Tumgik
#असून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा भारतीय महिला संघाची धाकडं फलंदाज आणि यष्टीरक्षक रिचा घोष हिने आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांनाच भुरली घातली आहे. महिला क्रिकेटमध्ये रिचाप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करणारे खेळाडू खूप आहेत. त्यामुळेच तिची ही फलंदाजीची शैलीच तिला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं बनवते. सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत रिचाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokwadalnews · 1 year
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभाव���न बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देत��. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर ���ाहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे ��िळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर��षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प���रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा ��क्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
zee48tass · 1 year
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…
Tumblr media
View On WordPress
8 notes · View notes
124bha · 8 months
Text
2 notes · View notes
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Tumblr media
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes · View notes
devilssoul · 2 years
Photo
Tumblr media
अपने असून को भी कीमत होती है | #reelsinstagram #explore #explorepage #exploremore #trending #instagood #instadaily #shayarilove #shayari #broken #brokenheart #viral #instagram #alone #love #urdupoetry #ghalib #gulzar #rahatindori #motivation #motivationalquotes #maa #papa #india #poetry #hindiquotes #urdu #shayarilover #reelitfeelit #quotes https://www.instagram.com/p/CnM266SSPFi/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
marathimajja · 2 years
Text
तसल्या सर्व्हिस साठी सर्च केली ती वेबसाईट, आणि त्यावरील बहिणीचा प्रोफाइल पाहून….
तसल्या सर्व्हिस साठी सर्च केली ती वेबसाईट, आणि त्यावरील बहिणीचा प्रोफाइल पाहून….
  अनेकदा इंटरनेट चा वापर करत असताना आपल्याला अश्लील जाहिराती दिसत असतात. बऱ्याचदा आपण त्यांना टाळत असतो परंतु काही फोटो असे असतात की पाहून माणूस क्लिक करतोच. हि घटना 2 डिसेंबर ची असून बॉडी मसाज पार्लर साठी सर्च करत असताना तो एका वेबसाइट वर आला. तिथे त्याने आपल्याच बहिणीचे आणि अन्य एका ओळखीच्या महिलेचे फोटो पाहिले. फोटो खालील माहिती वाचून तर तो हदरलाच. मग त्याने बहिणीकडे चौकशी केली असता आपण 6…
Tumblr media
View On WordPress
5 notes · View notes
airnews-arngbad · 9 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची पंतप्रधानांची घोषणा
समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा स���ाजाच्या बंदला जालना आणि परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत एक - शून्य अशी आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक पेड माँ के नाम, स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोल��स बंदोबस्त लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्या��च्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
 ****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
0 notes
news-34 · 15 hours
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक मुंबई : महाराष्ट्रात ई-सिगारेटवर बंदी आहे. मात्र तरिही ही बंदी झुगारून सर्रासपणे ई-सिगारेट विक्रीचा काळा बाजार सुरु असल्याचं अधोरेखित झालं आहे. ई-सिगारेटीविरोधात बांगूर नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच तब्बल 15 हून अधिक ई-सिगारेटची पाकिटंही जप्त करण्यात आली आहे. आता अटक करण्यात आलेल्या…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 days
Text
Pune : पुणेकरणांसाठी गुड न्यूज ; पुण्याहून बँकॉक आणि दुबई आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी
एमपीसीन्यूज – पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Pune ) पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली असून येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे . अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ दिली आहे. पुणे ते दुबई ही विमानसेवा दररोज सुरु होणार असून पुणे ते बँकॉक ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु होणार आहे. पुणे ते बँकॉक हि विमानसेवा पूर्वी सुरू होती.…
0 notes
marathicelebscom · 5 days
Text
शर्वरीबद्दल चर्चा करत आहे संपूर्ण इंडस्ट्री ! कबीर खानचा त्यांच्या शोधलेल्या स्टारच्या यशाबद्दल उत्साह
प्रतिभावान बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीने 2024 तिच्या नावावर केले असून, ती इंडस्ट्रीतील सर्वात तेजस्वी युवा अभिनेत्रींपैकी एक म्हणून समोर आली आहे. तिने वर्षाची सुरुवात ‘मुँज्या’ या मोठ्या यशस्वी चित्रपटाने केली, ज्याने 100 कोटींचा आकडा ओलांडला आणि तिच्या सोलो डान्स नंबर ‘तरस’ ने सर्वत्र धूम उडवली. त्यानंतर तिने ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये काम केले आणि मग ‘वेदा’ मध्ये तिच्या अप्रति��…
1 note · View note
marmikmaharashtra · 5 days
Link
https://marmikmaharashtra.com/that-is-why-our-nature-is-cleanliness-and-sanskar-cleanliness/
0 notes
mhlivenews · 20 days
Text
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे
Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती आपले सरकार टिकवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
शिवाली परब दिसणार सोनी मराठीच्या नव्या मालिकेत
शिवाली परब दिसणार सोनी मराठीच्या नव्या मालिकेत
  महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री म्हणजेच कल्याणची चूलबूली शीवाली हि हस्याजात्रेचा महत्वाचा भाग बनलेली असून त्यासोबतच तीचे सहकलाकार गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पृथ्वीक पाटील, वनिता खरात, बने, दत्तू मोरे हे सुद्धा सर्वांचे लाडके आहेत.   नुकत्याच केलेल्या इंस्टाग्राम च्या पोस्ट मध्ये व्हिडिओ शेअर करताना तिने मालिकेचा introduction व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये केप्शन म्हणून ती…
Tumblr media
View On WordPress
3 notes · View notes