Tumgik
#गुंतवणुकदारांना
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला सुरुवात, राज्यात १५ जिल्ह्यांमधल्या २७ तालुक्यांचा समावेश
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन काळात कपात
दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
आणि
टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईत भव्य स्वागत, पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या क्रीडापटूंना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
****
नीती आयोगाचं संपूर्णता अभियान कालपासून देशभरात सुरू झालं. ३० सप्टेंबर पर्यंत देशातल्या ५०० तालुक्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे.
राज्यात नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव, बीडसह १५ जिल्ह्यांमधल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात संपूर्णता अभियानाला काल सुरुवात झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आकांक्षित तालुक्यात करण्याच्या कामांची यादी वाचून दाखवत सर्व निकष मुदतीपूर्वीच पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. यासाठी हिंगोली तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले...
“ह्या कार्यक्रमामध्ये सहा पॅरामीटर्स नीती आयोगाकडून निश्चित केलेले आहेत, त्याच्यामधलं १०० टक्के काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ह्याच्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने १०० टक्के प्रेगनन्ट लेडीजचं रजिस्ट्रेशन, महिलांच्या साठी असलेला १०० टक्के पोषण आहार, त्याच अनुषंगाने आपल्याकडच्या कृषी विभागाकडच्या असलेल्या कृषी आरोग्य कार्डचं डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या महिला बचत गटांना १०० टक्के रिव्हॉल्व्हिंग फंड देणे या चार पॅरामीटर्समध्ये १०० टक्के काम करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन आणि आराखडा आज समितीमध्ये मंजूर केला. आणि खऱ्या अर्थाने आकांक्षित तालुका ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण ह्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत, ते १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे.’’
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथं संपूर्णता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते झाला, यावेळी परंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं, तसंच आयुष्यमान भारत अंतर्गत आभा कार्डाच वाटप आणि महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप करण्यात आलं. तालुक्यातल्या प्रत्येक गावात यानिमित्ताने नीति आयोगाने घालून दिलेल्या विविध निर्देशांकाची जनजागृती करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली होती.
यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी इथंही काल संपूर्णता अभियानाचं उद्घाटन झालं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घेतली.
****
महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख १० हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत १०१ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, गेल्यावर्षीच्या तीन जुलैच्या तुलनेत हे प्रमाण २० लाख हेक्टरनं वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही, नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
राज्यात पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना, मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. विधानसभा सदस्य राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातल्या कुठल्याही खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असं पवार यांनी आश्वस्त केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतल्या गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचं, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं. हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना देण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. नारायण कुचे, प्रकाश सोळंके आणि बबनराव लोणीकर यांनीही याबाबत उप प्रश्न विचारले होते.
****
सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं काल एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
दरम्यान, विधानपरिषदेतल्या निवृत्त सदस्यांना काल निरोप देण्यात आला. वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक वाढवण्याचं काम या सदस्यांनी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
****
राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून निवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या निर्णयाला, स्थगितीची मागणी करणारा अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं, फेटाळून लावला आहे. या बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि साडे बारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं ही शिक्षा निलंबित करून केदार यांना जामीन दिला होता.
****
ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिल्ली इथं शाह यांची भेट घेवून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही विखे पाटील यांनी शाह यांना दिली.
****
धाराशिव इथं काल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यात महामंडळाअंतर्गत चार हजार १५३ लाभार्थ्यांचे बँकांनी कर्ज मंजूर करून, ३१८ कोटी रुपये रक्कम वितरित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचं काल मुंबईत वानखेडे क्रीडा संकुलावर भव्य स्वागत करण्यात आलं. दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर हा संघ विशेष बसमधून मिरवणुकीने क्रीडासंकुलावर पोहोचला. या संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा अफाट जनसागर मरीनड्राईव्हवर लोटला होता.
दरम्यान, भारतीय संघानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांनी या संघाचं कौतुक करत, देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.
****
पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी देखील काल संवाद साधला. भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करुन देशाचं नाव उंचावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या सर्वेश कुशारे याची उंच उडी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणात पंचकुलात झालेल्या चाचणीत सर्वेशने सव्वा दोन मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांकासह ऑलिम्पिक पात्रताही पटकावली. भारतीय लष्करी सेवेत असलेला सर्वेश हा अशी किमया करणारा महाराष्ट्रातला पहिलाच खेळाडू ठरला आहे.
****
विंबल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ओलिवेती यांनी कझाकस्तानच्या जोडीचा सहा - चार, सहा - चार असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी देखील दुसरी फेरी गाठली असून, त्यांचा पुढचा सामना जर्मन जोडीशी होणार आहे.
****
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत राज्य शासनानं 'संवादवारी' हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल जेजुरी इथं मुक्कामी होती. काल जेजुरीत भंडाऱ्याचं उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांची पालखी काल वरवंड इथं मुक्कामी होती.
पैठणहून निघालेल्या संत श्री एकनाथ महाराजांच्या पालखी आज पाटोदा इथून मार्गस्थ होत आहे. पालखीचा दुसरा रिंगण सोहळा आज पारगाव घुमरे इथं होणार आहे.
शेगाव इथल्या संत गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. कळंब शहरात नगरपालिका प्रशासनाने पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विकासासंदर्भात खासदार संदिपान भुमरे यांनी नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं भुमरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
share Market: बाबो, जूनमध्ये शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना 14 लाख कोटींनी डुबवले; पण जुलै पाडणार पैशांचा पाऊस! काय सांगतो सेंसेक्सचा इतिहास?
share Market: बाबो, जूनमध्ये शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना 14 लाख कोटींनी डुबवले; पण जुलै पाडणार पैशांचा पाऊस! काय सांगतो सेंसेक्सचा इतिहास?
share Market: बाबो, जूनमध्ये शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना 14 लाख कोटींनी डुबवले; पण जुलै पाडणार पैशांचा पाऊस! काय सांगतो सेंसेक्सचा इतिहास? Sensex Return: जून महिन्यात शेअर बाज��रात गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला. त्यांच्या पदरी निराशा आली. बीएसई निर्देशांकात 2300 अंकांची मोठी घसरण झाली. गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटी रुपये डुबले. परंतु, सेंसेक्सचा इतिहास पाहता जुलै त्यांच्यासाठी छप्पर फाडके परतावा…
View On WordPress
0 notes
mdhulap · 2 years
Link
‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठी असा करा क्लेम! pancard club ltd filing claims online form
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी - राज्यमंत्री शंभुराज देसाई
‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 25 : मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध एकूण ३२ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत.…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
'या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
मुंबई-प्रतिनिधी सध्या शेअर बाजारात केपीआयटी टेक्नोलॉजी लिमिटेडच्या(HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात KPIT Technologies Ltd. कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 300 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. एवढेच नव्हे तर या मिडकॅप समभागाने अवघ्या सात महिन्यांत गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. गेल्यावर्षी याचा काळात केपीआय टेक्नोलॉजी कंपनीच्या समभागाचा भाव 78.40 रुपये इतका होता. मात्र,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thebusinesstimes · 4 years
Text
सब ब्रोकर कसे बनाल?
भारतात स्टॉक ट्रेडिंगचा सध्या ट्रेंड आहे. यात तुम्हाला प्रत्यक्ष सहभागी व्हायचे नाही. पण तरीही तुम्हाला त्याची मालकी हवी आहे. मग सब ब्रोकिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सब-ब्रोकर ही अशी व्यक्ती असते, जी बाजारातील सिक्युरिटीज खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतवणुकदारांना मदत करते. सब ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग सदस्य नसला तरीही, तो किंवा ती ग्राहकांना सेवा देण्यास स्टॉक ब्रोकरची…
View On WordPress
0 notes
thanevarta-blog · 8 years
Photo
Tumblr media
कल्पवृक्ष मार्केटींगची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे न्यायालयाचे आदेश राज्यभरातील १३ लाख गुंतवणूकदारांना देशोधडीला लावणा-या कल्पवृक्ष मार्केटींगची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीशांकडून व्यक्त
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन काळात दोन दिवस कपात
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आजपासून प्रारंभ
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत मरीनड्राईव्हवर लोटला अफाट जनसागर
****
देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत रोखे अपीलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते. प्रत्यक्षातल्या तसंच आभासी माध्यमातून होणाऱ्या कामकाजासाठीही या सुविधांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भांडवली बाजाराचा बहुस्तरीय विस्तार झाला आहे. हे लक्षात घेता गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी न्यायाधिकरणाच्या अतिरिक्त शाखा असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
****
संसदेत नव्या खासदारांच्या शपथविधीच्या नियमात लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला यांनी बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेताना शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही. १८व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात अनेक सदस्यांनी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त घोषणाबाजी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना मतदारांसाठी सोयीस्कर आणि जवळच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.
****
सुधारित फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्र सूचना कार्यालयानं आज मुंबईत एक विशेष कार्यक्रम घेतला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या कार्यक्रमात सुधारित कायद्यांबाबत मार्गदर्शन केलं. सुधारित कायदे हे शिक्षेऐवजी न्यायकेंद्रित आहेत, तसंच यामुळे पीडित आणि तक्रारदारांना तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपली तक्रार आणि जबाब नोंदवता येतील, असं डॉ. डोळे यावेळी सांगितलं.
****
राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून निवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना देण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. नारायण कुचे, प्रकाश सोळंके आणि बबनराव लोणीकर यांनीही याबाबत उप प्रश्न विचारले होते.
****
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली, ते विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्ज केल्यानंतर दीड महिन्यात हे प्रमाणपत्र मिळेल, असं सावे यांनी सांगितलं. मृत झोपडीधारकाच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंत्री सावे यांनी दिली.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. सदनानं आवाजी मतदानानं तो मंजूर केला. त्यामुळे दानवे उद्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.
****
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या निर्णयाला, स्थगितीची मागणी करणारा अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं, फेटाळून लावला आहे. या बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि साडे बारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं केदार यांची शिक्षा निलंबित करून त्यांना जामीन दिला आहे.
****
ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली इथं शाह यांची भेट घेवून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही विखेपाटील यांनी शहा यांना दिली.
****
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आकांक्षित तालुक्यात करण्याच्या कामांची यादी वाचून दाखवत सर्व निकष मुदतीपूर्वीच पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. यासाठी हिंगोली तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत –
ह्या कार्यक्रमामध्ये सहा पॅरामीटर्स नीती आयोगाकडून निश्चित केलेले आहेत, त्याच्यामधलं १०० टक्के काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ह्याच्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने १०० टक्के प्रेगनन्ट लेडीजचं रजिस्ट्रेशन, महिलांच्या साठी असलेला १०० टक्के पोषण आहार, त्याच अनुषंगाने आपल्याकडच्या कृषी विभागाकडच्या असलेल्या कृषी आरोग्य कार्डचं डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या महिला बचत गटांना १०० टक्के रिव्हॉल्व्हिंग फंड देणे या चार पॅरामीटर्समध्ये १०० टक्के काम करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन आणि आराखडा आज समितीमध्ये मंजूर केला. आणि खऱ्या अर्थाने आकांक्षित तालुका ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण ह्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत, ते १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी इथंही आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन झाल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञ��� केली.
****
बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यातील १८ बँकांच्या २०९ शाखांना जिल्हा अग्रणी बँकेकडून १ हजार ७०७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलं आहे. या अंतर्गत जून २०२४ अखेर या सर्व बँकांनी बीड जिल्ह्यात ९५ हजार ५४३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी ४१ लाखांचं पीककर्ज वितरित केलं आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४४ टक्के आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचं आज मुंबईत वानखेडे क्रीडा संकुलावर भव्य स्वागत होत आहे. दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर हा संघ विशेष बसमधून मिरवणुकीने क्रीडासंकुलावर पोहोचणार आहे. या संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा अफाट जनसागर मरीनड्राईव्हवर लोटला आहे.
दरम्यान, बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर या संघाला दिल्लीहून सायंकाळी मुंबईत आणलेल्या विमानाचं विमानतळावर पाण्याचे फवारे उडवून स्वागत करण्यात आलं. सध्या हा संघ वानखेडे मैदानाकडे रवाना होत आहे.
****
निफाड तालुक्यातील सर्वेश कुशारे याची उंच उडी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणातील पंचकुलात झालेल्या चाचणीत सर्वेशने सव्वा दोन मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांकासह ऑलिम्पिक पात्रताही पटकावली. भारतीय लष्करी सेवेत असलेला सर्वेश हा अशी किमया करणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
****
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत राज्य शासनानं ‘संवादवारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विकासासंदर्भात खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं भुमरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता.
जुन्या पेन्शन योजनेसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीचा सरकारचा निर्णय.
छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार.
आणि
सोळाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला थोड्या वेळातच प्रारंभ.
****
राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.
****
राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ ते २० मार्च या कालावधीत संप केलेल्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे. तसंच संपकाळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी विनंतीपत्र दिले असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा निकाल गुजरात उच्च न्यायालयानं दिला आहे. पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा मुख्य माहिती आयोगाचा आदेशही या न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद केला. पंतप्रधानांच्या पदव्यांमध्ये लपवण्यासारखे काही नसले तरी विद्यापीठाला माहिती जाहीर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. लोकशाहीत पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती डॉक्टरेट असेल किंवा निरक्षर असेल, यामुळे काहीही फरक पडत नाही. तसेच या माहितीत कोणतेही जनहित गुंतलेलं नाही, असंही मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं.
****
सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या, १२ डब्ल्यू एल आर ‘स्वाती’ रडारच्या खरेदीसाठी, संरक्षण मंत्रालयानं भारत ��ायनॅमिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. ९ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक रकमेच्या या करारानुसार सुधारित क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक, सहाय्यक उपकरण आणि वाहनांची खरेदी केली जाणार आहे. आकाश शस्त्र ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओनं ती विकसित केली आहे. सुधारित आकाश शस्त्र प्रणालीच्या आणखी दोन तुकड्या देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय लष्करासाठी खरेदी करण्याची योजना आहे.
****
येत्या १७ ते १९ मे दरम्यान पहिली जागतिक पर्यटन क्षेत्रातली आर्थिक गुंतवणूक परिषद नवी दिल्लीत होणार आहे. देशी आणि परदेशी गुंतवणुकदारांना पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल, असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल दोन दिवसीय पर्यटन चिंतन समंलेनाचा समारोप केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
****
राज्यात आज ४२५ जणांना कोविडचा संसर्ग झाला आहे. तर ३५१ रुग्ण संसर्गमुक्त होवून घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १४ टक्के आहे. दरम्यान, आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने वर्तवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितल आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज मुंबईत पत्रकार परिषद घेत, ही सभा होणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज सभेच्या नियोजित ठिकाणी सांस्कृतिक मंडळ मैदानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या सभेमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचा अहवाल जर संबंधित यंत्रणांनी दिला, तर सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. प्रशासन सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं महाजन यांनी सांगितलं.
****
शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुळे यांनी ट्वीटरवरून हे मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
****
प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषीपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
****
सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळणार असून एकूण ७० सामने होणार आहेत. देशभरातल्या एकूण १२ शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवत आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालूक्यात ३०० हेक्टर जमिनीवर कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती केली जाणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्स १४५० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही १५,८०० अंकाची घसरण दिसून…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी - राज्यमंत्री शंभुराज देसाई
‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 November 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
भारत डिजिटल व्यवहारात जगातला आघाडीचा देश बनला असून, आज देशात २४ तास बँकिंग सेवा सुरु असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यापैकी एक उपक्रम म्हणजे रिझर्व्ह बँकेची थेट किरकोळ सेवा योजना. या योजनेअंतर्गत किरकोळ गुंतवणुकदारांना केंद्र आणि राज्य सरकारांनी वितरीत केलेल्या रोख्यांमध्ये थेट गुंतवणूक करायची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकात्मिक अंतर्गत देखरेख योजना हा बँकेचा दुसरा उपक्रम आहे. या योजनेअतंर्गत संपूर्ण देशभरातल्या ग्राहकांच्या तक्रारी आणि दावे एकाच केंद्रीकृत पद्धतीनं सोडवले जाणार आहेत. आरबीआयनं सुरु केलेल्या या दोन नवीन उपक्रमांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, महिला, निवृत्ती वेतनधारक अशा अल्प बचत करणाऱ्या वर्गाला थेट सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणं सहज सोपं होणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आर्थिक क्षेत्रातील नियामक म्हणून रिझर्व्ह बँक सातत्यानं निरनिराळ्या उपाययोजना राबवत असून, आर्थिक विकासाचा लाभ तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी व्यापक निर्णय घेत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्यातल्या सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत रूग्णालयासाठी औषधी, साहित्य, साधनसामुग्री खरेदी करणं, रूग्णालयांचं बांधकाम विस्तारीकरण, दुरूस्ती आणि देखभाल, अग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसंच देखभाल दुरूस्ती, आदी कामं या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, या निर्णयामुळे शक्य होणार आहे.
****
पुणे इथं “ज्ञानसंगम” या कर सल्लागारांच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, काल या परिषदेच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी, राष्ट्र उभारणीत करदात्याची भूमिका कायमच महत्वपूर्ण ठरली असल्याचं नमूद केलं. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी संकलनामध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचं कर सल्लागारांनी सांगितलं आहे; त्या समस्याही सोडवण्यात येतील, असं ते म्हणाले.
****
देशातल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं ११० कोटी ७९ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५३ लाख ८१ हजार ८८९ नागरिकांचं लसीकरण झालं, देशात आतापर्यंत या लसीच्या ११० कोटी ७९ लाख ५१ हजार २२५ मात्रा देण्यात आल्या आहेत.  
****
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं नवीन नियमावली जारी केली आहे. प्रवाशांनी प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करुन, त्याच्या नेगेटिव अहवालासह त्यासंबधी स्वघोषणा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यू दिल्ली एअरपोर्ट डॉट इन या संकेतस्थळावर अपलोड करावी, याशिवाय भारतात उतरल्यानंतर लक्षणं आढळून आल्यास त्यांचं विलगीकरण करण्यात येईल, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  
****
पुणे, नाशिक नंतर सांगलीत खाजगी शिवशाही बस सुरू करण्यात आली. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बस स्थानकासमोरून हटवण्यात आलं असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, खाजगी शिवशाही सुरू करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोणताही एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेला नसून, आमचा संप सुरूच असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं.
****
सांगली जिल्ह्यात ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर - एक रकमी एफआरपी द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन हिंसक वळणावर पोहचलं आहे. रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू साखर कारखाना आणि क्रांती साखर कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले, तर विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली. राजारामबापू, क्रांती आणि विश्वास हे कारखाने काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
****
0 notes
marathinewslive · 4 years
Text
अवघ्या 5 वर्षांत लाखो लोकांचे पैसे झाले दुप्पट; जाणून घ्या LIC च्या सर्वात फायदेशीर योजनेविषयी... | National
अवघ्या 5 वर्षांत लाखो लोकांचे पैसे झाले दुप्पट; जाणून घ्या LIC च्या सर्वात फायदेशीर योजनेविषयी… | National
LIC च्या या अत्यंत फायदेशीर म्युच्युअल फंडाच्या योजनेत आजच पैसे गुंतवा. नवी दिल्ली, 30 जानेवारी : कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक गुंतवणुकदारांना नेहमीच पडतो. गुंतवणुकदारांसाठी आज विविध कंपन्यांच्या अनेक योजना उपलब्ध आहे. या कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दामदुप्पटीसारख्या योजना जाहीर करतात, पण त्याबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे आपला पैसा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****  सिंगल ब्रँड किरकोळ व्यापार तसंच बांधकाम क्षेत्रातल्या ब्रोकिंग सेवांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारची परवानगी  आधार क्रमांकाशी संबंधित माहिती डाटा अधिक सुरक्षित करण्यासाठी आभासी ओळख क्रमांक आणण्याची योजना  जेष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी हत्या प्रकरणी केंद्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसह राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आणि  औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी एक कोटी रूपयांची लाच मागितल्याची उपजिल्हाधिकाऱ्याची पोलिसांकडे तक्रार **** परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं काल काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंगल ब्रँड किरकोळ व्यापार तसंच बांधकाम क्षेत्रातल्या ब्रोकिंग सेवांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यास मान्यता दिली. यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी विदेशी गुंतवणुकदारांना सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही. याचबरोबर एअर इंडिया या हवाई कंपनीत परदेशी कंपन्यांना ४९ टक्के हिस्सा देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजाराअंतर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणुकीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. मनोविकलांग, बहुविकलांग राष्ट्रीय न्यासाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्ष निश्चित करण तसंच एकाच पदावर, एक व्यक्ती प्रदीर्घ काळ राहू नये यासाठी नियमात सुधारणासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. **** आधार क्रमांकाशी संबंधित माहिती अधिक सुरक्षित करण्यासाठी १२ आकड्यांऐवजी आता आभासी ओळख क्रमांक –व्हर्च्युअल आयडी आणण्याची योजना सरकारनं तयार केली आहे. या योजनेनुसार प्रत्येक आधार कार्डचा एक आभासी ओळख क्रमांक तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांचा १२ आकडी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही. आभासी ओळख क्रमांकाची ही सुविधा १ जूनपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याचं विशिष्ट ओळख प्राधिकरणानं म्हटलं आहे. **** कर्नाटकातले जेष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसह राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय, यांना नोटीस बजावली आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमा कलबुर्गी यांनी संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत, हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केली आहे, या याचिकेच्या अनुषंगानं, न्यायालयानं, महाराष्ट्र तसंच कर्नाटक सरकार आणि दोन्ही तपास यंत्रणांना तीन आठवड्याच्या आत उत्तर द्यायला सांगितलं आहे. **** केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं राज्यातल्या मराठा समाजाच्या दोन लाख ८८ हजार तरुण तरुणींना विविध २४ अभ्यासक्रमांचं मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. याची सुरुवात येत्या २६ जानेवारीपासून करण्याचे निर्देश सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात स्थापलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले आहेत. तसंच आर्थिक मागास वर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीची उत्��न्न मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. **** येत्या २० तारखेपासून बँकांच्या सर्व मोफत सेवा बंद होणार असल्याची बातमी निराधार असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. अर्थ मंत्रालयाचा अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसून सोशल मिडीयावरील या संदर्भातली बातमी केवळ अफवा असल्याचं अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. भारतीय बँक संघटनेनं ही बातमी निराधार असून लोकांनी संभ्रमित होऊ नये असं म्हटलं आहे. **** राज्यातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि रस्त्यांवरचे खड्डे भरण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना आलेल्या अपयशाबाबत नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं याबाबत संबंधित संस्थांवर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे अपघातांमध्ये होणारी वाढ, या संदर्भात दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्था याकामात टाळाटाळ करत असतील तर राज्य सरकारला असलेले कारवाई करण्याचे अधिकार वापरावेत असं सांगितलं. **** राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीनं नुकतीच आपली भेट घेऊन याबाबतची आपली समस्या सांगितली, त्या अनुषंगानं पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्वपुर्ण ठरू शकेल असा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास योग्य रितीनं होण्यासाठी पोलीस आणि दलित संघटनांच्या प्रतिनिधींची १० सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत काल घेण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत ४३ जणांना अटक करण्यात आल्याचं सांगून यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपासाबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. **** राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाला आजपासून सुरूवात होत आहे. विद्युत निरीक्षणालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहानिमित्त संपूर्ण राज्यभर १७ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयेाजन करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** कोरेगाव भीमा वादाविषयी कारवाईची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातल्या हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप केला असल्यानं राज्य सरकारची जबाबदारी वाढली असून पुण्याच्या एल्गार परिषदेत उमर खालीदला कोणी बोलावले याची चौकशीही व्हावी अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली. **** भारताबाहेर रोजगाराकरता जाणाऱ्या कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी, परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारं केंद्र ओव्हरसीज प्ल��समेंट सेंटर कार्यान्वित करण्यास, विदेश मंत्रालयानं तत्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती, राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. नवी दिल्ली इथं केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन, निलंगेकर यांनी असा प्रस्ताव सादर केला होता. **** जमीन विक्री परवानगी अनियमितता केल्या प्रकरणी, निलंबित केलेले, औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी निलंबनापूर्वी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली, आणि जातीय वादातून कारवाई केली असल्याची तक्रार शहरातल्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये काल दाखल केली. **** बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत काल बीडमध्ये ३०६ मुलींचा सामुहिक नामकरण सोहळा पार पडला. १४ व्या राष्ट्रीय किर्तन महोत्सवात पार पडलेल्या सामुहिक नामकरण सोहळ्याची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या लंडनच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं नोंद घेतली आहे. **** केंद्र आणि राज्य शासनाच्या शहराच्या विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश, खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत. काल औरंगाबाद जिल्हा दक्षता, आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या विविध योजनांचा आढावा खैरे यांनी यावेळी घेतला. शासनांच्या योजनांचा लाभ वेळेत देण्यासाठी सर्व यंत्रणांनी विकास कामांना प्राधान्य देऊन, जनतेला लाभ मिळून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. **** हातगाडी चालक तसंच पथ विक्रेत्यांवर कारवाई न करता, पथ विक्रेता अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं औरंगाबाद महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन संघटनेच्या वतीनं मनपा आयुक्तांना देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. **** महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेलं एम. एम. सी. मोबाईल ॲप काल सुरू केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हते मुंबईत या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जुलै २०१७ दुपारी १.००वा. ****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी मध्ये उत्पादन शुल्क आणि इतर कर समाविष्ट झाल्यानं जीएसटी हा व्हॅटपेक्षा अधिक भासत असल्याचं महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे. जीएसटीसंबंधी काही शंका असल्याच्या पार्श्वभूमीवर, अढिया यांनी जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांना तात्पुरत्या ओळख क्रमांकावर व्यापार करता येईल, असं स्पष्ट केलं आहे. ज्या व्यापारांनी अद्याप जीएसटीमध्ये नोंदणी केली नाही, ते सध्या आपला व्यवसाय सुरु ठेऊ शकतील, मात्र ३० दिवसांच्या आत त्यांना नोंदणी करावी लागेल, असं ते म्हणाले.     **** वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यामुळे देशाच्या मानांकनावर सकारात्मक परिणाम होईल, असं जागतिक मूल्यांक संस्था मूडीजनं म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकास दर आणि आयकर वाढण्यास मदत होणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. व्यापार करणं सोपं झाल्यामुळे भारत परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करेल, असं मत मूडीजचे उपाध्यक्ष विलियम फोस्टर यांनी व्यक्त केलं आहे.       **** सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदरहीत करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, आजपासून अंशत: न्यायालयाचं कामकाज कागदरहीत सुरु होणार आहे. पाच अव्वल वरीष्ठ न्यायालयांमध्ये दाखल झालेली नवीन प्रकरणं डीजिटल पद्धतीनं दाखल करण्यात येणार आहेत. देशातल्या सगळ्या उच्च न्यायालयांना डीजिटल पद्धतीनं कामकाजाच्या नोंदी ठेवण्यासाठी एक विशिष्ट आयडी देण्यात आला आहे.   **** देशातल्या एक लाख ६० हजार पुलांच्या सुरक्षा व्यवस्थेचं परीक्षण पूर्ण झालं असून, त्यातले सुमारे १४७ पूल मोडकळीस आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. मोडकळीस आलेल्या पुलांची तातडीनं दखल घेतली जाईल, असं ते म्हणाले. **** पाकिस्तानात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्याची भारताची मागणी पाकिस्ताननं फेटाळून लावली आहे. दोन्ही देशांच्या कैद्यांना सोडण्याच्या वेळी भारतानं पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांची तुलना सामान्य कैद्यांसोबत करता येणार नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. **** आसाममध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आजही पूर परिस्थिती कायम आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आठ जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून, तीन लाख नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. गुजरातमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नैॠत्य मोसमी पाऊस राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा काही भाग आणि संपूर्ण दिल्ली परिसरातही दाखल झाला आहे. राज्यातही पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून काल पाणी सोडण्यात आलं. यामुळे गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या नाशिक, इगतपुरी आणि निफाड गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या सकाळपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. **** राज्य सरकार आणि पोलिसांच्या विशेष प्रयत्नानं गेल्या १२ वर्षात ५९१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातले ५७२ नक्षलवादी एकट्या गडचिरोली जिल्ह्यातले असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. इतर नक्षलवादी गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातले आहेत. २००५ मध्ये राज्य सरकारनं आत्मसमर्पण योजना सुरु केली, त्याअंतर्गत नक्षलवाद्यांचं पुनर्वसन करण्यात येतं. **** स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नोटीस बजावली आहे. पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात उद्या चर्चेला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत खोत यांचं वर्तन संघटनेच्या हिताला हानीकारक असल्याचा आक्षेप घेत, अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यासंदर्भात चार सदस्यीय सम��तीची स्थापना करण्यात आली होती. **** एकाच वेळी दोन महिन्यात चाळीस मेट्रिक टन सेंद्रिय खत तयार करणारा पथदर्शी प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरु करण्यात आला. या प्रकल्पाचं उदघाटन कुलगुरू डॉ के पी विश्वनाथा यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पाअंतर्गत वर्षाकाठी दोनशे चाळीस मेट्रिक टन सेंद्रिय गांडूळ खत निर्माण केलं जाणार आहे. **** वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यापासून वाशिम जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती असून, जिल्ह्यातल्या बाजारपेठेतली अनेक मोठी व्यापारी प्रतिष्ठान बंद आहेत. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचा कर कोणी भरायचा याबाबत आडत व्यापाऱ्यांमध्ये संदिग्धता असल्यानं जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातल्या २० लाख रुपयांच्या वर वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापारांना जीएसटी नंबर देण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes