Tumgik
#असते
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Furniture Vastu Tips: घरातील फर्निचरसाठी कोणते लाकूड असते शुभ किंवा अशुभ? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
Furniture Vastu Tips: घरातील फर्निचरसाठी कोणते लाकूड असते शुभ किंवा अशुभ? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
Furniture Vastu Tips: घरातील फर्निचरसाठी कोणते लाकूड असते शुभ किंवा अशुभ? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी फर्निचर वास्तु टिप्स: घर बांधताना फर्निचरचे काम करून घेणे सामान्य गोष्ट आहे, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की फर्निचरसाठी वापरण्यात येणारे लाकूड देखील शुभ आणि अशुभ परिणाम देणारे असते. अशुभ लाकडाच्या वापराने घरामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अकाली मृत्यू यांसारख्या भयंकर समस्या येतात, तर शुभ   …
View On WordPress
0 notes
keentalepeanut · 8 months
Text
0 notes
marathidurala · 1 year
Text
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
बळीराजा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या घटाची मांडणी झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं.तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
alkabirislamic · 6 months
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
हजरत मुहम्मदजी यांना जिबराईल नावाच्या एका फरिश्त्याने गळा दाबून कुराण-शरीफ मधील ज्ञान समजावले. जर कुरान शरीफ चा ज्ञानदाता अल्लाह असता तर त्याने आपल्या आवडत्या नबी ला अश्याप्रकारे ज्ञान का समजवले असते?
Tumblr media
22 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा ��्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes · View notes
kamlakar-das · 3 months
Text
Tumblr media
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes · View notes
zee48tass · 1 year
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…
Tumblr media
View On WordPress
8 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
sameeroak · 2 years
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्‍ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes · View notes
dhanashrisstuff · 2 years
Text
'मन अधीर झाले' ही एक मनाचा ठाव घेणारी सुंदर भावपूर्ण कविता आहे. या कवितेमध्ये प्रेयसीच्या मनातील विचारांचा आढावा घेतलेला आहे.
एक मुलगी प्रेमात आखंड बुडून आपल्याच खोलीच्या खिडकीत उभं राहून आपल्या प्रियकराचा विचार करत आहे. ती त्याच्या विचारांमध्ये मग्न आहे. तीला आपल्या प्रियकाराचे भास होत आहेत. आणि ती आपल्या मनाशीच म्हणतीये.
"ही प्रित प्रेम असेच असते का? ज्यात आपल्या प्रियकरचा आपल्याला भास होतोय. तो आपल्या जवळ आहे असं सारख वाटत आहे. आणि त्यामुळे आपल्याला जगाचा ही विसर पडला आहे."
अश्याच आशयाची ही कविता आहे.
3 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
NARCO Test मध्ये पटापट कसं खरं बोलतो आरोपी? काय असते या चाचणीची प्रक्रिया, याचा दुष्परिणाम काय?
NARCO Test मध्ये पटापट कसं खरं बोलतो आरोपी? काय असते या चाचणीची प्रक्रिया, याचा दुष्परिणाम काय?
NARCO Test मध्ये पटापट कसं खरं बोलतो आरोपी? काय असते या चाचणीची प्रक्रिया, याचा दुष्परिणाम काय? दिल्लीतील श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी आफताब पूनावाला यांची नार्को टेस्ट 1 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली आहे. कारण आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाचे 35 तुकडे केले. आफताबने आरोप मान्य केला मात्र आरोपीकडून तपास यंत्रणांना समाधानकारक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे…
View On WordPress
0 notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कध��कधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
alkabirislamic · 6 months
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
हजरत मुहम्मदजी यांना जिबराईल नावाच्या एका फरिश्त्याने गळा दाबून कुराण-शरीफ मधील ज्ञान समजावले. जर कुरान शरीफ चा ज्ञानदाता अल्लाह असता तर त्याने आपल्या आवडत्या नबी ला अश्याप्रकारे ज्ञान का समजवले असते?
Tumblr media
20 notes · View notes
mukundhingne · 5 hours
Text
"If I had given importance to money, I wouldn't have become a writer…!"
“पैश्याला महत्व दिले असते तर लेखक झालो नसतो…!” List three jobs you’d consider pursuing if money didn’t matter. How should one live their life? In reality, it depends on the values instilled in you. It is from these values that your perspective on life is shaped, and your goals and objectives are formed. A child born to parents who have endured the hardships of poverty is raised with the values…
Tumblr media
View On WordPress
0 notes
drsamratjankar12 · 2 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes