Tumgik
#घाणेरडं
Text
bageshwar baba : बागेश्वर बाबा घाणेरडं काम करतो, अडवाणीसारखी गत होणार; तेज प्रतापनंतर आता शिक्षणमंत्र्यांची धमकी
https://bharatlive.news/?p=96806 bageshwar baba : बागेश्वर बाबा घाणेरडं काम करतो, अडवाणीसारखी गत होणार; तेज ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
३४ जिल्ह्यांच्या ३४० तालुक्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर.
भारत जोडो यात्रेमुळे संजीवनी मिळून, काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवत-माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश.
आणि
न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत पाकिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट विश्चचषकाच्या अंतिम फेरीत दाखल.
****
राज्याच्या ३४ जिल्ह्यात ३४० तालुक्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसंच सदस्य पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज जाहीर केला. १८ डिसेंबरला या निवडणूका होतील. या सर्व ठिकाणी आजपासून निवडणूक आचरसंहिता लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज १८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करु शकतील, ७ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील, याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिलं जाणार असून अंतिम यादी जाहीर केली जाईल. मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच अशी असेल मात्र, नक्षलग्रस्त भागांमध्ये ही वेळ सकाळी साडे सात ते दुपारी तीनपर्यंत राहील असं आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
आजपासून सुरु झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील प्रारंभ आज पुण्यातून झाला, त्यावेळी राजीव कुमार बोलत होते. शहरी मतदार आणि युवकांचा मतदान प्रक्रियेतला सहभाग वाढवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यानिमित्तानं मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
****
विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात २९ लाख दोन हजार ११९ मतदार असून यापैकी १३ लाख ७२ हजार ६३४ महिला मतदार, १५ लाख २९ हजार ३९६ पुरुष मतदार आणि ८९ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली असल्याचं जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितलं. जिल्ह्यात असलेल्या ८६१ ग्रामपंचायतींमध्ये उद्या विशेष ग्राम सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये मतदार यादीचं वाचन करण्यात येणार आहे.
नवमतदारांना जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला मतदार नोंदणी करता येणार असल्याचं पांडेय यांनी सांगितलं. आजपासून ८ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, युवा वर्ग नोकरीच्या शोधात आहे, तर मोठे उद्योग इतर राज्यात जात असताना, राज्यशासन या विषयांकडे दुर्लक्ष करून घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप युवा सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलावीत असं आवाहन ही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलं.
ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील संगेवाडी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
****
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांचा जामीन अर्ज काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयानं मंजूर केला आहे. गेल्या ३१ जुलैला राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं अटक केली होती. तब्बल शंभर दिवसांनंतर संजय राऊत यांना दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन अर्ज मंजूर झाला आहे.
या निर्णयाला ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र, कार्यालयीन प्रक्रियेविरोधात जाऊन निकाल देऊ शकत नसून, उद्या यासंदर्भात सुनावणी घेणार असल्याचं सांगत, उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली.
****
दापोली रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना खेड सत्र न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दापोलीच्या साई रिसॉर्टमधील कथित घोटाळ्यात परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल प्रकरणी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अनिल परब यांनी फसवणूक आणि आर्थिक घोटाळा तसंच मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमिनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप ���ाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. परब यांनी हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, हे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज राजभवन इथं राज्यपालांची भेट घेऊन अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीचं निवेदन दिलं. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांकडून महिलांविषयी बेताल आणि मानहानीकारक वक्तव्य करून राज्यातील महिलांचा अपमान केला जात असल्याची तक्रार या शिष्टमंडळानं केली. मंत्रिमंडळ विस्तारातही एकाही महिलेला स्थान न देऊन सत्ताधारी पक्षातील महिला लोकप्रतिनिधींचा हक्क हिरावून घेत राज्यातील समस्त महिलांविषयी आपला आकसभाव दाखवला असल्याचंही शिष्टमंडळानं म्हटलं आहे.
****
ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळून, पक्ष पुनरुज्जीवत झाल्याची भावना माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं पोहोचली असता, रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांचे प्रश्न जाणून घेत, त्याला वाचा फोडण्यासाठी भारत जोडो यात्रा काढल्याचं रमेश यांनी नमूद केलं. विमुद्रीकरणासह केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर तसंच सामाजिक संपर्क माध्यमांवरील कारवाईवर रमेश यांनी टीका केली. येत्या १७ तारखेला शेगाव इथं राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती रमेश यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक विश्लेषक तथा राजकीय तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. ही यात्रा नायगाव तालुक्यात देगाव इथं पोहोचताच, यादव या यात्रेत सहभागी झाले. यापूर्वी आपण काँग्रेसविरोधात अनेक आंदोलने केली, मात्र ती आंदोलनं परिस्थितीजन्य होती. सध्याची परिस्थिती पाहता, आपण या यात्रेत सहभागी झाल्याचं यादव यांनी सांगितलं.
आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाचशे कार्यकर्त्यांनी संबळाच्या तालावर या यात्रेत ठेका धरला. त्यासाठी तुळजापूर इथं मंदिराच्या प्रांगणात असलेल्या २७ संबळ वादकांची निवड करण्यात आली होती.
****
पाकिस्तान संघानं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंड संघाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडचा संघ निर्धारित षटकांत चार बाद १५२ धावांच करू शकला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानच्या संघानं सात गडी आणि पाच चेंडू शिल्लक असतानाच, हे उद्दीष्ट साध्य केलं.
दरम्यान, या स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्याशी येत्या रविवारी १३ तारखेला अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाची लढत होणार आहे.
****
गुरुदेव नानक यांचं कार्यकर्तृत्त्व आणि विचारदर्शन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यास तसंच नवभारताच्या उभारणीस प्रेरक ठरलं, असं मत ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरु डॉ. वि. ल. धारुरकर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं नारायणराव उजळंबकर वाचनालयात ‘गुरुदेव नानकांचं समाजप्रबोधन’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळंबकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल गुरुदीपसिंह बग्गा यांची उपस्थिती होती. धारुरकर यांनी आपल्या व्याख्यानातून गुरुनानक यांच्या कार्याला उजाळा दिला.
****
0 notes
survivetoread · 4 years
Text
The unconventional use of अं in Marathi
The symbol अं [aṅ] is a staple of the Devanagari writing system, where it’s referred to as the anusvāra. Its most common use, across languages, is to nasalise a syllable.
So if you write the word डंड [ḍaṅḍa] (penalty), you are giving a nasal sound to the first syllable, i.e. ड [ḍa].
However, Marathi also uses अं in a unique, alternate way.
In Marathi, a number of words that used to end in the vowel ए [e] are now pronounced with the vowel अ [a]. These words come to mind:
केळे [keḷe], now [keḷa] (banana)
घाणेरडे [ghāṇerḍe], now [ghāṇerda] (filthy, singular neuter)
मुले [mule], now [mula] (kids, boys)
पाने [pāne], now [pāna] (leaves)
If a sound has changed over time, the solution should be to change the spelling of the word, right?
But it’s not that simple.
In the Devanagari script, the vowel अ [a] is ‘inherent’. There is no special symbol to denote it in writing, because it is assumed that if there is no other vowel sign, then the अ is indeed pronounced.
For eg. the word स्वर is pronounced as [svara], and the word गणेश is pronounced as [gaṇeśa].
Now this might be true for Sanskrit, but in Marathi, there are many times where the ‘inherent’ vowel अ is not pronounced at all, even though it technically exists.
In fact, this happens a lot at the end of words. In all of the following words, the ending vowel अ is not pronounced:
जहाज [jahāz], not [jahāza] (ship)
गाय [gāy], not [gāya] (cow)
लाल [lāl], not [lāla] (red)
स्वर [svar], not [svara] (sound)
गणेश [gaṇeś], not [gaṇeśa] (The deity Ganesh)
In fact, this is so common that as a rule, you do not pronounce the inherent अ at the end of a word, unless you explicitly know you should.
This presents a problem when you consider that the pronunciation of some -ए ending words has become -अ (like केळे, मुले, and so on).
If you were to write केळ, it might too easily be pronounced as simply [keḷ], rhyming with the word वेळ [veḷ] (time). If you were to write घाणेरड, it might be pronounced as [ghāneraḍ], which is completely wrong.
To solve this, Marathi transcribers now use the anusvāra to serve as a symbol for the inherent अ.
Therefore, now we have केळं [keḷa], घाणेरडं [ghāṇerḍa], and मुलं [mula].
It’s not perfect, because this could cause some readers to read the words with a nasal syllable instead. However, this is avoided because Marathi has few real words that end with a nasal syllable. If you see a word that ends with -अं in Marathi, that almost always means the final inherent अ is pronounced in that word.
29 notes · View notes
darshanpawarjb · 4 years
Text
Tumblr media
माझ्यासोबत एका ताटात बसून जेवणाऱ्या "९६ कुळी" मित्राचा काल त्याच्या गावाहून कॉल आला.…खूप वैतागलेला होता.... म्हटलं का काय झालं ? तर म्हणे गावी आलो गावच्या शाळेत १४ दिवस काॅरंटाईन करून ठेवलंय... आमचं अक्ख कुटुंब सोबत आहे.. पण हे सगळे गावातले इतकी शिवाशिव पाळत आहेत की तळ पायाची आग मस्तकात जात आहे..... मुंबईहुन थोडं फार खाऊ घेऊन गेलो गावच्यांसाठी तर त्यांनी चक्क नाकारलं.... म्हणे तुमचं काही घ्यायचं नाही असं ठरलं आहे गावात... घरून जेवण जरी आणून दिलं तरी ६ फूट लांबून गेटवर कुत्र्याला जेवण ठेवतो तस ठेवून निघून जातात.. जेवलेले डब्बे ही आम्ही धुवून स्वच्छ करून दिले तरी डायरेक्ट हातात न घेता जमिनीवर ठेवायला सांगतात...."माझा ६ वर्षांचा मुलगा म्हटला पप्पा आपल्याला कोरोना झालाय का " ? अशी वागणूक आजवर ही आम्ही तुमच्या बौद्ध समाजाशी गावात करत होतो...... आज कळालं किती घाणेरडं फील होतं ते..... एकदा हा काॅरंटाईन संपुदे मग बघतो एका एकाला मी हसून फक्त म्हटलं मग आमच्या बाप - जाद्यांनी शेकडो वर्षे हा अपमान आणि हीन वागणूक कशी सहन केली असेल ?
ही शिवाशिवीची - अस्पृश्यतेची चीड आमच्या मनात शेकडो वर्षे धुमसत होती त्याचा वणवा महामानव #डॉ_बाबासाहेबानी पेटवला आणि या अस्पृश्यतेच समर्थन आणि मांडणी करणारा मनुस्मृती हा ग्रंथ जाळला.... काय चूक केली बाबासाहेबांनी ? मित्र निरुत्तर होता...... फक्त एवढंच बोलला, सॉरी यार मी मनापासून पुर्वजांनी केलेल्या नीच वागणुकीबद्दल मनापासून सॉरी बोलतोय खरचं मी दोन दिवसात स्वतः ला लाचार , हीन आणि दोषी असल्यासारखं समजू लागलोय..... मी उत्तर दिलं, मित्रा तुला हे फील झालं यातच तुझ्यातला माणूस जिवंत आहे याचं मला समाधान वाटतंय....!!! मित्र धीर-गंभीर आवाजात म्हंटला, भाई जय भिम..!!! बाबासाहेबांनी खूप मोठा लढा लढलाय या मानवतेसाठी, त्या महामानवास तोड नाही....!!!! #जय_भिमच...!!! मी ही अंतकरणातून त्याला जय भिम म्हटलं...!!!! फोन ठेवला आणि माझ्या पुर्वजांना शेकडो वर्षे केलेलं काॅरंटाईन आठवू लागलो... Thanks #Dr_Babasaheb_Ambedkar💕
0 notes
kokannow · 4 years
Text
विरोधी पक्षाचं घाणेरडं राजकारण सहन करणार नाही
विरोधी पक्षाचं घाणेरडं राजकारण सहन करणार नाही
मुंबई :महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कोरोनाची पर्वा �� करता रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोना किंवा अन्य कोणत्याही आजाराचा रुग्ण असला तरी पालिका रुग्णालयात उपचारांचा यज्ञ सुरु आहे. अनेक आरोग्य कर्मचारी क्वारंटाइन होत आहेत; तरीही कोणी रुग्णांच्या सेवेपासून इंचभरही हललेला नाही. तरीही विरोधी पक्ष यातून घाणेरणं राजकरण करत असेल तर मी सहन करणार नाही, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान
Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान कोलेस्टेरॉलची वाढती पातळी ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. कोलेस्टेरॉलच्या समस्येमुळे अनेकांना हृदयाशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ असून रक्ताच्या नसांमध्ये आढळतो. महत्वाच म्हणजे कोलेस्ट्रॉलची निर्मिती तुमच्या आहारातूनच होत असते. तसेच यकृतामध्ये देखील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रक्तात घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल वाढवतात हे 6 पदार्थ, जपन खा नाहीतर कधीही येईल हार्ट अटॅक
रक्तात घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल वाढवतात हे 6 पदार्थ, जपन खा नाहीतर कधीही येईल हार्ट अटॅक
रक्तात घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल वाढवतात हे 6 पदार्थ, जपन खा नाहीतर कधीही येईल हार्ट अटॅक High Cholesterol : कोलेस्टेरॉल हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्हीही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल (good cholesterol) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (bad cholestrol) अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्या कोलेस्ट्रॉलला HDL (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि वाईट कोलेस्ट्रॉलला LDL (लो डेन्सिटी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण' - सामना
‘शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण’ – सामना
‘शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण’ – सामना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. “तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही,”असं वक्तव्य त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये केलं.    “आम्ही म्हणे संभाजीराजेंना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले
तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले
तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेताना देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरु असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** शालेय शुल्कासंदर्भात राज्यस्तरीय तसंच विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार
** अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांच्या नुकसानाचे सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश  
** वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी
** जालना जिल्ह्यात येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच आठवडी बाजार बंद
आणि
** उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश
****
शालेय शुल्कासंदर्भात राज्यस्तरीय तसंच विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. पालकांनी या समित्यांकडे शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी पाठवाव्या, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. शालेय शुल्कासंबंधी प्राप्त तक्रारींसंदर्भात झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. कोविड कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून शुल्कासाठी तगादा लावला, शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणं, सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणं, उशिरा शुल्क भरल्यास दंड वसूल करणं, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले आहेत. अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात वडेट्टीवार यांनी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून आढावा घेतला. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ��रंगाबाद, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या नुकसानाचा सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
****
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून आपलं ३० वर्षांचं सामाजिक राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे. ते आज वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबद्दल आपल्याला दु:ख आहे, मात्र या प्रकरणावरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं राठोड यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यातून सत्य बाहेर येईल, मात्र समाज माध्यमं तसंच प्रसार माध्यमातून होणारी बदनामी थांबवा, असं आवाहनही राठोड यांनी केलं.
राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते
या गर्दीच्या अनुषंगानं बोलताना, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी, समाजाची आड घेऊन राठोड हे आपण निरागस असल्याचा दावा करत असल्याचं सांगत, समाजाला वेठीस धरून घोषणाबाजी केल्याने मुद्दा बदलत नाही, कारण गुन्हेगाराला जात नसते, असं चित्रा वाघ यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी नोंद घेऊन कारवाई करावी. हा प्रश्न फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर लैंगिक अत्याचार पीडित सगळ्या महिलांशी हा प्रश्न निगडित असल्याचं मत वाघ यांनी मांडलं. हे सरकार अत्याचाऱ्यांना अभय देण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. भुसे यांनी आज दिल्लीत केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन ही मागणी केली. राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे ४४ लाख ५० हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदा ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.
****
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी, तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अशोक मिरगे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयात गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आलं. रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ अशोक मुंडे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत आहे. रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, आणि मनपा आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय झाला. येत्या १४ मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू, औद्योगिक क्षेत्र आणि त्यातले कर्मचारी यांना या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच तालुका आणि गाव पातळीवरचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज याबाबत माहिती दिली. दहावी आणि १२ वीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महसूल आणि पोलीस प्रशासनानं दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली असल्याचं जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितलं.
****
लातूर इथं विद्यार्थ्याच्या एका वसतीगृहात ४५ विद्यार्थ्याना कोविडची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आलं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांनी ही माहिती दिली. औद्योगिक वसाहतीत असलेल्या या वसतीगृहाल्या बाधित विद्यार्थ्याना बार्शी रस्त्यावरील कोवीड केंद्रात ठेवण्यात आलं आहे. पालिकेने या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. वसतीगृहाला लागून असलेल्या इमारतीत इंग्रजी शाळा भरवली जाते, ही शाळा सुध्दा पुढचे दहा दिवस बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी ही माहिती दिली. वैद्यकीय पथकामार्फत सर्व प्रवाशांची अॅटीजेन चाचणी केली जाणार आहे. कोविड बाधित आढळणाऱ्या रुग्णांना परत पाठवून विलगीकरणात ठेवण्यात येईल, असं जिल्हाधिकारी ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधून नियंत्रण ठेवत होतं. जिल्हाधिकाऱ्यांसह या पथकाने शहरातल्या अनेक भागातून पायी निरीक्षण करत, काही वाहनधारकांना समज दिली तर काहींना दंडही ठोठावला. व्यापाऱ्यांनाही मास्क वापरणं, सॅनिटायझरची व्यवस्था करणं, सामाजिक अंतर राखणं आदी सूचना करण्यात आल्या
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. उस्मानाबाद शहरात १४ फेब्रुवारीला तर लोहारा तालुक्यात मार्डी इथं १५ फेब्रुवारीला हे विवाह होणार होते. जिल्हा बाल संरक्षण् अधिकारी ए.बी. कोवे यांच्या मार्गदर्शनात शेवटच्या क्षणी विवाहस्थळी पोहोचून हे विवाह थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर कायमस्वरुपी भर्तीसाठी आज बँकेच्या सुमारे एक हजार ९०० शाखांमधल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून बँकेत रिक्त पदांवर भर्ती झालेली नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात २६ फेब्रुवारीला बँकेच्या सर्व ३२ प्रादेशिक कार्यालयांसमोर, ६ मार्च रोजी बँकेच्या पुण्यातल्या मुख्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत. तर १२ मार्च रोजी देशव्यापी संपाचा इशारा ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशननं दिला आहे.
****
पंढरपूर इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदीर उद्या द्वादशीलाही बंद राहणार आहे. आज माघी एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पंढरपुरात संचार बंदी लावलेली आहे. ही संचारबंदी उठल्यानंतर भाविक उद्या द्वादशीला येण्याची शक्यता असल्याने, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदीर उद्याही बंद राहणार असल्याचं, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामान्यांच्या मालिकेतला तिसरा सामना उद्यापासून अहमदाबाद इथं सुरू होणार आहे. दिवस आणि रात्र खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याला दुपारी अडीच वाजता सरुवात होईल. मालिकेत एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत.
//********//
0 notes
kokannow · 5 years
Text
“भाजपाचं राजकारण गुंडांपेक्षाही घाणेरडं; हे महाराष्ट्रात चालणार नाही”- संजय राऊत 
मुंबई: ​शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. “ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यानी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच उलटलं आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडागर्दीचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांची नावं लवकच जाहीर करू, पण भाजपाचं राजकारण गुंडाच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. हे महाराष्ट्रात चालणार नाही,” असा आरोप संजय…
View On WordPress
0 notes