Tumgik
#स्वीकारण्याची
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वाटप
ऊसाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल-  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष-राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त
प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन
आणि
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप, स्पर्धेत भारताने जिंकली एकूण सहा पदकं
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अत्यंत सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते शेतकरी आणि वैज्ञानिकांशी संवाद साधतील. यात ३४ नगदी पिकं आणि २७ बागायती पिकं आहेत. यात भरडधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस, कपाशी, तृणधान्य यांसह भाज्या, फळं, कंदमुळं, मसाले, औषधी वनस्पती, फुलं अशा विविध पिकांचा समावेश आहे.
****
देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही वर्षांत वर्षाकाठी एक हजार कोटी लीटर इतकी इथेनॉलची गरज भासणार असून, भविष्यात इथेनॉल इंधनाच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढवण्याची तयारी केली पाहिजे, असं ते म्हणाले. २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शाह यांनी सांगितलं.
****
जालना - जळगाव रेल्वेमार्ग पुढच्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते काल या प्रकल्पाबाबत माहिती देत होते. या प्रकल्पामुळे ६० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणं अपेक्षित असून, कार्बन उत्सर्जन ५४ कोटी किलो कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या मार्गासाठी सुमारे ९३५ हेक्टर भूसंपादन केलं जाणार असून, साडे २३ किलोमीटर अंतराचा देशातला सर्वाधिक लांबीचा बोगदा साकारला जाणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं.
****
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. सात हजार १५ कोटी रुपयांच्या या योजनेतून, पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून, १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या योजनेमध्ये नऊ धरणं प्रस्तावित आहेत. त्यातून २६० पूर्णांक ३० दशलक्ष घन मीटर पाणी उपसा करुन, चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतल्या एकूण ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना येत्या १७ तारखेला ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचं अनुदान खात्यात जमा केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल धुळ्यात झालेल्या सभेत बोलत होते. या योजनेअंतर्गत एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राजकीय स्वार्थासाठी राज्यात जातीय द्वेष पसरवला जात असल्याची खंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं नवनिर्माण यात्रेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. उपलब्ध संधीचा योग्य वापर केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही असं सांगत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले...
महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला अस वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठलं राज्य नाही आहे. या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नौकऱ्यापर्यंत, उद्योग - धंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असतांना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलींना मुलांना इथे मिळत नाहीत त्या ज्या महाराष्ट्रामधल्या जो कोटा आहे महाराष्ट्रातील ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत या जर समजा आपण नीट वापल्या महाराष्ट्रातील मुलामुलीसाठी, मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणांची गरज नाही.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजिक नक्षत्रवाडी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गृह प्रकल्पाचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं. या प्रकल्पाचं बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार असल्याने, संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास, सावे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडे सहा हेक्टर क्षेत्��ावर एक हजार छपन्न सदनिका बांधण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत...
****
मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. विजय कदम यांनी मराठी नाटकं, चित्रपट तसंच दूरदर्शन मालिका अशा तीनही माध्यमांमधून अनेक वर्ष काम केलं. त्यांनी भूमिका साकारलेलं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य, तसंच ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ‘आम्ही दोघ राजा राणी’ आदी चित्रपटही खूप गाजले. कदम यांच्या पार्थिव देहावर काल अंधेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. गोल्फ मध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचंही आव्हान काल संपुष्टात आलं. या स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे सामने संपले असून, भारताने एक रौप्य आणि पाच कांस्य, अशी एकूण सहा पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडे बारा वाजता समारोप सोहळ्याला सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय कुसतीपटू विनेश फोगाटला अपात्र केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा न्यायालय येत्या मंगळवारी १३ तारखेला निकाल सुनावणार आहे. या याचिकेत विनेशनं संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे.  
****
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात काल राज्यस्तरीय मातंग समाज मेळावा घेण्यात आला. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था -आर्टी ची स्थापना केल्याबद्दल मातंग समाजाच्यावतीनं शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आरक्षण प्रश्नी लवकरच तोडगा निघेल, मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं.  
****
धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात मौजे बावची इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी आणि उमेद महिला स्वयंसहायता गटातल्या महिलांनी तिरंगा रॅली काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसंच, गावातल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळांसह विविध शाळांमधले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
****
परभणी इथं काल महसूल पंधरवाड्यामध्ये 'सैनिक हो तुमच्यासाठी' हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता-पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
****
परभणी इथं काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेत विविध पदाकरता विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातले जवळपास ३०० युवक या शिबिरात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात प्रशासनातर्फे आज विशेष मतदार नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे. पुढच्या आठवड्यातही १७ आणि १८ तारखेला हे अभियान पुन्हा राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
mhadalottery2023 · 4 months
Text
सीमा सुरक्षा दलात मोठी भरती! 2158 रिक्त पदांची नवीन भरती सुरू! | BSF Bharti 2023
BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दलात काम करून देशसेवा करण्याची चांगली संधी आहे. सीमा सुरक्षा दलातील रिक्त पदे भरण्यासाठी ही नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. भारतीय द्वारे प्रकाशित. ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये दिल्या आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months
Text
22. संतुलन हा परमानंद आहे
गीतेच्या अगदी सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात की, इंद्रियांचे बाह्य वस्तूंशी मिलन झाल्यामुळे सुख आणि दुःख होते (2.14). तो अर्जुनाला त्यांना सहन करणे शिकायला, कारण ते अशाश्वत आहेत. समकालीन जगात याला ‘हाही काळ जाईल’ असे म्हणतात. जर ते प्रायोगिक स्तरावर विकसित केले गेले, तर आपण या ध्रुवांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्यांना समानतेने स्वीकारण्याची क्षमता असू शकते.
आपल्याकडे पाच इंद्रिये आहेत; दृष्टी, ऐकणे, गंध, चव आणि स्पर्श. ती अनुक्रमे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच अवयवांशी संबंधित आहेत. विविध अवयवांकडून आलेल्या अनुभवांवर प्रक्रिया करण्याचे काम मेंदूतील विशिष्ट भागाकडे असते.
तथापि, या संवेदी साधनांना अनेक मर्यादा आहेत. उदाहरणार्थ डोळा, तो प्रकाशाच्या विशिष्ट वारंवारतेवर प्रक्रिया करू शकतो ज्याला आपण दृश्यमान प्रकाश म्हणतो. दुसरे, तो प्रति सेकंद 15 पेक्षा जास्त प्रतिमांवर प्रक्रिया करू शकत नाही आणि हा चित्रपट तयार करण्यासाठी आधार आहे जा आपल्याला स्क्रीनवर पाहण्यात आनंद होतो. तिसरे, आपल्याला एखादी वस्तू बघणे शक्य व्हावे यासाठी एका किमान पातळीवरचा प्रकाश आवश्यक असते. इंद्रियांच्या या मर्यादांमुळे आपल्याला सत (शाश्वत) आणि असत (अशाश्वत) यांच्यात फरक करणे जमत नाही आणि आपण दोरीला साप समजायला लागतो.
मेंदूतील या उपकरणांचे संवेदी भाग देखील उपकरणांच्या मर्यादांनी बांधलेले असतात. दुसरे म्हणजे, बालपणात त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली गेली त्याचा त्यांना त्रास होतो. परिणाम प्रेरित धारणा आहे ज्यामुळे आपल्याला वास्तविकतेऐवजी जे पहायचे आहे ते आपण पाहतो.
सत्य पाहण्याची असमर्थता आणि असत्यकडचा ओढा दुःखाला कारणीभूत ठरतो. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही सुख आणि दु:खाच्या आघातामध्ये समतोल साधता तेव्हा तुम्ही अमृताला (मोक्षास) पात्र असता (2.15), जी मुक्ती, इथे आणि आता आहे.
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
नाशिकमध्ये पुन्हा बडा मासा गळाला , पन्नास लाख पाहिजे होते पण..
नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रमी कारवाया सुरू केलेल्या असून पुन्हा एकदा एक बडा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलेला आहे. एका कंपनीला नोटीस पाठवल्यानंतर तिच्यावर कारवाई न करण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी करून अखेर 40 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
शाश्वत विकासासाठी नवीन प्रारुप स्वीकारणे आवश्यक - शेर्पा अमिताभ कांत
शाश्वत विकासासाठी नवीन प्रारुप स्वीकारणे आवश्यक – शेर्पा अमिताभ कांत
मुंबई, दि. १३ : भारत जगाचे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनण्याची क्षमता असलेला देश आहे. त्यासाठी भारताने नवीन प्रारुप स्वीकारण्याची गरज असून हे नवीन प्रारुप स्वीकारुन भारत यशस्वी होईल, असे जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितले. बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट या परिसंवादात…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
शाश्वत विकासासाठी नवीन प्रारुप स्वीकारणे आवश्यक - शेर्पा अमिताभ कांत
शाश्वत विकासासाठी नवीन प्रारुप स्वीकारणे आवश्यक – शेर्पा अमिताभ कांत
मुंबई, दि. १३ : भारत जगाचे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनण्याची क्षमता असलेला देश आहे. त्यासाठी भारताने नवीन प्रारुप स्वीकारण्याची गरज असून हे नवीन प्रारुप स्वीकारुन भारत यशस्वी होईल, असे जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितले. बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट या परिसंवादात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता
भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता
भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता सध्या इंग्लंडमधील क्रिकेट जगतात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी क्रिकेटपटू जो रुट याने इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कर्णधाराच्या शोधात होता. हा शोध आता पूर्ण झाला असून बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे…
View On WordPress
0 notes
navinyaurban · 2 years
Photo
Tumblr media
नविन्य अर्बन च्या विविध सुविधा* 🟥 SMS सुविधा. 🟧 NEFT,RTGS,IMPS सुविधा 🟩 FD,RD,MIS,PIGMY,SAVING,LOAN AC. सुविधा. 🟪 फोन पे ,गुगल पे इतर कोणत्याही UPI अँप वरून पैसे स्वीकारण्याची सुविधा. 🟦 आपल्या खात्यातून इतर कोणत्याही बँकेत, जगाभरात कुठेही पैसे पाठवण्याची सुविधा. 🟨 कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक चे पैसे काढण्याची सुविधा. 🟥 मोबाईल अँप सुविधा. 🏦 *नावीन्य अर्बन बँक 🏦* *ह्या सर्व सुविधा आपल्या गावात देत आहे , तर मग विचार कसला करताय आजच आपले बचत खाते ओपन करा व या सर्व सुविधांचा लाभ घ्या.* 👍 अधिक माहितीसाठी 9370125455 / 7350404036 वर कॉल करा. #navinyaurban #navinyaurbanpimparkhedbk #dhakalgaon #pimparkhedbk #navinyaurban #navinyaurbanpimparkhedbk #dhakalgaon #amolbone #pimparkhedbk navinya #dadhegaon #dhakalgaon #goldloan #loan #karj #dalycollection #pigmy #rd #fd #goldloan #sonetarankarj #upi #aeps #qrcode #phonepe #fixeddeposit #recuringdeposit #mis #pimparkhed_bk #bank #navinyaurbansuvidha https://www.instagram.com/p/CiOq8YiJM6R/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०९ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियात मॉस्को इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत २२व्या भारत - रशिया वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेत उभय नेते संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सहकार, शिक्षण, यासह विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच सैनिक हुतात्मा झाले, तर पाच जण जखमी झाले. गस्तीवर असलेल्या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली. या भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
****
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्यासंदर्भात राज्यं आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून एक धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. महिला कल्याण मंत्रालयानं यासंदर्भात संबंधितांशी बैठका घ्याव्यात आणि यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार करावा, असंही न्यायालयानं काल यासंदर्भातल्या सुनावणी दरम्यान सांगितलं.
****
खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण���यात आली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
****
मुलींना शिक्षणात १०० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शासन निर्णय काल जाहीर झाला. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाहून कमी असेल, अशा कुटुंबाना ही सवलत दिली जाईल. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार असून, यासाठी ९०६ कोटी पाच लाख रुपये एवढा निधी मंजूर कऱण्यात आला आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर, त्यांनी ही माहिती दिली.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
Sidhu : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी मी राजीनामा मागे घेत आहे : नवज्योत सिंग सिद्धू
#Sidhu : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी मी राजीनामा मागे घेत आहे : नवज्योत सिंग सिद्धू #Congress #Punjab
Sidhu : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांनीमात्र कारभार स्वीकारण्याची अट घातली आहे. नवीन एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावरमी पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन, असे सिद्धू यांचे म्हणणे आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनीचरणजीत सिंग चन्नी सरकारच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामा दिला होता.नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज चंदीगडमध्ये पत्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय महासचिव अमर हबीब यांनी व्यक्त केले.
0 notes
amhikastkar · 3 years
Text
अकोला जिल्हा परिषदेचा निवडणूक आखाडा 
अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी १९ जुलैला मतदान होणार असून यासाठी मंगळवार (ता. २९) पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. यासोबतच निवडणुकीची रणधुमाळी वेग घेणार आहे. निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की सोबत याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांचा निर्णय अंतिम झालेला नसल्याने स्थानिक पातळ्यांवर चाचपणीचे काम सुरू आहे. अकोला, वाशीम जिल्हा परिषदांच्या प्रत्येकी १४ जागा रिक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
पळ काढण्याचा इतिहास समीर नलावडे, गोट्या सावंत यांचाच!
पळ काढण्याचा इतिहास समीर नलावडे, गोट्या सावंत यांचाच!
दोन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्या नलावडेंनी आव्हानाची भाषा करू नये; नगरसेवक सुशांत नाईक यांचा टोला कणकवली : आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघा भावांना हिंमत असेल तर खुल्या मैदानात उतरून दाखवण्याचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान स्वीकारण्याची निलेश-नितेश या दोन्ही भावांमध्ये हिंमत नसल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. त्यासाठीच त्यांनी वैभव नाईकांविरोधात लोमत्यांना पुढे करून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
मुंबई, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या संकल्पेनवर मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी नागरिकांचा मिळालेला प्रचंड सहभाग पाहता भारत निवडणूक आयोगाने या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 केली आहे. पूर्वी ही मुदत 15 मार्च 2022 अशी होती. सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
निकालांनंतर स्वीकारण्याची सत्ये..
निकालांनंतर स्वीकारण्याची सत्ये.. योगेन्द्र यादव कोणत्याही पराजिताची आपल्या पराभवाची कारणमीमांसा करण्याची एक पद्धत असते. बहुतांश वेळा ती ठरलेली आणि पराभव नाकारणारी असते. पण मोठय़ा लढाईची तयारी करायची असेल तर सगळ्यात आधी पराभव स्वीकारण्याची तयारी दाखवायला हवी..  ‘पोटात जोराचा गुद्दा मारल्यासारखं वाटतंय’ अशीही एक प्रतिक्रिया मला आलेल्या व्यक्तिगत संदेशांमध्ये होती. उत्तर प्रदेशासह अन्य चार…
View On WordPress
0 notes
navinyaurban · 2 years
Photo
Tumblr media
नविन्य अर्बन च्या विविध सुविधा* 🟥 SMS सुविधा. 🟧 NEFT,RTGS,IMPS सुविधा 🟩 FD,RD,MIS,PIGMY,SAVING,LOAN AC. सुविधा. 🟪 फोन पे ,गुगल पे इतर कोणत्याही UPI अँप वरून पैसे स्वीकारण्याची सुविधा. 🟦 आपल्या खात्यातून इतर कोणत्याही बँकेत, जगाभरात कुठेही पैसे पाठवण्याची सुविधा. 🟨 कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक चे पैसे काढण्याची सुविधा. 🟥 मोबाईल अँप सुविधा. 🏦 *नावीन्य अर्बन बँक 🏦* *ह्या सर्व सुविधा आपल्या गावात देत आहे , तर मग विचार कसला करताय आजच आपले बचत खाते ओपन करा व या सर्व सुविधांचा लाभ घ्या.* 👍 अधिक माहितीसाठी 9370125455 / 7350404036 वर कॉल करा. #navinyaurban #navinyaurbanpimparkhedbk #dhakalgaon #pimparkhedbk #navinyaurban #navinyaurbanpimparkhedbk #dhakalgaon #amolbone #pimparkhedbk navinya #dadhegaon #dhakalgaon #goldloan #loan #karj #dalycollection #pigmy #rd #fd #goldloan #sonetarankarj #upi #aeps #qrcode #phonepe #fixeddeposit #recuringdeposit #mis #pimparkhed_bk #bank #navinyaurbansuvidha https://www.instagram.com/p/CiOq575Jq9M/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes