Tumgik
#ढवळाढवळ
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
✍️✍️✍️
खरं आहे की नात्यात पारदर्शकता हवी...
पण याचा अर्थ असा नाही की आयुष्यातल्या मिनिटा मिनिटाचा हिशोब कोणालातरी द्यायलाच हवा!!!
नातं जोडायच ते एकमेकांचा आधार होण्यासाठी... एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होण्यासाठी... मग जर नात्याचाच त्रास व्हायला लागला तर त्याचा अर्थच काय उरतो....
कितीही प्रेमाचं कोणी असलं तरी मनातला निदान एक कप्पा तरी पूर्णतः स्वतःचा ठेवायचा असतो... आपल्या आवडी निवडी.. आपला छंद... जी कोणाशीही शेअर करावीशी वाटत नाहीत अशी काही गुपित ह्याच कप्प्यात जपायची असतात...
समोरच्या व्यक्तीच्या देखील ह्या गोष्टी जपता आल्याच पाहिजेत... बाकी ह्या गोष्टीत जर कोणाची ढवळाढवळ झाली तर ती कोणालाच खपत नाही.... वीट येत जातो मग सगळ्याचा....
नात चिरंतर जपायच असेल तर एकमेकांची ही स्पेस जपावी लागतेच... त्याला पर्याय नाही....
-वैभव वैद्य....
0 notes
survivetoread · 3 years
Text
Words in Marathi
ढवळणे
[ḍhavaḷṇe], transitive verb
to stir (something)
मी चहा ढवळायला विसरलो आणि सगळी साखर खालीच राहिली. mī cahā ḍhavaḷāylā visarlo āṇi sagḷī sākhar khālīč rāhilī
I forgot to stir the tea and all the sugar remained at the bottom.
---
Origin:
Ultimately derived from the Sanskrit root ड्वल् [ḍval] (mix), which forms the verb ड्वलयति [ḍvalayati] (to mix).
The verb almost certainly came to Marathi via Prakrit, but neither Wiktionary nor Kulkarni have recorded the intermediary word(s). I hypothesize it would have been something like डवलइ [ḍavalai] or ढवलइ [ḍhavalai].
Related term:
ढवळाढवळ [ḍhavaḷāḍhavaḷ] - shake-up, things getting moved around, hassle
12 notes · View notes
mhlivenews · 2 years
Text
आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज
आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज
पूर्वीच्या काळात येणारी संकटे ही बहुतांश नैसर्गिक असत.मानवाने प्रगतीला जसजशी सुरुवात केली तसतशी संकटेही वाढू लागली. मानवाने आपली प्रगती करताना निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करायला सुरूवात केली. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये गुंतागुंत अधिकच वाढत गेली.वाढती लोकसंख्या आणि प्रगती करताना निसर्गाच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यामुळे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
·      देशात पुढच्या वर्षापर्यंत एक हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार - केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
·      मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
·      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
·      श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन २०१० च्या ७९ कोटी रुपयाच्या मुळ आराखड्यास मान्यता
आणि
·      जास्तीत जास्त शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं - बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांचं आवाहन
****
सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र असून, पुढच्या वर्षापर्यंत ही संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्यानं साकारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं नामकरण खाशाबा जाधव क्रीडा संकुल असं करण्याचा समारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. भावी खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंना वर्षाला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
क्रीडा क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधांवर भर दिल्यापासून भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे, विशेषत: दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून, राज्यांनीही अशा प्रकारे तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
****
मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. रुग्णांचं निदान करण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागात चाचण्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मास्क सक्ती जरी नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ते म्हणाले,
‍Byte -
ॲक्टीव्ह केसेस सापडण्याची संख्या नक्कीच वाढलेली आहे. ज्या अर्थी संख्या वाढतीये त्या अर्थी असं व्हायला नको की टेस्ट न केल्यामुळे असेच लोक राहून जातील. आणि तशीच लोक जर राहून गेले तर मग ते घरी इंफेक्शन वाढेल आणि त्यामुळे आम्ही टेस्ट वाढवण्याचा एक नक्की निर्णय घेतोय. आज आपण चाळीस हजार टेस्ट दररोज करतोय. मास्क जरी कम्पलसरी नसले तरी आता लोकांना परत अलर्ट कराव लागेल. ज्या अर्थी संख्या वाढतेय, त्या अर्थी आपण मास्क घालण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. सतर्क राहुया एवढं मला यानिमित्त निश्चितंच सांगावसं वाटतं.
****
मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसंच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातल्या ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
****
संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा उमेदवारी हा त्यांच्यातला आणि शिवसेनेतला विषय आहे, इतरांनी त्यात ढवळाढवळ करू नये, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपला असून, त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले.
****
ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट आढाव्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार एक आराखडा विकसित करणार आहे. ई-कॉमर्स ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांना वस्तू विकत घेण्यापूर्वी प्रत्यक्ष हाताळता येत नाही, त्यामुळे ते बरेचदा अशा उत्पादनांच्या समीक्षेवर आणि ते उत्पादन वापरलेल्या ग्राहकांच्या मतावर अधिक विश्वास ठेवतात. ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं, या समीक्षकांची सत्यता पडताळणं आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची यासंदर्भातली जबाबदारी या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सावरकरांचे विज��ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा तसंच माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मुंबईमध्ये दादरच्या सावरकर स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या सावरकरांच्या जन्मस्थानी विविध संस्थांनी अभिवादन केलं. सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत या संस्थेच्या स्मारकाच्या नूतनीकरणाला आज प्रारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे भगूर इथं सावरकर यांच्या स्थानबद्धतेच्या कालावधीतल्या त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या लघुपटाचंही लोकार्पण करण्यात आलं. समाज क्रांतिकारक सावरकर अशा आशयावरील या लघुपटामध्ये, सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना केलेलं कार्य दाखवण्यात आलं आहे.
औरंगाबाद शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आज अभिवादन करण्यात आलं. तसंच विटखेडा इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन २०१० च्या ७९ कोटी रुपयाच्या मुळ आराखड्यास मान्यता दिली असल्याची माहिती, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. माहूरगड विकास आराखड्यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक, आदी पायाभूत सुविधांचा समावेश असून, पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्या दृष्टीनं लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक घेऊ, असं चव्हाण यावेळी म्हणाले.
****
जास्तीत जास्त शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यगृहात, श्री श्री नैसर्गिक शेती संस्था आणि एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाच्या, शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा आणि कृषी व्यापार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, त्या आज बोलत होत्या. सेंद्रीय शेती केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित न राहता गावोगावी राहिबाई तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीच्या मार्गाचा अवलंब करावा, महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होत असून, देशासमोर या प्रयोगाचा आदर्श निर्माण होईल, असं कार्य शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहन, आदिवासी मंत्रालयाचे सहसचिव नवल कपूर यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचं, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या नागमठाण, टेंभी, सटाणा, लाडगाव इथंल्या मंजूर झालेल्या एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन, आज चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी सरकारने जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागासाठी दिला असल्याचं ते म्हणाले.
****
वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जालना इथं शिवसेनेच्यावतीनं आज मस्तगडवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. माजीमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होत गॅस सिलिंडची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शिरपूर शहरातल्या पाच कंदील चौकात जाहीर सभा झाली. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा स्वामीनाथन आयोगाचे सदस्य अतुलकुमार अंजान यांनी संबोधित केलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…”
Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…”
Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढ��ळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…” शिंदे गटाकडून अपात्रतेचा मुद्दा विधानसक्षा अध्यक्षांकडे सोपवला जावा असा युक्तिवाद केला गेला. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर! सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून गेल्या काही महिन्यांत खूप टीकेला सामोरे जावे ��ागले. त्याच्या कार्यकाळात महिला क्रिकेटसाठी फार योजना अमलात आणल्या नसल्याचा आरोपही झाला. शिवाय, विराट कोहली आणि गांगुली यांच्यातील दुफळीही समोर आली. आता तो निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहत…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
राजन तेली यांना शिवसेना पक्षात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही सावंतवाडी : शिवसेना पक्षात कोणतेही गटतट नाहीत, भाजप जिल्हा अद्यक्ष राजन तेली शिवसेना पक्षात उगाच ढवळाढवळ करत आहेत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे याच्यावर टीका टिपणी करून आता त्याच्यासोबत काम करतात त्यामुळे आम्हाला शिकवू नये तसेच नगराध्यक्ष संजू परब यांनी आमच्या पालकमंत्री व शिवसेना नेत्यावर टीकाकरू नये आम्हाला पण टीका करता येते, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवडी शहरात एक रुपया पण निधी दिला नाही हे कोणत्या आधारावर बोलतात सावंतवडी शहरात तीन बी एस एन टॉवर झाले दोन हायमास्ट मजूर झाले आणि काय नाय निधी दिला हे कसे काय साळगावकर बोलतात तुम्ही नगराध्यक्ष असताना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला निधी खर्ची घातला नाही तुम्ही अपयशी ठरला आहात, त्यामुळं जास्त बोलायला लावू नये, अशी  खरमरीत टीका विरोधकावर  शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ आज सावंतवडी येते झालेल्या पत्रकार परिषद मध्ये केली,
0 notes
kokannow · 5 years
Text
आजचे राशिभविष्य २3 जानेवारी २०२०
आजचे राशिभविष्य २3 जानेवारी २०२०
आजचे पंचांग : भारतीय सौर ३ माघ शके १९४१, पौष कृष्ण चतुर्दशी उत्तररात्री २-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र : पूर्वाषाढा उत्तररात्री १-२० पर्यंत, चंद्रराशी : धनू, सूर्यनक्षत्र : उत्तराषाढा, सूर्योदय : सकाळी ७-१६, सूर्यास्त : सायं. ६-२५, चंद्रोदय : पहाटे ५-५८, चंद्रास्त : सायं. ५-१०.  मेष : मन नर्वस राहील मनासारखी कामे होणार नाहीत.  वृषभ : आज इतरांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करू नका.  मिथुन : कोर्टाच्या कामात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 August 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर असून ते नुकतेच थिंपू इथल्या पारो विमानतळावर पोहचले आहेत. यावेळी भूतानचे पंतप्रधान डॉ लोटाय त्शेरिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी भूतानचे अनेक वरिष्ठ मंत्री आणि उच्चाधिकारीही उपस्थित होते. भारतातून दौऱ्यावर रवाना होताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच भूतानच्या दौऱ्यावर जाणं यावरून भारत भूतानला किती महत्व देतं, ते दिसत असल्याचं म्हटलं आहे. **** काश्मीर खोऱ्यातल्या नागरिकांच्या हालचाली आणि दळणवळणावरील बंधनं हळूहळू कमी करण्यात येत असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमन्यम यांनी म्हटलं आहे. सरकारी कार्यालयं यापूर्वीच कार्यरत झाली असून सोमवारपासून प्रत्येक विभागनिहाय शाळा देखील सुरू करण्यात येतील, असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी खोऱ्यातल्या नागरिकांनी या काळात शांतता पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. पाच ऑगस्टला अनुच्छेद ३७० हटवल्यापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. सरकारनं केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून या भागांमध्ये बंधने टाकली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. **** संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतल्या बैठकीत अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर भारताला खिंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुरता फसला आहे. सुरक्षा परिषदेतल्या बहुतांशी सदस्यांनी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं पाकिस्तानसह चीन देखील तोंडघशी पडला आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे युनोमधले कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या आग्रहाखातर चीननं विनंती केल्यानंतर सुरक्षा परिषदेची ही बैठक बोलावण्यात आली होती. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय ही पूर्णत: भारताची अंतर्गत बाब असल्याच्या भूमिकेवर भारत कायम राहिला असल्याचं अकबरुद्दीन यांनी नमूद केलं. तसंच या बैठकीमध्ये अकबरुद्दीन यांनी पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये विनाकारण ढवळाढवळ करत असल्याची टीकाही केली. तसंच पाकिस्तान भारतात जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्याचंही त्यांनी सदस्य राष्ट्रांना सांगितलं. **** कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती आटोक्यात आली असून, ३६९ गावांमधल्या चार लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं आहे. जिल्ह्यातल्या ३१० गावांच्या स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली आहे. **** पुरामुळे बंद असलेली मिरज – मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक आजपासून सुरू होणार आहे. गेले काही दिवस रद्द केलेल्या महालक्ष्मी, सह्याद्री, आणि कोयना एक्सप्रेस गाड्या आजपासून धावू लागतील. सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशीलही हळूहळू कळू लागला आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या सुमारे ११२ रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२५ कोटी रुपयांची आवश्यकता असून, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं शासनाकडे पाठवला आहे. जिल्ह्यातल्या ४३३, तर शहरातल्या हरीपूर या एकाच गावात २५० घरांची मोठी पडझड झाली तर, सु��ारे तीन हजार घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. हळदीच्या साठवणुकीसाठी वापरली जाणारी जमिनीतली १०० पेवं पाण्यात बुडाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** कोल्हापूरमधून पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणींचा रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आणखी एक तरुण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे पर्यटक सध्या कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहत होते. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे. **** नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात २० टक्के पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता शहराला ४ दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. काल पासून नवीन वेळापत्रक अंमलात आणलं जात आहे. या आधी नांदेड शहराला सहा दिवसा आड पाणी पुरवठा केला जात होता. **** नाशिक रोड इथं बंद स्थितीत असलेल्या एका चित्रपटगृहाच्या छताला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या पथकाच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. ***** ***
0 notes
kokannow · 5 years
Text
आजचे राशिभविष्य २३ जुलै २०१९.
आजचे राशिभविष्य २३ जुलै २०१९.
आजचे पंचांग : भारतीय सौर १ श्रावण शके १९४१, आषाढ कृष्ण षष्ठी सायं. ४.१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा दुपारी १.१२ पर्यंत, चंद्रराशी : मीन, सूर्यनक्षत्र : पुष्य सूर्योदय : सकाळी ६.१४, सूर्यास्त : सायं. ७.१७.
मेष : आहार व्यवस्थित घ्या. भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस इतरांना मदत करा.
वृषभ :जोडीदारांच्या कामात ढवळाढवळ करू नका, स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 April 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.०० **** अपप्रकार करणाऱ्या लोकांना न्यायसंस्थेत ढवळाढवळ करण्याची संधी मिळाल्यास, ही संस्था तग धरणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातल्या कथित लैंगिक छळ प्रकरणी, झालेल्या सुनावणीत आज न्यायालयानं, हे मत नोंदवलं. या दाव्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग, गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या प्रमुखांना, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्या या प्रकरणामागे मोठं कारस्थान असून त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा उत्सवसिंह बंस या वकिलांनी केला आहे, या प्रकरणी आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचं बन्स यांनी सांगितलं. न्यायालयानं, त्यांना उद्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. **** गेल्या रविवारी, इस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या बाँबस्फोट मालिकेत मृत्युमुखी पडलेल्या दहापैकी नऊ भारतीय नागरिकांचे देह भारतात आज पाठवण्यात आले. श्रीलंका सरकारनं ही माहिती दिली. चार वेगवेगळ्या विमानांमधून हे देह आज बंगळुरू आणि हैदराबाद इथे आणण्यात आले. **** जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची पाळमुळं खणून काढल्याचं, लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लों यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं, सैन्यदल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये ४१ अतिरेकी मारले गेले, त्यापैकी २५ जण जैश ए मोहम्मद चे सक्रीय दहशतवादी असल्याचं, या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. २०१८ या वर्षात काश्मीरमध्ये २७२ दहशतवाइदी मारले गेल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या डोणगाव इथल्या १२० क्रमांकाच्या मतदानकेंद्रावर आज फेरमतदान झालं. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे अट्ठावन्न टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या केंद्रावर अठरा एप्रिलला मतदान सुरू होतं, त्या दिवशी मतदान पथकानं मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधला डेटा वेळेवर न गाळता, काही मतदारांनी मतदान केल्यानंतर गाळल्यामुळे इथे आज नव्यानं मतदान घेण्यात आलं. **** महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या महाराष्ट्र दिनाला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या पदकांचं वितरण करण्यात येणार आहे. **** बुलडाणा परिसरातल्या लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि शेकडो वर्षापासून मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीच्या यात्रेला बुलडाणा शहरात सुरुवात झाली आहे. या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. उन्हाची पर्वा न करता पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरात तीव्र पाणीटंचाई भासत असून नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे या शहरात टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसात टँकरनं पाणी पुरवठा करावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर यांनी दिला आहे. **** बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या झोडगा गावाजवळ असलेल्या येलदरी नाल्यात बिबट्या वाघाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.या जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये सध्या पिण्याचं पाणी नसल्यानं वन्य प्राण्यांचे मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत असून, या बिबट्याचाही पाण्याअभावी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. **** चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आणि समीर वर्मा यांनी आपआपले एकेरीचे पहिल्या फेरीचे सामने जिंकून दुस-या फेरीत प्रवेश केला .किदाम्बी श्रीकांत याचा पहिला सामना आज होणार आहे. **** वाशिम जिल्ह्यात विहिरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना नवीन केलेलं बांधकाम खचल्यानंतर मातीखाली दबून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. कारंजा तालुक्यातल्या मसला या गावी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  तिहेरी तलाक प्रथेला बंदी घालण्यासाठीचा अध्यादेश नव्यानं जारी करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी  पेरणी ते कापणी पर्यंत शेतीची सर्व कामं डिजिटली नियंत्रित करणारी योजना आणणार - मुख्यमंत्री  राजकारण्यांनी इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नये - ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला आणि  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ***** तिहेरी तलाक प्रथेला बंदी घालण्यासाठीचा अध्यादेश नव्यानं जारी करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अध्यादेश २०१९ अंतर्गत तिहेरी तलाक देण्याची प्रथा बेकायदेशीर ठरणार असून, याचं उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा होईल. कंपनी सुधारणा अध्यादेश २०१९ आणि भारतीय वैद्यकीय परिषद दुरुस्ती अध्यादेश २०१९ पुन्हा जारी करण्यासही राष्ट्रपतींनी मान्यता दिली. दरम्यान, आज आणि उद्या साजऱ्या होत असलेल्या लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, भोगली बीहू, उत्तरायण आणि पौष पर्व या सणांनिमित्त राष्ट्रपतींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या सणांचा उत्सव म्हणजे देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. **** शाश्वत शेतीसाठी पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामं डिजिटली नियंत्रित करणारी एक योजना आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत औद्योगिक संघटनांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. राज्य चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असून, कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. शेतीशी तंत्रज्ञानाची सांगड घालण्याच्या या प्रयत्नामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन, शेतीतून मिळणारं उत्पन्न शाश्वत असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना डिजिटली राबवल्यामुळे सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्व समावेशक उद्योग धोरण, सुलभ डिजिटल व्यवहार आणि अनुकुल वातावरणामुळे देश - विदेशातल्या उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करू नये तर विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांच्याच क्षेत्रात काम करावे, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. यवतमाळ इथल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, उद्घाटक वैशाली सुधाकर येडे, साहित्य महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या संमेलनात एकूण १५ ठराव संमत करण्यात आले असून बंद पडत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारनं यासंदर्भात आवश्यक कृती करण्याचं आवाहन याबाबतच्या ठरावामध्ये करण्यात आलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेणं, मराठी विद्यापीठ तसंच अनुवाद अकादमी स्थापन करणं, आदी ठरावांसह बेळगाव - कारवार सीमावर्ती भागाच्या सनदशीर लढ्याकडेही सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. सरकारनं शेतमाल खरेदी करावा, शेतमालाला हमी भाव द्यावा, समाजातल्या झुंडशाही प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, असे अन्य ठरावही या संमेलनात संमत करण्यात आले. **** आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकण्याची शक्यता कमी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणानं ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉ. बाबासा���ेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, याबाबत अनेक घटना तज्ज्ञांची मते अशीच आहेत, त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शक्यता कमी वाटते, असं ते म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबाद इथल्या ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा’ रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त, औरंगाबादसह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ परिसरात रोषणाई करण्यात आली असून प्रवेशद्वारावर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नामांतर लढ्यातल्या हुतात्म्यांना अभिवादनासह विविध पक्षाच्या जाहीर सभा या परिसरात होणार आहेत. **** पुणे इथं सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत’ महाराष्ट्रानं काल पाचव्या दिवसापर्यंत ५६ सुवर्ण पदकं पटकावली. ४४ रजत आणि ५६ कांस्य पदकांसह महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी आतापर्यंत या स्पर्धेत १५६ पदकं पटकावली आहेत. जिमनॅस्टीक प्रकारात अदिती दांडेकर आणि अरीक डे यांच्या दमदार कामगिरीमुळे २१ वर्षांखालच्या गटात महाराष्ट्रांनं काल नऊ पदकांची कमाई केली. काल आदितीनं दोन सुवर्णपदकांसह चार पदकं आणि अरीक डे नं एक सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलं. पश्चिम बंगालचा नेमबाज अभिनव शॉ यानं काल दहा मीटर एअर रायफल मिश्र संघांच्या स्पर्धेत मेहुली घोषच्या साथीनं सुवर्ण पदक जिंकलं. त्यामुळे तो या स्पर्धेत सुवर्णपदक जिकंणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. **** राजकीय द्वेष, जातपात बाजूला सारून सगळ्यांनी विकासासाठी एकत्र आलं पाहिजे, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. काल हिंगोली इथं जिल्हा कोषागार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. हिंगोलीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीपैकी ४३ कोटी रुपये दिले असून, उर्वरित सात कोटी रुपये फेब्रुवारीपर्यंत देण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. ��गर परिषद इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, तसंच शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आली. **** लातूर जिल्ह्यातल्या महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी कंपनी सामाजिक दायित्त्व निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं आश्वासन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं आहे. लातूर इथं काल हिरकणी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र आणि राज्य शासनाकडून बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यातल्या आरोग्य सुविधेत भर घालण्यासाठी शंभर खाटांचं स्त्री रुग्णालय मंजूर झालं असलं, तरी भविष्यातली गरज लक्षात घेऊन या रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करुन ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. परभणी इथं काल या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. **** परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना आठ हजार रुपये लाच मागणारा डॉक्टर गजानन काळे याच्यासह मिश्रक- कम्पाउन्डर पांडुरंग डुकरे या दोघांना काल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. याप्रक्ररणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. **** वीज बिल भरण्यासाठी छापील देयकाऐवजी ई-मेल आणि एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबिल १० रुपये सवलत महावितरणनं जाहीर केली होती, त्याअंतर्गत मागील एका महिन्यात राज्यातल्या सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. औरंगाबाद परिमंडळात जवळपास एक हजार १६९ ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी केली असून, अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणनं केलं आहे. **** शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंहजी यांची जयंती काल नांदेड इथं सचखंड गुरूद्वाऱ्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्त रोषणाईसह शबत कीर्तन, विशेष ग्रंथ वाचन, लंगर तसंच हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. **** सोलापूर शहराचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा कालपासून सुरु झाली. यावेळी सात मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात आली. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22  December 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि. ****  देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही संगणकावर नजर ठेवण्याचा अधिकार;  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयावर विरोधकांची टीका  सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता  दुष्काळी तालुके आणि महसूल मंडळातल्या पाणीपुरवठा योजनांचं वीजेचं चालू देयक, मदत आणि पुनवर्सन विभागाच्या टंचाई निधीतून भरलं जाणार आणि  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अभिजित कटकेचा दुसऱ्या फेरीत प्रवेश **** केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना देशभरातल्या कोणत्याही संगणकातल्या माहितीवर नजर ठेवण्याचा अधिकार दिला आहे. गृहमंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. दरम्यान, या मुद्यावरून राज्यसभेत काल विरोधकांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला असणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, यामुळे देशात आपत्कालिन परिस्थिती निर्माण होईल, असं मत व्यक्त केलं. असे आदेश जारी करुन सरकार नागरिकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं, मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापतींनी कामकाज बुधवार २६ डिसेंबर पर्यंत स्थगित केलं. त्यापूर्वी सकाळी सदनाचं कामकाज राफेल खरेदी चौकशी, कावेरी खोऱ्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्य दर्जा, या मागण्यांवरून झालेल्या गदारोळामुळे बारावाजेपर्यंत तहकूब झालं होतं. याच मुद्यांमुळे लोकसभेचं कामकाज कालही बाधित झालं. आता नाताळच्या सुटीनंतर गुरुवार २७ डिसेंबर रोजी दोन्ही सदनांचं कामकाज सुरू होईल. **** नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीला दिल्लीतली त्यांच्या कार्यालयाची जागा रिकामी करण्याचे आदेश, दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. गेल्या ५६ वर्षांपासून भाडेपट्ट्यावर सुरू असलेलं हे कार्यालय रिकामं करण्याचे निर्देश, शहर विकास मंत्रालयानं दिले होते, या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत, आदेशाला स्थगिती मिळवली होती, मात्र काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, स्थगिती काढून घेत, सरकारी आदेशानुसार कार्यालय रिकामं करण्याचे निर्देश दिले. **** गुजरातमधल्या बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं, सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरातमध्ये १३ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत, मुंबईत सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला. सोहराबुद्दीनचा मृत्यू हा गोळी लागून झाला असला तरी, ती गोळी याच आरोपींनी चालवल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली **** आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक काल मुंबईत झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्याबाबत या बैठकीत सहमती झाल्याचं सूत्रांकडून समजतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले, बहुजन विकास आघाडीला पालघर तर कम्युनिस्ट पक्षाला दिंडोरी मतदार संघाची जागा सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. **** सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह वेतन वाढीच्या मागणीसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं काल पुकारलेल्या संपाचा अंशतः परिणाम बँकांच्या कामकाजावर झाला. दरम्यान, युनायटेड बँक युनियन फोरमनं येत्या २६ तारखेला संपाचा इशारा दिला आहे. **** राज्यातल्या दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासन भरणार असून थकित देयकावरचं दंड -व्याज माफ करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. ते काल नागपूर इथं बोलत होते. दुष्काळी तालुक्यांतल्या आणि महसूल मंडळातल्या नोव्हेंबरपासूनचं पाणीपुरवठा योजनांचं वीजेचं देयक, मदत आणि पुनवर्सन विभागाच्या टंचाई निधीतून भरण्यासही शासनानं मंजुरी दिली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. **** दहावीच्या परीक्षेसाठी आता मुक्त परीक्षा मंडळ केलं जाणार असून क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाच आपले छंद जोपासता येणार आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ते काल रत्नागिरीत विद्यार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमात बोलत होते. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जालना इथं सुरु असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कालच्या तिसऱ्या दिवशी अभिजित कटकेनं शिवराज राक्षेचा पराभव करत, महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत, सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे याच्यावर रत्नागिरीच्या संतोष दोरवड यानं विजय मिळवला. ६१ किलो गादी गटात कोल्हापूरच्या सौरभ पाटील याने कल्याणच्या जयेश शेळके याचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं, ८६ किलो गादी गटात अहमदनगरच्या अक्षय कावरे यानं पुण्याच्या अनिकेत खोपडे याला चीतपट करत सुवर्णपदक जिंकलं. ८६ किलो माती गटात कोल्हापूरच्या शशिकांत बोंगार्डे याने जालन्याच्या बालाजी येलगुंडे याला झोळी डावावर चीतपट करीत सुवर्णपदक मिळवलं. ७० किलो माती गटात कोल्हापूरच्या राम कांबळे यानं कोल्हापूरच्याच मच्छिंद्र निउंगरे याचा ७-३ अशा गुणाने पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. या योजनेच्या कामांची काल त्यांनी पाहणी केली. या योजनेच्या मूळ आराखड्यात जी गावं लाभक्षेत्रात नाहीत, त्यांना समाविष्ट करण्याची मागणी आमदार संदिपान भुमरे यांनी केली आहे. त्यानुसार अशा गावांचं सर्वेक्षण करून संपूर्ण अहवाल पंधरा दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचनाही शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. **** चाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं प्रारंभ होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत या संमेलनातल्या नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज उदगीर शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. उद्या तारखेला साहित्यिक डॉ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल, २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात, परिसंवाद, कथाकथन, कवि संमेलनं, आदी कार्यक्रम होणार आहेत. **** नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्नबाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे. १८ संचालक पदांसाठी ६०उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १०८ मतदान केंद्रांवर ६० हजार हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठीची पुढील कार्यवाही तातडीनं करून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. **** उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामधून पाणी उपसा करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. कुरूंदकर यांनी दिला आहे. कालव्यावरच्या बांधकामांचं नुकसान करून विहीरी आणि शेत तळे विना परवानगी भरुन घेण्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. **** अहमदनगर जिल्ह्यात कर्जत शहरातल्या देवस्थान जमिनीवरचे अनधिकृत बांधकामं काढण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणाऱ्या तौसिफ हमीम शेख यांचा काल सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केलं. *****
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 December 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना संगणकातल्या माहितीवर नजर ठेवण्याचा अधिकार बहाल केल्याच्या विरोधात आज राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. दुपारनंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, गृह मंत्रालयाच्या या आदेशावर आक्षेप घेत, यामुळे देशात आपत्कालिन परिस्थिती निर्माण होईल, असं मत व्यक्त केलं. असे आदेश जारी करुन सरकार नागरिकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला असणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं, मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्याचं उपसभापतींनी कामकाज बुधवार २६ डिसेंबर पर्यंत स्थगित केलं. आता नाताळच्या सुटीनंतर गुरुवार २७ डिसेंबर रोजी सदनाचं कामकाज सुरू होईल.
****
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा कायमस्वरुपी उपाय नसल्याचं संसदीय कार्य मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं, ही केवळ एक राजकीय खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्णपणे एकत्र असल्याचंही तोमर यांनी नमूद केलं.
****
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह वेतन वाढीच्या मागणीसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं आज संप पुकारला असून, या संपाचा अंशतः परिणाम बँकांच्या कामकाजावर झाला आहे. दरम्यान, तीन बँकांच्या विलिनीकरणाविरोधात युनायटेड बँक युनियन फोरमनं येत्या २६ तारखेला संपाचा इशारा दिला आहे.
****
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून, नवीन औद्योगिक धोरणात या उद्योगांना विशेष सवलती दिल्या जातील, असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे. मुंबईत आज आयोजित लघु आणि मध्यम उद्योग संघटनेच्या संचालकांच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. छोट्या कंपन्यांमध्ये तयार होणारे सुटे भाग वापरण्यासाठी देश-विदेशातल्या मोठ्या कंपन्यांना सक्ती करण्यात आली असून, याशिवाय काही समस्या असतील तर त्यावर तोडगा काढला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत शहरातल्या मुख्य रस्त्यावरच्या मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थानच्या जमिनीवरचे सर्व अनधिकृत बांधकामं तत्काळ काढा अशी मागणी करत आत्मदहन करणाऱ्या तौसिफ हमीम शेख यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केलं, तसंच काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असून, तौफिक यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
****
कांद्याला दोन हजार ३०० रुपये हमीभाव दिला जावा, अशी मागणी करत धुळे इथं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधानांनी शेतमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.    
****
जालना इथं सुरु असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ६१ किलो माती विभागात पुण्याच्या निखिल कदमनं साताऱ्याच्या सागर सुळचा सात - शून्य असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात सांगलीच्या राहुल पाटीलनं उस्मानाबादच्या दत्ता मेटे याचा १२ - ११ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. कांस्य पदकासाठीच्या लढतीत सागर सूळनं दत्ता मेटेचा पराभव केला.
६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या उपान्त्य फेरीत कल्याणच्या जयेश साळवीनं नाशिकच्या सागर बर्डेचा दहा - शून्य असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपान्त्य फेरीत कोल्हापूरच्या सौरभ पाटीलनं जालन्याच्या अक्षय धानोरेवर चार - शून्य अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर सागर बर्डेनं औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा आठ - दोन असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं.
७० किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटीलनं पुण्याच्या दिनेश मोकाशीला चार - तीन असं हरवत, तर पुण्याच्या शुभम थोरातनं सोलापूरच्या धिरज वाघमोडेला आठ - दोन असं हरवत अंतिम फेरी गाठली. या गटात धीरज वाघमोडेनं कांस्य पदक जिंकलं.
****
राज्यात आज सर्वात कमी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं. औरंगाबाद १०, परभणी ११ पूर्णांक पाच, तर उस्मानाबाद इथं १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 September 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा. **** तिहेरी तलाक संबंधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मान्यता दिली. संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनांपासून हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलेलं नाही. या मुद्यावर आपण काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विधेयक संमत होऊ शकलं नाही, असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. **** राफेल लढाऊ विमान खरेदी करार करताना पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमीटेड तसंच भारतीय वायुसेनेचं हित लक्षात घेतलं नाही असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. त्या नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या. वरिष्ठ कॉग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी सरकार राफेल कराराविषयीची माहिती दडवत असल्याचा आरोप सीतारामन यांनी फेटाळून लावला. **** ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात दुबईतल्या न्यायालयानं कथित दलाल क्रिश्चियन मिशेलच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. तीन हजार ६०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तपासणीच्या आधारे, भारतानं अधिकृतरित्या यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार काल न्यायालयानं हे आदेश दिले. जून २०१६ मध्ये संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात मिशेलनं जवळपास २२५ कोटी रुपये मिळवल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, तपास यंत्रणांकडून मिशेलविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी करण्यात आली होती. **** राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून नेहमीच दूर राहिला असून, सरकारच्या कारभारात संघानं कधीही ढवळाढवळ केली नाही, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. `भविष्यातला भारत - संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर संघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यान मालिकेतलं दुसरं पुष्प गुंफताना ते काल बोलत होते. संपूर्ण समाजाचं एकत्रीकरण करणं, हे संघाचं ध्येय, असून संघ स्वयंसेवकाला राजकीय पक्षात जबाबदारी दिली जात नाही, या कडे सरसंघचालकांनी लक्ष वेधलं. **** भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्मन्न दुप्पट करण्यास कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उदयपूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. मृदा आरोग्य पत्रिका आणि पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ, यासारख्या शेतकरी कल्याणकारी योजना सरकार राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भाभा अणुसंशोधन केंद्राचे महानिदेशक नीलकंठ व्यास यांची अणु ऊर्जा विभागाचे सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०२१ पर्यंत या पदावर काम करतील, असं या आदेशात म्हटलं आहे. **** दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून बँक खात्यांची माहिती प्राप्त न झाल्यानं, दूध दरासाठीच्या अनुदानापोटी आलेला सुमारे २२५ कोटी रुपये निधी शासकीय पातळीवर वितरणाअभावी पडून आहे. राज्य सरकारनं गेल्या एक ऑगस्टपासून दूध उत्पादक तसंच दूध भुकटी कारखान्यांना लीटरमागे पाच रुपये अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान संबंधितांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार असल्यानं, संबंधितांनी आपल्या बँक खात्याची माहिती जमा करण्याचं आवाहन दुग्धविकास विभागाकडून करण्यात आलं आहे. **** राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंधराव्या वित्त आयोगाचं पथक आज आपल्या दौऱ्याच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. काल या पथकानं विविध राजकीय पक्ष आणि उद्योग समुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. **** मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उद्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं नवोदित कथालेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे. कथालेखनाचं तंत्र - परंपरा आणि प्रयोग, तसंच कथा सुचण्यापासून लिहिण्यापर्यंत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. **** आकाशवाणी औरंगाबाद केंद्र आज आपला ४२ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आकाशवाणी औरंगाबाद केंद्र आपली विश्वासार्हता जपून असल्याचं, अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून म्हटलं आहे. **** आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल स्पर्धेत काल भारतानं पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा २६ धावांनी पराभव केला. **** स्लोव्हाकियात ट्रन्वा इथं सुरु असलेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या साजन भानवालनं ७७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. *****
0 notes