Tumgik
#दाखवलेल्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली...
Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली…
Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली… Rohit sharma wife Ritika Sajdeh Reaction, India Vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीनंतरही कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी केली. रोहितच्या या शौर्यावर त्याची पत्नी रितिका सजदेहनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने रोहितवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. Rohit sharma wife Ritika Sajdeh…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 11 months
Text
कृषिमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार झाला हलका
मुंबई दि. 11 – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार  कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास मदतीचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय जारी;मात्र निर्णयात सुधारणा करून सरसकट प्रमाणपत्र देण्याची आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी
सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करून मराठा आरक्षणावर काम करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि बीड जिल्ह्यात कालही निदर्शनं
राज्यभरात काल दहीहंडीचा थरार;शाळांमधूनही बाळगोपाळांकडून दहीहंडी उत्साहात साजरी
सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी
आणि
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एब्डेन जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश 
****
मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल, त्यांना निजामाच्या काळातला महसुली अभिलेख, शैक्षणिक अभिलेख किंवा अन्य ठिकाणी वंशावळी कुणबी उल्लेख असेल, त्यांना हे प्रमाणपत्र द्यायला सरकारनं मंजुरी दिली आहे. अर्जदारानं सादर केलेल्या प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी करुन मराठा-कुणबी, किंवा कुणबी-मराठा हे जात प्रमाणपत्र दिलं जाईल.
मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याची, तसंच जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी, सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत.
****
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना शासन निर्णयाची प्रत दिली, तसंच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. जरांगे पाटील यांनी मात्र, सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. दुरुस्ती होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या उपोषणाचा काल दहावा दिवस होता. वंशावळाच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं शासन आदेशात नमूद आहे, मात्र आमच्याकडे कुणाकडेही वंशावळीचे पुरावे नाहीत, त्यामुळे वंशावळीची अट रद्द करून, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणसाठी राज्यभरात समाजबांधवांकडून सुरू असलेली आंदोलनं लोकशाही मार्गानं करावी असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी काम करत असल्याचा पुनरुच्चार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल ठाणे इथं आनंद दिघे दहीहंडी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, मात्र हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठंही धक्का लावला जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडवणीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयानं देखील अंतिम केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसंच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. पवारांनी मुख्यमंत्री असताना या आरक्षणासाठी काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते काल सोलापूरमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात धोरण स्पष्ट केलं असून, कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी मुख्य मागणी पूर्ण केली असल्यानं त्यांनी विषय जास्ती ताणू नये, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.
****
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल हिंगोली आणि बीड जिल्ह्यात निदर्शनं करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथं सकल मराठा समाजाच्या स्मशानभूमीत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी काल दुचाकी फेरी काढली. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर काल भर पावसात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावं, आंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीमारच्या घटनेची सखोल चौकशी करून जखमींना तत्काळ आर्थिक मदत करावी यासह इतर मागण्यांचं निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आलं.
बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ परिसरात तसंच धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी चौक परिसरात काल आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळी गेवराई दिशेनं बीड शहरात रुग्णवाहिका येत असल्याचं निदर्शनास येताच आंदोलनकर्त्यांनी काहीकाळ आंदोलन थांबवून रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करुन दिली.
****
काँग्रेस पक्षानं रायपूरच्या महा अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा ठराव संमत केला असून, आरक्षणाचा प्रश्न हा जातीनिहाय जनगणनेनं सोडवता येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल नागपूरमध्ये जनस��वाद यात्रा काढण्यात आली. महागाई, बेरोजगारी या सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करेल, असं पटोले यांनी सांगितलं. लातूर इथंही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
****
गोरगरीबांपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व योजना घेऊन जाण्यासाठी वित्तीय क्षेत्रातल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केंद्र सरकार करत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. जनधन, आधार आणि मोबाइल या त्रिसुत्रीमुळे लोकांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला, वित्तीय क्षेत्रातल्या तंत्रज्ञानामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातल्या लोकांचं आयुष्य सुकर झाल्याचं ते म्हणाले. देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात वित्तीय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला.
****
मेरी माटी मेरा देश, या महाअभियानाला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या अभियानात १५ सप्टेंबरपर्यंत बूथ स्तरावर प्रत्येक घरातून माती किंवा धान्य गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये अमृत कलशांतील माती कर्तव्य पथावर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाणार आहे. याबरोबरच देशभरात गावागावात अमृतवाटिका उभारण्यात आल्या असून, शिलाफलकही लावण्यात आले असल्याचं, मोहोळ यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काल राज्यभरात दहीहंडीचा थरार पहायला मिळाला. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने गोविंदांचा उत्साह द्विणुणित झाला होता.
मुंबईत यंदा दहीहंडी फोडताना थर कोसळून एकूण ३५ गोविंदा जखमी झाले. त्यापैकी चार जणांना रुग्णालयात दाखल केलं असून, नऊ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. २२ गोविंदा बाह्य रुग्ण विभागात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगर पालिका रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे.
औरंगाबाद इथं ४८ ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव पार पडला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथ���ांमध्ये चुरस लागली होती.
प्राथमिक शाळांमधूनही काल दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. राधा कृष्णांच्या वेशभुषेत आलेले बाळगोपाळ आणि गोपिका मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर साकारल्या जात असलेल्या इस्कॉन मंदिरातही काल भजन, कीर्तन, महाप्रसादासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घेतला.
****
राज्यातल्या अनेक भागात काल जवळपास महिनाभराच्या खंडानंतर पाऊस पडला.
औरंगाबाद शहर परिसरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाची संततधार सुरु होती. धुळे जिल्ह्यातही काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातही पाऊस झाल्यानं, खरीपातल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीनं निकोलस माहुत आणि पियरे ह्यूजयुएस हर्बर्ट या फ्रेंच जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला. अंतिम सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीचा सामना जो सॅलिसबरी आणि राजीव राम या ब्रिटिश अमेरिकी जोडीसोबत होणार आहे.
****
४३व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, लक्ष्मणराव मनाळ यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमुक्तानंद महाविद्यालयात दोन आणि तीन डिसेंबर रोजी हे संमेलन होणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन भव्य-व्यापक आणि ऐतिहासिक कसं होईल या दृष्टीनं स्वागतमंडळ प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. गंगापूर शहरात असा सांस्कृतिक-वैचारिक सोहळा पहिल्यांदाच होत असल्यानं तालुक्यातील साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यास तो उपयुक्त ठरेल असंही चव्हाण यांनी नमुद केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबीत कामांसाठी २२० कोटीहुन अधिकचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद शहरात सर्व्हिस रोड, विद्युतीकरण आणि येडशी-सोनेगाव रस्त्यावर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी जवळपास रुपये ११० कोटी निधी मंजूर केला आहे. या कामांमुळे अनेक गैरसोयी दूर होऊन जिल्हावासीयांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
एअर कंडीशनरला पर्याय म्हणून उपयुक्त ठरणार्‍या उपकरणाची अथक संशोधनातून आणि प्रयोगातून निर्मिती करण्यात तुळजापूर इथले प्राध्यापक प्रदीप हंगरगेकर यांना यश आलं आहे. या संशोधनाला भारत सरकारने मान्यता मिळवून त्याबद्दलचं पेटंट त्यांना प्राप्त झालं आहे. हंगरगेकर यांनी इराण आणि इतर देशांमध्ये पूर्वापार वापरात येत असलेल्या पॅसिव्ह डाऊन ड्राफ्ट इव्हापोरेटिव्ह कुलिंग यंत्रणेचा अभ्यास करून आणि त्यातल्या सर्व त्रुटी अभियांत्रिकीच्या ज्ञानाद्वारे दूर करून अत्यंत उत्कृष्ट मॉडेल तयार केलं आहे. त्यावरती सलग तीन वर्षे कडक उन्हामध्ये प्रयोग करून परीक्षण करण्यात आलं. ही यंत्रणा अत्यंत कमी वीज वापरून शांतपणे आणि डिजिटल कंट्रोलद्वारे कार्यरत राहते.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव उपक्रमांमध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यावर प्राधान्यानं भर देणं आवश्यक असल्याचं, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. सर्व विभागांनी महोत्सवासंदर्भातली जबाबदारी ओळखून कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन करावं, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या तातडीने मिळण्यासाठी, तसंच या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उदगीर तालुका क्रीडा संकुलामध्ये खेळाडुंना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रस्तावाचा बनसोडे यांनी काल आढावा घेतला.
****
औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयातली पांढरी वाघीण अर्पितानं काल तीन बछड्यांना जन्म दिला. प्राणीसंग्रहालयातल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघीण आणि बछड्यांची तपासणी केली असून, त्यांची तब्येत उत्तम असल्याचं म्हटलं आहे. काल जन्मलेल्या तीन बछड्यांमुळे आता सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढऱ्या वाघांची संख्या सहा झाली असल्याची माहिती उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
****
औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय कार्यालयात काल अध्यक्ष निवडीची बैठक घेण्यात आली होती, त्यात निवडणूक प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात आली.
****
जनावरांमधल्या लंपी त्वचेच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसंच या सांसर्गिक रोगाची लागण म्हैसवर्ग, शेळी आणि मेंढयामध्ये होत नसल्याने त्यांचे खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कृषि विभागामार्फत उकिरडा मुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटामधल्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर १९९ गांडूळ कल्चर युनिटचं लक्षांक प्राप्त झालं आहे. या योजनेचा शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
****
0 notes
rightstartup · 1 year
Text
Tumblr media
मानवी कल्याणासाठी दया, क्षमा, शांती व अहिंसा या सर्वोच्च मानवी मूल्यांचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! भगवान बुद्ध यांनी दाखवलेल्या सद्मार्गावर मार्गक्रमण करण्याचा संकल्प करूया. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
0 notes
nileshartist · 2 years
Photo
Tumblr media
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब (@pawarspeaks ) हे आजही देशातील सर्वच तरुण आणि बुजुर्ग राजकारण्यांसाठी आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यातून, अफाट बुद्धिमत्ता, अभ्यास आणि लोकसंपर्कातून शरद पवारसाहेबांनी हे वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मागच्यावेळी वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली अन् साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीचा गेम पालटला. पवारांची ही सभा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. आताही पवारसाहेबांच्या कर्तव्य निष्ठतेचं हे रुप पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असताना त्यांनी मध्येच डिस्चार्ज घेतला असून थेट पक्षाच्या मेळाव्यासाठी शिर्डीत (shirdi) दाखल झाले आहेत. वयाच्या 81व्या वर्षीही आजाराची पर्वा न करता साहेबांनी दाखवलेल्या या उत्साहाची एकच चर्चा सुरू झाली आहे.अजूनही प्रत्येक तळागाळात जाऊन मार्गदर्शन व काम करताना मी पाहील.त्यांचा हा उत्साह आणि ऊर्जा तरुणांना लाजवेल अशीच आहे. उर्जास्तोत्र #पवारसाहेब #artforall #publicart #streetart #punestreetart #artistsoninstagram #streetartindia #wallartindia #pune #pawarsaheb #pawarspeaks #baramatiloksabhaconstituency #punecity #pmc #sharadpawar #saheb #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CnAayf_hv-6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mhlivenews · 2 years
Text
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 05 : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ganeshotsav entry arch in miraj eknath shinde group shivsena tension
ganeshotsav entry arch in miraj eknath shinde group shivsena tension
राज्यात एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी कायम तत्पर असणारे एकनाथ शिंदेगट आणि शिवसेना बुलढाण्यामध्ये थेट हमरीतुमरीवर आल्याचा प्रकार समोर आला. बुलढाणा बाजार समितीमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या सत्कार समारंभात हे दोन्ही गट भिडले आणि तुफान राडा झाला. अशीच काहीशी परिस्थिती मिरजमध्ये उद्भवण्याची वेळ ओढवली होती. मात्र, पोलिसांची मध्यस्थी आणि दोन्ही बाजूंनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे हा प्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 3 years
Text
काश्मीर फाईल्स अन सिन्नरमध्ये रिक्षा, पोलिसांनी तात्काळ थांबला ' तो ' प्रकार
काश्मीर फाईल्स अन सिन्नरमध्ये रिक्षा, पोलिसांनी तात्काळ थांबला ‘ तो ‘ प्रकार
देशात सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे मानसिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे . या चित्रपटाच्या बाजूने उभे राहणाऱ्या व्यक्तींचा यांचा एक गट तर दुसरीकडे या चित्रपटात दाखवलेल्या अतिरंजित प्रकारावर काही व्यक्तींकडून केली जाणारी टीका असे दोन गट या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे हा चित्रपट पाहण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरुन देश भरकटला होता, तो पंतप्रधान मोदींनी परत आणला – अमित शाह
महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरुन देश भरकटला होता, तो पंतप्रधान मोदींनी परत आणला – अमित शाह
महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरुन देश भरकटला होता, तो पंतप्रधान मोदींनी परत आणला – अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच अनेक सरकारी प्रकल्प आणि योजनांमध्ये महात्मा गांधींच्या तत्त्वांचा समावेश केला आहे, असे म्हटले आहे. अमित शाह यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील कोचरब आश्रमात एका कार्यक्रमाला संबोधित केले. महात्मा…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
असाही प्रामाणिक पणा !
असाही प्रामाणिक पणा !
सापडलेला मोबाईल परत केला आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक नजिक सापडलेला मोबाईल आचरा भंडारवाडी येथील गणेश आचरेकर यांनी मोबाईल मालक ऋग्वेद सरजोशी यांना परत केला. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणा बद्दल आचरा ग्रामोपाद्याय निलेश सरजोशी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 05 : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
सरकारनं आरक्षण संबंधी परिपत्रकात सुधारणा करण्याची उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची मागणी, उपोषण मागं घेण्यास नकार.
हिंगोली, बीड इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन.
आणि
जन्माष्टमी - दहिहंडीचा उत्साह शिगेला.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केलं जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर आनंद दिघे दहीहंडीमध्ये सहभाग घेतला, त्यानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे, मात्र हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षाणाला कुठंही धक्का लावला जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण उच्च न्यायालयानं देखील अंतिम केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झालं असा आरोप त्यांनी केला. दहीहांडीच्या निमित्तानं गोंविदा थर लावत आहेत, दुसरीकडे राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचं शिंदे म्हणाले. देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नाही. २०२४ ची लोकसभेची हंडी मोदीच फोडतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिल्याप्रमाणं मराठवाड्यातल्या मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या संदर्भातल्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात अंतरवाली इथं उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना आपलं उपोषण मागं घेण्याची विनंती शासनामार्फत करण्यात आली आहे. ही विनंती करणारं सचिव सुमंत भांगे यांचं पत्र देण्यात आलं आहे. माजी मंत्री अर्जुन खो���कर यांनी जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना शासन निर्णयाची प्रत दिली.
****
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनं चांगला निर्णय घेतला असला तरी वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. सरकारनं काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करावी, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी आजही उपोषण आंदोलन मागं घेण्यास नकार दिला. त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. वंशावळाची नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं शासन आदेशात नमूद आहे. मात्र आमच्याकडे कुणाकडेही वंशावळीचे पुरावे नाहीत, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात समाजबांधवांकडून सुरू असलेली आंदोलनं लोकशाही मार्गानं करावी असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे.
****
कुणबी मराठा आरक्षणा संदर्भात कालच मुख्यमंत्र्यांनी धोरण स्पष्ट केलं असून मराठवाड्यातली सर्व गावं ही निजाम संस्थानमध्ये होती. त्यासाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सोलापूरमध्ये दिली. कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मुख्य हीच मागणी होती. आपली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी पूर्ण केली असल्यानं त्यांना विनंती आहे, त्यांनी जास्त विषय ताणू नये, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन विखे पाटील यांनी राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली. पवारांनी मुख्यमंत्री असताना या आरक्षणासाठी काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भातली श्वेतपत्रिका राज्य सरकार काढणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथं मराठा समाजाला आरक्षण आणि जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या स्मशानभूमीत सात जणांनी उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी काल दुचाकी फेरीही काढली होती. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणकर्त्यांनी वाजतगाजत मोर्चा काढला आणि स्मशानभूमीत जाऊन उपोषण आंदोलनाला सुरूवात केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ परिसरात तसंच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी चौक परिसरात आंदोलन झालं. या आंदोलनाच्या वेळी गेवराई दिशेनं बीड शहरात रुग्णवाहिका येत असल्याचं निदर्शनास येताच आंदोलनकर्त्यांनी काहीकाळ आंदोलन थांबवून रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करुन दिली.
****
काँग्रेस पक्षानं रायपूरच्या महा अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा ठराव संमत केला असून आरक्षणाचा प्रश्न हा जातीनिहाय जनगणनेनं सोडवता येईल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज नागपूरमध्ये जनसंवाद यात्रा काढण्यात आली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून देशात वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी या सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल असं पटोले यांनी यावेळी सांगितलं.
****
जन्माष्टमी निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाऊस गोविंदा पथकांच्या उत्साहात भर घालत आहे. औरंगाबाद इथं ४८ ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव होत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारं गाव अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतल्या घणसोली गावांत साजऱ्या होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता करण्यात आली. गावांत होणाऱ्या या सप्ताहाला १२२ वर्षांची परंपरा आहे आणि आजची पिढी ती परंपरा जपतही आहे. श्रीकृष्णजन्माच्या रात्री काल कृष्ण अध्याय वाचन, पाळणागीत आणि आरती करून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करताना मृदंग उतरविण्यात आलं त्यानंतर आज गावातल्या कौलआळीतल्या ग्रामस्थांनी मानाची हंडी फोडली.
****
त्रेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमुक्तानंद महाविद्यालयात दोन आणि तीन डिसेंबर रोजी होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव मनाळ यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य-व्यापक आणि ऐतिहासिक कसं होईल या दृष्टीनं स्वागतमंडळ प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. गंगापूर शहरात असा सांस्कृतिक-वैचारिक सोहळा पहिल्यांदाच होत असल्यानं तालुक्यातील साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यास तो उपयुक्त ठरेल असंही चव्हाण यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद शहर परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून ढगाळ वातावरण होतं आणि पावसाची संततधार सुरु होती. पावसानं धुळे जिल्ह्यातही सर्वत्र मुसळधार हजेरी लावली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पाऊस सुरू आहे. नाशिक परिसरातही पाऊस आहे. मोठ्या कालावधीनंतर पाऊस सुरु झाल्यानं खरीपातल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
****
औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयातली पांढरी वाघीण अर्पीतानं आज दुपारी तीन बछड्यांना जन्म दिला. प्राणीसंग्रहालयातले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघीण आणि बछड्यांची तपासणी केली असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचं म्हटलं आहे. आज जन्मलेल्या तीन बछड्यांमुळं आता सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढऱ्या वाघांची संख्या सहा झाली असल्याची माहिती उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे.
****
0 notes
neerajkumarji · 3 years
Text
#संतरामपालजी_समाज_क्रांतिकारक
7 Days to go for Avataran Diwasअश्लील चित्रपटांमुळे समाजात वाढती अश्लीलता, छोट्या कपड्यांचा ट्रेंड सामान्य झाला आहे. दुसरीकडे, संत रामपाल जी महाराजांच्या अनुयायांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून चित्रपट, मालिका, अश्लील गाणी इत्यादींचा पूर्णपणे त्याग केला आहे. जो सामाजिक सुधारणेचा एक अद्भुत उपक्रम आहे. संताच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे आज लाखो लोक सामाजिक दुष्टता सोडून शास्त्र आधारित भक्ती करत आहेत. 8 सप्टेंबर हा त्या परम संत रामपाल जी महाराजांचा अवतार दिन आहे.
0 notes
rightstartup · 1 year
Text
भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, संयम आणि करूणेची तत्त्वं समाजात रूजवत मानवी जीवनाला नवी दिशा दिली. त्यांनी दाखवलेल्या सदाचाराच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा संकल्प करूया. भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Tumblr media
0 notes
amhikastkar · 3 years
Text
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही ‘फौजदारी’ होईना 
पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या १२६ कोटी रुपयांच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपये गडप झाल्याचा निष्कर्ष काढून विरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस दस्तुरखुद्द उपलोकायुक्त, कृषी सचिव, कृषी आयुक्तांनी केली आहे. मात्र घोटाळेबाजांना अटक सोडाच; पण साधा ‘एफआयआर’ देखील नोंदविला जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  कृषी खात्यातील गैरव्यवहार मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ३१ :  स्वामी विवेकानंदांनी देशाला ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हे ध्येयवाक्य दिले. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत ध्येय गाठायला अनेक वर्षे लागू शकतील. प्रत्येकाला विवेकानंद किंवा शंकराचार्य होता येत नाही; परंतु प्रत्येकाने स्वामी विवेकानंदांनी दाखवलेल्या वाटेवर किमान दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी…
View On WordPress
0 notes