Tumgik
#खंत?
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली 'ही' खंत
Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत
Rohit Pawar : मुंबईतील बेस्ट बसचे फोटो ट्वीट करून रोहित पवार यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत Rohit Pawar Tweet : मुंबईतील बेस्ट बसेसवर झळकलेल्या जाहिरातींचे फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.  Rohit Pawar Tweet : मुंबईतील बेस्ट बसेसवर झळकलेल्या जाहिरातींचे फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.  Go to…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 29 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
बदलापूर बाललैंगिक अत्याचार घटनेचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापना
परळी वैजनाथ इथं आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप, तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची विभागाची माहिती
आणि
जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदे�� ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असून, त्याचाच भाग म्हणून शाळांमधे त्वरित तक्रार पेट्या बसवल्या जातील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच या पेट्या उघडल्या जातील, असं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल काल शासनास सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून, शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घ��ना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतल्या चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी काल निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे कोसळला. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. पालकमंत्री चव्हाण यांनी सायंकाळी राजकोट इथं जात घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, हा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदलानं खंत व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकार आणि नौदलाची एक समिती नियुक्त केली आहे. हा पुतळा पुन्हा एकदा उभारु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला. म���त्र, लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारु असं त्यांनी सांगितलं
****
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने आज पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्रमणी यांच्यासह अनेक मान्यवर या समारोप सोहळ्याला उपस्थित होते. या महोत्सवामध्ये मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विविध वस्तूंच्या ४३५ स्टॉल मधून सुमारे तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली.
****
आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. काल मुंबईत राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या गावांमध्ये पायाभूत सुविधांसह व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, असंही राज्यपालांनी नमूद केलं.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चव्हाण यांचं काल हैदराबाद इथं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यसभेच्या राज्यातल्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती, विधीमंडळाने प���रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
****
कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. द्वारका, मथुरा आणि वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये मध्यरात्री  श्रीकृष्ण जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
दरम्यान, दहीहंडी उत्सव आज साजरा होत आहे, शहरात अनेक चौकांमध्ये हंडी बांधण्याची तयारी सुरू झाली असून, गोविंदा पथकंही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
****
लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्र��त्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या घाटनांदूर इथल्या वीज उपकेंद्रातील वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे घाटनांदूर आणि जवळगा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा आज सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वीजग्राहकांनी सहकार्य करावं  असं  आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी सव्वा सहा लाख रुपयाच्या गुटख्यासह सुमारे पावणे नऊ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथकानं उमरगा इथं औराद पाटी चौरस्ता भागात ही कारवाई करत, एका आरोपीस अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या”पात्र लाभार्थींचे अर्ज येत्या ३१ ऑगस्टपर्यंत भरुन घेण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अधिकारी कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांची वैयक्तीक भेट घेऊन अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 
****
0 notes
Text
स्वातंत्र्य
आजूबाजूला बघतो जेव्हामाणुसकीचा दिसतो अंत ।स्वातंत्र्य हे टिकणार कसे आहे मनाला हीच खंत । महाराज कोणी होतो बाबाम्हणतो आहे मीच संत ।व्यभिचारी इथे दुराचारीहोऊन फिरतात मोठे महंत । राजकारण्यांचे नाव नकोदाखवतील ते वाचले ग्रंथ ।तोडा फोडा राज्य कराएकच त्यांचा मूळ मंत्र  । जाती जातीत द्वेष कितीविचारतात ते कुठला पंथ ।हिंदू मुस्लिम शीख ईसाईमारा मारा कोण म्हणतं । नाही उरली माणुसकी होचिरडतात ते जसा जंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thediscoveredwriter · 5 months
Text
प्रेमाची आशा!
शंकेची भिंत जेव्हा हळूहळू कोसळली, संशयाच्या सावटांनी जेव्हा जागा सोडली, विश्वासाच्या किरणाने हृदयाला वेढले. आपुलकीच्या उष्णतेने मन प्रफुल्लित झाले. तुमच्या हास्याने जे काही सांगितले, ते नजरेने ऐकले, हृदयाने ओळखले. तुमच्या नजरेतल्या गोडव्याने जे काही व्यक्त केले, ते मनाने सांगितले, आत्म्याने स्वीकारले. आता कोणतीही तक्रार नाही, कोणतीही खंत नाही, नाही नात्यात कोणताही दुरावा, कोणतीही अडचण…
View On WordPress
0 notes
imranjalna · 6 months
Text
जेष्ठांबाबत केंद्राकडून आखडता हात तर राज्य शासन सकारात्मक : अरूण रोडे
विभागीय मेळावा : मराठवाड्यातील 500 प्रतिनिधींचा सहभाग जालना (प्रतिनिधी) : लोकसंख्येच्या 14% समुह असलेल्या जेष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत, वर्षातून दोनदा मोफत आरोग्य तपासणी,विरंगुळा केंद्र, आर्थिक लाभाच्या योजना अशी दिलासा दायक धोरणे महाराष्ट्र राज्य शासनाने सकारात्मक दृष्टीने राबविली आहेत. मात्र केंद्र शासनाने कोरोना काळापासून रेल्वे प्रवासात सवलत, आर्थिक लाभ योजना बंद केल्या असल्याची खंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 7 months
Text
मी आणि समुद्रकिनारा
निळा समुद्र,गरम वाळू,छोटे मासे,खारी हवा,समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही गोव्याला…
View On WordPress
0 notes
jagdamb · 1 year
Text
आजच्या दिवशी मावळलेला सूर्य, पुन्हा कधीच दिसणे नाही,
अखंड काळाची खंत असेल, ऐसा राजा होणे नाही !!
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#स्मृतीदिन | #त्रिवार_वंदन !
#ChatrapatiShivajiMaharaj #smrutidin
#Jagdamb®
#Vyavsaywala™
(CONTENT © COPYRIGHT)
Tumblr media
0 notes
nashikfast · 2 years
Text
--II ● विवेक विचार ● II--
. आपल्या धडपडीची, आपल्या चुकांची, आपल्याला आलेल्या अपयशाची तमा बाळगू नका मी गायीला कधी खोटे बोलतांना ऐकले नाही; पण ती नेहमी गायच राहते, कधी मनुष्य होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका, क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद बाळगू नका. हजार वेळा आपल्या आदर्शाला धरुन राहण्याचा प्रयत्न करा आणि हजार वेळा अपयशी झालात तरी फिरुन एकवार कंबर कसून कामाला लागा. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Read With STR: मृत्युंजय - कर्ण 1.11
We're reading मृत्युंजय [mṛtyuṅjay] by Shivaji Sawant!
कर्ण 1.11
ओरखडा [orakhaḍā] - scratch, abrasion
सूरकांडी [sūrkāṅḍī] - to swoop down, to perform a swooping dive
काजवा [kāzvā] - firefly
खोक [khok] - wound, bruise
पाला [pālā] - leaf
चंद्रकोर [caṅdrakor] - crescent moon
चंपा [caṅpā] - front part of a foot
रुतणे [rutṇe] - to prick, to penetrate
वलय [valay] - ring, halo
कातडी [kātaḍī] - skin
झिंज्या [jhiṅjyā] - messy or disorderly tress of hair
तसू [tasū] - a very short measure of length
अभेद्य [abhedya] - impenetrable, impregnable
धोंडा [dhoṅḍā] - large stone
झळाळणे [zhaḷāḷṇe] - to shine, to glisten
उन्मत्त [unmatta] - arrogant, intoxicated, delirious and frantic
झगझगणे [zhagzhagṇe] - to dazzle
टिटवी [ṭiṭvī] - red-wattled lapwing
कर्कशपणे [karkaśpaṇe] - hoarsely, rasping, shrilly
केकाटणे [kekāṭṇe] - squeal
धुमसणे [dhumasṇe] - smoulder
खंत [khaṅta] - shame, disgust due to conscience
वसा [vasā] - marrow or fat, grease
काबाडकष्ट [kābāḍkaṣṭa] - back-breaking labour or effort
कृतघ्न [kṛtaghna] - ungrateful, thankless
प्रतारणा [pratārṇā] - deception
Words I did not get:
क्रण [kraṇ] - "तिथे एखादा साधा क्रणही उठलेला नव्हता."
Notes and summary:
Karna learns that he had struggled against the aggressive bull for a considerable length of time before Shon returned with his father, who calmed the bull. According to Shon, their father found Karna's body too hot to touch, making it difficult to dislodge his hands from the bull's horns.
This leads Karna to wonder how he doesn't have so much as a scratch on his body. After learning that Shon had once been injured and had bled at that time, Karna returns to the cottage and shoots an arrow at his own foot.
He is entirely unharmed, no matter how many times he attacks his own body. The realisation dawns that he is invincible, and he once again begins to question as to who he really is. He then regrets thinking himself as apart from his beloved family, and convinces himself that he is a charioteer's son, and so, a charioteer himself.
4 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते... सुलोचना चव्हाणांच्या मुलाने व्यक्त केली खंत
पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते… सुलोचना चव्हाणांच्या मुलाने व्यक्त केली खंत
पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते… सुलोचना चव्हाणांच्या मुलाने व्यक्त केली खंत Sulochana Chavan Son Vijay Chavan Reaction: महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी १० डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. लाडक्या ‘माईं’च्या जाण्याने महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान सुलोचना यांचा मुलगा विजय यांनी त्यांच्या निधनानंतर एक खंत व्यक्त केली आहे. Sulochana Chavan Son…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वाटप
ऊसाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल-  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष-राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त
प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन
आणि
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप, स्पर्धेत भारताने जिंकली एकूण सहा पदकं
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अत्यंत सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते शेतकरी आणि वैज्ञानिकांशी संवाद साधतील. यात ३४ नगदी पिकं आणि २७ बागायती पिकं आहेत. यात भरडधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस, कपाशी, तृणधान्य यांसह भाज्या, फळं, कंदमुळं, मसाले, औषधी वनस्पती, फुलं अशा विविध पिकांचा समावेश आहे.
****
देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही वर्षांत वर्षाकाठी एक हजार कोटी लीटर इतकी इथ���नॉलची गरज भासणार असून, भविष्यात इथेनॉल इंधनाच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढवण्याची तयारी केली पाहिजे, असं ते म्हणाले. २०३० पर्यंत २० टक्के इथेन��ल मिश्रित पेट्रोल तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शाह यांनी सांगितलं.
****
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते काल या प्रकल्पाबाबत माहिती देत होते. या प्रकल्पामुळे ६० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणं अपेक्षित असून, कार्बन उत्सर्जन ५४ कोटी किलो कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या मार्गासाठी सुमारे ९३५ हेक्टर भूसंपादन केलं जाणार असून, साडे २३ किलोमीटर अंतराचा देशातला सर्वाधिक लांबीचा बोगदा साकारला जाणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं.
****
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. सात हजार १५ कोटी रुपयांच्या या योजनेतून, पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून, १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या योजनेमध्ये नऊ धरणं प्रस्तावित आहेत. त्यातून २६० पूर्णांक ३० दशलक्ष घन मीटर पाणी उपसा करुन, चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतल्या एकूण ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना येत्या १७ तारखेला ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचं अनुदान खात्यात जमा केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल धुळ्यात झालेल्या सभेत बोलत होते. या योजनेअंतर्गत एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष पसरवला जात असल्याची खंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं नवनिर्माण यात्रेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. उपलब्ध संधीचा योग्य वापर केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही असं सांगत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले...
महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला अस वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठलं राज्य नाही आहे. या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नौकऱ्यापर्यंत, उद्योग - धंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असतांना बाह��रच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलींना मुलांना इथे मिळत नाहीत त्या ज्या महाराष्ट्रामधल्या जो कोटा आहे महाराष्ट्रातील ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत या जर समजा आपण नीट वापल्या महाराष्ट्रातील मुलामुलीसाठी, मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणांची गरज नाही.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजिक नक्षत्रवाडी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गृह प्रकल्पाचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं. या प्रकल्पाचं बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार असल्याने, संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास, सावे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडे सहा हेक्टर क्षेत्रावर एक हजार छपन्न सदनिका बांधण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत...
****
मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. विजय कदम यांनी मराठी नाटकं, चित्रपट तसंच दूरदर्शन मालिका अशा तीनही माध्यमांमधून अनेक वर्ष काम केलं. त्यांनी भूमिका साकारलेलं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य, तसंच ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ‘आम्ही दोघ राजा राणी’ आदी चित्रपटही खूप गाजले. कदम यांच्या पार्थिव देहावर काल अंधेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. गोल्फ मध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचंही आव्हान काल संपुष्टात आलं. या स्पर्धेत भारतीय खेळ���डुंचे सामने संपले असून, भारताने एक रौप्य आणि पाच कांस्य, अशी एकूण सहा पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडे बारा वाजता समारोप सोहळ्याला सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय कुसतीपटू विनेश फोगाटला अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. या याचिकेत विनेशनं संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे.  
****
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात काल राज्यस्तरीय मातंग समाज मेळावा घेण्यात आला. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था -आर्टी ची स्थापना केल्याबद्दल मातंग समाजाच्यावतीनं शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आरक्षण प्रश्नी लवकरच तोडगा निघेल, मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं.  
****
धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात मौजे बावची इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. याव��ळी शालेय विद्यार्थी आणि उमेद महिला स्वयंसहायता गटातल्या महिलांनी तिरंगा रॅली काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसंच, गावातल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळांसह विविध शाळांमधले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
****
परभणी इथं काल महसूल पंधरवाड्यामध्ये 'सैनिक हो तुमच्यासाठी' हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
****
परभणी इथं काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेत विविध पदाकरता विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातले जवळपास ३०० युवक या शिबिरात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात प्रशासनातर्फे आज विशेष मतदार नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे. पुढच्या आठवड्यातही १७ आणि १८ तारखेला हे अभियान पुन्हा राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 4 months
Text
एकांत
धरू नको तू एकांतहवीच कशाला खंत ।उघडुन डोळे बघ जराजग किती हे अनंत । वाऱ्या विना सारे इथेवाटते किती संथ ।आभास होतो मनातकण कण इथला शांत । काळ कुठे थांबतोतोही करतो अकांत ।फेर जीवनाचा हाशेवटाला होतो अंत ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
imcoupleofts · 3 years
Text
निर्दिशा व अंतहीन प्रवासं चाले आजंही।
जन्मजात अपेक्षेचे शिरावर ओझे आजंही।
मनाच्या कोपऱ्यातं सारं दुःख दाटे आजंही।
अखंडितं अनैच्छिकं रोज मरणे आजंही।
नाविलाजं या डोळ्यांत खंत वाहे आजंही।
प्रतिबिंब आरश्यात स्वप्न पाहे आजंही।।
अगणितं अकल्पितं सरी पडती सागरी।
अव्यक्त भावंविश्व धावे स्वार त्या लाटांवरी।
सूक्ष्म थेंब अंतरीच्या दृष्टीला निहाळती।
फक्त एक थेंब विलग होता शिंपल्यात जन्मति मोती।।
अस्वीकृत भावनेचे अनामिक भासे नावही।
जन्मजात अपेक्षेचे शिरावर ओझे आजही।।
अनभिज्ञ
2 notes · View notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' मोदी_आया_बेरोजगारी_लाया ' ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
‘ मोदी_आया_बेरोजगारी_लाया ‘ ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडलं असून काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत ‘भारत जोडो’ यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ प्रोजेक्ट चित्ता ‘ साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' मोदी_आया_बेरोजगारी_लाया ' ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
‘ मोदी_आया_बेरोजगारी_लाया ‘ ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडलं असून काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत ‘भारत जोडो’ यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ प्रोजेक्ट चित्ता ‘ साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' मोदी_आया_बेरोजगारी_लाया ' ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
‘ मोदी_आया_बेरोजगारी_लाया ‘ ट्विटरवर ट्रेंडिंग , चित्ता इव्हेन्टची काँग्रेसकडून पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडलं असून काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत ‘भारत जोडो’ यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ प्रोजेक्ट चित्ता ‘ साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes