक अजून खाली उतरत होते आणि बाहेरील आत येण्याच्या तयारीत होते. आणि त्याच मधल्या त्या सुवर्ण क्षणांचा फायदा उठवत मी पुढे जाऊन बसण्यासाठी उठलो आणि. . !
समोर पाहतो तर काय! सुजाता. माझी मॅम. फिक्कट गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सावकाश वर चढून येताना दिसली. सुरवातीला तिचं लक्ष नाही गेलं माझ्यावर. बसण्यासाठी ��ीट शोधत होती ना! पुढे जाण्यासाठी दोन पाऊले टाकलेला मी जणू फेविकॉलच्या टाकीत पडल्यासारखा तिथेच अडखळून उभा राहिलो.
तिचे अजून आपल्याकडे लक्ष नाही गेलं असं पाहून मी माझा अगदी चोपून पाडलेला भांग विस्कटत माझ्या डोक्याचा तो ओसाड झालेला भूभाग शक्य तितका झाकून घेण्याचा प्रयत्न केला.
अखेरीस तिला रिकामी सीट मिळाली तशी ती तिथे उभी राहून इकडेतिकडे पाहू लागली आणि बस्स. . . तिची नजर माझ्यावर पडलीच एकदाची! माझी तर आधीपासूनच होती तिच्यावर! अंगाने थोडी भरलेली वाटत होती ती. सुंदर होतीच ती पूर्वीसारखी; पण थोडी चेहऱ्याने सुकलेली वाटली. मीही कुठे तो पूर्वीचा राहिलो होतो म्हणा? लग्नाआधीच डोक्यावर उजाड होण्याची नौबत आली होती माझ्यावर. खुर्चीत बसले की पोट शर्टाच्या बाहेर पडू पाहत होते. शिवाय दोन गावचा ग्रामसेवक असूनपण-
काय बोलणार? लाच खाणं आपल्या तत्वात बसत नव्हतं ना!
आमची नजरानजर होताच तिने मला ओळखल्यागत केले; पण लगेच सावध होत तिने आपल्या मागील एका काकांना बोट दाखवीत मागे जाऊन बसण्याचा इशारा केला आणि ती माझ्याकडे पाहत काहीशी नजर चोरीतच सीटवर बसली. ते काका जसे मागे आले तसे मला माझ्या आधीच्या जागी घेऊनच शेजारी बसले. सुजाताचे वडील तर नक्कीच नव्हते ते.
बस सुरू झाली आणि मी सुजाताकडे पाहत मागे टेकून बसलो. मनात विचारांची गर्दी करीत!
बारावी नंतर आज जवळपास सात वर्षांनी मी तिला पाहिले होते. एवढ्या काळात तर मुलींची लग्ने होऊन त्यांना लेकरे पण होतात. मात्र तिच्याकडे पाहून असं काही जाणवलं तर नाही मला. ना कपाळावर कुंकू किंवा गळ्यात मंगळसूत्र. मी तर कशाला इतकं पाहावं? की मी संधी धुंडाळीत होतो?
संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.
https://lekhanisangram.com/marriage-material/
#marathi #लेखणीसंग्राम #कथा #मराठीकथा #writing #writer
0 notes
gramsangind · 2 years
Text
#ती_आणि_ती a lady and a prostitute
#कथा
स्वारगेटजवळील कॅफे आयडियल मध्ये ती तिची वाट पाहत बसली होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. ती सतत आपल्या हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. वेळ पाहत असेल बहुतेक.
नवरा ऑफिसातून घरी यायच्या आधी तिला मोगराला भेटून जायचं होतं. पहिल्यांदाच भेटणार होती ती तिला. तसंही अशा बायकांना ती उभ्या आयुष्यात कधी भेटली नव्हतीच. कशी भेटेल? कधी संबंध यायचं कारणच काय? त्यातही ती मोगरा काही तयारच नव्हती भेटायला; पण तिला तिने कसेबसे मनवले होते.
“अजून कशी येईना ही?” असे म्हणत तिने एकदा आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली आणि बाहेर नजर रोखून ती तिच्या येण्याकडे डोळे लावून बसली. बाहेर एकामागून एक भराभर अशी वाहने निघून जात होती. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, पीएमट्या. कान नुसते वाजवून सोडीत होती.
साधारण मागच्या आठवड्यात तिचं मोगराशी बोलणं झालेलं. तेही पहिल्यांदाच.
“हॅ. . हॅ. . लो. हॅलो? मो. . मोगरा?” सुचेताने जरा संकोचानेच विचारले. एका वेश्येला नेमकं कसं बोलावं हाच विचार बहुधा ती मनात करीत असावी; पण वेश्या असली तर ती काय माणूस नाही? तरीही काहीसा संकोच असतोच की!
“मोगरा हीच बोल रेली मैं. अब आगे भी बोल.” मोगरा पलीकडून घाईत बोलताना वाटली. बहुधा तिने तोंडात पानाचा विडा धरला असावा असा तिचा सुर होता.
सुचेताला तिला नेमकं कसं बोलावं काही सुचेना. ती आपला खालचा ओठ दातांत घट्ट पकडून बोलण्याचा प्रयत्न करीत होती खरी; पण शब्द फुटले तर नशीब!
पलीकडून कोणीच काही बोलत नाही म्हणून मग मोगराने फोन ठेवून दिला. सुचेताने आपले डोळे घट्ट मिटत आणि ओठ तसाच दाबत एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण विचार करून मग तिने पुन्हा मोगराला फोन लावला. आज तिला बोलायचेच असा मनाशी पक्का निर्धार केला होता आता तिने.
“मोगरा?” तिने विचारले.
“नहीं, अब चमेली बोल रेली मैं.” तिने वैतागून उत्तर दिले. तिच्या त्या उत्तरावर सुचेता पुन्हा गप्प झाली. तिची ती चुप्पी तोडीत मोगरा मग मोठ्यानेच बोलली, “अब बोलेगी भी? मोगरा हीच हैं मैं. धंदे का वखत होने को हैं. खाली टाईमपास मत कर. वरना रख देती मैं. क्या?”
“म्. . मी, मी सुचेता. सुचेता बोलतेय.” ती धीर करून म्हणाली एकदाची.
“देख सुचेता, ये औरत लोगों का आपण को जमता नहीं हैं. तू किसी और को कॉल लगा. रखती मैं.”
“अहो, अहो मोगरा. . मोगरा ताई. प्लीज नका. . नका ठेवू फोन. माझं तुमच्याकडेच काम आहे.” तिने आधीच्या सारखा आपला फोन ठेवून देऊ नये म्हणून ती विनवणी करू लागली. मोगरा काही न बोलता तशीच फोन कानाशी धरून उभी राहिली.
आजपर्यंत तिला लोकांनी खूप नावांनी बोलावले होते. धंदेवाली, रंडी, छिनाल, रांड अशा कैक नावांनी; पण ताई? आज कुणीतरी तिला ताई म्हणून बोलावले होते. आणि क्षणात त्या वेश्येआड दडलेली तिच्यातली ती स्त्री जागी झाली होती.
“नाय ठेवत फोन. बोल तू सुचेता.” वरून खरबडीत वाटणाऱ्या फणसाच्या आतून रसाळ गोड असे गरे बाहेर पडावे तसे मोगराच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. नकळतच अगदी!
“मला. . ते.” म्हणता म्हणता सुचेता पुन्हा गप्प झाली. तिला कसे विचारावे तिला कळेना. आजपर्यंत तिने ज्या काही वेश्या पाहिल्या होत्या त्या चित्रपटातच. त्यातून तिचा समजच झाला होता की वेश्या म्हणजे स्वभावाने फटकळ, वाट्टेल तसे बोलणाऱ्या, मनाला वाटेल तशी उत्तरे देणाऱ्या, शिव्या घालणाऱ्या आणि सोबतच अतृप्त पुरुषी देहाची भूक शमविणाऱ्या!
“आगं माझी आय. धंद्याचा टाईम हाय. बोल की पटापटा. मुकादम शिव्या घालंल मला.” ती म्हणाली.
“मला भेटायचंय तुम्हाला.” ती झटदिशी म्हणाली व गप्प झाली.
“अगं मी तुला आत्ताच बोलली की. आपल्याला नाय जमत बायकांचं; पण आता तू बोलती तर..”
“अहो ताई, तसलं काही नाही हो. माझं दुसरं काम आहे तुमच्याकडे.” मोगराचे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली.
सुचेताने परत एकदा मोबाईलमध्ये पाहिले. साडेचार वाजलेले. आता आपसूकच तिची बोटे ती बसलेल्या टेबलाशी नी हातातल्या मोबाईलशी चाळा करू लागली. तिला निघायला उशीर होईल याची भीती होती मनात.
“मॅडम, काय घेणार?” इतका वेळ बसूनपण तिने काहीच न ऑर्डर केल्याने आतून एकाने तिला विचारले.
“पाचच मिनिट.” हाताने इशारा करीत ती एवढंच म्हणाली आणि पुन्हा ती बाहेर नजर रोखून पाहू लागली.
काही घटका टळून गेल्या असता एक भडक गुलाबी रंगाची सलवार कुर्ती घातलेली बाई आत आली. सुचेताचा कानोसा घेणाऱ्या नजरेने ती इतरत्र कटाक्ष टाकू लागली; पण तिची नजर पडली एका वेश्येची. तिच्यापेक्षा तेथील लोकांच्याच नजरा तिच्यावर आपोआप रोखल्या गेल्या. आणि त्यात भरीस भर म्हणून की काय तिने आपले ते यौवन तसेच उघडे सोडून दिले होते. त्यावर ना कसली ओढणी ना आणखी काही!
संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
https://lekhanisangram.com/a-lady-and-a-prostitute/
#मराठी #मराठीकथा #ती #बाई #दोघी #लेखणीसंग्राम #marathistories
0 notes
gramsangind · 2 years
Text
What One can write in English if it is not his mother tongue?
Just asking.
Wanna give a try.
#writing #Mywriting #write
0 notes
gramsangind · 2 years
Text
If you want to stay away from the trouble.
Be the trouble.😶
0 notes
gramsangind · 2 years
Text
Stay consistent
Staying consisting is another hardest thing on the internet. You may post something for two days, a week, probably a month but when you loose consistency then at the end we call it- it is not my cup of tea. 
1 note · View note